वृक्ष लागवड.

दत्ताभाऊ गोंदीकर's picture
दत्ताभाऊ गोंदीकर in काथ्याकूट
17 Apr 2016 - 12:13 pm
गाभा: 

मला घराभोवती वृक्ष लागवड करायची आहे .त्यासाठी कोणत्या वृक्षाची निवड करु.मिपावर बरीच जाणती मंडळी आहेत ,त्यांनी मार्गदर्शन करावे.

प्रतिक्रिया

विजय पुरोहित's picture

17 Apr 2016 - 12:14 pm | विजय पुरोहित

आंबा, चिक्कू तर नक्कीच करा. मौसमात फळे मिळतातच. हल्ली त्यांची छोटी व्हरायटीपण मिळतात.

चांदणे संदीप's picture

17 Apr 2016 - 2:11 pm | चांदणे संदीप

घर कुठल्या भागात आहे - थोडक्यात पत्ता, घराचे क्षेत्रफळ, उपलब्ध मोकळी जागा इ. जरा सविस्तर सांगितलेत तर सविस्तर सांगता येईल ना!

पुण्यात घर आहे असे धरून असाच एक सल्ला देऊन टाकतो... पुणे विद्यापीठाच्या सर्कारी नर्सरीत जा... तिथे झाडांची रोपेही स्वस्तात मिळतात, भरपूर प्रकारही उपलब्ध आहेत, आणि त्यांच्याकडूनच योग्य ते मार्गदर्शनही मिळेल.

धन्यवाद,
Sandy

नाखु's picture

18 Apr 2016 - 9:26 am | नाखु

शेतकी महाविद्यालयाची जी स्पायसर रोडवर आहे ती नाही ना?

अति अवांतर : संदीपभौ घरी पाय्धूळ झाडणे म्हणजे या विषयावर बोलता येईल.

ता.क. वल्लींना घेऊन येणे म्हणजे घर शोधायला लागणार नाही.

चांदणे संदीप's picture

18 Apr 2016 - 10:15 am | चांदणे संदीप

आयुकापासून थोड आत गेलं की, डाव्या बाजूला आत आहे ही नर्सरी आणि स्पायसर रोडवर खडकीकडे जाताना डाव्या बाजूला बॉटनिकल गार्डन आहे. तिथेही रोपे मिळतात. फळेही स्वस्त मिळतात तिथे.

अति अवांतर : संदीपभौ घरी पाय्धूळ झाडणे म्हणजे या विषयावर बोलता येईल.

काय चेष्टा करताय राव गरीबाची! :( मी तर इतका रिकामटेकडा आहे की, कदाचित मला घरातून हाकलण्याचीही वेळ तुमच्यावर येऊ शकते! ;)

शनिवारी/रविवारी आलो तर चालेल का? वेळ तुमच्या सोयीप्रमाणे...

कोणत्या भागात? कोकण,खानदेश,मराठवाडा,कराड कोल्हापुर?

दत्ताभाऊ गोंदीकर's picture

17 Apr 2016 - 3:13 pm | दत्ताभाऊ गोंदीकर

इंदापूरला.जागा ३० गुठांच्या आसपास आहे.घराचे क्षेत्र.२५००स्वेफूट.आहे.

चांदणे संदीप's picture

17 Apr 2016 - 3:34 pm | चांदणे संदीप

अरे वा! शेठ, आता अजून थोडीच माहिती द्या.... जसे की..

१) नक्की काय हेतूने झाड लावायचीत? म्हणजे उत्पन्नासाठी का शोभेसाठी किंवा इतर काही असल्यास तेही सांगावे
२) वृक्ष लागवड करण्यासाठीचे बजेट काय योजले आहे
३) ह्या सर्वांसाठी तुमच्याकडे माणसे आहेत का स्वत: सगळे करायचा विचार आहे?

हे सगळ विचारायचं कारण म्हणजे जेवढं नॅरो डाऊन करू तेवढी पर्यायांची निवड सोपी व ठळक होत जाईल. शिवाय, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काय करता येते का तेही पाहता येईल. कारण, अनेक चांगले नवनवीन प्रयोग वाट पाहत जागेची आणि ते करण्याची तयारी असणाऱ्या माणसांची. :)

Sandy

दत्ताभाऊ गोंदीकर's picture

17 Apr 2016 - 4:21 pm | दत्ताभाऊ गोंदीकर

सविस्तर सांगतो.१)माझं घर रस्ताच्याजवळ आहे.वाहतूकीमुळे धूळ उडते सारखी अन् घरात येते.ती काही प्रमाणात रोखण्यासाठी दाठ पाने असणारी व उंच वाढणारी झाडे सांगा.हि दोन घराच्या बाजूस २)घरासमोर शोभेची,ढेरेदार झाडे २.१(घराच्या एकाबाजूस गुरांचा गोठा आहे गोठावर सावली पडून गोठ्याचे तापमान थंड राहील अशी झाडे ३)उत्पादनची अपेक्षा नाही,असले तरी चालेल.४)बजेट ४०हजार ५)मी स्वतः करणार आहे ६)तंत्रज्ञान स्विकारायची तयारी आहे ७)हा पॕटर्न संपूर्ण गावात राबवायचा ते नंतर बघू...सुरूवात माझ्यापासून करायची आहे.मृग नक्षत्रास अवधी आहे आजून.म्हणून आतापासून तयारी चालू केली आहे.

रघुनाथ.केरकर's picture

18 Aug 2016 - 5:01 pm | रघुनाथ.केरकर

दापोली क्रुषी विद्यापीठाने सुचवलेली लाखी बाग करुन पाहा.
२० बाय २० फुटांवर नारळ लावा, मध्ये जायफळ आणी दालचीनी लावा, नारळावर मिरी सोडा. जमल्यास चिकु आणी फणस देखील लावा, गोठ्या शेजारी बदामाची झाडे लावा त्यामुळे सावली देखील छान मिळेल. अननसाचे पीक घेतल्यास अजुन उत्तम दोन्ही सावलीत देखील येते.

चांदणे संदीप's picture

17 Apr 2016 - 6:03 pm | चांदणे संदीप

आता कसं! ह्याला म्हणतात माहिती! ;)

आता, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यासंबधी तुम्हाला कंजूसकाका आणि मिपावरची इतर जाणकार मंडळी योग्य ते मार्गदर्शन करतील. मी आपला "नुसतीच लुडबूड" कॅटेगरीतला आहे. तरीही हे जरास...

१) ज्या बाजूने धूळ येते त्या बाजूला शोभेची दाट व बऱ्यापैकी उंच अशी झुडूपे लावता येतील. नारळाच्या झावळ्यांसारखी दिसणारी शोभेची झुडूपे दाट व उंचही असतात. तिथेच उंचीसाठी अशोकाची झाडे लावता येतील.
२) बहाव्याचे झाडही बऱ्यापैकी दाट असते व त्याचा घेरही कमी असल्याने त्यांच्यातले अंतर कमी ठेवता येते.
३) फळझाडे लावायची झाल्यास, दोन झाडांमधले अंतर, फळ हातात येण्याचा काळ, त्या फळांचा हंगामाचा काळ इ. बाबी विचारात घ्याव्यात. त्यातल्या त्यात पपईची झाडे बेस्ट, खालोखाल चिकू, पेरू इ.फळझाडांना लागणारी खते, औषधे यांची माहीती ठेवावी. फळांच्या जातीवर यांच्या रोपांची किंमत कमी-जास्त होते हे लक्षात घ्या.
४) कडुनिंबाची व गुलमोहोराचीही झाडे लावा. जास्त जागा व्यापतील पण प्रचंड सावली व गारेगार हवा यांसाठी यांच्यासारखी दुसरी झाडे नाहीत. मला वाटते, कमी घेर असलेली कडुंनिबाची एक प्रजाती आहे. योग्य ठिकाणी चौकशी केल्यास फायदा होईल.
५) सूर्यप्रकाशाची दिशा पाहून छोटी फुलझाडे, फळझाडे, शोभेची झाडे, फळझाडे उंच झाडे(नारळ, सुपारी वगैरे) यांची जागा निश्चीत करावी. शोभेची काही झाडे सावलीतही येतात.
६) भाजीपाला आणि औषधी वनस्पती यांच्यासाठीही जागा राखून ठेवावी.
७) झाडांसाठी रोपे जिथून विकत घेणार ती नर्सरी किंवा संस्था चांगली'च' निवडावी जेणेकरून रोपे घेताना व घेतल्यानंतर त्यांच्याकडून निरंतर माहिती मिळू शकेल. हडपसर ते उरूळी किंवा अजून थोडंसं पुढे, पुणे-सोलापूर महामार्गावर चिक्कार चांगल्या नर्सरीज तसेच संशोधन केंद्रे आहेत.
८) तुम्ही स्वत:च करताय तर मिपाकरांचा एक कट्टा लागवडीच्या दिवसात इंदापुरात ठरवावा, म्हणजे मुबलक मनुष्यबळ उपलब्ध होऊन तुमचे काम सुकर होईल व कमी वेळात संपेल. हौशी मिपाकरांनाही आपले हात-पाय मातीत (तोंड नाही!) काळे करता येतील. ;)
९) लेटेस्टेस्ट टेक्नॉलॉजीवर जरा रिसर्च करून उद्या किंवा वेळ मिळेल तसे सांगतो. केएफबायोप्लांट्स, फ्युचरफार्मस अशी नाव माहिती आहेत. आधिक तपास करतोच!

सर्कारी "शेतकरी", कृषी विज्ञान प्रकाशनचे "बळीराजा" असली मासिकं मिळवा. त्यात व्यवस्थित, इत्थंभूत माहिती असते.

धन्यवाद,
Sandy

दत्ताभाऊ गोंदीकर's picture

17 Apr 2016 - 9:44 pm | दत्ताभाऊ गोंदीकर

माहिती आवडली.

दत्ताभाऊ गोंदीकर's picture

17 Apr 2016 - 6:25 pm | दत्ताभाऊ गोंदीकर

जाणकार मंडळीची वाट पाहतोय.

एस's picture

17 Apr 2016 - 7:21 pm | एस

साग लावा.

कंजूस's picture

17 Apr 2016 - 8:11 pm | कंजूस

हिरडा,भोकर,बिब्बा,रिठा.
सदाहरीत वृक्ष. फळांना चांगला भाव येतो.चोरीला गेली तरी थोडी उरतातच.सावली दाट.घराच्या पायाला त्रास देण्याइतकी मुळे वाढ़त नाहीत.रोपे सहज तुम्हालाचा करता येतात.रस्त्याकडे एक दहाफुट उंच जाळी अथवा लाकडं ाची चौकट टाकून कृष्णकमळ,गारवेल वगेरे वेल सोडले की एक हिरवी भिंत तयार करतात आणि आडोसा मिळतो व धूळ अडवतात.निरनिराळ्या बंगल्यात या अथवा इतर वेली पाहायला मिळतील.एक निळ्या फुलांचा वेलही मिळतो अथवा गोकर्णीचा वेल सोडा.बिया भरपुर मिळतात.नर्सरीतून काहीच आणावे लागणार नाही.
( सोलापूर रस्त्यावरचं इंदापूर? / रोह्याजवळचं गोवा रोडवरचं इंदापुर?)

कंजूस's picture

17 Apr 2016 - 8:16 pm | कंजूस

मोठी झाडं आताच होळीनंतर लावायची आणि पाणी द्यायचे कष्ट घेतले तर मृगाचा पाऊस लागला की फार जोर मारतात.जूनमध्ये लावलेल्या रोपापेक्षाही भारी काम होतं.वरती थोडी झावळ्यांची सावली करायची.

दत्ताभाऊ गोंदीकर's picture

17 Apr 2016 - 9:31 pm | दत्ताभाऊ गोंदीकर

मी सोलापूर रस्त्यावरिल इंदापूरला राहतो.आता या स्थितीत झाडे लावणे कठीण आहे.कधी पडला नव्हता असा दुष्काळ पडला आहे.पाणीटंचाई खूपच आहे.म्हणून जून मध्ये झाडे लावावी म्हणतोय.तोपर्यंत तापमान पण कमी होईल

अंकोलीचे अरुण देशपांडे आहेत त्यांना भेटलात तर बरीच माहिती मिळेल.

दत्ताभाऊ गोंदीकर's picture

17 Apr 2016 - 9:32 pm | दत्ताभाऊ गोंदीकर

मी सोलापूर रस्त्यावरिल इंदापूरला राहतो.आता या स्थितीत झाडे लावणे कठीण आहे.कधी पडला नव्हता असा दुष्काळ पडला आहे.पाणीटंचाई खूपच आहे.म्हणून जून मध्ये झाडे लावावी म्हणतोय.तोपर्यंत तापमान पण कमी होईल

दत्ताभाऊ गोंदीकर's picture

18 Apr 2016 - 8:38 pm | दत्ताभाऊ गोंदीकर

मिपावर धागा टाकताना थोडा सांशक होतो की खरच मदत येथे भेटेल का येथे,पण तुम्ही सगळ्यांनी खूपच महत्त्वाची माहिती दिली.येथील मोकळे वातावरण पाहून पुरता भारावून गेलो.यापुढेही आपला असाच लोभ राहूद्या. धन्यवाद! दत्ताभाऊ.

जावई's picture

17 Aug 2016 - 1:37 pm | जावई

तुम्ही इंदापूरकर आहात.इंदापूरमध्ये कुठं राहता?पत्ता देता का?

प्रभाकर पेठकर's picture

19 Aug 2016 - 10:48 am | प्रभाकर पेठकर

वृक्ष-वल्ली आम्हा सोयरी... हे जरी खरं असलं तरी ह्या हिरवाई सोबत कांही किडे, चिलटं, घुंगरटं वगैरे येऊ शकतात त्याने गोठ्यातील गुरांना आणि बंगल्यातील माणसांना उपद्रव होऊ नये म्हणून जाणकारांचा ह्या विषयावरही सल्ला घ्यावा.
बाकी आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेतच.