Skip to main content

मिपावर चित्रे टाकण्याची कृती

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 14/04/2016 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर चित्रे टाकताना बर्‍याच जणांना समस्या येतात असे दिसते आहे. या विषयावर अगोदर लिहीले गेले आहेच. परंतु सहजपणे ही माहिती समोर असावी यासाठी हा परत केलेला प्रपंच. खालील पायर्‍या वापरल्यास मिपावर चित्रे टाकणे सहजसाध्य होईल. इतकेच नव्हे तर ती योग्य आकारात व प्रमाणबद्ध दिसतील. १. प्रथम तुमची चित्रे गुगल-फोटो, फ्लिकर किंवा तत्सम संस्थळावर चढवा. २. चित्रांचे तिथले स्टेट्स "पब्लिकली शेअर्ड" असे करा. चित्रे मिपावर दिसण्यासाठी हे आवश्यक आहे. असे केल्यावर तुमची चित्रे मिपावर टाकण्यायोग्य स्थितीत येतील. ३. त्या संस्थळावर चित्र पूर्णपणे (थंबनेल अथवा छोटी आवृत्ती नव्हे) उघडून त्यावर राईट क्लिक करा आणि "Copy image URL" पर्यायावर टिचकी मारा... आता ते चित्र मिपामध्ये टाकण्यासाठी त्याचा दुवा कॉपी केला गेलेला आहे. हे चूक आहे...  . हे बरोबर आहे...  आता मिपावर या आणि... ४. लेखन करण्याच्या चौकोनाच्या (टेक्टबॉक्सच्या) वर असलेल्या बटणांपैकी सर्वात डावीकडच्या (सुर्योदयाचे चित्र असलेल्या) बटणावर क्लिक करा. (त्या बटणावर कर्सर ठेवल्यास Insert/edit image असा मेसेज दिसेल व "Insert/edit image टेक्स्टबॉक्स" दिसू लागेल.) .  . ५. दिसू लागलेल्या Insert/edit image टेक्ट बॉक्स मध्ये खालीलप्रमाणे माहिती भरा: ......अ) Insert Image मध्ये वर कॉपी केलेली युआर एल पेस्ट करा (Ctrl + V) ......आ) Width X Height: कोरे ठेवा. ......इ) Alternate Text: इथे तुम्हाला हवे ते चित्राचे नाव टाका अथवा फक्त एकदा स्पेसबार दाबून एक स्पेस टाका. ६. OK बटन दाबल्यावर टेक्ट बॉक्समध्ये त्या चित्राचा कोड दिसू लागेल. ७. चित्र "पूर्वपरिक्षण" करुन पहा: ......अ) चित्र लेखनाच्या चौकटीत योग्य जागी दिसत असल्यास टाकलेला कोड योग्य आहे. ......आ) चित्र लेखनचौकटीबाहेर जात असल्यास आणि/किंवा उजव्या बाजूच्या मिपासंबधीच्या माहितीवर आक्रमण करत असल्यास Width मध्ये ६६० ते ३०० यामधला एक पर्याय वापरून "पूर्वपरिक्षण" करुन पहा व योग्य तो पर्याय स्विकारा. (सर्वसाधारणपणे आडव्या (लॅड्स्केप) चित्रांना ६०० ते ६६० व उभ्या (पोर्ट्रेट) चित्रांना ३०० ते ४५० Width योग्य होते) ......इ) Height नेहमीच कोरी ठेवा. मिपा तुम्ही स्विकारलेल्या Width ला योग्य ती Height वापरून चित्र प्रमाणबद्ध ठेवते. (अंदाजे Height टाकण्याच्या प्रयत्नात बहुदा चित्र वेडेवाकडे दिसते, तेव्हा ते टाळा.) ८. पायरी क्रमांक ३ ते ७ परत परत वापरून पुढच्या प्रत्येक चित्राचा योग्य कोड लेखात अंतर्भूत करा. ९. लेखाचे सर्व चित्रांसह "पूर्वपरिक्षण" करून तो मनाजोगता दिसू लागला की मगच तो "प्रकाशित करा". कारण लेख प्रकाशित केल्यावर सर्वसामान्य लेखकाला त्यात बदल करता येत नाही. १०. लेख प्रसिद्ध केल्यावर लेखनात अथवा चित्रांत काही दोष आढळले तर ते सुधारण्यासाठी साहित्य संपादकांशी संपर्क करा. .

खास सूचना :

मिपात टाकलेले फोटो (अ) साठवण केलेल्या जागी एडीट केले आणि / किंवा (आ) त्यांना दुसर्‍या अल्बममध्ये हलविले तर त्यांच्या दुव्यांच्या मजकूरात (लिंक्स) बदल होतो व त्यामुळे ते फोटो मिपातिल लेखात दिसणे बंद होते. असे फोटो लेखात परत दिसण्यासाठी त्यांचे बदलेले नवे दुवे मिपात टाकणे जरूर असते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 93010
प्रतिक्रिया 112

प्रतिक्रिया

In reply to by टर्मीनेटर

सद्याच्या व्यवस्थेत मिपावर प्रत्येक चित्र स्वतंत्रपणे टाकावे लागते. गॅलरीचा फक्त दुवा देता येईल, पण तिच्यातील फोटो वाचकांना मूळ संस्थळावर पहावे लागतील.

In reply to by टर्मीनेटर

हो, iframe वापरून मी लेखांत गुगल मॅप जोडले आहेत. पण इमेज गॅलरीसाठी iframe वापरलेली नाही; बहुतेक गुगल फोटो सपोर्ट करत नाही. तुम्ही प्रयत्न केलात तर जमतंय का ते अवश्य सांगा.

हे चालेल का टर्मिनेटर? तुमच्याच आताच्या धाग्यातले सहा फोटोंचा स्लाइडशो करून विडिओ प्लेअर केला आहे. फोटोंचे स्क्रिनशॅाट्स घेतल्याने कमी रेझलुशन/साइजचे झाले आहेत आणि विडिओची साइजही लहान राहिली. प्लेअर न देता फक्त युट्युब विडिओची लिंक देण्याचा पर्याय आहेच. समुद्र, सेरापियम, किल्ला, काटकोंब यांचा एकेक फोटो लेखात देऊन एकेका जागेचे अधिक फोटोंचे विडिओ प्लेअर/ लिंक देऊ शकता. प्रत्येक भागात नकाशा हवा आहे.

मोबाइल फोनमधून (Android) गुगल फोटो फेल्डरमध्ये असलेल्या फोटोची मिपासाठी इमेज लिंक काढणे - तयारी - जो फोटो लेखासाठी घ्यायचा आहे तो प्रथम फोन मेमरीमधून इंटरनेटवर - google photos वर अपलोड करण्याचे गरजेचे आहे. फोटो उघडल्यावर वरती वर दिशेकडे दाखवणारा बाण /किंवा छोट्याशा ढगात वर जाणारा बाणाचे चिन्ह दिसेल त्यावर क्लिक केल्यावर फोटो अपलोड होणे सुरू होईल. नंतर - - - १) गुगल फोटो app उघडा, २) हवा असलेल्या फोटोवर क्लिक केल्यावर फोटो मोठा दिसेल. वरच्या बाजूस शेअरिंगची खूण दिसेल त्यावर क्लिक करा. एका चौकोनात एक छोटीशी लिंक येईल ती "कॅापी लिंक" करून घ्या. आणि "share with anyone/ public " ok करा. ३) ctrlq dot org/google/photos ( CTRLQ dot org ) ही साइट उघडा, एका चौकोनात "paste link here" दिसेल तिथे वरची लिंक पेस्ट करून पुढच्या चौकोनातल्या " generate code" buttonवर टिचकी मारा. आता पेजच्या खाली दोन चौकोनात दोन लिंक्स येतात -- पहिला -direct link - ही कॅापी करून मिपा लेखाच्या फोटोसाठी वापरा. दुसरी लिंक - embed code असते. ( या साइटमधून लिंक्स निघाल्या नाहीत तर तुमचा फोटो पब्लिक शेअरिंगसाठी रेडी नाही हे आपोआपच कळते हा एक फायदा आहे. )

ट्रायल म्हणून प्रिन्टेड रेन्बो ही एक अप्रतिम शॉर्ट फिल्म एम्बेड करून बघितलीय....... जरूर पहा खुप सुंदर अहीआहे.

 जम्पशेअर वर प्रयत्न केला, जमतेय बहुतेक. धन्यवाद !

In reply to by गवि

भटकंती विभागात प्लिटविस -क्रोएशिया वर चा लेख पाहिला. तिथे चित्रे डकविण्याची समस्या होती लेखिकेला. मलाही चित्र डकवून पाहायचे होते एकदा म्हणून गुगलवर शोध घेऊन ह्या ठिकाणाचा फोटो टाकला. बहुधा तिथलं नॅशनल पार्क आहे.

In reply to by चौथा कोनाडा

प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद ! मी मिपावर तब्बल १० वर्षे इतका काळ आहे. खरं तर हे अगोदरच शिकायला पाहिजे होतं. मी तंत्रमंद आहे असे ही नाही. पण कंटाळा ! खरं तर जास्त काही लिखाण / प्रतिसाद दिलेले नाहित मिपायुष्यात. पण दिवसातून २-४ वेळा तरी इथें आल्याशिवाय राहवत नाही. नवीन असताना लेख लिहावेत, प्रतिसाद द्यावेत असे सतत वाटते, अगदी व्यक्त व्हायला हात शिवशिवत असतात. पण कालांतराने आपण बरेचजण थंड होत जातो. वाचनमात्र राहिलो तरी पुरे असे वाटते. याला मी काळ बदलला, मिपा बदलले असे नाही म्हणणार, पण आपणच बदलत असतो हळुहळू ! माझा पुर्वीचा बॉस मला नेहमी म्हणायचा, " कमॉन धर्मराज, यु कॅन डू इट, बट यु शुड हॅव दॅट फायर इन द बेली !" पण आता फायर बेलीच्या बराच खाली, बुडा खाली सरकलाय :) असो ! भटा ला दिली ओसरी, भट हातपाय पसरी असा झाला हा प्रतिसाद !

In reply to by धर्मराजमुटके

नवीन असताना लेख लिहावेत, प्रतिसाद द्यावेत असे सतत वाटते, अगदी व्यक्त व्हायला हात शिवशिवत असतात. पण कालांतराने आपण बरेचजण थंड होत जातो. वाचनमात्र राहिलो तरी पुरे असे वाटते. याला मी काळ बदलला, मिपा बदलले असे नाही म्हणणार, पण आपणच बदलत असतो हळुहळू !
मस्त लिहिलं आहेत. आवडलं.

In reply to by कंजूस

आपण गायकीचे मर्म अचूक पकडले आहे. प्रसिद्धीसाठी गाणार्‍याचे मुख दिसणे उचित. पोटासाठी गाणार्‍याचे पोट दिसणे उचित. तद्वतच मनापासून गाणार्‍याचे केवळ ह्रदय आणि गळा दिसणे उचित होय. आपण प्रत्येक गोष्टीतून काहीतरी चांगले शिकू शकतो . धन्यवाद !

.

.

In reply to by Sanjay Uwach

कंजूस साहेबांनी सुचवलेले करावे. आणि ट्रायल घेताना आणखी एक महत्वाचे : १. "शेअर टू एव्हरीवन / ऑल " करून लिंक सेव्ह (नोटपॅड वर वै). करुन ठेवावी २. गुगल / गुगल फोटोज / गुगल ड्राइव्ह वरून लॉग ऑऊट करावे ३. मग, ती मिपावर टाकून पुर्वपरिक्षणात दिसते का याची ट्रायल घ्यावी ४. इमेज पुर्वपरिक्षणात दिसत नसेल तर शेअर झालेली नाही हे समजते. ५. परत "शेअर टू एव्हरीवन / ऑल " करून पुन्हा वरील प्रमाणे ट्रायल घ्यावी

In reply to by चौथा कोनाडा

मी शेअर टू ऑल हा स्टेटस सेटिंग मधून काढतो. तिथले वरडीग माझ्या ल्यापटोप वर कांहीं वेगळेच आहे तर हा स्टेटस कुठून काढायचा.

शेअरिंग लिंक काढून ती प्रथम https://photos.app.goo.gl/.......... अशी दिसेल. ती https://app.bytenbit.com/ इथे बॉक्समध्ये टाकून वेगळी इमेजसाठी लिंक मिळते ती वापरायची. जर लिंक आलीच नाही तर शेअरिंग झालेलं नाही.

शेअर टू ऑल हा स्टेटस सेटिंग मधून काढतो. तिथले वरडीग माझ्या ल्यापटोप वर कांहीं वेगळेच आहे तर हा स्टेटस कुठून काढायचा
"Share with the people" हे दिसेल. त्याच्या खाली Change दिसेल त्यावर क्लिक केल्यावर "Share this photo with anyone with the link" Yes करा. ---------------------