साहित्य : १. कोवळी कारली - किमान चार
२. लाल तिखट - अर्धा चचा
३. गरममसाला - एक मोचा
४. खोबर्याचा कीस - तीन मोचे
५. पांढरे तीळ - दोन मोचे
६. फोडणीसाठी तेल - नेहेमीच्या प्रमाणापेक्षा थोडे अधिक, मोहरी, जिरे हिंग, इत्यादी
७. मीठ चवी नुसार
८. साखर - अर्धा चमचा ( आवडत असल्यास. नाही घातली तरी चालेल)
९. लिंबाचा रस (अर्धे लिंबू)
कृती: - कारली धुवून त्यांच्या अगदी पातळचकत्या कराव्यात. (त्यातील बिया काडून टाकणे ऐच्छिक आहे)
-चकत्यांना थोडे मीठ चोळून त्या किमान अर्धा तास बाजूला ठेवाव्या. अर्ध्या तासाने त्या पिळून कोरड्या कराव्या.
- एकाकढाईत खोबर्याचा कीस व तीळ भाजून घावेत व बाजूला काढून ठेवावे.
- त्याच कढाईत नेहेमी प्रमाणे तेल, मोहरी, जिरे. हिग घालून फोडणी करावी.
- फोडणी धुरावल्यावर शेगडीची आंच मंद करून कोरड्या केलेल्या कारल्याच्या चकत्या परतण्यास सुरुवात करावी.
- चकत्या थोड्या मऊ झाल्यावर मीठ घालावे. परतणे चालूच ठेवावी.
- मीठ घातल्या थोडे पाणी सुटते. ते आटल्यावर लाल तिखट,गरम मसाला घालावा.
- त्यानंतर भाजलेले तीळव खोबर्याचा कीस घालून परतावे. (आवडत असल्यास साखरही)
- शेवटी भाजी अगदी कोरडी झाली आहे असे दिसल्यावर लिंबाचा रस घालावा.
-शेगडीची आंच मोठी करून भाजी लालसर रंगावर कुरकुरीत होईतो भरभर परतावी
टीप: या पाककृतीत हळद लागत नाही.
सूचि: चचा = चहाचा चमचा
मोठा = मोठा चमचा (भात खाण्याचा)
प्रतिक्रिया
18 Sep 2008 - 2:59 pm | बेधुन्द मनाची लहर
सही आहे पाक्रु.
मस्तच लागत असेल कार्ले कुरकुरे....
18 Sep 2008 - 3:05 pm | प्रभाकर पेठकर
प्रतिसाद मागे घेतला आहे.
18 Sep 2008 - 5:55 pm | अरुण वडुलेकर
पेठेकर,
प्रतिसाद मागे घेतला आहे.
पण प्रतिसाद दिला कधी ??
18 Sep 2008 - 10:37 pm | प्रभाकर पेठकर
दिला होता पण चुक लक्षात येऊन लगेच मागे घेतला.
18 Sep 2008 - 10:30 pm | वेलदोडा
वा . छान वाटतीये रेसिपी. करून बघतो आता.
18 Sep 2008 - 10:49 pm | प्राजु
पुण्यात असताना हॉट चिप्स या चिप्स मिळणार्या दुकानात कारल्याचे चिप्स खाल्ले होते. सह्ही होते ते सुद्धा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Sep 2008 - 10:59 pm | विसोबा खेचर
कारलं हा आमचा दुश्मन नम्बर एक...! :)
कार्ल्याची कुठलीही पाकृ आवडत नाही...
तात्या.
19 Sep 2008 - 10:47 am | अरुण वडुलेकर
दिला होता पण चुक लक्षात येऊन लगेच मागे घेतला.
अरेरे! तुम्ही पण कारल्याचे शत्रू दिसता.
19 Sep 2008 - 11:22 am | प्रभाकर पेठकर
'शत्रू'ही नाही म्हणता येणार आणि 'मित्र'ही नाही म्हणता येणार. कारलं माझ्या 'ओळखिचं' आहे. डॉक्टरांनी आठवड्याच्या डाएट मध्येच घातलय ते.
27 Sep 2008 - 10:52 am | sonalib
zakasssssssss
me karun baghte ajach
pethkar tumhi farach khavaye dista ho.
kai kam kai karta tumhi
27 Sep 2008 - 1:46 pm | प्रभाकर पेठकर
ही पाककृती श्री. अरूण वडूलेकर ह्यांची आहे. माझी नाही.
कृपया मराठीत लिहीण्याचा प्रयत्न करावा.