आई शप्पथ !!!
आपण मानले बुवा ह्या बजेट तयार करणाऱ्यांना.
आणि विशेष म्हणजे....
ते समजुन घेऊन त्यावर टिका किंवा स्तुती करणाऱ्यांना.
एक चहा... बरंका ... असेच चहा पिताना मनात आले कि आपण फक्त एक चहाचे बजेट एक रुपयात काढूया आणि घेतला कागद नी ह्या महिन्याची सामानाची यादी नी बसलो ना राव मी बजेट काढायला.
तर मंडळी...
पहिला घेतला गॅस सिलेंडर मग चहा पावडर मग साखर, दुध, विलायची, आले, विलायची मग आठवले कि बाबारे एवढे सामान टाकलेला चहा फक्त बायकोच्या माहेरचे कोणी आले तर मिळतो.
आता काय मग परत नव्याने बजेट बनवायला घेतले.
पहिला गॅस सिलेंडर मग चहा पावडर मग साखर, दुध,आले, विलायची नाही..नाही आता विलायची कट करायची कारण फक्त चहा पावडर मग साखर, दुध,आले अरे हा चहा तर आपले पाहुणे आले कि असतो.
आता काय मग परत पुन्हा एकदा नव्याने बजेट बनवायला घेतले.
गॅस सिलेंडर मग चहा पावडर मग साखर, आले, दुध.... नाही दुध कम पाणी हो फक्त दुधासारखे सफेद दिसणारे द्रव्य म्हणजे दूध हं बरोबर असाच चहा नेमके आपले मित्र आले असले कि बनतो.
आता काय मग पुन्हा परत तिसऱ्यांदा नव्याने बजेट बनवायला घेतले.
गॅस सिलेंडर मग चहा पावडर मग साखर, लिंबु.... अँयींग लिंबु? अरे यस नेमका तो शेजार्यांचा बोका दुध मटकावुन गेला किंवा रात्री जरा थोडी जास्त झाली की हा ब्लॅक टी नामक चहा मिळतो.
अरे यार !!! आता काय मग परत चौथ्यांदा नव्याने बजेट बनवायला घेतले.
गॅस सिलेंडर अहो... अहो... थांबा. गॅसचा नेमका रेट काय आहे हो? म्हणजे १२ सिलेंडरच्या आत बनवलेला कि १२ सिलेंडर नंतर बनवलेला चहा विचारात घ्यायचा.बरे आता सबसिडी किती जमा होईल?
आलोच जरा अॅनासिन खाऊन. तोपर्यंत तुम्ही तुमचा चहाचा हिशोब सांगा.
प्रतिक्रिया
2 Apr 2016 - 10:45 pm | उगा काहितरीच
नेमकं काय चालू आहे ?
4 Apr 2016 - 4:16 pm | विजय पुरोहित
अँयींग अँयींग अँयींग अँयींग अँयींग!!!!
3 Apr 2016 - 1:53 am | अमृता_जोशी
हा धागा रॉकेट लावून उडवला पाहिजे..
3 Apr 2016 - 9:36 am | विवेकपटाईत
चाय पे चर्चा जोरदार होणार आहे, सकाळ पासून २ कप चहा गळ्यात ओतला आहे आणि आता तिसर्या कपची वाट पाहतो आहे.
4 Apr 2016 - 4:15 pm | प्रणवजोशी
कुणीतरी न.मोःना बोलवा रे मग आपण सगळे मिळुन चाय पे चर्चा करुया ः-)