लिफ्ट

Anonymous's picture
Anonymous in जनातलं, मनातलं
28 Mar 2016 - 3:59 pm

'लिफ्ट'

जाम पाऊस पडत होता, रात्रीचे ११वाजत आलेले, एक रिक्षा थांबायला तयार नाही, शंभर टक्के भीजलेलो, तेव्हढ्यात एक स्कूटरवाले काका थांबले, हेल्मेटवरची फुटलेली काच वर करत 'कुठे जायचय' ची खूण केली, मी म्हणालो... 'डेक्कन' मागे बसायची खूण केली, मी पटकन जाऊन सवई प्रमाणे उगाच सीट हातानी झटकुन बसलो, अर्धा तास भिजल्यानी थंडीने कुडकूडत होतो, त्यात लांब पाय टाकून स्कूटर वर 'आई आई ग्ग'करत कसाबसा बसलो... क्रैंम्प आलेला बेक्कार! काका मागे न वळताच, काय झालं रे?ची 'खुण करत' तोच हात झटकनी गीयरवर टाकून जोरात पिकअप घेतला, मला काहीच उत्तर देता येई ना, ओठ-दात चावत अभाळाकडे पाहत... पाय तसाच सरळ ठेवत बसलेलो अपंगा सारखा, मधले खड्डे वगैरे न चुकवत काका भरधाव निघाले. रस्त्यावर कोणी गाडी चालवताना दीसे ना मला, सगळे झाडांखाली, कोणी दुकानाच्या आडोशी, जिथे पाऊस कमी लागेल असे थांबलेले.
शिवाजी नगर आले, सिग्नल वगैरे बंदच होते, तिथे एक मझ्यासारखाच मुलगा थांबलेला, त्याच्या समोर जाऊन स्कूटर थांबवली, मी लगेच उतरलो, अखडलेला पाय झटकत, हे सगळे चालू होते तेव्हा त्या मुलाकडे पाहत काका तशीच 'मागे बसायची खुण' करत गीयर टाकायच्या तयारीत!

बरं, त्यांची स्कूटर पण काही मोठी नव्हती, चेतक किंवा वेस्पा कश्या बऱ्यापैकी मोठ्या असतात, त्यांची होती 'प्रिया', पण ते होते अडदांड! मीच कसाबसा मावलेलो त्यात आता ट्रिपल सीट म्हणजे, मी म्हणालो 'काका, तुम्ही दोघे निघा... डेक्कन जवळ आलेच आहे, मी जाईन चालत' हे सगळे त्यांना ऐकू आलं नसेल बहुतेक मला परत 'मागे बसायची खुण' करत गीयर बदलायला परत सज्ज!

मी गपगुमान जागा अड्जस्ट करत कसाबसा बसलो, तो मुलगा मध्ये आणि मी स्कूटरच्या मागच्या स्टेपनीला न बघताच घट्ट पकडून न पडण्याच्या प्रयत्नात! पावसानी अजुनच जोर पकडलेला...अक्षरशहा काही दिसत नव्हतं, इतका पाऊस! कधी एकदा डेक्कन येतय आणि मी उतरतोय असं झालेलं.
गुडलक चौका पाशी आल्यावर मी म्हणालो 'काका थांबवा, इथे उतरतो मी', स्कूटर काय थांबेना! मग त्या मुलानी त्यांच्या खांद्यावर जरा हात लावत सेम मी जे बोललो तेच बोलला, स्कूटर थांबली. गुडलक ओलांडून आम्ही ऑलमोस्ट गरवारे ब्रिजपलीकडे आलेलो.

दोघे उतरलो, मग ते काका पण उतरले. हेल्मेट काढलं आमच्या कडे हसत हसत बघत स्वतःच्या काना आणि तोंडाकडे बोट दाखवत दुसऱ्या हाताचा अंगठा हलवत परत बसले स्कूटरवर, सिग्नलला यू टर्न मारून गायब!
आम्हाला काही बोलायचं सुचलच नाही, तो मुलगा त्याच्या वाटेला आणि मी माझ्या वाटेला लागलो.
त्यारात्री नंतर मी कोणाच व्यक्तीला 'लिफ्ट'साठी नाकारले नाही.

Lift

#सशुश्रीके

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

भाऊंचे भाऊ's picture

28 Mar 2016 - 5:09 pm | भाऊंचे भाऊ

शेवट वाचताना तर माझ्या डाव्या डोल्यातून कधी पाणी आले समजलेच नाही

भाऊंचे भाऊ's picture

29 Mar 2016 - 5:18 pm | भाऊंचे भाऊ

सरकेस्टिक प्रतिसाद फक्त माझाच आला की ?

जव्हेरगंज's picture

28 Mar 2016 - 6:59 pm | जव्हेरगंज

आणि अप्रतिम !!!

मस्त ओघवती शैली !

कविता१९७८'s picture

28 Mar 2016 - 7:33 pm | कविता१९७८

मस्तच

एक एकटा एकटाच's picture

28 Mar 2016 - 7:46 pm | एक एकटा एकटाच

छान

विद्यार्थी's picture

28 Mar 2016 - 7:47 pm | विद्यार्थी

मस्त

असंका's picture

28 Mar 2016 - 8:01 pm | असंका

मस्त!!

धन्यवाद!!

मस्त लिहिलंय पण शेवट काय कळला नाय?

रातराणी's picture

28 Mar 2016 - 10:58 pm | रातराणी

छान लिहिलंय!

आनंद कांबीकर's picture

28 Mar 2016 - 11:02 pm | आनंद कांबीकर

वा! आवडले!

अभिजीत अवलिया's picture

28 Mar 2016 - 11:38 pm | अभिजीत अवलिया

मस्त ...

श्रीरंग_जोशी's picture

28 Mar 2016 - 11:50 pm | श्रीरंग_जोशी

शेवटचा धक्का सुखद वाटला.

नाखु's picture

29 Mar 2016 - 11:10 am | नाखु

चांगली झुळुक....

दंगा करता येणार नसल्याने काही जण फिरकणार नाहीत या धाग्यावर याची १००१% खात्री असलेला नाखु

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Apr 2016 - 7:09 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

चांगलचं आहे की मग. चांगल्या धाग्यावर हागणदारी नकोचं.

अद्द्या's picture

29 Mar 2016 - 11:19 am | अद्द्या

मस्त कथा

ब़जरबट्टू's picture

29 Mar 2016 - 12:11 pm | ब़जरबट्टू

आवडली.. बाकी ते मुकबधीर होते हे सगळे नंतर.. अश्या पावसात लिफ़्ट द्यायची तय्यारी दाखवली याबद्दल त्यांना सलाम.. :)

मीता's picture

29 Mar 2016 - 12:13 pm | मीता

मस्त

सिरुसेरि's picture

29 Mar 2016 - 12:23 pm | सिरुसेरि

छान लिहिलय . व.पु. काळे यांच्या "अ‍ॅट युअर सर्व्हिस" या कथेची आठवण झाली .

मोदक's picture

29 Mar 2016 - 3:14 pm | मोदक

छान लेखन.

वपुंची कथा वाचल्यासारखी वाटते आहे. "अ‍ॅट युअर सर्व्हिस" हे नांव होते की "केंव्हाही बोलवा" हे नांव होते?

सिरुसेरि's picture

4 Apr 2016 - 3:12 pm | सिरुसेरि

पुर्वी वपुंच्या कथांवर आधारीत एक हिंदी टीव्ही मालिका लागायची , त्यामधील "केंव्हाही बोलवा" या कथेवर आधारीत भागाचे "अ‍ॅट युअर सर्व्हिस" हे नांव होते .

राजू's picture

29 Mar 2016 - 12:38 pm | राजू
बाबा योगिराज's picture

29 Mar 2016 - 12:39 pm | बाबा योगिराज

छान लिहिलंय.

वेल्लाभट's picture

29 Mar 2016 - 3:05 pm | वेल्लाभट

झक्कास!

नीलमोहर's picture

29 Mar 2016 - 3:18 pm | नीलमोहर

छान.

पिलीयन रायडर's picture

29 Mar 2016 - 3:21 pm | पिलीयन रायडर

मस्त!

मराठी कथालेखक's picture

29 Mar 2016 - 3:46 pm | मराठी कथालेखक

हमारा बजाज :)

मराठी कथालेखक's picture

29 Mar 2016 - 3:49 pm | मराठी कथालेखक

मला वाटते मूक बधिरांना वाहन चालवण्याचा परवाना मिळत नाही.
काकांचा समाजसेवेचा हेतू कितीही चांगला असला तरी परवाना नसताना स्कूटर चालवणे धोक्याचे आहे असे मला वाटते

मुकबधिर आहेत म्हणून परवाना मिळतच नाही असे नसते. एखादी व्यक्ती किती % मुकबधिर आहे त्यानुसार नियम बदलतात.

मराठी कथालेखक's picture

29 Mar 2016 - 4:45 pm | मराठी कथालेखक

असू शकेल पण तरी मुसळधार पावसात स्कूटर चालवण त्यातही लिफ्ट देणं म्हणजे सव्तःसोबत दुसर्‍याचाही जीव धोक्यात घालणं झालं

तसेही अनोळखी माणसाला लिफ्ट देणे थोडे जोखमीचे असते.

वर्तमानपत्रात वाचलेला हा किस्सा बघा.

एक खेडेगांव. एक दुचाकीवीर गावातून चालला होता, सहज एकाने लिफ्ट मागितली, याने दिली. पुढच्या चौकात पोलीसांनी गाडी अडवली. लिफ्ट घेणार्‍या भिडूच्या पिशवीत बेकायदेशीर देशी दारू होती.
देशी दारूची वाहतूक केली म्हणून गाडीसकट दोघेही आत.
दुचाकीवीर पोलीसांच्या गयावया करत होता की मी फक्त लिफ्ट दिली.

उगा काहितरीच's picture

3 Apr 2016 - 9:50 pm | उगा काहितरीच

हेच लिहायला आलो होतो. हाच किस्सा वाचून लिफ्ट देणे व घेणेही बंद केलेय.

कपिलमुनी's picture

29 Mar 2016 - 5:07 pm | कपिलमुनी

मदत करण्याची वृत्ती प्रशंसनीय !
कर्णबधीर असले तर लायसन्स मिळते का ?
अशा व्यक्तीं नी रात्री पावसात व्हिज्युअल कमी असताना गाडी चालवणे योग्य आहे का ?

अभ्या..'s picture

29 Mar 2016 - 5:28 pm | अभ्या..

हो. मिळते. परसेंटेज पाहून.

माझा कोल्हापुरातील मित्र आहे. त्याला फोरव्हीलरचे लायसन आहे, तो एक कानाला लावायचे मशीन वापरतो. त्यात हॉर्नचे अन इतर इंजिनचे व्हायब्रेशन्स जाणवतात म्हणे. एकदम झकास गाडी चालवतो.

सविता००१'s picture

1 Apr 2016 - 6:19 pm | सविता००१

छान लेख

हा लेख मिसला होता. आवडला. वेगळीच शंका आली होती. मी लिफ्ट देत व घेत नाही. भीती वाटते.

मागील वर्षी संध्याकाळी ओळखीची मुलगी चालत घराकडे चाललेली पाहून "अगं, ये बैस, मी घरापर्यंत राईड देते" असे म्हणाले. ती नको नको म्हणत होती. मग आणखी दोन चार गप्पा झाल्यावर पुन्हा तिला जरा आग्रहानेच गाडीत बसवले. तिच्या घराशी सोडताना "कुठे गेली होतीस?" असे विचारताच ती म्हणाली "वॉकला गेले होते, पण तुम्ही जबरदस्तीने गाडीतून घरी सोडलेत."

संजय पाटिल's picture

4 Apr 2016 - 6:57 am | संजय पाटिल

लोल

एस's picture

4 Apr 2016 - 8:02 am | एस

_/\_

श्रीरंग_जोशी's picture

4 Apr 2016 - 8:39 pm | श्रीरंग_जोशी

किसीसे उनका कसरत का मौका छिन लेना, गुनाह हैं !!

- रंगफाम फसन

=))

टवाळ कार्टा's picture

4 Apr 2016 - 9:20 pm | टवाळ कार्टा

gunah hai ye

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Apr 2016 - 7:14 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

चांगला लेख. बाकी मुकबधिर लोकांना लायसन मिळतं गाडी चालवायचं. नीट नियम ठाउक नाहीत तस्मात पास. पण तरीही ते कितपत सुरक्षित आहेत ह्याबद्दलही शंका आहेचं. कारण १००% एबल व्यक्ती सुद्धा अपघातप्रसंगी अ‍ॅबसेंट माईंडेडली वागल्याने अपघात झाल्याची उदाहरणं आहेत. त्यामुळे ऐकु नं येणार्‍यांनी गाडी चालवणं कितपत योग्य आहे? खास करुन पुण्यासारख्या शहरात, जिथे पी,एम.पी.एम.एल. वाले यमदुत गाड्या अक्षरशः रेमटवत असतात.

उगा काहितरीच's picture

4 Apr 2016 - 9:59 am | उगा काहितरीच

पी,एम.पी.एम.एल. वाले यमदुत गाड्या अक्षरशः रेमटवत असतात.

अगदी १००% सहमत. काही काही गाड्या तर इतक्या खराब आहेत की या चालतातच कसं काय आसा प्रश्न पडतो . (या वाक्यात एक टक्काही अतिशयोक्ती नाही.)चालक लोकांची कमाल आहे राव अशा अशा गाड्या पण चालवू शकतात. दररोज किमान एका तरी ठिकाणी गाडी बंद पडत असेल.
.अवांतराबद्दल क्षमस्व !

तर्राट जोकर's picture

4 Apr 2016 - 8:35 am | तर्राट जोकर

=))

अजया's picture

4 Apr 2016 - 9:09 am | अजया

लेख आवडला :)

गणामास्तर's picture

4 Apr 2016 - 9:33 am | गणामास्तर

पण काकांना कळाले कसे की तुम्हाला डेक्कन ला जायचंय ते ?

नाखु's picture

4 Apr 2016 - 9:43 am | नाखु

हेल्मेटवरची फुटलेली काच वर करत 'कुठे जायचय' ची खूण केली, मी म्हणालो... 'डेक्कन' मागे बसायची खूण केली, मी पटकन जाऊन सवई प्रमाणे उगाच सीट हातानी झटकुन बसलो,

गणामास्तर's picture

4 Apr 2016 - 9:48 am | गणामास्तर

पण काकांना तर ऐकू येत नव्हते ना ? मग डेक्कन म्हणालेले कसे ऐकू आले असा डौट हाय मला.

नाखु's picture

4 Apr 2016 - 9:56 am | नाखु

असावे बहुदा. ओठांच्या हालचालीवरून समजते असे म्हणतात म्हणे.

खखो ते ओठ आणि वाचणारे जाणो.

हाताची घडी तोंडावर बोट नाखु.

तर्राट जोकर's picture

4 Apr 2016 - 10:13 am | तर्राट जोकर

डेक्कन म्हणतांना ओठ हलत नाहीत ना तोंड. वाचक फारच डिटेलींग मधे घुसतायत का?

नाखु's picture

4 Apr 2016 - 10:05 am | नाखु

धागा प्रतिसाद पन्नाशीबद्दल धागाकर्त्याला इतरांच्या(ही) धाग्यावर जाण्याकरीता लिफ्ट देऊन व प्रतिसादकर्त्यांना बंद न पडणार्या पी येम पी एल च्या बशीतून (स्व खर्चाने एक दिवसाचा प्रवास) आणि कागदी विमाने देऊन करण्यात येत आहे.

अखिल मिपा सत्कार समीती आणि टका संचालीत जेपी खुशालचेंडु मित्रमंडळ,धागा धुराळा कार्यकर्ते. यांचा संयुक्त उपक्रम