पाण्याची धुळवड आणि काही आकडे

साहना's picture
साहना in काथ्याकूट
22 Mar 2016 - 1:31 am
गाभा: 

भारतांतच नाही तर जगांत सगळीकडे प्राणीप्रेमी, निसर्गप्रेमी इत्यादी चे कातडे पांघरून राजकारण करणे सर्रास चालते. अश्या संघटनांना किंवा लोकांना मदत करताना आपली विवेकबुद्धी वापरूनच मदत करावी.

दर वर्षी होळीच्या उत्सव जवळ आला कि "पाणी वाचवा होळी खेळू नका" असे आवाहन केले जाते. आणखी कुठे दुष्काळ आहे, कुठे शेतकरी संकटात आहे असे भासवून मुंबई पुण्यात होळी खेळू नये असे सर्व राजकारणी NGO वगैरे लोक सांगत फिरतात. होळीमध्ये नक्की किती पाण्याची नासाडी होते ह्याचे आकडे कधी कुणे पुढे ठेवल्याचे आठवत नाही. काही लोक चक्क संडास फ्लश करू नका किंवा दाढी करताना नळ चालू ठेवू नका इत्यादी प्रचार करत असतात.

ह्या प्रचाराला शास्त्रीय आधार फार कमी आहे. पाणी किंवा इतर कुठल्याही संसाधनाचा वापर जितका शक्य आहे तितका कमी करावा पण होळी खेळू नये इत्यादी प्रचार अतिशयोक्ती आहे.

भारतातील एकूण पाण्याच्या वापरापैकी ९१% पाणी शेती साठी वापरले जाते, ७% पाणी शहरातील मानवी वापरा साठी जाते तर ५% पाणी विविध उद्योग धंदे वापरतात. [१]

७% मानवी वापरातील पाण्यापैकी सुमारे ५०% पाणी स्नान, कपडे धुणे आणि प्रसाधनग्रहांत जाते. [२] पिण्यासाठी फक्त ४% (७ टक्क्याचे ४%) पाणी वापरले जाते.

वर्षांतील एक दिवस आपण पाण्याने मनसोक्त होळी खेळली तरी पाण्याच्या एकूण साठ्यावर काहीही परिणाम होत नाही त्याशिवाय न खेळली तर जे पाणी वाचते त्यामुळे कुणालाही फायदा विशेष होत नाही. अर्थांत कुणाला प्रतीकात्मक दृष्ट्या होळी न खेळता पाणी वाचण्याचा प्रयत्न करायचा असेल तर जरूर करावा पण त्याने शेतकर्यांना फायदा होतो हा निव्वळ गैरसमज आहे.

सामाजिक प्रथा आणि इतर काही तरी विषय ह्यांत False Dichotomy [३] दाखवून सामाजिक प्रथा बंद करव्यात असा प्रचार जे लोक करतात त्यांच्या विषयी मला नेहमीच संशय वाटतो. उदा शिवलिंगावर दुध व्हावू नका भुकेल्याला द्या इत्यादी. आम्ही आमच्या मुलांना सुद्धा सांगू शकतो, उगाचं शिवरायांचे गड पाहायला जावून वेळ दवडू नका त्या एवजी गणित शिका. म्हातार्या आजीचा हात हातांत घेवून तिच्या बरोबर ५ मिनिटे बोलून वेळ दवडू नका विज्ञानाचे पुस्तक वाचा अभ्यासांत फायदा होयील. Alzimers झालेल्या आजोबा बरोबर बोलणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे कारण त्यांना नंतर त्याचा विसर पडेल त्या ऐवजी एखादे पुस्तक वाचा. ह्या गोष्टी काही प्रमाणात तार्किक वाटल्या तरी प्रत्यक्षांत तार्किक दृष्ट्या चुकीच्या आहेत. कारण इथे दोन पर्याय Mutually Exclusive नसून दोन्ही गोष्टी साध्य केल्या जावू शकतात.

ज्यांना पाण्या विषयी खरोखर कळकळ आहे ते अनेक गोष्टी करू शकतात. उदा एक दिवस तांदूळ जेवणात न वापरता गहू वापरा. साखरेचा वापर कमी करा इत्यादी.

९१% पाणी जे शेत साठी वापरले. पाणी वेस्ट करण्यात भारतीय शेतकऱ्याचा पहिला नंबर लागतो. चीन किंवा अमेरिच्या तुलनेत एक टन गहू उगवायला भारतीय शेतकरी सुमारे दुप्पट पाणी वापरतो.

एकूण शेतीच्या पाण्यापैकी सुमारे ४०% पाणी फक्त तांदूळ आणि उस हि पिके घेतात. भारतीय लोक आपल्या आहारांत तांदूळ फार प्रमाणात ठेवत असल्याने त्याचे आश्चर्य वाटत नाही पण उस ह्या पिकाचे मात्र आश्चर्य वाटते. महाराष्ट्रातील सुमारे ३% शेतजमीन उसाच्या लागवडी खाली आहे पण महाराष्ट्रातील ६०% पाणी मात्र फक्त उस घेतो. [६] पाणी हे शेतकर्यांना फुकट मिळत असल्याने शेतकऱ्याला फरक पडत नाही पण पिकाच्या किमतीत "पाण्याचा वापर" हा घटक ह्यामुळे लक्षांत येत नाही. ह्यामुळे साखरेची किमत कमी राहते. पाण्याचा वापर लक्षांत घेतल्यास साखरेची किंमत किमान १००% वाढायला पाहिजे.

ब्राझील सर्वाधिक साखरेची निर्मिती करतो. सदर साखर भारतांत कमी दरांत विकली जावू शकते म्हणून भारतीय सरकारने ४०% आयात कर लावून ह्या साखरेला भारतांत बंद केले आहे. साखर माफियाना करदात्याचा पैसा देवून सरकार साखर निर्यात करण्यास सरकार मदत करते.

साखरेची निर्यात करण्यास हरकत नाही पण ती साखर तयार करायला जे पाणी खर्च झाले आहे त्याचा खर्च त्याच्या दरातून वसूल नाही झाला तर अर्थ असा होतो कि भारतीय सरकार भारताचे पाणी भेट म्हणून इतर देशांना दिते. वरून करदात्यांचा पैसा साखर कारखान्यांना देणे म्हणजे पाण्याशिवाय गरीब भारतीयांचा पैसा सुद्धा विदेशी लोकांना भेट म्हणून देणे.

ऊस पिकवून शेतकरी गब्बर झाले आहेत असे सुद्धा वाटत नाही. उस पिकवणारे शेतकरी इतर शेतकर्या पेक्षा चांगल्या परिस्थतीत आहेत असे नाही उलट साखर कारखान्यांनी त्यांचे पैसे थकवून ठेवले आहेत. भात किंवा गहूची बाजारपेठ फार मोठी असते. उस फक्त साखर कारखानेच घेवू शकतात ह्यामुळे सरकारचे शेती धोरण "साखर माफिया" सोडून इतर कुणाला फायदेशीर आहे असे वाटत नाही.

ह्यांत मी सरकारचा सुद्धा दोष करू शकत नाही कारण उसाची शेती कमी करण्यासाठी सरकारने काही हालचाल केलीच तर "शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या" अशी आवई विरोधक आणि मिडिया वाले चालवतील.

पाणी वाचवायचे असेल तर. भात आणि साखर आपल्या आहारातून कमी करा. एक किलो साखर वाचवली सुमारे १००० लिटर पाणी वाचवले जावू शकते.

[१] http://www.fao.org/nr/water/aquastat/countries_regions/ind/index.stm
[२] http://indiaenvironmentportal.org.in/files/Water%20consumption%20pattern...
[३] https://en.wikipedia.org/wiki/False_dilemma
[४] http://www.lenntech.com/water-food-agriculture.htm
[5] http://www.indiaenvironmentportal.org.in/files/file/agricultural%20water...
[6] http://www.muthstruths.com/indias-sugar-export-policy-is-almost-criminal/

प्रतिक्रिया

अमृता_जोशी's picture

22 Mar 2016 - 2:09 am | अमृता_जोशी

एक किलो साखर वाचवली तर सुमारे १००० लिटर पाणी वाचवले जावू शकते

या विधानामागे लावलेले गणित फारच भयानक आहे! सगळ्याच पदार्थाची अशी यादी काढून देता का? बाजारला गेल्यावर उपयोगी पडेल..

ह्यांत काहीही चुकीचे गणित नाही. सिगारेट वर १% जास्त कर लावला असता सिगारेटची विक्री काही अंशांनी कमी होते. १% कर म्हणजे १-२ रुपयेच जरी जास्त असले तरी त्याचे स्केल इफेक्ट फार मोठे असू शकतात. साखरेची मागणी जर देशांत ५% सुद्धा कमी झाली तरी काही साखर कारखाने बंद पडतील, काही शेतकरी उसाला कंटाळून आणखीन काही तरी पेरतील आणि त्यामुळे काही पाणी वाचेल. एक किलो साखर कमी विकत घेतली तर कुठे तरी जादूने १००० लिटर पाणी उत्पन होईल असा अर्थ घेवून नये.

Water Footprint असे तुम्ही शोधले तर तुम्हाला कुठल्या खाद्य पदार्थांत किती पाणी खर्च होते ते दिसेल.

उगा काहितरीच's picture

22 Mar 2016 - 2:38 am | उगा काहितरीच

महाराष्ट्रातील सुमारे ३% शेतजमीन उसाच्या लागवडी खाली आहे पण महाराष्ट्रातील ६०% पाणी मात्र फक्त उस घेतो.

उसाबद्दल यापूर्वी वाचलं होतच . मराठवाड्यात दुष्काळाची तिव्रता जाणवण्यामागे ऊस हे एक मुख्य कारण आहे.
बाकी बरेचसे मुद्दे पण पटण्याजोगेच आहेत.

हा आकडा मुंबई मिरर मध्ये पहिल्यांदा वाचला होता जास्त क्रेडीबल आकडा कुठे भेटला तर जरूर द्यावा.

धनंजय माने's picture

22 Mar 2016 - 4:19 am | धनंजय माने

आकडा भेटत नाही ओ. मिळतो.

उगा काहितरीच's picture

22 Mar 2016 - 10:05 am | उगा काहितरीच

आणी आकडा लागतो सुद्धा . आकडा टाकता पण येतो.

साहना's picture

22 Mar 2016 - 10:24 am | साहना

खूप प्रयत्केला केला पण आजतागायत माझा आकडा लागला नाय

खेडूत's picture

22 Mar 2016 - 4:15 am | खेडूत

आशयाशी सहमत आहे.
आता किमान चहात तरी साखर कमी करायला हवी!

अवांतरः हल्ली मुटेकाका आणी बाप्पू कुठे आहेत?

राजेश घासकडवी's picture

22 Mar 2016 - 4:19 am | राजेश घासकडवी

आकडेवारी वापरून तथ्य काय आहे हे पाहाण्याचा दृष्टिकोन आवडला. अनेक वेळा प्रत्यक्ष उपयुक्त कृती करण्याऐवजी सिंबॉलिक गोष्टी करायला लोकांना आवडतं. त्यात पेनी वाईज अॅंड पाउंड फूलिश असंही होताना दिसतं. नक्की कुठच्या कृतीचा किती परिणाम होईल याचीही सर्वांना कल्पना नसते. ते सांगण्याचा प्रयत्नही आवडला.

साहना's picture

22 Mar 2016 - 4:37 am | साहना

Penni Wise and Pound foolish
अगदी हेच ह्या लेखाचे शीर्षक ठेवण्याचा विचार होता पण नंतर बदलला :)

नाना स्कॉच's picture

22 Mar 2016 - 8:08 am | नाना स्कॉच

विचार करण्यालायक गोष्ट आहे साहना जी!! आपले आभार ! U compelled me to put on my thinking hat! बघु काय नवे वाचायला मिळते ते

भाऊंचे भाऊ's picture

22 Mar 2016 - 8:53 am | भाऊंचे भाऊ

आपले लिखाण म्हटले की हल्के फुल्के असते असाच समज होता परंतु विदा देऊन या धाग्यात आपण खोडून काढला आपला लेख वास्सपवर आपले नाव अन धाग्याच्या लिंक सोबत प्रकाशित करत आहे परवानगी असावी धन्यवाद

साहना's picture

22 Mar 2016 - 10:26 am | साहना

हलके फुलके ? मी इथवर कष्ट घेवून काही लेख लिहिले पण प्रतिसाद अल्प मिळाला. एक बाष्कळ paragraph होता त्यावर्र अजून धुमश्चक्री चालू आहे

असंका's picture

22 Mar 2016 - 5:42 pm | असंका

=))

क्रेझी's picture

22 Mar 2016 - 9:08 am | क्रेझी

साहनाजी लेख आवडला पण मला वाटतं पाण्याचा काटकसरीने किंवा कोणत्याही निसर्गनिर्मित साधनसामुग्रीचा वापर काटकसरीने केला तर त्या गोष्टीचा आपल्यालाच आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना उपयोग होईल.

पुणे, मुंबई सारख्या शहरांमधे पाण्याची आवक जास्त आहे त्यामुळे इथे थोडी जरी पाणीटंचाई उद्भवली तरी पाण्याची व्यवस्था लवकर होऊ शकते.
इतर शहरांमधे तशी परिस्थिती नाही, कदाचित तुम्ही वाचलं असेल की ह्या वर्षी उन्हाळ्याच्या सुरूवातीपासूनच मराठवाडा भागांमधे पाण्याचं किती दुर्भिक्ष निर्माण झालं आहे ते आणि अजून दोन पूर्ण महिने जे अति रखरखित असणार आहेत असे सरायचे आहेत.

जर प्रत्येकाने स्वतःला पाणी वापरायची शिस्त लावली तर कदाचित इतक्या मोठ्या प्रमाणात टंचाईला तोंड देण्याची वेळ येणार नाही.
तुम्ही म्हटल्याप्रमाणे जर दाढी करतांना पाण्याचा नळ चालू राहिला तर १० मिनीटांमधे जे पाणी वाया जातं ते पुर्नवापर करण्यालायक राहत नाही. अजून तरी मोठ्या शहरांमधे असलेल्या सोसायट्यांमधे पाण्यावर प्रक्रिया करून त्याला पुर्नवापरासाठी उपलब्ध करून देणारी यंत्रणा मी बघितली नाही. तेंव्हा जर प्रत्येक घरातून असं वापरण्यायोग्य पाणी वाया घालवलं गेलं तर शेवटी तो अपव्ययच आहे!

आनन्दा's picture

22 Mar 2016 - 9:29 am | आनन्दा

लेख छानच आहे, पण खालील कारणासाठी आवडला नाही -

घरगुती पाण्याचा आपण जो अपव्यय करतो त्याचे थोडेसे समर्थन केल्यासारखे वाटले. कदाचित विविध माध्यमांमधून होणार्‍या त्याच्या मार्‍याला तुम्ही कंटाळला असाल.. समर्थन करणे ही तुमची भूमिका नसेलच असे गृहीत धरून आहे.. पण लेखातला सूर थोडा वेगळा लागलाय.

बाकी मांडलेले मुद्दे एकदम बिनतोड आहेत. हाच विचार मी आज सकाळी करत होतो.. होळीला जर मी शेजार्‍याच्या अंगावर १ बादली पाणी ओतले तर असे नेमके किती पाणी मी खर्च करणार आहे? सहानुभूती म्हणून होळी न खेळने वेगळे आणि पाणी वाचवायचे म्हणून होळी न खेळणे वेगळे.

कधी कधी याला पण (मिथ्या)पुरोगामी अजेंड्याचा वास येतो..

कुठलेही संसाधन काटकसरीने वापरावे हे तत्वतः अगदी बरोबर आणि आणि मी वर तसे लिहिले सुद्धा आहे. पण त्याचा आमच्या सण उत्सवाशी संबंध जोडू नये.

प्रामाणिक पणे सांगायचे झाले तर पाणी हे कारण पुढे करून काही लोक हिंदू धर्मावर हल्ला चढवत आहेत. उद्या CNN आणि BBC वाले पाणी कमी असताना हिंदू लोक कसे पाणी असहिष्णू पणे नष्ट करत आहेत हे छापतील. मुद्दाम BBC हिंदी ची Facebook पेज बघा.

सर्व शाळांतून होळी म्हणजे पाण्याची नासाडी असे लहान मुलांना शिकवले जाईल. शिव लिंगावर दुध न वाहता त्याचा काय सदुपयोग करता येतो ह्यावर निबंध लिहायला सांगतील. ह्याचे परिणाम दूरगामी आहेत आणि जे लोक हा प्रचार चालवात त्यांचे उद्धेश सुद्धा फार दूरगामी आहेत.

उदा
भारतीय मंदिरावर प्राणी प्रेमाच्या नावाखाली होणारा हल्ला
http://www.huffingtonpost.ca/sangita-iyer/elephant-mistreatment-india_b_...

योगा म्हणजे लैगिक आणि सामाजिक शोषण आहे ह्यावरची हि conference (मी इथे जाणार आहे)
https://call-for-papers.sas.upenn.edu/node/65385

हिंदू स्मशाने मृतांना जाळून प्रदूषण करतात
http://www.cnn.com/2011/09/12/world/asia/india-funeral-pyres-emissions/

हिंदू लोक गुरांचे शोषण कसे करतात
http://freefromharm.org/animal-cruelty-investigation/no-sacred-cows-the-...

PETA हि संस्था आणि त्यांचा jalikattu ह्या तमिळ खेळाला असलेला विरोध हे सर्वश्रुत आहे.

यज्ञ याग म्हणजे प्रदूषण हे सुद्धा काही दिवसांनी ऐकू येयील.

चाणक्य's picture

23 Mar 2016 - 2:37 pm | चाणक्य

लेख ब-याच अंशी पटला. पण शिवलिंगावर दूध ओतणे मला तरी दुधाची नासाडीच वाटते.

नाना स्कॉच's picture

22 Mar 2016 - 10:33 am | नाना स्कॉच

तुमचा रोख हा पाणी बचत एक मिथ पासुन हिंदु खतरे में है कड़े वळतो आहे असे दिसते! मला वैयक्तिक दृष्ट्या तसे वाटत नाही धन्यवाद

तुषार काळभोर's picture

22 Mar 2016 - 11:21 am | तुषार काळभोर

लेखाच्या आशयाशी बराचसा सहमत, पण रोखाशी/उद्देशाशी/इंटेन्शनशी नाही.

साहना's picture

22 Mar 2016 - 11:25 am | साहना

Conspiracy Theories मला सुद्धा आवडत नाहीत. पण काही व्यक्ती आणि संघटना ज्यांच्यात विस्तव जात नाही त्या सुद्धा एखादा common objective दिसला कि तत्काळ हात मिळवणी करतात. RTE असो किंवा "होळी" काही जणांनी हिंदू विरुद्ध काही तरी करूया म्हणून एखाद्या खोलीत बैठक घेवून सर्व घडवून आणले असा माझा मुद्दा नाही. एक मुद्धा कुणी तरी उपस्थितीत केला आणि त्यात फायदा दिसणार्या लोकांनी आपले हात धुवून घेतले. मिडिया आणि विदेशी मिडिया जी भारताकडे ख्रिस्ती दृष्टीकोनातून पाहते ती ह्याचा विपर्यास करणार हे स्पष्ट आहे. आम्ही त्याचा प्रतिवाद करण्याची तयारी ठेवली पाहिजे हा माझा मुद्दा आहे आणि प्रतिवाद सुद्धा सत्यावर आधारितच असावा.

अगदी पाणी संवर्धन हाच उद्धेश ठेवून प्रतिवाद करण्यास काय हरकत आहे ? लेखाचा मूळ गाभा तोच तर आहे.

अनेक वर्षां मागे नरेंद्र मोदींना अमेरिकेत बोलवायचे ठरले. मी अनेक डाव्या विचारसरणीच्या विद्यापीठांत (अमेरिकन) जात असल्याने तेथे ह्या विषयाची चर्चा सुरूच होती. आश्चर्य जनक रित्या डावे लिबरल, एवनजेलिस्ट आणि मुस्लिम संघटना एकत्र येवून त्यांनी एकजुटीने ह्या भेटीचा विरोध करायचा प्रयत्न सुरु केला. लोक भेट वगैरे घेत असताना काही भारतीय लोकांना मी ह्याची कल्पना दिली आणि विसा कदाचित नाकारला जायील म्हणून अधिक काळजीपूर्वक पुढे चाला असे इमेल टाकायला सुरुवात केली. (माझी कुठल्याही अतिमहनीय वगैरे व्यक्ती कडे ओळख नाही त्यामुळे खर्या आयोजकाकडे तो पोचला असल्याची शक्यता नाही). काही लोकांनी माझी अक्षरशः टर उडवली. शेवटी वीसा नाकारला गेला. नरेंद्र मोदी ह्यांचा उल्लेख प्रत्येक वेळी "कट्टर हिंदू" असा संपूर्ण अमेरिकन मिडिया मध्ये केला जातो.

नाना स्कॉच's picture

22 Mar 2016 - 11:32 am | नाना स्कॉच

एकीकडे सऊदी अरेबिया का अबुधाबी मधे हिंदु मंदिरा करता जागा मिळवली म्हणून मोदींचे कौतुक आपणच करतो (आता ते त्यांना आवडते की नाही ह्यावर मी काही बोलणार नाही ) पण मग "कट्टर हिंदु" इमेजचे आपल्याला वाईटही वाटते. एकंदरित कंफ्यूजन है भाई

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Mar 2016 - 3:13 am | निनाद मुक्काम प...

अबुधाबी मध्ये मंदिर होणे हे तेथील बहुसंख्य अनिवासी बहुतांशी हिंदू समाजाची मागणी होती तसेच तेथील कामगारांच्या अनेक समस्या होत्या त्या दोन्ही त्यांनी तेथील राजाच्या कानावर घातले भारतात गुंतवणूक करण्यासाठी त्यांना बर्याच योजना सांगितल्या त्याला प्रतिसाद देऊन तेथील राजाने मोदीच्या ह्या मागण्या मान्य केल्या
शरियत कायद्याने राजवट करणे यु ए इ व कातर देशांनी मोदींना स्वीकारले त्यांचा उल्लेख आता ते कट्टर असा करत नाहीत
अमेरिकेत खुद मोदींच्या वर विसा न देणे हे कसे चुकीचे होते हे

साधी गोष्ट आहे. पुण्याचेच उदाहरण घेतले तर लाखो लोक होळी खेळून पाणी नासवतात. मागच्या वर्षी पावसाने पार सप्टेंबरपर्यंत ओढ दिली होती. अशावेळी धरणे कोरडी पडली तर पाणी आणायचे कोठून ? मग जर आपणच बचत केली तर आपलीच पुढे होणारी गैरसोय दूर होणार नाही का? काय हरकत आहे आपण आपल्याचसाठी पाण्याची बचत केली तर? मला नाही वाटत त्यात हिंदूविरोधी काही आहे म्हणून.

राहुल मराठे's picture

22 Mar 2016 - 2:25 pm | राहुल मराठे

+१ सहमत

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Mar 2016 - 3:19 am | निनाद मुक्काम प...

मुंबई पुण्याच्या नागरिकांनी एक दिवस पाणी वाचवले तर त्यांच्या तोंडचे पाणी मराठवाड्यात वळविण्याची सुविधा आपल्याकडे आहे का
अनधिकृत पणे बांगलादेशी व इतर परप्रांतीय मुंबई सारख्या मोठ्या शहरात झोपड्या उभारतात व अनधिकृतपणे
पाणी चोरण्यासाठी पाण्याची पाईप लाईन फोडतात लाखो लिटर्स पाणी वाया जाते. ह्यावर कोण भाष्य करणार
बुरा ना मानो होली है

अप्पा जोगळेकर's picture

22 Mar 2016 - 2:48 pm | अप्पा जोगळेकर

होळीमध्ये नक्की किती पाण्याची नासाडी होते ह्याचे आकडे कधी कुणे पुढे ठेवल्याचे आठवत नाही.

आम्हा पामरांना धुळवडी मुळे पाण्याचा नाश होतो असे वाटते. तुम्हाला जर तसे होत नाही असे वाटते तर तुम्ही आकडेवारी देऊन 'होळीत पाण्याची खूपच कमी नासाडी होते हे सिद्ध का करत नाही' ?
निव्वळ सोयीस्कर आकडे नाचवण्यामागे इतर कोणतातरी 'आसारामी, सनातनी' अजेंडा दिसतो.
शेतकरी संकटात आहे म्हणून होळी खेळू नका असे कोणी सांगितले ? आम्ही तर 'प्यायला पाणी नाही म्हणून धुळवड टाळा' असे ऐकले.

पुरावे वर दिले आहेत. न वाचता कमेंट का टाकता ?

बॅटमॅन's picture

23 Mar 2016 - 1:53 am | बॅटमॅन

अगदी असेच म्हणतो.

shvinayakruti's picture

22 Mar 2016 - 4:04 pm | shvinayakruti

+11111111111
अप्पा जोगळेकर

तुमचा रोख हा पाणी बचत एक मिथ पासुन हिंदु खतरे में है कड़े वळतो आहे असे दिसते!
+११११११११११

पिलीयन रायडर's picture

22 Mar 2016 - 4:11 pm | पिलीयन रायडर

आकडे बघत बसले नाही. कारण लातुर - अंबेजोगाई - औरंगाबाद मध्ये भरपुर नातेवाईक आहेत. तिकडच्या बातम्या कळतात.

महिन्याला एकदा पाणी येते. कसे भागवतात कोण जाणे.

अशावेळेस फक्त मज्जा करायला पाणी नासवु शकत नाही.

आपल्याच महाराष्ट्रात पिकं, गाई-गुरं, माणसं पाण्याअभावी अतोनात हाल अपेष्टा सहन करत असताना आपण पाण्यात नाचणे पटत नाही. हिंदु सण वगैरे फुटकळ मुद्दे तर लक्षातही घ्यायची गरज वाटत नाही.

दुष्काळ धर्म बघुन पडत नाही.

प्रसाद१९७१'s picture

22 Mar 2016 - 4:33 pm | प्रसाद१९७१

लेखकाला म्हणायचे आहे की रुट कॉज वेगळे आहे आणि आपण अगदीच मलमपट्टी करतो आहोत छोटी.

मुळ कारणच जर थोडे फार कमी केले तर मराठवाड्यात पण रंगपंचमी खेळता येइल

श्रीरंगपंत's picture

24 Mar 2016 - 5:18 pm | श्रीरंगपंत

+१

चाणक्य's picture

23 Mar 2016 - 2:40 pm | चाणक्य

+१

मृत्युन्जय's picture

22 Mar 2016 - 4:11 pm | मृत्युन्जय

उत्तम लेख. माझा दृष्टीकोन असाच होता रंगपंचमी बद्दल. पण इतकी आकडेवारी आणि अभ्यास नव्हता / नाही. माझा पॉईंट लोकांम्ना पटवुन देण्यासाठी मुद्दे दिल्याबद्दल धन्यवाद :)

बाळ सप्रे's picture

22 Mar 2016 - 4:47 pm | बाळ सप्रे

आणखी कुठे दुष्काळ आहे, कुठे शेतकरी संकटात आहे असे भासवून मुंबई पुण्यात होळी खेळू नये

अहो मुंबई पुण्याच्या पाणी स्रोतांतील पाण्याची पातळीही खूप खाली गेलीय.. खडकवासला , पानशेतला जाउन बघा पाणी कमी माती जास्त दिसतेय. शहरातील बर्‍याच भागात पाणी रोज येत नाही नळाला.. आलं तरी काही तासच. बहुतांश स्विमिंग पूल्स बंद झालेत.

हे पाहून तुमचे आकडे मिसलिडींग आहेत हे नक्की.
आणि हिंदू धर्माचा उल्लेख पाहून तर तुम्हाला त्यातच जास्त रस आहे याची खात्रीही पटते.

काळा पहाड's picture

23 Mar 2016 - 12:07 am | काळा पहाड

तुमचे मुद्दे पूर्ण पटले. पण हिंदू कसे वाईट आहेत हे सुद्धा दाखवण्याचा प्रकार यामुळेच चालू होईल याबद्दल शंका नाही. बाकी हिंदू विरोधकांची नेहमीची कोल्हेकुई इथे चालू झालीच आहे.

बोका-ए-आझम's picture

23 Mar 2016 - 12:26 am | बोका-ए-आझम

धर्म वगैरे सगळं राहू दे. होळीत वापरलं जाणारं पाणी ही नासाडी आहे हे मुळात आपल्याला मान्य आहे की नाही? बाकी आकडेवारी बिनतोड आहे. Carbon Footprint सारखा आपला Water Footprint चा मुद्दाही पटला. पण तुमचाच मुद्दा घेऊन म्हणतो - होळीचा Water Footprint जास्त आहेच. त्यामुळे ते वाचवलं तर बिघडलं कुठे? आणि पाणीटंचाई प्रत्यक्षापेक्षा जास्त सांगितली तरी चालेल असं मला वाटतं. निदान लोक पाणी कमी नासतील.

विकास's picture

23 Mar 2016 - 1:51 am | विकास

सहमत...

पाण्याचे व्यवस्थापन सर्वच क्षेत्रात होणे महत्वाचे आहे. त्यात शेती देखील आली. पण, जेंव्हा पाणीच पाणी चोहीकडे असेल तेंव्हा जर कोणी रंगपंचमीस / धुळवडीस विरोध केला तर त्याला विरोध करेन. पण आत्ता, सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष झाले असले तर असे करू नये असे वाटते.

अत्रन्गि पाउस's picture

23 Mar 2016 - 9:13 am | अत्रन्गि पाउस

त्यातून कोरडे रंग वगैरे भंपक पणा पुढे आहेच ....कोरडे रंग धुवायला पाणी लागते त्याचे काय ??
असो ....

तर्राट जोकर's picture

23 Mar 2016 - 1:06 am | तर्राट जोकर

बाकी हिंदू विरोधकांची नेहमीची कोल्हेकुई इथे चालू झालीच आहे

१. इथे हिंदू विरोधक कोण आहेत हे काळापहाड ह्यांना माहित आहे काय?
२. कोल्हेकुई सुरु झाली ह्याचा अर्थ काय?

संपादकमंडळ, इकडे लक्ष देईल काय? आणि इथल्या सदस्यांशी सभ्यपणे वागावे असा नेहमी एकतर्फी दबाव आणणारे सारे सन्माननीय सदस्य आता विरोध करतील काय?

काळा पहाड's picture

24 Mar 2016 - 12:05 pm | काळा पहाड

१. इथे हिंदू विरोधक कोण आहेत हे काळापहाड ह्यांना माहित आहे काय?

इथे हिंदू विरोधक कोण आहेत हे तर्राट जोकर ह्यांना माहित नाही असं म्हणायचं आहे काय? तसं असेल तर त्यांनी आपला अभ्यास वाढवावा.

२. कोल्हेकुई सुरु झाली ह्याचा अर्थ काय?

आता मराठी शब्द, वाक्प्रचार, म्हणी यांचे अर्थ सुद्धा समजवावेत असं वाटत असेल तर बोलणंच खुंटलं. तुम्ही एक मराठी इयत्ता दुसरीचं पुस्तक विकत घेवून अभ्यास करावा असा माझा सल्ला आहे.

संपादकमंडळ, इकडे लक्ष देईल काय? आणि इथल्या सदस्यांशी सभ्यपणे वागावे असा नेहमी एकतर्फी दबाव आणणारे सारे सन्माननीय सदस्य आता विरोध करतील काय?

१. संपादक मंडळ आणि सन्माननीय सदस्य अशी विभागणी करण्याचं कारण कळलं नाही. संपादक मंडळाचे सदस्य सन्माननीय नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे काय? संपादक मंडळाने कृपया लक्ष द्यावं.
२. सन्माननीय सदस्य (जे कुणी असतील ते) एकतर्फी दबाव आणतात असा जो तुमचा आरोप आहे त्याबद्दल तुम्ही पुराव्याने काही शाबीत करू शकता का ? नसेल तर तुम्ही काही सन्माननीय सदस्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करताय. तसंच दादा दरेकर (किंवा त्यांचे दशावतार) सोडता इथे सगळे सन्न्माननीय च असल्यामुळे तुमचा आरोप बेचूट स्वरूपाचा आहे याची नोंद घ्यावी. संपादक मंडळाने कृपया लक्ष द्यावं.

नाखु's picture

24 Mar 2016 - 1:42 pm | नाखु

काढणे यालाच म्ह्णतात काय?

तर्राट जोकर's picture

24 Mar 2016 - 2:30 pm | तर्राट जोकर

शब्दांचे फुगे उडवून मुद्दा दाबणे म्हणतात नाखुशेठ.

जाकी रही भावना जैसी | प्रभु मूरत देखी तिन तैसी ||

शेवटी हेच खरं होत आहे मिसळपाव वर.

तर्राट जोकर's picture

23 Mar 2016 - 3:39 am | तर्राट जोकर

पाणी वाचवा धाग्यावर मोदींची चर्चा आणि भक्तांची भलामण??? आता विनातक्रार चालेल ;-)

कुठे गेले मला विषयांतर करतो, अवांतर करतो, धागा मूळ विषयापासून भरकटवतो, नको तिथे मोदीचा विषय आणतो म्हणुन बदनाम करणारे सोज्वळ, धुतल्या तांदळाचे भक्तगण?

साधा मुलगा's picture

23 Mar 2016 - 10:51 am | साधा मुलगा

प्रथमतः आपण आकडे देऊन आपला मुद्दा मांडलात याबद्दल आपले अभिनंदन.
पण अशी परिस्थिती आहे कि आमच्याकडे महानगरपालिकेचे पाणी जे सकाळी आणि संध्याकळी तीन-चार तास चांगल्या दाबाने यायचे तेच आता पाणीकपात म्हणून आठवड्यातले पाचच दिवस येते दोन दिवस येत नाही. बाकी इतर गाव शहरात किती टंचाई भीषण आहे हे मी सांगायची गरज नाही.
म्हणजे पाण्याची टंचाई आहे हे तुम्हीसुध्दा मान्य कराल.

माझा अंदाज/ठोकताळा: ( अंदाजपंचे लिहित आहे , चुका लक्षात आणून द्याव्यात)
पूर्वी रंगपंचमी खेळून आल्यावर किमान दोन पाणी बादल्यांनी आंघोळ करावी लागायची. शिवाय रंगपंचमी खेळत असताना किमान दहा बादल्या पाणी तरी सहज आम्ही एकमेकांवर उडवायचो. म्हणजे जिथे आम्ही रोज साधारण चार ते पाच बदल्या पाणी वापरत असू तर तोच वापर पंचमीच्या दिवसात पंधराच्या वर जाऊ शकतो. हे एका घराबाबत झाले, यालाच शहरातील रंगपंचमी खेळणाऱ्या लोकांच्या संख्येने गुणले तर आकडा फार मोठा होऊ शकतो. आणि हल्ली तर काय रेन dance वगैरे प्रकार चालले आहेत तिकडे किती पाणी वापरतात कोणाला माहिती.
माझे म्हणणे एवढेच आहे कि जर पाणी टंचाई आहे तर पाणी जपून वापरणे प्राप्त आहे. जर होळीच्या दिवशी आपण एवढे पाणी फुकट (साधारण दुप्पट ते चौपट) घालवत असू, तर त्यापेक्षा होळी न खेळता
त्या पाण्याची बचत करून, दोन दिवसांची पाणी टंचाई किमान एक दिवसावर तरी आणता येईल.(हे हि अंदाजपंचे बोलत आहे.)
शेतकऱ्यांच्या पाण्याची गोष्ट तर दूरच आहे किमान माझे पिण्याचे/घराच्या वापराचे पाणी तरी मला नियमित मिळू द्या. उगाच रीण काढून सण साजरा करावा हि वृत्ती मला तरी आवडत नाही.
बाकी आकडेवारी:
मागे मी एकदा राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद अंतर्गत शालेय मुलांनी आपण रोजच्या वापरातील पाणी बचत केल्यास किती बचत होते यावर एक प्रकल्प केला होता , ते पुस्तक माझ्याकडे आहे , घरी गेल्यावर वाचून त्याची आकडेवारी टाकतो, आत्ता वायफळ बडबड करण्यात अर्थ नाही.

मागे मी एकदा राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद अंतर्गत शालेय मुलांनी आपण रोजच्या वापरातील पाणी बचत केल्यास किती बचत होते यावर एक प्रकल्प केला होता , ते पुस्तक माझ्याकडे आहे , घरी गेल्यावर वाचून त्याची आकडेवारी टाकतो, आत्ता वायफळ बडबड करण्यात अर्थ नाही.

आकडेवारीच्या प्रतीक्षेत

ब़जरबट्टू's picture

23 Mar 2016 - 12:04 pm | ब़जरबट्टू

ते अजून घरी पोहचले नाहीत... :)

राही's picture

23 Mar 2016 - 12:45 pm | राही

अहो, इथे कृत्रिम हौद उभे करतात रंगीत पाण्याने भरलेले. आहात कुठे? पिंपे भरभरून पाणी फेकले जाते. आणि केवळ दुष्काळातच नव्हे तर सामान्य परिस्थितीतही एक बादली पाणीच काय कोणतेही नैसर्गिक संसाधन शक्यतो कणभरही वाया जाऊ नये किंवा त्याचा गैरवापर होऊ नये असे माझे मत आहे. यात दुधातुपाचे अभिषेकही आले. सध्या आमच्याकडे शिवजयंतीनिमित्त वीजकंपनीच्या रस्त्यावरील स्टेशन्समधून वीज वापरून मंडप सजले आहेत. एरवीही सोसायट्यांमधील दिवे सकाळी सुमारे एक तास अधिक वेळ जळत असतात. परिसरात एक अनधिकृत देऊळ आहे. त्याला मोठी पत्र्याची शेड घालून सुमारे साडेतीनशे चौ.फू.ची आवार बनवले आहे. मध्ये १०x१० ची घुमटी आहे. घुमटीमध्ये अहोरात्र दिवा असणे ठीक. पण आवारात सुमारे दहा-बारा ट्यूब रात्रभर सकाळी पावणेआठपर्यंत जळत असतात. सध्या लवकर उजाडते. तेव्हा हा सगळा विजेचा अपव्यय आहे असे मला वाटते. मला जाताजाता समोर हे दिसते. ते टाळण्याजोगे आहे असे वाटते.

तर्राट जोकर's picture

23 Mar 2016 - 1:20 pm | तर्राट जोकर

सहमत. एक बादली तर आहे च्या नावाखाली हजारो लिटर पाणी वाया जाते आणि ते कळत नाही. एक बादलीला ओके म्हटले की पुढे रेनडान्सही कबूल करावा लागतो.

साधा मुलगा's picture

23 Mar 2016 - 2:30 pm | साधा मुलगा

आपल्याला मुद्दा कळला मी काय म्हणतो ते , उगाच साधनसंपत्तीची वाया घालवू नये मग ते पाणी असो व वीज. प्रतिसादाशी सहमत आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

24 Mar 2016 - 12:37 pm | प्रकाश घाटपांडे

हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होतो आहे आमच्या शे पाचशे च्या चिरीमिरी ने काय होणार आहे
मला लहानपणी वाचलेली 'खुलभर दुधाची' कहाणी आठवली. देवाचा गाभारा दुधाने भरून वाहील असा संकल्प राजाने केला व सक्तिने सर्व नागरिकांना स्वतःला थेंबही न घेता सगळे दूध देवळात आणुन घालायचा हुकुम सोडला. सार्‍या गावाने सगळे दूध ओतले तरी गाभारा भरेना. अखेर एक म्हातारी आली. तिने राजाचा हुकुम बाजुला सारून आपल्या घरच्या वासराना, लेकराना दूध पिऊ दिले आणि उरलेले खुलभर दूध ती देवळात घेऊन आली. तिने आपला गडु देवावर ओतताच गाभारा ओसंडुन वाहु लागला.
आता मला मोठेपणी ऐकलेली 'खुलभर पाण्याची' कहाणी आठवली. देवाचा गाभारा दुधाने भरून वाहील असा संकल्प लोकशाही राजाने केला व अनासक्तिने सर्व नागरिकांना स्वतःला थेंबही न घेता सगळे दूध देवळात आणुन घालायचे आवाहन केले.
कोणी विचार करु लागला कि इतर लोक दुध टाकणार आहेत च आपली एखादा तांब्या पाण्याने काय होणार आहे? चला आपण पाणीच टाकू
कोणी विचार करु लागला कि इतर लोक साले चोर आहेत पाणी टाकतील मग आपण दुध टाकले तरी त्याचा काय उपयोग? चला आपण पाणीच टाकू.
अशा रितिने सर्व गाभारा पाण्याने ओसंडून वाहू लागला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Mar 2016 - 2:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडला आणि पटलाही. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

गरिब चिमणा's picture

24 Mar 2016 - 3:15 pm | गरिब चिमणा

मी स्वतः एक शेतकरी आहे,ऊसाच्या पिकाला पाणि जास्त लागते हे खरे असले तरी ३% ऊस ६०% पाणि पितो या आकडेवारीविषयी मी साशंक आहे.उस भिजवणेसाठी पाणि भरपुर सोडावे लागते,ऊस गरगरीत भिजवायला लागतो .एकदा उस भिजवला की जवळपास् सत्तर टक्के पाणि हे पर्कोलेशनने जमिनीतीत जाते व भुजल पातळी पुनर्भरण होते.शेजारच्याचा उस भिजला की विहीरी व बोअरवेलचे पाणी वाढते हा नेहमीचा अनुभव आहे.फाट्याच्या पाण्यावर रानं भिजली की आसपासच्या सगळ्या विहीरी भरतात व ते पाणि इतर पिकाला उपलब्ध होते.
ऊस पाच महीन्याचा झाला की दाट होत जातो त्यामुळे बाष्पीभवनाने जाणारे पाणी वाचते.उसाची पक्की बांधणी झाल्यानंतर फक्त पाणी द्यायचे असते ,तेही तीन आठवड्यात एकदा .त्यामुळे ऊस शेती करणारे शेतकरी ईतर कामे करु शकतात.बरेच ऊस शेतकरी गवंडी काम, ट्रॅक्टर चालक,नोकरी ,दुग्धव्यवसाय करतात .त्यामुळे या कामांसाठी मनुष्यबळ उपलब्ध होते.उस तुटल्यानंतरच वाढं म्हणजेच वरचा भाग गुरांसाठी उत्तम चारा म्हणुन आठ महिणे उपलब्ध असतो.उसाच्या शेतीने जे पुरक उद्योग विकसीत झाले आहेत व मिळणार्या उसंतीने जे मनुष्यबळ तयार झाले आहे त्यांमुळे शेती विकासात भरच पडली आहे.ईतर पिके हंगामी वेळखाउ व नगदी नसल्याने त्यांच्यापासून फारसा फायदा नाही,
ऊसशेतीला बदनाम करणे त्यामुळे योग्य नाही.फक्त तुषार सिंचन ,ड्रीप इरीगेशन याला चालना दिल्याने अतिरीक्त पाण्याची बचतही होईल.
( सदरची माहीती माझ्या तूटपुंज्या शेतीच्या अनुभवावर आधारीत आहे ,पण मला वाटतं कोणा दिल्लीत बसणार्या जलतज्ञाच्या काही आकडेवारीपेक्षा शेतकर्यांने अनुभव जास्त महत्वाचे आहेत.)

प्रसाद१९७१'s picture

25 Mar 2016 - 12:35 pm | प्रसाद१९७१

ही माहीती नविन आहे आणि उपयोगी आहे.

नाखु's picture

29 Mar 2016 - 10:55 am | नाखु

ही माहीती खरी आणी थेट शेतकर्याकडून असेल तर अगदी तपशीलवार वेगळ्या स्वतंत्र लेखात आली तर सोन्याहून पिवळे.बरेच गैरर्समज्/एकांगी लेख वाचून झालेले प्रतिकूल मत बदलण्यास मदत होईल.

तेव्हा चिमणा भाऊंनी लिहावेच.

नाखु

छान लेख! असा तथ्याधारित लेख विरळाच!
नाही तर जनरली लोकांना 'कस्स्सं कस्सं बॉ मला(च) शेत्कर्‍याची कल्जी' हे दाखवायचा इतका सोस असतो :प! ;)

चौथा कोनाडा's picture

25 Mar 2016 - 11:15 am | चौथा कोनाडा

लेख आवडला.

दर होळी अन उन्हाळ्या पुर्वी पाणी वाचवाचे हाकारे सुरु होतात.
टिव्हीचॅनेल वाले एनजीओ अन तत्सम मंडळी या विषयाच्या बोम्बा मारायला चालु करतात. स्वत: किती पाणी वाचवतात कोण जाणे !

सिनेमा, फालतू टिव्ही सिरियल्स, बिना कामाचे प्रचारकी कार्यक्रम,मिरवणुका, हे असले नॉन व्हॅल्यु वाल्या टुकार अक्टिव्हिटी तीन चार महिने बंद ठेवुन खुप पाणी वाचवता येइल ना !

सतीश कुडतरकर's picture

29 Mar 2016 - 12:37 pm | सतीश कुडतरकर

साहना
आपण तांदुळाचा विषय काढलात. तांदुळाची शेती ही बागायती शेती आहे कि पावसाळी? जो काही पाउस थेट खाचरात पडतो त्यातूनच तांदुळाची शेती होते धरणातून कालवे काढून पाणी पुरवले जात नाही.