भारतांतच नाही तर जगांत सगळीकडे प्राणीप्रेमी, निसर्गप्रेमी इत्यादी चे कातडे पांघरून राजकारण करणे सर्रास चालते. अश्या संघटनांना किंवा लोकांना मदत करताना आपली विवेकबुद्धी वापरूनच मदत करावी.
दर वर्षी होळीच्या उत्सव जवळ आला कि "पाणी वाचवा होळी खेळू नका" असे आवाहन केले जाते. आणखी कुठे दुष्काळ आहे, कुठे शेतकरी संकटात आहे असे भासवून मुंबई पुण्यात होळी खेळू नये असे सर्व राजकारणी NGO वगैरे लोक सांगत फिरतात. होळीमध्ये नक्की किती पाण्याची नासाडी होते ह्याचे आकडे कधी कुणे पुढे ठेवल्याचे आठवत नाही. काही लोक चक्क संडास फ्लश करू नका किंवा दाढी करताना नळ चालू ठेवू नका इत्यादी प्रचार करत असतात.
ह्या प्रचाराला शास्त्रीय आधार फार कमी आहे. पाणी किंवा इतर कुठल्याही संसाधनाचा वापर जितका शक्य आहे तितका कमी करावा पण होळी खेळू नये इत्यादी प्रचार अतिशयोक्ती आहे.
भारतातील एकूण पाण्याच्या वापरापैकी ९१% पाणी शेती साठी वापरले जाते, ७% पाणी शहरातील मानवी वापरा साठी जाते तर ५% पाणी विविध उद्योग धंदे वापरतात. [१]
७% मानवी वापरातील पाण्यापैकी सुमारे ५०% पाणी स्नान, कपडे धुणे आणि प्रसाधनग्रहांत जाते. [२] पिण्यासाठी फक्त ४% (७ टक्क्याचे ४%) पाणी वापरले जाते.
वर्षांतील एक दिवस आपण पाण्याने मनसोक्त होळी खेळली तरी पाण्याच्या एकूण साठ्यावर काहीही परिणाम होत नाही त्याशिवाय न खेळली तर जे पाणी वाचते त्यामुळे कुणालाही फायदा विशेष होत नाही. अर्थांत कुणाला प्रतीकात्मक दृष्ट्या होळी न खेळता पाणी वाचण्याचा प्रयत्न करायचा असेल तर जरूर करावा पण त्याने शेतकर्यांना फायदा होतो हा निव्वळ गैरसमज आहे.
सामाजिक प्रथा आणि इतर काही तरी विषय ह्यांत False Dichotomy [३] दाखवून सामाजिक प्रथा बंद करव्यात असा प्रचार जे लोक करतात त्यांच्या विषयी मला नेहमीच संशय वाटतो. उदा शिवलिंगावर दुध व्हावू नका भुकेल्याला द्या इत्यादी. आम्ही आमच्या मुलांना सुद्धा सांगू शकतो, उगाचं शिवरायांचे गड पाहायला जावून वेळ दवडू नका त्या एवजी गणित शिका. म्हातार्या आजीचा हात हातांत घेवून तिच्या बरोबर ५ मिनिटे बोलून वेळ दवडू नका विज्ञानाचे पुस्तक वाचा अभ्यासांत फायदा होयील. Alzimers झालेल्या आजोबा बरोबर बोलणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे कारण त्यांना नंतर त्याचा विसर पडेल त्या ऐवजी एखादे पुस्तक वाचा. ह्या गोष्टी काही प्रमाणात तार्किक वाटल्या तरी प्रत्यक्षांत तार्किक दृष्ट्या चुकीच्या आहेत. कारण इथे दोन पर्याय Mutually Exclusive नसून दोन्ही गोष्टी साध्य केल्या जावू शकतात.
ज्यांना पाण्या विषयी खरोखर कळकळ आहे ते अनेक गोष्टी करू शकतात. उदा एक दिवस तांदूळ जेवणात न वापरता गहू वापरा. साखरेचा वापर कमी करा इत्यादी.
९१% पाणी जे शेत साठी वापरले. पाणी वेस्ट करण्यात भारतीय शेतकऱ्याचा पहिला नंबर लागतो. चीन किंवा अमेरिच्या तुलनेत एक टन गहू उगवायला भारतीय शेतकरी सुमारे दुप्पट पाणी वापरतो.
एकूण शेतीच्या पाण्यापैकी सुमारे ४०% पाणी फक्त तांदूळ आणि उस हि पिके घेतात. भारतीय लोक आपल्या आहारांत तांदूळ फार प्रमाणात ठेवत असल्याने त्याचे आश्चर्य वाटत नाही पण उस ह्या पिकाचे मात्र आश्चर्य वाटते. महाराष्ट्रातील सुमारे ३% शेतजमीन उसाच्या लागवडी खाली आहे पण महाराष्ट्रातील ६०% पाणी मात्र फक्त उस घेतो. [६] पाणी हे शेतकर्यांना फुकट मिळत असल्याने शेतकऱ्याला फरक पडत नाही पण पिकाच्या किमतीत "पाण्याचा वापर" हा घटक ह्यामुळे लक्षांत येत नाही. ह्यामुळे साखरेची किमत कमी राहते. पाण्याचा वापर लक्षांत घेतल्यास साखरेची किंमत किमान १००% वाढायला पाहिजे.
ब्राझील सर्वाधिक साखरेची निर्मिती करतो. सदर साखर भारतांत कमी दरांत विकली जावू शकते म्हणून भारतीय सरकारने ४०% आयात कर लावून ह्या साखरेला भारतांत बंद केले आहे. साखर माफियाना करदात्याचा पैसा देवून सरकार साखर निर्यात करण्यास सरकार मदत करते.
साखरेची निर्यात करण्यास हरकत नाही पण ती साखर तयार करायला जे पाणी खर्च झाले आहे त्याचा खर्च त्याच्या दरातून वसूल नाही झाला तर अर्थ असा होतो कि भारतीय सरकार भारताचे पाणी भेट म्हणून इतर देशांना दिते. वरून करदात्यांचा पैसा साखर कारखान्यांना देणे म्हणजे पाण्याशिवाय गरीब भारतीयांचा पैसा सुद्धा विदेशी लोकांना भेट म्हणून देणे.
ऊस पिकवून शेतकरी गब्बर झाले आहेत असे सुद्धा वाटत नाही. उस पिकवणारे शेतकरी इतर शेतकर्या पेक्षा चांगल्या परिस्थतीत आहेत असे नाही उलट साखर कारखान्यांनी त्यांचे पैसे थकवून ठेवले आहेत. भात किंवा गहूची बाजारपेठ फार मोठी असते. उस फक्त साखर कारखानेच घेवू शकतात ह्यामुळे सरकारचे शेती धोरण "साखर माफिया" सोडून इतर कुणाला फायदेशीर आहे असे वाटत नाही.
ह्यांत मी सरकारचा सुद्धा दोष करू शकत नाही कारण उसाची शेती कमी करण्यासाठी सरकारने काही हालचाल केलीच तर "शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या" अशी आवई विरोधक आणि मिडिया वाले चालवतील.
पाणी वाचवायचे असेल तर. भात आणि साखर आपल्या आहारातून कमी करा. एक किलो साखर वाचवली सुमारे १००० लिटर पाणी वाचवले जावू शकते.
[१] http://www.fao.org/nr/water/aquastat/countries_regions/ind/index.stm
[२] http://indiaenvironmentportal.org.in/files/Water%20consumption%20patterns.pdf
[३] https://en.wikipedia.org/wiki/False_dilemma
[४] http://www.lenntech.com/water-food-agriculture.htm
[5] http://www.indiaenvironmentportal.org.in/files/file/agricultural%20water%20use%20India.pdf
[6] http://www.muthstruths.com/indias-sugar-export-policy-is-almost-criminal/
वर्गीकरण
वाचन संख्या
10337
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक किलो साखर वाचवली तर सुमारे
ह्यांत काहीही चुकीचे गणित
In reply to एक किलो साखर वाचवली तर सुमारे by अमृता_जोशी
महाराष्ट्रातील सुमारे ३%
हा आकडा मुंबई मिरर मध्ये
In reply to महाराष्ट्रातील सुमारे ३% by उगा काहितरीच
आकडा भेटत नाही ओ. मिळतो.
In reply to हा आकडा मुंबई मिरर मध्ये by साहना
आणी आकडा लागतो सुद्धा . आकडा
In reply to आकडा भेटत नाही ओ. मिळतो. by धनंजय माने
खूप प्रयत्केला केला पण
In reply to आणी आकडा लागतो सुद्धा . आकडा by उगा काहितरीच
आशयाशी सहमत आहे.
आकडेवारी वापरून तथ्य काय आहे
Penni Wise and Pound foolish
In reply to आकडेवारी वापरून तथ्य काय आहे by राजेश घासकडवी
विचार करण्यालायक गोष्ट आहे
आपले लिखाण म्हटले की हल्के
हलके फुलके ? मी इथवर कष्ट
In reply to आपले लिखाण म्हटले की हल्के by भाऊंचे भाऊ
=))
In reply to हलके फुलके ? मी इथवर कष्ट by साहना
साहनाजी लेख आवडला पण मला
लेख छानच आहे, पण खालील
कुठलेही संसाधन काटकसरीने
In reply to लेख छानच आहे, पण खालील by आनन्दा
बाकी
In reply to कुठलेही संसाधन काटकसरीने by साहना
तुमचा रोख हा पाणी बचत एक मिथ
+१ सहमत
In reply to तुमचा रोख हा पाणी बचत एक मिथ by नाना स्कॉच
Conspiracy Theories मला
In reply to तुमचा रोख हा पाणी बचत एक मिथ by नाना स्कॉच
एकीकडे सऊदी अरेबिया का
In reply to Conspiracy Theories मला by साहना
अबुधाबी मध्ये मंदिर होणे हे
In reply to एकीकडे सऊदी अरेबिया का by नाना स्कॉच
पण प्र्त्येक वेळी आकडेवारी हवीच का?
+१ सहमत
In reply to पण प्र्त्येक वेळी आकडेवारी हवीच का? by बबन ताम्बे
मुंबई पुण्याच्या नागरिकांनी
In reply to पण प्र्त्येक वेळी आकडेवारी हवीच का? by बबन ताम्बे
होळीमध्ये नक्की किती पाण्याची
पुरावे वर दिले आहेत. न वाचता
In reply to होळीमध्ये नक्की किती पाण्याची by अप्पा जोगळेकर
+११११११११११११११११११११११
In reply to होळीमध्ये नक्की किती पाण्याची by अप्पा जोगळेकर
+11111111111 अप्पा जोगळेकर
तुमचा रोख हा पाणी बचत एक मिथ
आकडे बघत बसले नाही. कारण
लेखकाला म्हणायचे आहे की रुट
In reply to आकडे बघत बसले नाही. कारण by पिलीयन रायडर
+१
In reply to लेखकाला म्हणायचे आहे की रुट by प्रसाद१९७१
+१
In reply to आकडे बघत बसले नाही. कारण by पिलीयन रायडर
उत्तम लेख. माझा दृष्टीकोन
आणखी कुठे दुष्काळ आहे, कुठे
तुमचे मुद्दे पूर्ण पटले. पण
साहनाजी
+१
In reply to साहनाजी by बोका-ए-आझम
प्रचंड सहमत
In reply to साहनाजी by बोका-ए-आझम
बाकी हिंदू विरोधकांची नेहमीची
१. इथे हिंदू विरोधक कोण आहेत
In reply to बाकी हिंदू विरोधकांची नेहमीची by तर्राट जोकर
पिसे
In reply to १. इथे हिंदू विरोधक कोण आहेत by काळा पहाड
शब्दांचे फुगे उडवून मुद्दा
In reply to पिसे by नाखु
पाणी वाचवा धाग्यावर मोदींची
नमस्कार
मागे मी एकदा राष्ट्रीय बाल
In reply to नमस्कार by साधा मुलगा
दम धारा जरा.
In reply to मागे मी एकदा राष्ट्रीय बाल by आनन्दा
एक बादली?
सहमत. एक बादली तर आहे च्या
In reply to एक बादली? by राही
आपल्याला मुद्दा कळला मी काय
In reply to एक बादली? by राही
हजारो कोटी रुपयांचा
लेख
मी स्वतः एक शेतकरी आहे
ही माहीती नविन आहे आणि उपयोगी
In reply to मी स्वतः एक शेतकरी आहे by गरिब चिमणा
+११
In reply to ही माहीती नविन आहे आणि उपयोगी by प्रसाद१९७१
http://scroll.in/article
In reply to मी स्वतः एक शेतकरी आहे by गरिब चिमणा
छान लेख! असा तथ्याधारित लेख
लेख आवडला.
साहना