गाभा:
कॉफी घालून केक किंवा आईस्क्रीम बनवलेले ठाऊक आहे ....brandy वाईन वगैरे वापरून काही पदार्थ बनवलेले सुद्धा पहिले ऐकले वाचले आहेत ...
परंतु काही प्रश्न मला नेहेमी सतावतात
- कॉफी घालून केक किंवा आईस्क्रीम बनवलेले ठाऊक आहे ....brandy वाईन वगैरे वापरून काही पदार्थ बनवलेले सुद्धा पहिले ऐकले वाचले आहेत ...परंतु 'चहा' किंवा चहा पावडर वापरून (पिण्याच्या चहा व्यतिरिक्त) काही पदार्थ करतात का ?
- कॉफीन फ्रॉम HongKong मध्ये बेगर्स चिकन म्हणून पदार्थ वर्णन केला होता तो खरोखर असतो का ? कुणी खाल्ला आहे का ?
- कुकरी शो वर किंवा अन्य तत्सम कार्यक्रमात दाखवले जाणारे मुख्य पदार्थाची इवलुशी मूद त्यावर अलगद घातलेले कोथिंबीरीचे पान,त्याला टेकून टोमाटो चा काप, बाजूला मधाचा किंवा सॉस चा फराटा हे असले पदार्थ केले कि एका माणसाला तरी पुरतात का ...कोण खात इत्केसे
- खूप नाव ऐकले म्हणून सरदार ची पाव भाजी खायला गेलो, एक प्लेट पार्सल दुसऱ्या दिवशी खावी म्हणून घेऊन आलो फ्रीज मधून दुसऱ्या दिवशी काढल्यावर सुमार ८०-९० ग्राम्स बटर एकीकडे थिजलेले होते .....आता प्रश्न असा कि आपण खाल्लेल्या पाव्भाजित चव बटर ची, मसाल्याची का आणखीन कसली .... हे असे इतके बटर पोटात गेले तर नक्की काय परिणाम होत असावा ?
- मामलेदारच्या मिसळीत तिखटपणा कसला ? तिखटाचा,मिरचीचा, मिऱ्याचा कि चुन्याचा ??
प्रतिक्रिया
17 Mar 2016 - 4:22 pm | सप्तरंगी
मला फक्त याचे उत्तर देता येईल
'चहा' किंवा चहा पावडर वापरून (पिण्याच्या चहा व्यतिरिक्त) काही पदार्थ करतात का ?
उत्तर : चहाच्या पाण्यात छोले भिजवता येतात , मेंदी भिजवता येते (खाता येत नाही ), मॉकटेल करता येते, ते पण मस्त होते.
कुकरी शो वर किंवा अन्य तत्सम कार्यक्रमात दाखवले जाणारे मुख्य पदार्थाची इवलुशी मूद त्यावर अलगद घातलेले कोथिंबीरीचे पान,त्याला टेकून टोमाटो चा काप, बाजूला मधाचा किंवा सॉस चा फराटा हे असले पदार्थ केले कि एका माणसाला तरी पुरतात का ...कोण खात इत्केसे
उत्तर :त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे असतात :)
31 Mar 2016 - 5:21 pm | पांथस्थ
१. जपान मधे ग्रीन टी पासून जेली, आईस्क्रीम असे अनेक पदार्थ बनवले जातात
२. TV Show मधे दाखवले आहे कि श्रीलंके मधे काही पदार्थांच्या रस्स्यात चहा घालतात अथवा कोथिंबीर सारखे वरून टाकतात
31 Mar 2016 - 6:46 pm | lgodbole
चुना हे कॅल्शियमचे स्वस्त स्त्रोत आहे.
चार लोकांच्या आमटी वरणात हरबरा डाळीइतका चुना टाकावा
1 Apr 2016 - 3:08 pm | सुयशतात्या
कॉफीन फ्रॉम HongKong मध्ये बेगर्स चिकन , मी जकार्ता मध्ये खाल्ल आहे.मस्त लागत
https://www.zomato.com/onesuyash
1 Apr 2016 - 4:37 pm | विवेकपटाईत
दिल्ली आणि पंजाब मध्ये पाव भाजी असो वा दाल मखानी, नान असो वा रोटी. बटरचा वापर भरपूर होतो. त्या शिवाय लोकाना खाल्ल्या सारखे वाटत नाही.
1 Apr 2016 - 11:44 pm | बोका-ए-आझम
चा उल्लेख मीना प्रभूंच्या चिनी माती मध्ये आहे आणि ते वर्णन वाचून भूक लागते इतकं ते छान लिहिलेलं आहे.
2 Apr 2016 - 4:56 pm | असंका
३. नंबरचा प्रश्न सहमत...उत्तराच्या प्रतिक्षेत!! जे कुणी हे असले खातात, ते मग पोटभरीसाठी लगेच दुसरीकडे कुठेतरी जात असावेत का ? कुठे? असा माझा पुढचा प्रश्न आहे.
2 Apr 2016 - 6:49 pm | सुबोध खरे
कुकरी शो मध्ये दोन किंवा तीन घास येतील इतकेच पदार्थ असल्यामुळे त्याची चव बराच वेळ लक्षात राहते.
पावसाळ्यात तीनच भजी खाऊन पहा जिभेला खवखव सुटेल कि नाही. मी आणी माझी बायको सर्रास( पाचात चार वेळा) दोघात एक पाणीपुरी खातो. कारण दवाखान्यातून मधेच जाऊन खाल्ले तर जेवणाच्या वेळेच्या जवळ असते त्यामुळे तीन किंवा चार पाणीपुर्या खाल्या तर जीभ अजूनच खवळते.
पोट भरेस्तोवर खाल्ले तर त्याची खुमारी राहत नाही. शिवाय जेवणाचा विचका होतो.
"गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा
स्वप्नातल्या कळ्य़ानो उमलू नकाच केंव्हा. "
2 Apr 2016 - 7:25 pm | तर्राट जोकर
मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया ही मालिका बघितली व त्यावरुन पाकशास्त्र किंवा डायनिंगबद्दल जेवढं कळलं त्यानुसार पाश्चात्त्यांमधे जेवनाचे आन्त्रे, मेनकोर्स व डेजर्ट असे तिन कोर्सचा डिनर असतो. हॉटेलमधे बहुतेक डिनरला जातात. घरी जेवताम्ना असं साग्रसंगीत नसतं आपल्यासारखं. लंच म्हणजे एखादं सॅन्डविच. कुकरीशो हे लोकांनी जास्तीत जास्त हॉटेलिंग करावं ह्यासाठीचे अंडरकवर मार्केटींग आहे. त्यात दाखवले जाणारे पदार्थ तसेच्या तसे घरी बनवणं फार थोड्या लोकांना शक्य असतं. पार्टीमधे अनेक आन्त्रे, अनेक मेनकोर्स डिशेस अनेक डेझर्ट असू शकतात (हा माझा अंदाज, प्रत्यक्ष अनुभवी इथे असतील त्यांनी स्पष्ट करावे) त्यामुळे गोंडस हवीहवीशी दिस्नारी डिश चवीसाठी खाल्ली जाते, पोटभरीसाठी नाही. पोटभरीसाठी इतर पदार्थ असतात.
- माझ्यापरिने उत्तर. सर्व बरोबर असेल्च असे नाही.
2 Apr 2016 - 9:52 pm | नाना स्कॉच
कॉफी घालून केक किंवा आईस्क्रीम बनवलेले ठाऊक आहे ....brandy वाईन वगैरे वापरून काही पदार्थ बनवलेले सुद्धा पहिले ऐकले वाचले आहेत ...परंतु 'चहा' किंवा चहा पावडर वापरून (पिण्याच्या चहा व्यतिरिक्त) काही पदार्थ करतात का ?
चहा पाण्यात अंडी उकडून त्यांचे टी क्योर्ड एग पिकल बनवतात चीनी लोक, कोवळी चहाची पाने गार्निशिंग ला वापरली जातात तसेच ब्रॉथ म्हणजेच रस्सा ह्या प्रकाराला रंग यावा म्हणूनही चहाची पाने वापरतात
कॉफीन फ्रॉम HongKong मध्ये बेगर्स चिकन म्हणून पदार्थ वर्णन केला होता तो खरोखर असतो का ? कुणी खाल्ला आहे का ?
कुकरी शो वर किंवा अन्य तत्सम कार्यक्रमात दाखवले जाणारे मुख्य पदार्थाची इवलुशी मूद त्यावर अलगद घातलेले कोथिंबीरीचे पान,त्याला टेकून टोमाटो चा काप, बाजूला मधाचा किंवा सॉस चा फराटा हे असले पदार्थ केले कि एका माणसाला तरी पुरतात का ...कोण खात इत्केसे
बेगर्स चिकन बद्दल ऐकले नाहीये म्हणून आमचा पास, बाकी अन्नाचे पोर्शन छोटे ठेवणे ह्या मागे मल्टीपल कोर्स चा हात असतो, सहसा appetizer-starter-salad-rotisserie-main course- dessert असा बेसिक कोर्स असतो, तसेच बारके पोर्शन असणाऱ्या मेन कोर्सेस मधे वैरायटी असते म्हणजे एकच मासा तीन वेगळ्या प्रकारे बनवून सर्व करणे किंवा तीन वेगळे मासे तीन वेगळ्या सॉस मधे शिजवणे, प्रत्येक कोर्स असा असतो जो एकतर पुढील कोर्स साठी टेस्ट पेलेट क्लियर तरी करेल किंवा नेक्स्ट कोर्स मधील टेस्ट प्रोफाइल एनहान्स करेल. अन हे सगळे बेसिक आहे, फ्रेंच कुझीन मधे जितकी कटलरी वापरतात (काटे चमचे सूरी वगैरे) त्यांची एकुण संख्याच पाहुन दड़पुन जायला होते! (ह्या कटलरी संदर्भात टाइटेनिक सिनेमा मधे एक उत्तम सीन आहे)
खूप नाव ऐकले म्हणून सरदार ची पाव भाजी खायला गेलो, एक प्लेट पार्सल दुसऱ्या दिवशी खावी म्हणून घेऊन आलो फ्रीज मधून दुसऱ्या दिवशी काढल्यावर सुमार ८०-९० ग्राम्स बटर एकीकडे थिजलेले होते .....आता प्रश्न असा कि आपण खाल्लेल्या पाव्भाजित चव बटर ची, मसाल्याची का आणखीन कसली .... हे असे इतके बटर पोटात गेले तर नक्की काय परिणाम होत असावा ?
मामलेदारच्या मिसळीत तिखटपणा कसला ? तिखटाचा,मिरचीचा, मिऱ्याचा कि चुन्याचा ??
दोन्ही जागांचा अनुभव नाही त्यामुळे ह्या प्रश्नाला सपशेल पास