मनावरील ते शूर्प ओरखडे १ : (ईस्टेटीची परात)
आज सकाळीच भारतीय स्त्रीचे सुवर्ण प्रेम ! हा लेख लिहिण्याचा योग आला, भारतीय स्त्रीच्या या आकर्षणा मागे पुर्वार्जीत मालमत्तेत स्त्रीयांना सहसा वाटा मिळत नसे -आता कायदा बदलला आहे- त्यामुळे कदाचित जिवन लढ्याच्या स्पर्धेतून येणारा पण ज्या संपत्तीवर तुमचा तांत्रिक-नैतिक दृष्ट्या अधिकार असणे अभिप्रेत नाही तिचा मोह करणारी स्त्री कुठे दृष्टीस पडली की स्त्री आदर्श असते टाईप मनात तयार झालेल्या प्रतिमांना तडे जाऊन मनावर क्वचित शूर्प ओरखडे उमटतात.
आत्ता सायंकाळी मिपा कवि लीलाधरांची किसमिस हि कुणि वर आणलेली कवितेच्या खालील ओळी वाचनात आल्या आणि आठवणी भर्रकन एक तप मागे गेल्या
संदर्भःकिसमिस -मिपा कवि: लीलाधर
आता मात्र खरंच दिवस गेले आणि आमच्या सौंच्या बुद्धीमत्तेचे दीवे घरभर पेटू लागले, एक दीवस तीने मागितली आमच्या ईस्टेटीची परात,एका संध्याकाळी नौकरीवरुन परतलेले चार-सहा सॉफ्टवेअर कंपनीत एखाद दीडवर्षाचा अनुभव असलेले बॅचलर मित्र एकत्र आपल्या शेअर्ड फ्लॅटवर गप्पा मारत बसलेले असतात, त्यांचा अजून एक मित्र येतो सॉलीड टेंशन मध्ये आहे कारण त्याची एंगेजमेंट झालेल्या मुलीशी एक मिटींग झाली आहे त्यात ती त्याला त्याचे आई-वडील सोबत राहणार नाहीत असे वचन मागते. आजच्या काळात तसे पाहता विशेष काही नाही पण तिने त्याच्या आई-वडीलांकडून मुलगा सर्वीसला असलेल्या मेट्रोपॉलीटन शहरात एक फ्लॅट विकत घेऊन देतील याचे आश्वासन मागितले त्याच्या आईवडीलांनी आपल्या आयुष्याचे सर्व सेव्हींग जोडले तर फ्लॅट होऊ शकेल असा विचार करून मुलाच्या सुखी संसारासाठी आश्वासन दिले खरे आता त्या मुलीला सासू सासर्यांच्या मदतीने फ्लॅट हवा आहे पण सासू सासरे मात्र नकोत- आणि सासू सासर्यांकडे त्या सेव्हिंग पलिकडे काही पैसे असणार नाहीत. मोठ्या शहरातील फ्लॅट आणि प्रॉपर्टींचे भाव असे गगनाला भिडलेले आहेत की सॉफ्टवेअर कंपनीतल्या मुलांना कर्जवगैरे मिळू शकतात पण डाऊन पेमेंट करुन त्यांनाही फ्लॅट अगदी एखाद दुसर्या वर्षाच्या अनुभवावर घेणे शक्य होतेच असे नाही. त्याने आईवडील नकोत तर ठिक पण कर्ज घेऊन फ्लॅट घेऊ आईवडीलांचे पैसे घेऊ नयेत असेही मुलीला सांगून पाहीले तिने त्यासही नकार दिला. त्या मुलाच्या मित्रांनी एकदा एंगेजमेंट झाली आहे मुलगी तुला आवडली आहे तेव्हा लग्न होऊन जाऊदे मग पहा असा सल्ला दिला त्यांचे म्हणणे सॉफ्टवेअर कंपनीत पुन्हा जॉब बदलताना चांगली पगारवाढ होईल मग तू तुझ्या आईवडीलांना फ्लॅट करता त्यांनी खर्च केलेले पैसे परत करु शकशील. पण त्याच्या काही मित्रांचे म्हणणे पडले कि आताच लग्न होण्याच्या आधिच ब्लॅकमेलींग केले जाते आहे हा टेंशन मध्ये येतो आहे, लग्न आणि खासकरुन मुले झाल्यावर ब्लॅकमेलिंग केले तर हा आईवडीलांना कशी काय आर्थीक मदत पुरवू शकेल. या परिस्थितीत त्या मुलाने काय करावयास हवे होते असे तुम्हाला वाटते ? प्रत्यक्षात त्यामुलाने एंगेजमेंट मोडण्याचा निर्णय घेतला. पण एका मुलाच्या मनावर एक शूर्प ओरखडा ओढला गेला होता.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ह्म्म.. तोच पर्याय योग्य
अवघड आहे बाबा. काय चाललंय
उत्तम निर्णय ..
नोकरी वाली मुलगी कशाला पाहिजे
नाही या केसमधली मुलगी
कमाल आहे
आता हे कलम/ही अट अगोदरच फोनवर
ओरखडा?
हेहेहेहेहे
अनुमोदन को अनुमोदन.
योग्य निर्णय
मुर्ख मुलगी!!!
मुलांनी / मुलींनी
ठरलेलं लग्न मोडणं
तुमच्या मित्राने
+१
+१
आयुष्यभर दादागिरी पेक्षा लग्न
ह्या लेखासाठी लीलाधराची
:)
तुमचा हा प्रतिसाद लीलाधराने
नक्की ना ! आपला प्रतिसाद
लीलाधर कदाचित फ़िरकायचे नाहीत
हा ना. मजाक मजाक मे रजाक हुआ
शूर्प हा शब्द आजच वाचला..
'नखा' हे अध्याहृत :(
रामायणातील शूर्पनखा नाव
योग्य निर्णय घेतला. उगा
योग्य
पैसे
योग्य निर्णय
एकदम योग्य निर्णय...
त्या मुलाचे अभिनंदन.
योग्य निर्णय!
ज्यांची कँपस सलेक्शन्स होत
हल्ली ही गोष्ट प्रकर्षाने
'मुलगाच हवा' या हव्यासापोटी....
हे सत्य असले तरी मुलींच्या
हे सत्य असले तरी मुलींच्या
सर, जे तुम्ही म्हणताय त्यातलं