काही परकीय अमराठी भाषेतील शब्द आणिक त्याचा मराठी अर्थ

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जनातलं, मनातलं
26 Feb 2016 - 11:32 am

खर तर सदर विषय हा लेखनाचा स्वतन्त्र विषय होऊ शकतो का ? हा खरोखरच सन्शोधनाचा विषय आहे. मला खर तर ह्या विषयाचा स्वतन्त्र ध्हगाच काढायचा होता पण ते जमल नाही त्यामुळे हा लेखन प्रपन्च.

माझ्या अमराठी भाषान्च्या कुतुहला पोटी म्हणा किन्वा नको तीथे लुडबूड करण्याच्या खोडीमूळे म्हणा (कॉलेज शब्द किड्यान्मूळे) मी काही अमराठी शब्द आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. माझ्या पर्देशातील काही काळाच्या वास्तव्यामधे मला काही अमराठी आणिक काही परकीय भाशीकान्शी सन्वाद साधण्याची सन्धी मिळाली. त्यातून हे जे काही शब्द आहे ते मी शिकलो.

माझ्या ट्रेनीन्गच्या काळात काही गुजराथी अशीलाबरोबर काम करण्याची सन्धी मिळाली त्यातील चुम्माळीस म्हणजे मराठीतील चव्वेचाळीस आणि पिस्ताळीस म्हण्जे मराठीतली पन्चेचाळीस ही गोष्ट मला अजूनपर्यन्त पटलेली नाहीये (हा पिस्ता मला काही पचनी पडलेला नाहीये)
तसेच गुजराथीत लिहीलेला व्याजनू खाता हा शब्द मराठीतला/ देवनागरीतला " प्यार नू खाता " असा मी वाचायचो. आणिक गुजराती लोक जात्याच 'प्रेमळ' (गुजराथी मा बोले हू प्रेम करू शू ) असल्याने मला तन्तोतन्त खरा वाटायचा.
गुजराथीतील आणि एक प्रसिद्ध शभ म्हणजे गान्डा ह्या शब्दाचा मराठीत किन्वा हिन्दीत भयानक अनर्थ होईल पण असा शब्द गुजराथीत आहे खरा.

माझ्या परदेशातील काही काळाच्या वास्तव्यात माझा काही केरळी/ मल्याळम लोकान्शी सन्बन्ध आला. असे म्हणतात की केरळी लोक एकवेळ केरळात भेटणार नाहीत पण ते जगाच्या पाठीवर दुसरी कडे कुठेही भेटतील. अशीही एक आख्यायिका आहे की नील आर्मस्ट्रोन्ग जेन्व्हा पहिल्यान्दा चन्द्रावर गेला तेन्व्हा त्याला तीथे केरळी माणसाने चहा पाजला. खरे-खोटे देव जाणे.
तर ही गुळूगुळू मुळूमुळू मल्याळम भाषेत भाताला मोरु म्हणतात ताक्/दह्याला चोरू म्हणतात (लोणच्याला बहुदा जोरू म्हणत असावेत. तशीही जोरु तिखट असतेच म्हणा)
म्हणजे आपण भातावर ताक घेतले की ते म्ह्णणार चोरुवर मोरु. आपल्याकडे म्हण आहे ना "चोरावर मोर" तिच उगम स्थान बहुदा "चोरुवर मोरु " वरून झाल असणार.
चण्याला ही मल्याळम मण्डळी म्हणतात कडलै वास्तविक कढवण्याचा आणिक चण्यान्चा काही सम्बन्ध नाही पण ह्याना कोण समजावणार आणि कुठल्या भाषेत समजावणार

आता तामिळ भाषा म्हटलीकी तोन्डत पाणी खेळवत श्वास न घेता बोलायची सवय तुम्हाला सायला पाहीजे. ह्यात क्रियापद पुरूष काही वेगळाच चालतो. पो म्हटल तर चालता हो पोहोया म्हटल तर जा आणि पोहोलामे म्हटल तर आपण निघूया (आपण दोघे किन्वा जितके असतील तितके चाल्ते होऊया थोडक्यात कटूया) म्हणजे "चालणे" हा शब्द किती चालतो बघा तामिळ भाषेत.
आता मी जर म्हटल " मिक्क णनड्री" तर तुम्हाला वाटेल मी तुम्हाला शिवी दिलीये आणि तुम्ही भा.ण्डायला याल माझ्याशी पण मी जर ह्याचा अर्थ सान्गीतला तुम्हाला की "खुप खुप धन्यवाद" तर तुम्ही गोन्धळून जाल का नाही. तसच असत ते.

एकदा अशीच गाडीत गम्मत झाली. कुण्या एका पन्जाबी माणसाला एक कुणी बिगर पन्जाबी माणसाचा छोटा मुलगा धक्का देत होता तेन्व्हा तो पन्जाबी म्हणाला " अरे ओय तेरे लोन्ढे को सम्भाल इधर उधार हिलता है " तेन्व्हा पुर्ण डब्यात जोरदार हास्य रस उसळला

ही झाली भारतीय भाषान्ची कथा. पण परकीय भाषान्ची गत काही फारशी वेगळी नाहीये. फीलीपिनो लोकान्ची तघलूक काय नावची भाषा असते त्यात शब्दान्ची थोडीशी वानवा असावी कुठच्या सुन्दर किन्वा शुभ साठी ते "मगन्धान्ग" हा शब्द वापरतात म्हणजे बघा मगन्धान्ग उमागा (शुभ सकाळ) मगन्धान्ग हापेन (शुभ सन्ध्याकाळ ) मगन्धान्ग गबी (शुभ रात्री ) सुन्दर मुलगी असली तरी मगन्धान्ग सुन्दर चित्र असल तरी मगन्धान्ग सुन्दर जेवण असल तरी मगन्धान्ग (जोर से बोलो जयमातादी. त्वमेव मगन्धान्ग त्वमेव मगन्धान्ग )
भावाला म्हणतात " कुया " आणि बहीणीला म्हणतात " आते " बहिणीला आत्या म्हणायची ही काय बर पद्धत ? आणि धन्यवाद ला म्हणतात " सलामत"

आपले शेजारी श्रीलन्कन ह्यान्ची स्वाहीली भाषा एकदम निराळी.कुणाची चौकशी करायची असेल तर ते म्हणतात " कोहमद" मग आपण जर मजेत असू तर उत्तर द्यायच "हुन्दाय" आणि यथा तथा असू तर उत्तर द्यायच "वरदग्नै" (मराठीत विचार केला तर माझ्या कडे हुन्दाय गाडी आहे मी मजेत आहे किन्वा मी मजेत नाही मला वर दे की रे ) कोथीन्बीरी ला हे लोक म्हणतात "कोत्तुमाल" गोड वाटतो पण शब्द

अरेबीक लोक कुणाची चौकशी करायची तर म्हणतात "कैफल हाल " किन्वा "कैफालिक" मग ह्याच उत्तर द्यायच " अल हमदुलील्ला असमतुल्लाह रेहेमतुला बरकातू " (ह्याचा अर्थ मी देवाच्या कृपेने मजेत आहे आणि देवाच्या दयेने माझी बरकत होईल ) हे म्हणजे मराठीत तू कसा आहेस बाबा? आस विचारल्यावर त्याला गितेतला " कर्मण्येवाधिका रस्ते मा फलेशु कदाचन " हा श्लोक म्हणून दाखवल्यासारखा आहे. "आखुय" म्हणजे भाऊ आणिक "आख्ता" म्हणजे बहिण. लहान मुलाला गोड म्हण्याच तर वापरा "हेलुवा" पण हेच हेलुवा जर "भुनैया" आधी जोडलत तर बुरख्या आडून फटके पडतील कारण हेलुवा भुनैय्या चा अर्थ होतो फटाकडी पोरगी. त्यामुळे मग पळायची तयारी ठेवा. "बखलावा" म्हणजे मिठाई तर "बकला" म्हणजे बायकी पुरूष. त्यामुळे ख च्या ऐवजी क वापरलात तर आणिबाणी उदभवू शकते

फ्रेन्च लोकान्च इन्ग्लीश लोकान्शी अगदी वावड. ईन्ग्रजी मधले शब्द ते तोडून फोडून न्याहरीला वापरतील. आता ईन्ग्रजीत "मर्सी" म्हणजे दया पण फ्रेन्च मध्ये हाच मर्सी होतो "मेस्सी" अणिक त्याचा अर्थ होतो धन्यवाद :)
हे फ्रेन्चही "बॉन" शब्द कशा पूर्वीही वापरतात "बॉन जोर" (सुप्रभात) बॉन नुई (शुभ रात्री) "बॉन अपेत्ती" (तुम्हाला चा.न्गली भुक लागो आणिक चान्गले जेवण जावो ) अश्या अर्थाच मराठीतल एक " वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे " सोडल तर दुसरे काही ऐकीवात नाहीये. आहेच आपली मराठी भाषा तेवढी सबळ

मित्रानो खर तर माझे ज्ञान आणिक लेखन कौशल्य हे सर्व लिहीण्यास व्यक्त करण्यास खुप तोकडे आहे. मराठी भाषा दिनाच्या एक दिवस आधि माझ्या कडून असल काही लेखण माझ्या हातन झाल हा मी माझा देवी सरस्वतीचा माझ्यावरील आशिर्वाद समजतो आणि माझे लिखाण वाचल्या बद्दल म.ण्ड्ळी धन्यवाद, मिक्क णन्ड्री, सलामत, आणिक मेसी

लिखाण : केदार अनन्त साखरदाण्डे दिनान्क २६/०२/२०१६

विनोदभाषांतर

प्रतिक्रिया

माहितगार's picture

26 Feb 2016 - 12:04 pm | माहितगार

आपले शेजारी श्रीलन्कन ह्यान्ची स्वाहीली भाषा एकदम निराळी.

आँ ??

बाकी लेख आवडला

सिंहली आणि स्वाहीलीत गल्लत झाली दिसतीय. असो.

एकदमच बर्‍याच भाषांना हात घातल्याने फार वरवरचा लेख वाटतोय. शुभेच्छा पुढील लेखासाठी.

मीनादि's picture

26 Feb 2016 - 12:45 pm | मीनादि

मस्त आणी महितिपर

पैसा's picture

26 Feb 2016 - 1:00 pm | पैसा

मजेशीर संकलन!

तर्राट जोकर's picture

26 Feb 2016 - 1:13 pm | तर्राट जोकर

"बॉन अपेत्ती" (तुम्हाला चा.न्गली भुक लागो आणिक चान्गले जेवण जावो ) अश्या अर्थाच मराठीतल एक " वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे " सोडल तर दुसरे काही ऐकीवात नाहीये. आहेच आपली मराठी भाषा तेवढी सबळ

>> जेवायला बसले आणि कोणी आगंतुक आले तर त्यांना 'या जेवायला' म्हणायची प्रथा आहे. त्या व्यक्तीला जेवायचे नसेल तर तो जेवणार्‍याला 'अमृत जेवा' अशी शुभेच्छा देतो. 'वदनी कवळ' श्लोक न म्हण्णारे, म्हटल्यावर पहिला घास घेण्याआधी पंगतीत सोबतीला बसलेल्यांना 'घ्या' असा आग्रह करुन सुरुवात करतात.

मूखदूर्बळ's picture

29 Feb 2016 - 10:13 am | मूखदूर्बळ

धन्यवाद :)

श्रीगुरुजी's picture

29 Feb 2016 - 2:22 pm | श्रीगुरुजी

तर ही गुळूगुळू मुळूमुळू मल्याळम भाषेत भाताला मोरु म्हणतात ताक्/दह्याला चोरू म्हणतात (लोणच्याला बहुदा जोरू म्हणत असावेत. तशीही जोरु तिखट असतेच म्हणा)

तामिळ भाषा ही मल्याळम् ला जवळची आहे. तामिळीत भाताला राइस्स, ताकाला मोरं, दह्याला ताहिरं आणि लोणच्याला उरगा म्हणतात.

तामिळीत काही शब्द जरा विनोदी आहेत.

एक म्हणजे तामिळीत वण्णु (हा बहुतेक इंग्लिश "वन्" वरून आला असावा.
दोन म्हणजे तामिळीत रंड (हा फार भयंकर शब्द वाटतो).
तीन म्हणजे मूण, चार म्हणजे नाल, पाच म्हणजे अंजीर (म्हणजे फळ नव्हे), सहा म्हणजे आर, सात म्हणजे याल्लू.

आठ म्हणजे एट्टू (हा शब्द देखील इंग्लिश "एट" वरून आलेला दिसतो).
नऊ म्हणजे आंबुदु आणि दहा म्हणजे पात्तु.

टवाळ कार्टा's picture

29 Mar 2016 - 12:28 pm | टवाळ कार्टा

आणि कुंडी म्हणजे तश्रीफ ना? :)

श्रीगुरुजी's picture

29 Mar 2016 - 12:56 pm | श्रीगुरुजी

कुंडी कन्नडमधील शब्द आहे. तामिळमध्ये असा शब्द आहे का याची कल्पना नाही.

मूखदूर्बळ's picture

29 Mar 2016 - 12:25 pm | मूखदूर्बळ

अरेबीक मध्ये हुमार म्हणजे गाढव

आमचा एक अरेबीक मित्र कुमार सानू ला हुमार सानू म्हणायचा (किती ते चपखल)

हबीबी म्हणजे मित्र पण हबीबती म्हणजे प्रेयसी

पैसा's picture

29 Mar 2016 - 1:07 pm | पैसा

अरबस्तानात कोणालाही प्रेयसी असण्याची शक्यता किती? सगळेच बुरखे.

मूखदूर्बळ's picture

29 Mar 2016 - 1:12 pm | मूखदूर्बळ

तसे दुबई मध्ये शारजाह आणिक काही प्रमाणात बहारीन आणिक कतार आणि ओमान मध्ये पूर्ण चेहेरे झाकणारे बुरखे वापरत नाहीत.

तसेही बुरख्या आडचे भुरके फारच असतात तेथे :)

पैसा's picture

29 Mar 2016 - 1:20 pm | पैसा

जाम मजा आहे! तो मेरे मेहबूब शिनेमा बघितलेला. बुरख्यातले नुसते डोळे बघून एक येडं प्रेमात पडतं. मग बुरख्यातल्या दुसर्‍याच मुलीला आपली प्रेयसी समजून बोलतं शेवट दोघीही मैत्रिणी त्याच्या प्रेमात आणि जाम गोंधळ!

टवाळ कार्टा's picture

29 Mar 2016 - 12:29 pm | टवाळ कार्टा

डॅनिश भाषेत साखरेला सक्कर (sukker) म्हणतात

तर्राट जोकर's picture

29 Mar 2016 - 3:23 pm | तर्राट जोकर

साखरेचा जन्म भारतातलाच. त्यामुळे असेल कदाचित.

मूखदूर्बळ's picture

29 Mar 2016 - 12:42 pm | मूखदूर्बळ

अरेबीक मध्ये
शोये शोये म्हणजे पण हळू हळूहळू
मिन्नी मिन्नी म्हणजे हळूहळूच पण थोड उपरोधाने :)

सोनुली's picture

29 Mar 2016 - 2:05 pm | सोनुली

तेलुगु भाषेत 'पप्पू' म्हणजे डाळ. तसेच अंड्याला गुड्डू म्हणतात.