रूपक

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
15 Sep 2008 - 9:59 am

एक जंगलात एक माकड रहात होते.माकडाला एकदा वाटले की यदाकदाचित कधी जंगलाचा इतिहास लिहीला गेला तर आपले नाव सुवर्णाक्षरात लिहीले जावे. आपल्या नातू पणतू खापरपणतू यानी आपली नाव अभिमानाने घ्यावे. आपल्या नावाने खानादानाला ओळखले जावे. त्या लोकानी मिशांवर ताव देत म्हणायला हवे की आमचे आजोबा पणजोबा खापरपणजोब इतके शूर होते इतके पराक्रमी होते.त्यानी भिंतीवर फ़ोटो मिरवायला हवे. पुतळे रोज हारानी मढवले जायला हवेत
झाले; माकडाने ते मनावरच घेतले.एखादी संधी मिळाली की झाले. शौर्य दाखवायला मिळायला हवे. मग बघतोच . माकड अशी एखादी संधी मिळते का पहायला एका उंच झाडावर जाऊन बसले.जंगलाचा सगळा परीसर त्या झाडावरुन दिसत होता.
एक संधी आणि आपले नाव सुवर्णाक्षरात......
माकड इकडे तिकडे पहात होते. तेवढ्यात त्याला एक सिंह; शिकार करून सावज खाऊन विश्रान्ती घेत झोपलेला दिसला. माकडाला आयती संधी मिळाली
झाडावरुन उतरुन ते तडक त्या झोपलेल्या सिंहाजवळ गेले. आणि माकडाने त्या झोपलेल्या सिंहाच्या कानाखाली एक जोरात वाजवली.
काहितरी करण्याच्या जोषात माकडाने सिंहाच्या कानाखाली वाजवली खरी पण नन्तर त्याला वस्तिस्थितीची जाणीव झाली. आपण काय करुन बसलो हे माकडाला जाणवले.त्याने ओळखले की आता आपले काही खरे नाही. हा सिंह; चिडलेला सिंह आपल्याला नक्कीच ठार मारणार.माकडाने तेथुन लगेच पळ काढला
सिंहाची झोप ताडकन उडाली त्याने डोळे उघडुन पाहीले. कानाशीलात काहितरी जोरात लागले हे त्याला कळाले. पळुन जाणा-या माकडाला पाहुन त्याला काय झाले हे त्याला कळाले. माकडाने सिंहाच्या ,जंगलच्या राजाच्या कानाखाली वाजवावी याचेच त्याला आश्चर्य वाटले.
क्षणभर माकडाच्या धाडसाचे कौतूक ही वाटले. पण मग नन्तर त्याने विचार केला की हे माकड जंगलात जाईल झाला प्रकार सर्वाना सांगेल.
मग जंगलच्या राजाची अब्रूच गेल्यासारखे होईल. कोणालाच आपले भय रहाणार नाही. या माकडाला आत्ताच मारुन टाकायला हवे.
सिंह माकडाला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग करु लागला.
माकड पुढे पळु लागले सिंह त्याच्या मागे. माकड पुढे सिंह मागे. माकड पुढे सिंह मागे. आता काही आपण वाचत नाही असा विचार करुन माकड जंगलातून आणखी जोरात पळु लागले.
माकडाला मारुन टाकलेच पाहीजे असा विचार करुन सिंह तेवढ्याच जोरात माकडामागे धावु लागला. माकड वाट सापदेल तसे धावत होते सिंह त्याच्या मागे धावतच होताच माकड पुढे सिंह मागे आडवेतिडवे या झाडा आडुन जा त्या पाय वाटेने जा इकडुन तिकडून धाव जीव मुठीत धरुन माकड पळत होते. आणि माकडाला जिमन्त सोडायचे नाहीच हे ठरवुन सिंह त्याच्या मागे पळत होता.
इकडे तिकडे आडवे तिडवे पळुन पळुन माकड आता दमुन गेले होते. लपायला जागा शोधत होते. तेवढ्यात त्याला जंगलात वाटेवर पडलेले एक कसले तरी जुने वर्तमानपत्र सापदले. वर्तमान पत्र उघडुन त्याच्या आडोशाने माकड एका झाडाच्या बुन्ध्याला टेकुन बसले.
माकडाच्या मागेमागे असलेला सिंह तिथेही पोहोचलाच. त्याने पाहिले की कोणीतरी वर्तमानपत्र वाचत बसलेला आहे.आपण त्यालाच विचारु यात असा विचार करुन सिंहाने विचारले सुद्धा " दादा या बाजुने कोणी एखादे माकड जाताना पाहिले तुम्ही?"
या प्रशनाला उत्त्तर म्हणुन माकडाने वर्तमानपत्राआडुनच प्रतीप्रश्न केला " कोणते माकड ? तेच का; की ज्याने सिंहाच्या कानाखाली वाजवली ते?"
सिंहाला काही सुचेना तो खालमानेने परत फ़िरला. म्हणाला "ऒ ! तेवढ्यात पेपरात छापुनसुद्धा आले? संपलंच की सगळं"

ओशो रजनीशांची एक खासीयत आहे काही सांगताना ते विनोदाचा बरेचदा वापर करतात
एखादा विनोद सांगायचा आणि त्याचा रूपक म्हणुन वापर करून एखादा मर्मबोध करायचा.
ही त्यांची आवडती ष्टाईल.
ह्या विनोदाचा रूपक म्हणुन ते कसा सुंदर वापर करतील / ते कसा सांगतील बघा ...
अगोदर विनोद पूर्ण सांगतील आणि मग आधुन बधुन त्या विनोदातली वाक्ये घोळवत रहातील.
एक जंगलात एक माकड रहात होते.माकडाला एकदा वाटले की यदाकदाचित कधी जंगलाचा इतिहास लिहीला गेला तर आपले नाव सुवर्णाक्षरात लिहीले जावे.
आपण सुद्धा या माकडासारखे असतो. वर्तमानात जगायच्या ऐवजी आपण जेंव्हा या जगात नसू तेंव्हा लोक आपल्याबद्दल काय बोलतील याचा विचार करत असतो. काही उपयोग आहे का?
पण आपल्याला नेहमीच वाटते असते की आपले नाव सुवर्णाक्षरात लिहिले जावे म्हणून.
मग विचार करु लागतो........वर्तमानाच नाही तर भविष्यकाळाचा ज्यात आपण असणारसुद्धा नाही त्या भविष्याकाळाचा विचार. मन हे खूप अजब असते. वर्तमानाचाच आधार घेउन ते तुम्हाला इतरत्र रमवत असते. स्वत:चे जाळे विणत असते तुम्हाला त्यात अडकवत असते.
जरा ओळ्खा या मनाला.
म्हणते की काहितरी असे कर जे तुला शक्य नाही का तर लोकानी त्यासाठी तुझे नाव घ्यावे.त्याने तुला आत्ता काहीही मिळणार नाही. आणि जेंव्हा लोक नाव घेतील तेंव्हा ते ऐकायला तू असणार सुद्धा नाहीस.
आपण थोडेसे त्या सिंहासारखे असतो. झोपलेले.... स्वप्नात मग्न. वर्तमाना कडे पूर्ण पाठ फ़िरवुन..भूतकाळाच्या गतवैभवात रममाण होऊन झोपलेले असतो. वर्तमान नावाचे काही असते हे विसरुन स्वत:च्या साम्राज्यात रममाण असतो. एखादे माकड येते आपल्या कानाखाली देते. आपली स्वप्ने नगरी चक्काचूर होते स्वप्ने विखुरली जातात.. एखादे माकड आपली स्वप्नांची दुनिया उलटी करुन जाते. एखादा क्षुल्लक प्रसंग आपल्या ताळ्यावर आणुन ठेवतो.हवेत उडणारी पावले जमिनीवर टेकवतो.
आपल्याला राग येतो. ताळ्यावर आल्याच्या नव्हे ....तर आपण स्वप्नात होतो हे लोकाना समजले याचा
त्या क्षुल्लक कारणाच्या मागे आपण हात धुऊन पूर्ण शक्तिनिशी लागतो.
आणि तद्दन फ़ालतू का होईना ध्येय अगदी हातापाशी जवळ आलेले असताना एखाद्या किरकोळ कारणासाठी शेपुट फ़िरवुन माघार घेतो.
लोक काय म्हणतील या बाऊ ला घाबरुन आपल्याला जमत असलेले कामही अवघड करुन ठेवतो.
सिंहाने वर्तमानपत्र बाजूला करुन बघितले असते तर माकड सहज हाती लागले असते.
माकडाने वर्तमानपत्राआडुनच प्रतीप्रश्न केला " कोणते माकड ? तेच का; की ज्याने सिंहाच्या कानाखाली वाजवली ते?"
सिंहाला काही सुचेना तो परत फ़िरला म्हणाला "ऒ तेवढ्यात पेपरात छापुनसुद्धा आले? संपलंच की सगळं"
सत्य हे असेच असते. ते एखाद्या पातळ पडद्याआड दडलेले असते. आपण तो पडदा बाजूला करायचे कष्ट घेतच नाही.
कुणाच्या तरी एखाद्या क्षुल्लक शब्दाला महत्व देऊन "संपलंच की सगळं" म्हणत माघार घेतो. सत्य हे आपल्या समोरच असते. फ़क्त आपण त्या भोवतालचे लोकाचार , समाजमन , शिष्ठाचार , जात, धर्मग्रन्थ हे असले भ्रामक पडदे बाजूला सारत नाही. सत्य पडद्या आडच रहाते.आपण मात्र त्याच्या अगदी जवळ जाउन माघारी फ़िरलेलो असतो...... पराभूत होऊन.
:::::::स्वामी विजुभौ
( डीस्क्लेमर: प्रस्तूत रूपक हे ओशो रजनीशानी कधीही कोणत्याही व्याख्यानात सांगीतले नव्हते. हे लिखाण हे विजुभौंचे विचार आहेत.)

समाजविचार

प्रतिक्रिया

मेघना भुस्कुटे's picture

15 Sep 2008 - 10:24 am | मेघना भुस्कुटे

आता रूपककथा? विजुभौ, किती फॉर्म हाताळणारात? चांगला झाला आहे पण लेख.

जैनाचं कार्ट's picture

15 Sep 2008 - 10:38 am | जैनाचं कार्ट (not verified)

आवडले आपली रुपक कथा व टीप्पणी !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

बेसनलाडू's picture

15 Sep 2008 - 10:25 am | बेसनलाडू

(बालक)बेसनलाडू

प्राजु's picture

16 Sep 2008 - 12:41 am | प्राजु

गोष्ट आवडली..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ऋचा's picture

15 Sep 2008 - 10:46 am | ऋचा

मस्त आहे "रुपक" :)

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

प्रभाकर पेठकर's picture

15 Sep 2008 - 10:50 am | प्रभाकर पेठकर

हा विनोद काही वर्षांपूर्वी मला माझ्या एका गुजराथी मित्राने सांगितला होता. आवडला मला. पण त्याची रोजच्या मानवी जीवनाशी, तत्वज्ञानाशी सांगड मात्र आपण घातलीत.

आपण सुद्धा या माकडासारखे असतो.
आपण थोडेसे त्या सिंहासारखे असतो.

आता, मी नक्की कोणासारखा आहे ह्या संभ्रमात पडलोय. मार्गदर्शन करावे, स्वामी.

सहज's picture

15 Sep 2008 - 11:28 am | सहज

विजुभौ चांगली कथा.

अजुन बोधकथा येउ देत

डोमकावळा's picture

15 Sep 2008 - 11:29 am | डोमकावळा

स्वामीजी,
गोष्ट आवडली....

मला वाटतं, मलाही पेठकर काकांसारखा प्रश्न पडला आहे.

ठेविले अनंत्या तैसेचि रहावे, चित्ती असावे समाधान.

मृगनयनी's picture

15 Sep 2008 - 12:00 pm | मृगनयनी

"विजुनिश"भाय............. आम्ही आपणास जितके समजत होतो, त्यापेक्षाही जास्त प्रगल्भ आपण आहात... हे आम्हास कळुन चुकले.( चुकुन कळले.. असे आम्ही आजिबात म्हणणार नाय..)

असो... आज पहिल्यांदा.."आपले पुर्वज माकड होते" याचा अभिमान वाटला..!!! ;)

मृगनयनी's picture

15 Sep 2008 - 12:00 pm | मृगनयनी

"विजुनिश"भाय............. आम्ही आपणास जितके समजत होतो, त्यापेक्षाही जास्त प्रगल्भ आपण आहात... हे आम्हास कळुन चुकले.( चुकुन कळले.. असे आम्ही आजिबात म्हणणार नाय..)

असो... आज पहिल्यांदा.."आपले पुर्वज माकड होते" याचा अभिमान वाटला..!!! ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2008 - 12:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वामीजी,

आपला नवीन अवतार फारच आवडला. म्या (आणि माझ्यासारख्या इतर) पामरांसाठी असंच काही चांगलं बोधपर उपदेश करत ह्रावा ही विनंती!

(शिष्या) अदिती

विजुभाऊ's picture

15 Sep 2008 - 12:21 pm | विजुभाऊ

शिष्ये तुजप्रत कल्याण असो.( ठाणे आहे हे माहित आहे)
(अवांतरः असल्या शिष्या असल्या तर बर्‍याच लोकांच्या शंका परस्पर मिटतील)
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2008 - 2:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> शिष्ये तुजप्रत कल्याण असो.( ठाणे आहे हे माहित आहे)
नाय वो गुरुजी, सध्या मी पुण्यात असते त्यामुळे आशिर्वादाची गरज आहे! (ह.घ्या रे पुणेय्रांनो)

>> (अवांतरः असल्या शिष्या असल्या तर बर्‍याच लोकांच्या शंका परस्पर मिटतील)
या वाक्याचा अर्थ काय हो लावायचा "गुरू वर य"!

विजुभाऊ's picture

15 Sep 2008 - 5:30 pm | विजुभाऊ

(अवांतरः असल्या शिष्या असल्या तर बर्‍याच लोकांच्या शंका परस्पर मिटतील)
या वाक्याचा अर्थ काय हो लावायचा "गुरू वर य"!

सदोदीत नावे बदलत राहिले की लोकानी कसे आणि कोणाशी बोलावे हा त्याना प्रश्न पडत राहील आणि स्वामीना किती शिष्या आहेत असे वाटुन त्यांचा आदर दुणावेल .
शिवाय त्यानी विचारलेल्या प्रश्नाना मस्त टोलेबाज उत्तरे मिळतील ते वेगळेच
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2008 - 5:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सदोदीत नावे बदलत राहिले की लोकानी कसे आणि कोणाशी बोलावे हा त्याना प्रश्न पडत राहील आणि स्वामीना किती शिष्या आहेत असे वाटुन त्यांचा आदर दुणावेल .
शिवाय त्यानी विचारलेल्या प्रश्नाना मस्त टोलेबाज उत्तरे मिळतील ते वेगळेच

स्वामीजी, सर्वनामे न वापरता आपण पुन्हा हेच वाक्य विषद करून सांगण्याची कृपा कराल का?

(नतमस्तक शिष्या) अदिती

विजुभाऊ's picture

16 Sep 2008 - 9:45 am | विजुभाऊ

वा वत्से तुजप्रत कल्याण असो.
उत्तम प्रश्न विचारला आहे. दिवसेंदिवस आपली प्रगती विस्मयकारकरीत्या होत आहे. अशीच उत्तरोत्तर प्रगती करत रहा.
आश्रमाच्या उत्तर पष्चीम पुणे शाखेच्या प्रमुख म्हणुन मॉ १_६ आनन्दमयी अदिती या पदावर आपली नेमणूक करण्याचा आमचा मानस आहे.

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

भडकमकर मास्तर's picture

15 Sep 2008 - 2:14 pm | भडकमकर मास्तर

वावा.हीच गोष्ट विजुभौंनी 'पुरेपूर कोल्हापूर' कट्ट्याला सांगितलेली होती....
मूळ गोष्ट मराठीत ऐकल्यावर मग , अगदी मस्त बेअरिंग पकडलेल्या विजुभाउंनी प्रवचनी थाटात हिन्दीमध्ये सांगितलेली ही येकदम
झकास रूपककथा ऐकण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे.... :)

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

15 Sep 2008 - 2:59 pm | विसोबा खेचर

मास्तरांशी सहमत...

जियो विजूभाऊ...! :)

आपला,
तात्यानीश.

स्वाती राजेश's picture

15 Sep 2008 - 3:21 pm | स्वाती राजेश

मस्त मांडणी केली आहे...
रूपक आवडले...
कुणाच्या तरी एखाद्या क्षुल्लक शब्दाला महत्व देऊन "संपलंच की सगळं" म्हणत माघार घेतो. सत्य हे आपल्या समोरच असते. फ़क्त आपण त्या भोवतालचे लोकाचार , समाजमन , शिष्ठाचार , जात, धर्मग्रन्थ हे असले भ्रामक पडदे बाजूला सारत नाही. सत्य पडद्या आडच रहाते.आपण मात्र त्याच्या अगदी जवळ जाउन माघारी फ़िरलेलो असतो...... पराभूत होऊन.
विचार पटले.....

अवांतरः विजुभाऊ, तुमचे विचार,कल्पना म्हणजे अलिबाबाची गुहा आहे.....अजुनी गुहेत काय आहे कुणास ठाऊक? :?

डॉ.प्रसाद दाढे's picture

15 Sep 2008 - 3:42 pm | डॉ.प्रसाद दाढे

विजूभाऊ॑नी ही गोष्ट आ॑म्हाला साभिनय (योग्य त्या अ॑गवि़क्षेपासहीत) सा॑गितली होती. रजनिशा॑ची मस्तच नक्कल केली होती. पुढच्या कट्ट्याला परत करा बर॑ का. बाकी रूपक छान आहेच

रूपक आवडले,

कुणाच्या तरी एखाद्या क्षुल्लक शब्दाला महत्व देऊन "संपलंच की सगळं" म्हणत माघार घेतो. सत्य हे आपल्या समोरच असते. फ़क्त आपण त्या भोवतालचे लोकाचार , समाजमन , शिष्ठाचार , जात, धर्मग्रन्थ हे असले भ्रामक पडदे बाजूला सारत नाही. सत्य पडद्या आडच रहाते.आपण मात्र त्याच्या अगदी जवळ जाउन माघारी फ़िरलेलो असतो...... पराभूत होऊन.

हे वाक्य विचार करायला लावते.
:)

रामदास's picture

15 Sep 2008 - 7:10 pm | रामदास

आता मठाची स्थापना करायला काहेच हरकत नाही. आम्ही पण येऊ.

अवांतरः बरेच दिवस घरापासून दूर आहात का?

http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Sep 2008 - 12:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माकडाची गोष्ट आवडली.

"ऒ ! तेवढ्यात पेपरात छापुनसुद्धा आले? संपलंच की सगळं"

पेप्रात बातमी छापून आल्याचा प्रसंग डोळ्यासमोर लै डिक्टो उभा राहिला आहे. :)

उत्तारार्ध विचार करायला लावणारा आहे ! सत्याच्या जवळ जाऊन मागे फिरणे म्हणजे पराभव नव्हे, ती तर सत्त्याची हुलकावणी .

अवांतर : विजुभौ, रजनीश वाचायला लागल्यावर जरा परिणाम होतोच वाचकांवर ( ह. घ्या )

विजुभाऊ's picture

26 Jul 2012 - 2:39 pm | विजुभाऊ

.

स्पा's picture

26 Jul 2012 - 2:35 pm | स्पा

पुरे कि विजुभाव

मि. स्पा. विजुभाऊ हे जालावरचे ज्येष्ठ, आद्य - नि एकमेव... नाहीनाही आता एकदोन शिष्या पण आहेत - 'खाणसम्राट' आहेत. उमेश कणकवलीकरच्या पूर्वीच त्यांनी एक कार्यक्रम केला होता 'मी खणती करणारच' म्हणून. त्याच्यावरूनच तर कणकवलीकरांनी मी हे करणारच नि ते करणारच सुरू केले आहे, ठाऊक नाही तुम्हाला?