(बाटा रुते कुणाला)

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जे न देखे रवी...
17 Feb 2016 - 9:26 am

बाटा रुते कुणाला, आक्रसतात ऍक्शन
रीबॉक मज रुतावे हा दैवयोग आहे

सांगू कसे कुणाला कळ फाटक्या बुटांची
शिवून आठ जागी मी चालतोच आहे

डिस्काउंट येतो, टाकून 'अर्थ' देतो
माझी निवड बुटांची घाईत होत आहे

अस्सल असेल की चीनी माल आकळेना
ब्रांडेड मागवोनी ही त्रस्त त्रस्त आहे

-- स्वामी संकेतानंद

इशाराविडंबन

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

17 Feb 2016 - 9:35 am | प्राची अश्विनी

=))=))

चांदणे संदीप's picture

17 Feb 2016 - 9:59 am | चांदणे संदीप

एक लंबर!

स्वामीजी जोरात!

सतिश गावडे's picture

17 Feb 2016 - 10:05 am | सतिश गावडे

स्वामीजींनी काव्याची धुनी पेटवली आहे ;)

नाखु's picture

17 Feb 2016 - 11:05 am | नाखु

अजून काही समीधा असतील शिल्लक.

पैसा's picture

17 Feb 2016 - 10:53 am | पैसा

=)) =)) बूट कशाला? त्याची लेस बांधायचा त्रास. त्यापेक्षा कोल्हापुरी घ्या!

विकास's picture

17 Feb 2016 - 11:52 pm | विकास

मस्तच!

त्यापेक्षा कोल्हापुरी घ्या!

पै ताई "कोल्हापुरी चपला" मिपाजालावर वेगळ्या अर्थाने प्रसिध्द आहेत! ;)

पैसा's picture

18 Feb 2016 - 11:19 pm | पैसा

लोकांना आहेर द्यायच्या का?

पगला गजोधर's picture

17 Feb 2016 - 11:04 am | पगला गजोधर

Maayboli वरचे मानस६ ?

की

ब्लोग्वरचे Ganesh Bhagat

की

Charudatt Kulkarni

स्वामी संकेतानंद's picture

17 Feb 2016 - 11:08 am | स्वामी संकेतानंद

मूळ माझी आहे, फेसबुकवर टाकली होती आणि एका व्हाट्सएप ग्रुपवर. तिथून कोणी उचलली असेल तर मला माहीत नाही. मी चोर्‍या करत नाही. माझ्या अनेक कविता आधीच ढापल्या गेल्या आहेत.

पगला गजोधर's picture

17 Feb 2016 - 11:10 am | पगला गजोधर

नो प्रोब्लेम ...

स्वामी संकेतानंद's picture

17 Feb 2016 - 11:13 am | स्वामी संकेतानंद

आधी तुम्ही थेट चोरीचा उल्लेख केल्याने मला वाटले की विडम्बन जसेच्या तसे तुम्हाला कोठेतरी सापडले असेल. पण तरीही लिंक पाहिल्या तर वेगळे दिसले. हुश्श, सुटलो!

वेल्लाभट's picture

17 Feb 2016 - 11:33 am | वेल्लाभट

नाही तसं नाही;
पण नील जठार नावानेही २००९ ची ही मिळाली.

http://orkut.google.com/c29814167-tb7ac6c96a00f10c6.html

स्वामी संकेतानंद's picture

17 Feb 2016 - 11:55 am | स्वामी संकेतानंद

तुम्ही आणि पग नी दिलेल्या विडंबनाचा मूळ रचयिता कोण आहे माहीत नाही. जे सर्वात जुने दिसेल तोच रचयिता असावा. सगळे २००९ सालचेच आहेत. प्रत्येक पोस्टवरची तारीख पहावी लागेल. तेव्हा मी विडंबने लिहत नव्हतो. माझे हे विडंबन बरेच नवे, २०१५चे आहे, आणि स्वतंत्र्यरित्या सुचलेले आहे.

स्वामी संकेतानंद's picture

17 Feb 2016 - 11:12 am | स्वामी संकेतानंद

आयशप्पथ!!! आता तुम्ही दिलेल्या लिंका पाहिल्या! जुन्या आहेत बर्‍याच. २००९! त्या कविता वेगळ्या असल्या तरी हाच विषय धरून आहेत!! मी आधी कधीच वाचल्या नव्हती. मला स्वतंत्र सुचली होती. नवे शूज घेतले तेव्हा हे विडंबन सुचले होते. धन्यवाद! :)

श्रीरंग_जोशी's picture

17 Feb 2016 - 11:17 am | श्रीरंग_जोशी

विडंबन आवडले.

अवांतर - सुवर्णतारा वापरून बघा :-) .

अभ्या..'s picture

17 Feb 2016 - 11:25 am | अभ्या..

हाय्ला श्रीरंगा. हे पोलीस भरती स्पेशल शूज तुला म्हाइतेत व्हय.

गोल्डस्टार मध्ये बंद झालेला..युनिस्टार नावाने आहे. सोल मज्बूत, लाईटवेट अन स्वस्त मुलखाचा. भारीच राव. माझ्याकडे आहे एक अजून. लिंन्क मधले मॉडेल नवीन दिसते. माझा नंबर नाही त्यात. :(

श्रीरंग_जोशी's picture

17 Feb 2016 - 11:31 am | श्रीरंग_जोशी

क्रॉस कंट्री मॅरॉथॉन धावलोय गोल्डस्टार शुज घालून. मला नायकीसुद्धा फिके वाटतात यांच्यापुढे.

अभ्या..'s picture

17 Feb 2016 - 11:33 am | अभ्या..

भाऊ तू फिर भी दिल है हिन्दुस्तानी हैस. लगे रहो.

श्रीरंग_जोशी's picture

17 Feb 2016 - 11:36 am | श्रीरंग_जोशी

दिलच काय, अख्खी बाडीच हिन्दुस्तानी हाय ;-) .

तरी पन, भावनाओं को समझो, बाडी में क्या रख्खा है!! =))

स्वामी संकेतानंद's picture

17 Feb 2016 - 11:57 am | स्वामी संकेतानंद

मला हे दोन्ही ब्राण्ड माहीत नाहीत!::(

श्रीरंग_जोशी's picture

17 Feb 2016 - 11:59 am | श्रीरंग_जोशी

गरीबांचे ब्राण्ड हायेत ते :-).
नेपाळची कुंपणी हाये ती.

स्वामी संकेतानंद's picture

17 Feb 2016 - 12:04 pm | स्वामी संकेतानंद

मी शाळेत बाटाचे कॅनवास बूट घालायचो. नंतर कॉलेजची तीन वर्षे बिग बझारवाले डिजे आणि सी वापरून पाहिले, त्यानंतर थेट रिबॉक. हे विडंबन लिहीले त्या दिवशी लोटो चे विकत घेतले होते. फार प्रयोग केले नाहीत कधी. त्यामुळे अपना जुतों का नॉलेज बहुत कम है!

श्रीरंग_जोशी's picture

17 Feb 2016 - 12:11 pm | श्रीरंग_जोशी

गोल्डस्टार खास करून विद्यापीठ स्तरीय शर्यतीत धावणारे वापरताना दिसत.
शाळकरी मुलांच्या साइझचे बहुधा मिळतही नसावेत.

स्वामी संकेतानंद's picture

17 Feb 2016 - 12:13 pm | स्वामी संकेतानंद

आपलं धावणं तब्येतीपुरतं!

श्रीरंग_जोशी's picture

17 Feb 2016 - 12:15 pm | श्रीरंग_जोशी

तुम्ही शब्दांना धाववता...
आम्ही त्या बाबतीत अजुन पालथेही पडत नाही ;-) .

एकदा 'काष्ठभूमि' वापरुन पहा. बूट वापरून कंटाळाल, पण बूटांना काही होणार नाही.

सूडकेश कधीतरी चेंज म्हणून जेसीबी किंवा क्याट चा शू ट्राय कर. एकच लंबर.

स्वामी संकेतानंद's picture

17 Feb 2016 - 5:53 pm | स्वामी संकेतानंद

जेसिबि आणि क्याट? =)) =))

हा हा तीच ती अर्थ्मुव्हर्स वाली कंपनी. शूज असतात एकदम रफटफ.

jcb
कॅट पण अर्थ्मुव्हर्स वालीच कंपनी. कॅटरपिलर.
cat
अजून ह्याच टैपमध्यी गॅसोलीन पण मिळतात.

स्वामी संकेतानंद's picture

17 Feb 2016 - 5:53 pm | स्वामी संकेतानंद

ते पायाला जड वाटले..

वेल्लाभट's picture

17 Feb 2016 - 5:57 pm | वेल्लाभट

नैच्च. वेनब्रेनर आर फॉर रियल. काष्ठभूमी भंपक आहेत. शून्य पकड. नुसताच दिसायला गलेलठ्ठ

नुसताच दिसायला गलेलठ्ठ

शेवटी ज्याची त्याची आवड. आम्ही आमच्या अंगयष्टीला साजेसे घेतलेत, तुम्हाला सापडून गलेलठ्ठच सापडले असतील तर त्याला काय करणार. =)) ;)

वेल्लाभट's picture

18 Feb 2016 - 5:04 pm | वेल्लाभट

अरे ते सोड. ग्रिप नसेल तर काय उपयोग? सोल इतका हार्ड असतो एक तर. ड्राय ग्रिप अ‍ॅव्हरेज, वेट ग्रिपचा आनंदच !

हे ट्रेकच्या दृष्टीने म्हणतोय. बाकी आजवर मनात भरलेले जनरल पर्पज शूज म्हणजे ऑस्टिनचे शूज. (याचं नाव काय हे नक्की माहित नाही पण कॉलेजमधे असताना बरीच मुलं घालायची. बाप दिसतात ते पायात.

बाटाचं बाकी काही असो पण त्यांच्या हश पपीज या ब्रँडचे आपण चाहते आहोत. लेदर शूजमधे एक जोड जुना झाला की हश पपीजचा तस्साच्या तस्सा दुसरा घेऊन येतो. पायाला एकदम कुरवाळल्यागत फीलिंग. तीन वर्षं जातात.

मला वाटतं बाटाची साधे ते भारी अशी प्रॉडक्टलाईन्सची रेंज आहे.

बाकी विडंबन भारीच आहे.

शलभ's picture

19 Feb 2016 - 12:13 am | शलभ

हश पपीज

+1

अत्रुप्त आत्मा's picture

19 Feb 2016 - 9:20 am | अत्रुप्त आत्मा

स्वामिज्जी कि म'हाSssन रचनांए! =))

काय कडक-जोडा मारलाय राव! =))

बबन ताम्बे's picture

19 Feb 2016 - 4:02 pm | बबन ताम्बे

आवडले.