स्नेहसंमेलनात प्रेक्षकांना टाळ्या वाजवण्या साठी मराठी किंवा हिंदी 2 ते 3 ओळीतील शायरी सुचवा

सुधीर जी's picture
सुधीर जी in काथ्याकूट
16 Feb 2016 - 10:37 pm
गाभा: 

स्नेहसंमेलनात प्रेक्षकांना टाळ्या वाजवण्या साठी मराठी किंवा हिंदी 2 ते 3 ओळीतील शायरी सुचवा
उदा:-
सूर्याला आग आहे
चंद्राला डाग आहे
प्रेक्षकां कार्यक्रम छान चालला आहे
तर टाळ्या वाजवणे भाग आहे

अशाच अजून पाहीजेत
गुगल बाबा ला विचारून झाले त्यांनाही माहित नाही
हिंदी पण चालतील

प्रतिक्रिया

आयीशप्पत. असले धागे काढा राव.
म्या लै यमक हरामी. पार होळीतल्या शिव्या वाटतील अस्ली शायरी देतो. थोडं संपादक त्रिदेवांना दुर्लक्ष्य करायला सांगा फक्त. ;)
तोवर ही घ्या नांदी.
सुर्याला आग आहे, चंद्राला डाग आहे,
जो कुनी टाळ्या पिटल त्योच खरा वाघ आहे.
.
चांदीच्या कॉम्प्युटरला सोन्याचा माऊस.
घ्या देवाचे नाव आणि पाडा टाळ्याचा पाऊस.
.
काय मग? पाडू का अजून तीस चाळीस?

आणि ते गुगलबाबा वगिरे शोधत बसू नका. हिते माझ्यासारखे अचाट बुध्दीचे ढिगभर असताना तिकडे जायचेच कशाला. गुगलवाले हितनं नेतेत उधार कित्येकदा. ;)

चांदणे संदीप's picture

16 Feb 2016 - 10:50 pm | चांदणे संदीप

=))

अभ्यादादा, मग हौन जौदे येक राऊंड!

अभ्या..'s picture

16 Feb 2016 - 10:55 pm | अभ्या..

बघा प्रेक्षकहो, विचार करा पक्का,
को कुनी टाळ्या वाजवित नाही तो .....
.
जो कुणी वाजिवनार नाही जोरात टाळी,
त्याला हमखास मिळेल बायको काळी.
.
टाळ्याच्या आवाजाने दणाणून जाऊ द्या थेटर.
तुमच्या टाळ्यासाठीच अडलय माझं खेटर..
.
सॅन्डीबाबा आता तू कर चालू. येतेत एकेक नग हळूहळू. माझा विश्वास हाय मिपाकरांच्या ह्या क्रियेटीव्हिटीवर.

कपिलमुनी's picture

16 Feb 2016 - 11:01 pm | कपिलमुनी

दंगा धुडगूस्स ! काटा किर्र !

प्रचेतस's picture

17 Feb 2016 - 7:54 am | प्रचेतस

मेलो रे अभ्या मेलो.

तरी आपले एक यमके मित्र अजून मैदानात उतरलेले नाहीत.

एक सामान्य मानव's picture

17 Feb 2016 - 8:31 am | एक सामान्य मानव

पहिली व दुसरी कविता ही अनुक्रमे लिन्गद्वेष्टी व वर्णद्वेष्टी आहे.
ह्या अशा असहिष्णु व्रुत्तीचा मिपा सारख्या पुरोगामी व्यास्पीठावर जोरदार विरोध व्हायला हवा.

अभ्या..'s picture

17 Feb 2016 - 11:01 am | अभ्या..

निशेध, निशेध. अगदी जोरदार निशेध.
खुश आता?
चला.................नेक्ष्ट.......................

उगा काहितरीच's picture

16 Feb 2016 - 10:49 pm | उगा काहितरीच

:-D :-D :-D अगदी गडबडा लोळणारी स्मायली कल्पावी !

यशोधरा's picture

17 Feb 2016 - 2:16 pm | यशोधरा

=))

Rahul D's picture

16 Feb 2016 - 10:54 pm | Rahul D

अभि/ नवकवि

अभ्या..'s picture

16 Feb 2016 - 11:02 pm | अभ्या..

मी आणि नवकवि????
शाकुंतल कुणाचं है म्हैते का? निदान महाभारत तरी??

Rahul D's picture

17 Feb 2016 - 12:19 am | Rahul D

माहिती आहे.

Rahul D's picture

17 Feb 2016 - 12:19 am | Rahul D

माहिती आहे.

Rahul D's picture

17 Feb 2016 - 12:19 am | Rahul D

माहिती आहे.

बर झालं यार. लाज राखलीस माझी. ;)
बादवे राहुल डी (देव) नावाचा एक व्हिलन हाय बर्का फिल्म इंडस्ट्रीत. चेहरा खप्पड हाये पण बॉडी सॉल्लीड हाये तेची.

अभ्या ते 'अच्चीत गच्ची' राह्यलं की!! ;) =))

अभ्या..'s picture

17 Feb 2016 - 12:26 am | अभ्या..

चालत नै म्हणे असले काही सुधीरजींना.
शोकसभाय की काय कुणास ठाऊक. :(

स्वामी संकेतानंद's picture

16 Feb 2016 - 10:58 pm | स्वामी संकेतानंद

अभ्या राव.. लोळलो.. =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Feb 2016 - 11:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कवी कोण ओळखा पाहुंच्या कविता चाल्तिल काय?

टाळ्या वाजण्यासाठी शायरीची गरज नाही,
काही न बोलता पाच मिनटं माईकसमोर उभं राहयचं आपोआप टाळ्या वाजतील.

सुधीर जी's picture

16 Feb 2016 - 11:28 pm | सुधीर जी

गंभीरपणे घ्या मिपाकरहो
विनोदी नको
जे प्रेक्षक नृत्य बघून साधी टाळी वाजवायची तसदी घेत नाही
त्यांना उद्देशून सुचवा काही
पण विनोदी नको

अभ्या..'s picture

16 Feb 2016 - 11:45 pm | अभ्या..

सॉरी बर्का सुधीर्जी.
ते गंभीरपणे वगैरे काय येत नाही मला. असल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करुन सक्तीच्या टाळ्या मिळवण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही.
तुमचे तुम्ही निस्तरा.

नाव आडनाव's picture

17 Feb 2016 - 10:54 am | नाव आडनाव

विनोदी नको

विनोदी नको असेल तर काहीतरी गंभीर भाषण करा - आपला जीडीपी, समस्या आणि उपाय असं काहीतरी. भाषण थांबेपर्यंत टाळ्या नक्की. आणि सुरवातीच्या टाळ्यांनी खुष होउन लगेच भाषण थांबवू नका. बघा टाळ्या एक्सपोनेंशिअली वाढत जातील.

वेल्लाभट's picture

16 Feb 2016 - 11:49 pm | वेल्लाभट

आमचे एक सर म्हणायचे

शर्म उन्हे आती है
जो शर्म से शर्माते है
हम तो बेशर्म है
शर्म खुद हमसे शर्माती है

बुरे हैं ह़म तभी तो ज़ी रहे हैं.. अच्छे होते तो द़ुनिया ज़ीने नही देती. !!!!

विजुभाऊ's picture

17 Feb 2016 - 12:26 am | विजुभाऊ

अरे अरे अरे.......
इथले लोक इतके कंजूस असतील असे वाटले नव्हते.
मला वाटले होते की इथले लोक फार रसीक.
कलेचे जाणकार आहेत. चोखंदळ आहेत.
मात्र चांगल्या कार्यक्रमाला भरपूर टाळ्या वाजवतात.
बाकी बाबतीत कसेही असोत टाळ्या वाजवण्यात मात्र कंजूसे करत नाहीत.

खटपट्या's picture

17 Feb 2016 - 2:20 am | खटपट्या

जो कोणी वाजवणार नाही टाळी
जो कोणी वाजवणार नाही टाळी
हाणीन त्याच्या सोटा कपाळी
तेल लावत बसेल मग संध्याकाळी

कवी - अतीसुमार

सुधीर जी's picture

17 Feb 2016 - 6:00 am | सुधीर जी

धाग्याचा विषय सोडून बाकीची फालतू बड्बडच करत असतात मिपावर
म्हणून वैताग येतो इथे यायचा आणि काही विचारायचा

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Feb 2016 - 10:27 am | ज्ञानोबाचे पैजार

कविता म्हणजे तुम्हाला वाटली का चकली?
सोर्या दाबला आणि तळायला टाकली?

मिसळपावाच्या ठेल्यावर जाउन देते का कोणी ऑर्डर वरण भाताची
तिथे मजा घ्यायाची झणझणित रस्स्याची आणि मसालेदार ताकाची

केळ्याची शिक्रण हवी असेल तर पाव शँपल ची आर्डर देऊ नये
आणि मग तिखट लागले म्हणुन हाटेलच्या नावाने बोंबलु नये

फुकटचे टंकायला मिळते म्हणुन कोणीही उठुन श्या द्यायचे काम नाही
उगाच काय पण ऐकून घ्यायला मिपाकर काय कोणाचे गुलाम नाही

पैजारबुवा,

पैजारबुवा सध्या फुल फॉर्मात. =))

यशोधरा's picture

17 Feb 2016 - 2:15 pm | यशोधरा

=)) भारी!

बोका-ए-आझम's picture

17 Feb 2016 - 11:06 pm | बोका-ए-आझम

माऊली,काय हा चिमित्कार!

पैजारांनी त्यांचा 'बुवा' हा उपसर्ग आज सार्थ केला. =))

होबासराव's picture

18 Feb 2016 - 7:32 pm | होबासराव

केळ्याची शिक्रण हवी असेल तर पाव शँपल ची आर्डर देऊ नये
आणि मग तिखट लागले म्हणुन हाटेलच्या नावाने बोंबलु नये

येक नंबर..

विजुभाऊ's picture

18 Feb 2016 - 5:27 pm | विजुभाऊ

धाग्याचा विषय सोडून बाकीची फालतू बड्बडच करत असतात मिपावर
म्हणून वैताग येतो इथे यायचा आणि काही विचारायचा

कुणी आग्रह केलाय का इथे यायचा?
असले भुक्कड प्रश्न उपस्थित केल्यावर दुसरे काय होणार !
"द रॉब्ड इज इक्वली रीस्पॉन्सिबल फॉर द रॉबरी अ‍ॅज द रॉबर इज "
उगा त्रागा कशाला करता?

पक्षी's picture

17 Feb 2016 - 10:37 am | पक्षी

छान झाला नाच ... छान झाला नाच.....
जो पण टाळ्या वाजवणार नाही, त्याच्या .... घुसेल काचं

टाळ्या वाजव बाळा, नाहीतर होईल तुझा ..... काळा

प्रमोद देर्देकर's picture

17 Feb 2016 - 11:01 am | प्रमोद देर्देकर

बरं का सुधीरजी,

कोणी आवतण दिले तुम्हाला म्हणुन का तुम्ही मिपावर आलात,
मदत पाहिजे मदत पाहिजे म्हणुन तुम्हीच तर रडलात,
झाली थोडी करामाणुक तर कुठे बिघडलं
तुम्हाला मदत करायला मिपाकारांच काय हो अडलं

सुधीर जी's picture

17 Feb 2016 - 2:09 pm | सुधीर जी

मदत मागितली म्हणून रडलो
तर मदतीची अपेक्षा असते
थट्टा मस्करी ची नाही

महासंग्राम's picture

18 Feb 2016 - 4:58 pm | महासंग्राम

मदत मागितली रडतो
तसा कधीच रडत नाही
माझी मस्करी नका करत जाऊ गडे
थट्टा मला खपत नाही

पिके से पिके तक..'s picture

18 Feb 2016 - 5:09 pm | पिके से पिके तक..

मेले में खिलोने बेचने वाले लड़के को देखा,
सोचता हु उसकी खेलने की उम्र क्या होगी.......

जवान भाई मेरे शहीद हुए बर्फीली पहाड़ियों में
पर अफ़सोस के कुछ लोग देश में आग लगाने की सोच रखते है.....PK

अभि ये कुछ नहि रहे बहोत सारे हो गये है