पुणेरी वाहतूक पोलिसाचे वर्तन

चेतन सुभाष गुगळे's picture
चेतन सुभाष गुगळे in जनातलं, मनातलं
14 Sep 2008 - 6:48 pm

पुणेरी वाहतूक पोलिसाचे वर्तन
http://www.loksatta.com/daily/20061111/mv04.htm

प्रतिक्रियेसाठी संपर्क :-
भ्रमणध्वनी - ९८६०२०११०१
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

समाजअनुभव

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

14 Sep 2008 - 6:52 pm | यशोधरा

प्लीज, नुसत्या लिंक्स देण्यापेक्षा, तुमचेच लेख असतील इथे या संस्थळावर प्रकाशित करा ना...

चेतन सुभाष गुगळे's picture

14 Sep 2008 - 7:13 pm | चेतन सुभाष गुगळे

ही बातमी लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यासाठी मी ५ पानी लेख लिहून पाटविला होता. तो 'श्री लिपी' तुन टंकलिखीत केला होता. मी लिहीलेला मूळ लेख किंवा लोकसत्तातील बातमी यापैकी काहीच इथे कॉपी / पेस्ट करता येत नाहीय. पुन्हा सारा मजकूर टंकलिखीत करणे मला फारच अवघड वाटत आहे.

तुम्हाला हवी असल्यास पी डी एफ फाईल ईमेलने पाठवू शकेल.

देवदत्त's picture

14 Sep 2008 - 6:58 pm | देवदत्त

चांगले केलेत.
पण जवळपास २ वर्षांनी ही बातमी तुम्ही सांगताय. पुढे काय झाले ते ही सांगा की?

चेतन सुभाष गुगळे's picture

14 Sep 2008 - 7:10 pm | चेतन सुभाष गुगळे

त्या पोलिसाची चौकशी झाली. वाहतुक पोलिस आयुक्तांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलावुन माझी बाजु सन्मानाने ऐकून घेतली व पुढील कारवाईचे आश्वासन दिले.

कारवाई काय झाली हे पुढे गोपनीयतेच्या कारणामुळे मला कळू शकले नाही.

चेतन सुभाष गुगळे's picture

14 Sep 2008 - 7:06 pm | चेतन सुभाष गुगळे

ही बातमी लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यासाठी मी ५ पानी लेख लिहून पाटविला होता. तो 'श्री लिपी' तुन टंकलिखीत केला होता. मी लिहीलेला मूळ लेख किंवा लोकसत्तातील बातमी यापैकी काहीच इथे कॉपी / पेस्ट करता येत नाहीय. पुन्हा सारा मजकूर टंकलिखीत करणे मला फारच अवघड वाटत आहे.

तुम्हाला हवी असल्यास पी डी एफ फाईल ईमेलने पाठवू शकेल.

भडकमकर मास्तर's picture

15 Sep 2008 - 12:12 am | भडकमकर मास्तर

वाहतूक पोलीसांना गरज असली की कोणतेतरी नियम दाखवून तुमच्याकडून पैसे घेतातच हे सत्य....
.... त्यावर किती लढायचं, किती तक्रारी करायच्या आणि किती त्रास करून घ्यायचा हे ज्याच्या त्याच्या हिमतीवर अवलंबून...

एकदा माझ्या फ़ोर व्हीलरच्या लायसन्सवर एक्स्पायरी डेट नाही , म्हणून ते चुकीचे आहे अशी शंका एका वाहतूक पोलीसाने काढली.....तीनशे रुपये विनापावती घेतले... मी तडक लायसन्स मिळवून देणार्‍या संस्थेत गेलो , त्याने सांगितले की हे लायसन्स योग्य आहे आणि अशी एक्स्पायरी डेट फोर व्हीलरच्या ट्रान्स्पोर्ट प्रकारात असते, ... पण त्याने मला मोलाचा सल्ला असा दिला की
"आता पोलीसांकडे परत पैसे मागायला जाऊ नका, त्याचा काही फायदा नाही, घेतलेले पैसे परत द्यायची त्यांची पद्धत नसते...उलट तुमच्यावरच अजून एखादे निराळे कलम लावून तुम्हाला अडकवायची शक्यता जास्त कारण त्यांना आता मॅजिस्ट्रेट पॉवर्स आहेत "........खरंखोटं देवाला ठाऊक...

तीनशे अक्कलखाती जमा म्हणून परत आलो.... आता तुमची गोष्ट वाचून वाटतंय की लढलो नाही , बरे केले...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/