माझा निसर्ग चित्रणाचा प्रयत्न

आसिफ's picture
आसिफ in मिपा कलादालन
25 Jan 2016 - 6:41 am

नमस्कार मंडळी,

आजचा सुट्टीचा फावला वेळ कसा घालवावा या विवंचनेत होतो. नेट वर चाळताना काही पेंटीग्स नजरेला पडली. तशी मला चित्रकलेची आवड अगदी लहानपणापासून, पण ६ वी , ७ वी ला असताना एलिमेटरि आणि इंटर मिडिएट चित्रकलेच्या परिक्षां मध्ये भाग घेतला तेव्हा पासून आणखी वाढ झाली. दहावी नंतर ही कला जोपासायला वेळ तसा कमीच मिळाला. कधी कधी वेळ मिळाला तर स्केचेस करत होतो. अगदी इंजिनीयरिंग ला असताना पेपर च्या वेळी ही केले ( M3). (हसणारी स्मायली कल्पावी )
कामाला लागल्या पासून शनिवार रविवार मोकळे मिळायचे पण काही चित्रकला केल्याचे आठवत नाही.

बऱ्याच दिवसांनी मुड झालाय तर वाटले काही तरी रंगवु. लगोलग रंग, कॅनवास , ब्रश आणि इतर साहित्य आणले आणि केली सुरुवात.

१.
1

२.
2

३.
3

४.
4

५.
5

६.
6

७. इथे मला वाटले की आता थांबुया.
7

८. ५ मिनिटांनी रंग वाळल्यानंतर भिंतीवर लटकवून टाकले.
8

निसर्गचित्र
माध्यम : अक्र्यालिक (अक्र्यालिक कलर ऑन कॅनवास)
आकार : १८ " X १२ "(स्ट्रेचड कॅनवास )

प्रतिक्रिया

कंजूस's picture

25 Jan 2016 - 8:38 am | कंजूस

आवडलं.

शान्तिप्रिय's picture

25 Jan 2016 - 9:41 am | शान्तिप्रिय

छानच आसिफ भाई!

ती हिरवी झुडपं कॅनवासमधून बाहेर आल्यासारखं दिसतंय- एकदम जिवंत!

(पण समुद्र आणि आकाश त्याच्यासमोर जरा प्लेन वाटलं.... )

बबन ताम्बे's picture

25 Jan 2016 - 11:03 am | बबन ताम्बे

सराव सतत चालू ठेवणे.

प्रभाकर पेठकर's picture

25 Jan 2016 - 12:14 pm | प्रभाकर पेठकर

निसर्गचित्रात, मानव निर्मित दिपस्तंभ जरा खटकला.

बाकी मस्तच आहे.

जबरदस्त! पण आकाश क्षितिजाकडे पांढरं दिसतं आणि क्षितिजापासून लांब गर्द निळं होत जातं हा तपशील आवडला असता.

चांदणे संदीप's picture

25 Jan 2016 - 12:43 pm | चांदणे संदीप

लगे राहो!

Sandy

पैसा's picture

25 Jan 2016 - 12:47 pm | पैसा

बरेच वर्षांनी काढलेलं चित्र, तेही कॅनव्हासवर! मस्त आलंय!

शब्दबम्बाळ's picture

25 Jan 2016 - 2:01 pm | शब्दबम्बाळ

छान! मला चित्र रंगवणे सगळ्यात कठीण वाटते त्यामुळे विशेष आवडले! :)
बर्याच दिवसांनी एखादे चित्र आले कलादालनात... लगे रहो!!

एस's picture

25 Jan 2016 - 4:34 pm | एस

चित्र आवडले!