✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझा निसर्ग चित्रणाचा प्रयत्न

आ
आसिफ यांनी
Mon, 01/25/2016 - 06:41  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी, आजचा सुट्टीचा फावला वेळ कसा घालवावा या विवंचनेत होतो. नेट वर चाळताना काही पेंटीग्स नजरेला पडली. तशी मला चित्रकलेची आवड अगदी लहानपणापासून, पण ६ वी , ७ वी ला असताना एलिमेटरि आणि इंटर मिडिएट चित्रकलेच्या परिक्षां मध्ये भाग घेतला तेव्हा पासून आणखी वाढ झाली. दहावी नंतर ही कला जोपासायला वेळ तसा कमीच मिळाला. कधी कधी वेळ मिळाला तर स्केचेस करत होतो. अगदी इंजिनीयरिंग ला असताना पेपर च्या वेळी ही केले ( M3). (हसणारी स्मायली कल्पावी ) कामाला लागल्या पासून शनिवार रविवार मोकळे मिळायचे पण काही चित्रकला केल्याचे आठवत नाही. बऱ्याच दिवसांनी मुड झालाय तर वाटले काही तरी रंगवु. लगोलग रंग, कॅनवास , ब्रश आणि इतर साहित्य आणले आणि केली सुरुवात. १. 1 २. 2 ३. 3 ४. 4 ५. 5 ६. 6 ७. इथे मला वाटले की आता थांबुया. 7 ८. ५ मिनिटांनी रंग वाळल्यानंतर भिंतीवर लटकवून टाकले. 8 निसर्गचित्र माध्यम : अक्र्यालिक (अक्र्यालिक कलर ऑन कॅनवास) आकार : १८ " X १२ "(स्ट्रेचड कॅनवास )
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2168 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

आवडलं.

कंजूस
Mon, 01/25/2016 - 08:38 नवीन
आवडलं.
  • Log in or register to post comments

छानच आसिफ भाई!

शान्तिप्रिय
Mon, 01/25/2016 - 09:41 नवीन
छानच आसिफ भाई!
  • Log in or register to post comments

ती हिरवी झुडपं कॅनवासमधून

असंका
Mon, 01/25/2016 - 10:02 नवीन
ती हिरवी झुडपं कॅनवासमधून बाहेर आल्यासारखं दिसतंय- एकदम जिवंत! (पण समुद्र आणि आकाश त्याच्यासमोर जरा प्लेन वाटलं.... )
  • Log in or register to post comments

व्वा ! छान !!

बबन ताम्बे
Mon, 01/25/2016 - 11:03 नवीन
सराव सतत चालू ठेवणे.
  • Log in or register to post comments

छान आहे. पण...

प्रभाकर पेठकर
Mon, 01/25/2016 - 12:14 नवीन
निसर्गचित्रात, मानव निर्मित दिपस्तंभ जरा खटकला. बाकी मस्तच आहे.
  • Log in or register to post comments

जबरदस्त! पण आकाश क्षितिजाकडे

आदूबाळ
Mon, 01/25/2016 - 12:28 नवीन
जबरदस्त! पण आकाश क्षितिजाकडे पांढरं दिसतं आणि क्षितिजापासून लांब गर्द निळं होत जातं हा तपशील आवडला असता.
  • Log in or register to post comments

मस्तच!

चांदणे संदीप
Mon, 01/25/2016 - 12:43 नवीन
लगे राहो! Sandy
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
Mon, 01/25/2016 - 12:47 नवीन
बरेच वर्षांनी काढलेलं चित्र, तेही कॅनव्हासवर! मस्त आलंय!
  • Log in or register to post comments

छान! मला चित्र रंगवणे सगळ्यात

शब्दबम्बाळ
Mon, 01/25/2016 - 14:01 नवीन
छान! मला चित्र रंगवणे सगळ्यात कठीण वाटते त्यामुळे विशेष आवडले! :) बर्याच दिवसांनी एखादे चित्र आले कलादालनात... लगे रहो!!
  • Log in or register to post comments

चित्र आवडले!

एस
Mon, 01/25/2016 - 16:34 नवीन
चित्र आवडले!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा