गाभा:
मिपावर बरीच लेखक मंडळी आहेत. काहीना त्यांच्या लिखाणाचे पुस्तक छापण्याचा अनुभव असेल. आपले पुस्तक छापून घ्यायचे असेल तर काय करावे ह्याचे व्यवस्थित मार्गदशन मिळेल का? तसे येथील काही लेखकाना व्यनि करून देखील विचारता आले असते. पण इथे विचारले तर इतरानाही माहिती मिळेल म्हणुन लिहीत आहे.
आणि माझे देखील एक पुस्तक सात आठ वर्षापूर्वी छापले होते. पण आता लेटेस्ट स्थिती काय आहे ते देखील कळले तर बर.
म्हणजे --
साधारण खर्च काय येतो.
टर्म्स कंडीशन काय असतात..
दुसऱ्या आवृत्तीचे हक्क आपण आपल्याकडे ठेवू शकतो का? (म्हणजे इतर प्रकाशकांकडून छापून घेऊ शकतो का?)
प्रकाशकाने विकलेल्या प्रतींवर आपल्याला काही परतावा येतो का?
आणि इतर रिलेटेड गोष्टी.
कृपया अवांतर किंवा टवाळी साठी हा धागा वापरू नये. काही उपयोगी माहिती शेअर केल्याबद्दल आधीच धन्यवाद.
प्रतिक्रिया
20 Jan 2016 - 7:57 am | चांदणे संदीप
तहानच लागलेली इतक्यात शेजारी दुसरे कोणीतरी विहीर खोदत आहे! :)
माहितीच्या प्रतिक्षेत!
Sandy
20 Jan 2016 - 10:47 am | अन्नू
+१ :)
20 Jan 2016 - 8:00 pm | अरुण मनोहर
लाईक !
20 Jan 2016 - 8:25 am | प्रचेतस
त्यासाठी आत्मबंध ह्यांना संपर्क साधावा.
घरकुल प्रकाशनाचे श्री व सौ पटवर्धन त्यांच्या चांगलेच ओळखीचे आहेत. आत्मबंध ह्यांनी त्यांच्याकडून कवितासंग्रह छापवून घेतला होता.
20 Jan 2016 - 8:47 am | श्रीरंग_जोशी
वाचक म्हणून एक सांगणे आहे.
कृपया छापिल आवृत्तीबरोबर इ-बूक आवृत्ती प्रकाशित करण्याबाबत गांभिर्याने विचार करावा. परदेशस्थ व पर्यावरणप्रेमी वाचकांची सोय होते.
20 Jan 2016 - 10:12 am | अनंत छंदी
श्रीरंग जोशींच्या मताशी १००% सहमत आहे. प्रतिथयश साहित्यिक नसाल तर अनेक प्रकाशक तुमच्याच खर्चाने पुस्तक प्रकाशित करतात, त्यामुळे मानधन वगैरेचा विचार बाजूला ठेवून आपण आपल्या पुस्तकासाठी किती खर्च करू शकतो याचा विचार करावा. त्यापेक्षा ई बुक प्रकाशित करणे अधिक सोपे कमीत कमी खर्चाचे आहे. ई साहित्य प्रतिष्ठान कमी खर्चात ई बुक्स प्रकाशित करते आणि ती सुमारे २ लाख वाचकांपर्यंत पोहोचतात असा त्यांचा दावा आहे. एम एस वर्डचे कामचलावू द्न्यान असेल तरीही स्वत: ई बुक निर्मिती करणे सोपे जाते. तोच विचार प्राधान्याने करावा असे आग्रहाने सुचवावेसे वाटते.
20 Jan 2016 - 10:20 pm | श्रीरंग_जोशी
इ साहित्य प्रतिष्ठान हा स्पृहणीय उपक्रम असला तरी त्यांच्याद्वारे प्रकाशित होणारी पुस्तके विनामुल्य असतात असे माझे निरिक्षण आहे.
इ बुक आवॄत्ती सुचवताना माझा संदर्भ बुकगंगावर ज्याप्रमाणे इबुक्स विकत घेता येतात त्याचा होता.
20 Jan 2016 - 8:51 am | विशाखा पाटील
माझ्या माहितीप्रमाणे दोन प्रकारचे प्रकाशक असतात. नावाजलेले प्रकाशक लेखकाचे लेखन आवडले तर करार करून पुस्तक छापतात. लेखकाला रोयल्टी मिळते. माझा अनुभव 'राजहंस' आणि 'नितीन प्रकाशन' यांच्यापुरता आहे आणि तो उत्तम आहे.
काही प्रकाशक तुम्हीच पैसे गुंतवा आम्ही छापून देतो, असे सांगतात. काही जणांकडे वितरणव्यवस्था नसते. म्हणजे ती जबाबदारी लेखकावरच येऊन पडते.
20 Jan 2016 - 10:50 am | कविता१९७८
मिपाकर सुधांशु नुलकरांशी संपर्क साधा.
20 Jan 2016 - 10:53 am | मित्रहो
हा पर्याय आहे. बऱ्याच वेबसाइट मदत करतात.
दुसरा पर्याय म्हणजे प्रकाशम संस्थेपेक्षा प्रिंटींग प्रेसशी संपर्क साधने आमि त्यांच्या लिंंक वापरुन पुस्तक प्रकाशित करने. दोन्ही मधे ISBN स्वतःलाच घ्यावा लागतो. मार्केटींग, वितरण स्वतःच करावे लागते.
इ बुक उपाय चांगला आहे. उलट सुरवातील इ बुक बनवून काही लोकांची मते घेउन मग पुस्तक प्रकाशित करने केंव्हाही उत्तम. इ बुक च्या काही मर्यादा आहेत. फोन किंवा लॅपटॉप या दोन्हीची Display Intensity जास्त असते त्यामुळे काही विशिष्ट काळानंतर वाचताना डोळ्यावर ताण येतो. अॅमेझॉनने ही समस्या किंडलमधे सोडविली आहे. माझ्या माहीतीप्रमाणे किंडलवर मराठी भाषेचा सपोर्ट नाही. पीडीफ वापरावे लागतात.
20 Jan 2016 - 8:21 pm | आदूबाळ
पूर्वी .mobi मध्ये नव्हता. आता .azw3 मध्ये आहे. फॉन्ट रेन्डरिंगमध्ये सुधारणेला वाव आहे (उदा० र्या च्या जागी र्या दिसणे, किंवा सप्रीण च्या जागी सर्पीण दिसणे वगैरे), पण तेवढं जुळवून घेतलं की ओक्के आहे.
21 Jan 2016 - 11:22 am | ए ए वाघमारे
मी प्रयत्न करून पाहिला पण जमले नाही.तुम्हाला याबाबत काही स्पेसिफिक माहिती आहे का?
20 Jan 2016 - 11:01 am | भाते
या प्रतिसादात मी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे नवलेखक प्रोत्साहनार्थ योजनेची माहिती दिली आहे. यात लेखकाला मंडळातर्फे प्रकाशकांकडुन फक्त ७५० ते १५०० पर्यंत मानधन देण्यात येते. साहित्याच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशनाचे अधिकार मंडळाकडे आहेत. त्यात त्यांनी साहित्य टाईप करून पाठवायला सांगितले आहे. इथे एम एस वर्डवर ठराविक आकाराचा आणि ठराविक फॉंन्ट वापरुन टाईप केलेले अपेक्षित आहे का सरकारी खाक्याप्रमाणे टाईपरायटर वर टाईप केलेले अपेक्षित आहे?
माझी १४०-१४५ पानांची कादंबरी लिहुन तयार आहे. पण कथानकापध्दल माझे संपुर्ण समाधान झाल्याशिवाय मी पुढे जाणार नाही आहे.
20 Jan 2016 - 8:05 pm | अरुण मनोहर
धन्यवाद! बघतोय.
20 Jan 2016 - 8:08 pm | अरुण मनोहर
महाराष्ट्र राज्याच्या लिंकवर म्हटले आहे कि एकही पुस्तक प्रकाशित झालेले नको.!
20 Jan 2016 - 8:03 pm | अरुण मनोहर
सर्वाना धन्यवाद. काही धाग्यानुसार संपर्क साधायला सुरवात केली आहे.
नंतर सगळ्यांच्या माहितीसाठी इथे मलाही काही आणखी भर घालता आली तर बघू!