"कुत्र्याला खीर पचली नाही"

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in काथ्याकूट
18 Jan 2016 - 11:38 pm
गाभा: 

श्रीपाल सबनीस हे नाव मी त्यांची यंदाचे साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाली तेव्हा प्रथमच वाचले. "हे सबनीस कोण?" असा प्रश्नही अनेकांकडून उघड ऐकला.

श्रीपाल सबनीस यांचे निकटवर्तीय (पण बहुतेक आता दुरावलेले) पत्रकार घनश्याम पाटील यांनी "कुत्र्याला खीर पचली नाही" या शीर्षकाचा एक लेख लिहून सबनीस यांच्या उरल्यासुरल्या अब्रूची लक्तरे चव्हाट्यावर टांगली आहेत. साहित्यजगतात इतक्या खालच्या दर्जाचे राजकारण होत असेल आणि ते निर्लज्जपणाने करणारी व्यक्ती संमेलनाध्यक्षपदापर्यंत पोचत असेल यावर चटकन विश्वास बसत नाही.

सदर लेख आंतरजालावर सहज उपलब्ध आहे. परंतु भ्रमणध्वनी हस्तसंचावरून दुवा डकवणे कठीण जात आहे.

प्रतिक्रिया

काळा पहाड's picture

19 Jan 2016 - 1:03 am | काळा पहाड
यशोधरा's picture

19 Jan 2016 - 8:05 pm | यशोधरा

कठीण आहे!

कंजूस's picture

19 Jan 2016 - 8:18 am | कंजूस

हा माणूस वजन असणारा ( influencial) असावा.

असंका's picture

19 Jan 2016 - 8:48 am | असंका

भ्रमणध्वनी हस्तसंच

चांगला शब्दय. नुस्तं हस्तसंच म्हणलं तरी कळेल इतकं याला पॉप्युलर किंवा लोकप्रिय व्हायला हवं..

धन्यवाद!

प्रचेतस's picture

19 Jan 2016 - 10:36 am | प्रचेतस

लेख अजिबातच पटला नाही.
हे घनश्याम पाटिल कोण? चपराक मासिक पूर्वी मचाक स्टाइल लेखांसाठी प्रसिद्ध होते असे ऐकिवात आहे. खरेखोटे माहीत नाही.

लेखात किती सत्य / असत्य हे माहीत नाही पण पाटलांनी तितक्याच खालच्या पातळीवर जाऊन सबनीसांचं चारित्र्यहनन केलेलं आहे.
सगळेच एका माळेचे मणी.

राही's picture

19 Jan 2016 - 12:05 pm | राही

असेच म्हणायचे होते.

प्राची अश्विनी's picture

19 Jan 2016 - 12:08 pm | प्राची अश्विनी

+11

शब्दबम्बाळ's picture

19 Jan 2016 - 2:34 pm | शब्दबम्बाळ

चलत मुसाफिर यांनी सबनीसांचे नाव देखील आधी ऐकले नव्हते म्हटले आहे. परंतु कोणीतरी हीन दर्जाच्या भाषेमध्ये त्यांची टीका केली म्हणून सबनीस लगेच खालच्या दर्जाचे राजकारण करणारे कसे झाले?
एखाद्या व्यक्तीचा राग येत आहे म्हणून त्याची अब्रू काढणे आजिबात योग्य नाही.

हीच गोष्ट त्या लोकसत्तेमधल्या लेखाबद्दल!

चलत मुसाफिर's picture

19 Jan 2016 - 3:29 pm | चलत मुसाफिर

जे लिहिले आहे, त्यावर विश्वास बसत नाही असे म्हटले आहे. ते सर्व खरे आहे की खोटे, यावर मतप्रदर्शन करण्याइतके विषयाचे ज्ञान मजपाशी नाही.

अर्ज मागवून घेतलेली संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक हा साहित्यशारदेचा अपमान आहे असे माझे स्पष्ट मत आहे, मग कुणीही निवडून येवो. या गचाळ प्रक्रियेला पर्याय शोधणे आवश्यक आहे.

कदाचित, काही नावाजलेल्या पुरस्कारांची यादी बनवून (साहित्य अकादमी, राज्य शासन पुरस्कार, ज्ञानपीठ इ.), त्यांचे एकदोन वर्षातील जे कुणी मराठी विजेते असतील, त्यांची नावे या पदासाठी आपोआप विचारात घेतली जावीत व त्यातून निवड व्हावी अशी एक सूचना करता येईल.

यशोधरा's picture

20 Jan 2016 - 9:01 am | यशोधरा

हे बरोबर.

मराठी कथालेखक's picture

19 Jan 2016 - 1:09 pm | मराठी कथालेखक

विश्वास पाटील यांच्यावर चिखलफेक करणारा लेख त्यांचे (सख्खे) धाकटे बंधू सुरेश पाटील यांनी नुकताच लिहलाय. सभ्यतेचे पुरेसे निकष न पाळता लिहलेला हा लेह लोकसत्ताने रविवार-लोकरंग पुरवणीच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध केलाय !! (लोकसत्ताला वाद आणि वादळांची तशी आवड आहेच)
लेखातले किती खरे आणि किती खोटे माहित नाही..पण वाचायला मजा आली. आता लोकरंगचा पुढचा अंक तुफान रंगणार अशी आशा आहे. स्वतः विश्वास पाटील पण मैदानात उतरतीलच बहुधा...

चलत मुसाफिर's picture

19 Jan 2016 - 3:38 pm | चलत मुसाफिर

नळावर एकमेकाच्या झिंज्या ओढत भांडण करणाऱ्या चालगृहसंकुलनिवासी स्त्रीवृंदाची आठवण आली.

प्रसाद१९७१'s picture

19 Jan 2016 - 4:48 pm | प्रसाद१९७१

दोन्ही पुस्तकांचा खप वाढावा म्हणुन चे नाटक पण असेल.

मराठी कथालेखक's picture

19 Jan 2016 - 5:04 pm | मराठी कथालेखक

मलाही असेच वाटले...काही हजार तरी प्रती केवळ या वादामूळेच विकल्या जातील.
झालेच तर लोकसत्ताचाही खप जास्त झाला असेलच रविवारी.
आता येणार्‍या रविवारची आतुरतेने वाट पाहतोय :!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jan 2016 - 7:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

साहित्य संमेलनाच्या एका परिसंवादात विश्वास पाटील यांच्याबद्दल असं काही तरी बोलल्या गेलं होतं म्हणजे त्यांच्या लेखनाच्या कौतुकासाठी कशाकशाचा वापर करतात असं काही तरी. जाऊ द्या आपल्याला काय... लेखन वाचत राहु.

दुव्याबद्दल आभार.

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

22 Jan 2016 - 8:40 pm | माहितगार

आज चिंतामण विनायक जोशी (चिं.वि. जोशी) यांची 'चार दिवस सुनेचे' कादंबरी वाचनात आली त्यातही एक खाणावळ चालवणार्‍या आजीबाई आहेत, वाचताना पाटीलबंधूंच्या वृत्तपत्रीय खाणावळ वादाची आठवण आली, (पाटीलबंधूंच्या कादंबर्‍या मी वाचलेल्या नाहीत)

(अवांतराबद्दल क्षमस्व)

नया है वह's picture

19 Jan 2016 - 2:12 pm | नया है वह

साहित्य संमेलनाध्यक्ष कोण आहे याने सामान्य साहित्य वाचकांना काही फरक पडत नाही.आणि त्यामुळे
संमेलनालाही काही फरक पडत असेल असे वाटत नाही.

कपिलमुनी's picture

19 Jan 2016 - 2:43 pm | कपिलमुनी

कुठे प्रकाशित होता आणि कोण वाचता ??

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Jan 2016 - 3:03 pm | राजेंद्र मेहेंदळे

म्हणजे प्रकाशकांनी पुस्तकांचा खप वाढवण्यासाठी स्वतः पैसे पुरवुन सुरु ठेवलेला धंदा आहे . या संमेलनात म्हणे ४ कोटींच्या पेक्षा जास्त किमतीची पुस्तके खपली. कोण म्हणते पुस्तक प्रकाशन तोट्यात आहे म्हणुन?

आणि मराठी टिकायची/ टिकवायचीच असेल तर ईतर अनेक मार्ग आहेत की. मिसळपाव सारखी मराठी संस्थळेही त्यात आलीच. त्यासाठी या भिकारड्या साहित्य संमेलनांची गरजच काय? अशा संमेलनामुळे मराठी भाषेचा फायदा होणे हा मुळ उद्देश कधीच बाजुला पडलाय असे वाटते.

बोका-ए-आझम's picture

19 Jan 2016 - 6:34 pm | बोका-ए-आझम

साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हे इतकं आटापिटा करुन मिळवण्यासारखं पद आहे का? एवढं काय सोनं लागलेलं आहे त्या पदाला की लोकांनी एवढा अट्टाहास करावा अध्यक्षपदासाठी?

सुबोध खरे's picture

19 Jan 2016 - 8:34 pm | सुबोध खरे

बाडीस

चपराक नावातुनच एक विकृत दृष्टीकोण दिसतो. म्हणजे चपराक एक फार संतापातुन सात्विक संतापातुन रागातुन अपवादात्मकरीत्या कोणीही एरवी नॉर्मल माणुस सहज संवेदना असलेला माणुस लगावु शकतो. इथपर्यंत समजत. मात्र चपराक लगावण ( भले वैचारीक तथाकथित वैचारीक का असेना ) हाच आमचा धंदा हेच आमच ब्रीद किती चीप विचार आहे.
दुसर अस की जे गलिच्छ राजकारण ज्याच वर्णन पाटील करतात ते कोणी दुरुन पाहणारे तटस्थ नव्हे तर पुर्णपणे त्यात सक्रीय लिप्त असे दिसतात. हे म्हणजे शेवटी काहीतरी यांचा स्वार्थ हेतु जो साध्य झाला नसावा त्यानंतर झालेली आगपाखड दिसतेय. इतका इनोसंट आहे हा माणुस जो स्वत: या डर्टी गेम चा एक हिस्सा आहे. जो स्वत: पुर्णपणे त्यात गुंतलेला आहे. ते जेव्हा क्लेम करतात की त्यांना उशीरा कळल ते अत्यंत हास्यास्पदरीत्या अविश्वसनीय अगदी प्राथमिक तर्कानेही दिसुन येत. ते ज्या चीप शैलीत चिखलफेक करत आहेत ती तर अजुनच बकवास. म्हणजे ठीक आहे सबनीस हे अगदी धुतल्या तांदळासारखे आहेत की नाहीत हे बाजुला ठेवतो कारण माहीतच नाही तर त्यावर काय मत देणार. मात्र पाटील जी मांडणी करत आहेत ती अजिबात विश्वसनीय नाही. जी शैली ज्या गोष्टी जी सायकॉलॉजी यातुन ध्वनित होते ती सुस्पष्ट आहे. हे काहीतरी सबनीसांनी प्रॉमिस केलेल नाकारल्याच्या रागातुन आलेली प्रतिक्रीया वाटते. अस होत कधी कधी एखादा दरोडेखोर जणु टोळीतुन बाहेर पडुन पोलिसांच्या बाजुचा व्हावा आणि मग मारे कोणी संताच्या शैलीत ते अस करत होते ते अस करत होते इ. वल्गना कराव्या तसल काहीतरी अरे बाबा तु स्वत" उघड उघड त्या डर्टी गेम चाच एक भाग होता, सक्रिय सहभाग होता ते तु कीतीही लपवलस तरी उघड पडुन दिसत आहे. पुन्हा सबनीसांची बाजु घेण्याचा प्रश्न नाहीये कारण काही माहीतीच नाही जास्त म्हणुन मतच नाही त्यांच्याविषयी मात्र या लेखकात व याच्या दाव्यात फारसा अर्थ नाही.
यापेक्षा तर कैक पट अधिक संतुलित मार्मिक दर्जेदार विश्लेषण श्रावण मोडक यांनी जे सबनीसाच केलेल आहे ते आहे.
म्हणजे अधिक तार्किक अधिक कन्विन्सींग अस आहे.

शैलेन्द्र's picture

19 Jan 2016 - 11:44 pm | शैलेन्द्र

श्रा मो नी केलेलं विश्लेषण कुठय

रुपी's picture

23 Jan 2016 - 2:07 am | रुपी

इथे आहे.

संदीप डांगे's picture

20 Jan 2016 - 12:08 am | संदीप डांगे

बाडीस. मनातल्या भावना मांडल्यात.

हे म्हणजे आधी चोरांच्या टोळीत सामिल व्हायचं, मग त्यांचा दरोडेखोरीचा विचार कळला की बोंबाबोंब करायची....

नाखु's picture

20 Jan 2016 - 8:52 am | नाखु

हे म्हणजे आधी चोरांच्या टोळीत सामिल व्हायचं, मग त्यांचा दरोडेखोरीचा विचार कळला की बोंबाबोंब करायची....

थोडी दुरुस्ती

हे म्हणजे आधी चोरांच्या टोळीत सामिल व्हायचं, मग त्यांचा दरोडेखोरीचा हिस्सा/वाटा कमी देण्याचा विचार कळला की बोंबाबोंब करायची....

मुकाट वाचक नाखु (संमेलनाला हजेरी लावलेला)

पगला गजोधर's picture

20 Jan 2016 - 9:06 am | पगला गजोधर

सबनीसांनी प्रॉमिस केलेल नाकारल्याच्या रागातुन आलेली प्रतिक्रीया वाटते.

१००%

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Jan 2016 - 1:48 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी सहमत. अगदी 'चपराक' या नावाच्या विश्लेषणापासून.

माहितगार's picture

20 Jan 2016 - 12:07 am | माहितगार

अवघड आहे !

(सगळे वाचून का कोण जाणे 'माणंसांना गरज असलेल्या बर्‍याच गोष्टी जगातल्या कोणत्याही दुकानात मिळत नाहीत.' या वाक्याची आठवण झाली)

मारवांचा प्रतिसाद आवडला.

सुबोध खरे's picture

20 Jan 2016 - 9:26 am | सुबोध खरे

श्री व्यंकटेश माडगूळकारणी १९४६ साली लिहिलेले आठवले
साहेब, आपण मिठाई खावी कारखाना पाहण्याच्या फंदात पडू नये.
साहित्य संमेलनातील लाथाळ्या, प्रथितयश लेखक कवींचे रुसवे फुगवे पाहिलेले आहेत. यामुळे त्या लेखक किंवा कवीची मनातील प्रतिमा मलिन होते असे जाणवले. त्यामुळे साहित्य संमेलनाला न जायचा निर्णय फार पूर्वी घेतला आहे. पैशापरी पैसे खर्च करून गैर सोय सहन करून तेथे असे उद्विग्न करणारे राजकारण पाहण्यात कोणताही रस राहिला नाही.
राहिली गोष्ट पुस्तक प्रदर्शनाची - आमचे वडील ग्रंथाली, मेहता ग्रंथजगत आणि मैजेस्टिक ग्रंथालय यांचे सदस्य आहेत. त्यांची वेळोवेळी पत्रके, सवलतीची कुपने येतात त्यातून खरेदी करणे जास्त चांगले आणि स्वस्त आहे असे जाणवले.