वाघोबा at ताडोबा भाग - १

अभिदेश's picture
अभिदेश in भटकंती
26 Dec 2015 - 8:12 am

"Hey Rodney , Good Morning."

"Very Good Morning .. Tell me."

"Rodney , I am planning to take vacation in November for 2- 2 1/2 weeks."

"OK , dates?"

"From 10th till 30th . Can you Pl. let me know if it's OK at the earliest as I need to book my flight ."

"OK.. will let you know by end of day."

"Thank You Rodney."

Manager बरोबर वरील संभाषण ऑगस्ट महिन्यातलं . गेले वर्ष दीड वर्ष आस्मादिक मधु इथे (USA ) आणि चंद्र दोन उपग्रहांसह तिथे (पुणे ) परिस्थितीत . हम्म … बरोबर आहे ना ?…. म्हणजे मी मधू आणि बायको चंद्र ?? जाऊ दे ... मला हे न सुटलेलं कोडं आहे .. कोण मधु आणि कोण चंद्र . असो . संध्याकाळी Manager चा मेल आला . "Go Ahead "... वाह…. लगेच तिकीट काढले . रात्री पुण्याला ही बातमी सांगितली मंडळी खुश झाली .

पुढची गोष्ट म्हणजे काय काय करायचं ह्याचं planning सुरु झालं . मुलांना आणि सौ. च्या शाळांना सुट्टी असल्यामुळे , दिवसांचा प्रश्न नव्हता . दिवाळीचे दिवस झाल्यावर बाहेर जाऊ असे ठरले . पुढचे प्रश्न , कोण कोण , कुठे , कधी ???

खूप दिवसांची इच्छा होती की आपण जंगल सफारी करावी . मागे वायनाड ला गेलो होतो तेव्हा जंगल पाहिले होते , पण ती काही खरीखुरी सफारी नव्हती . विचार सुरु झाल्याबरोबर काही नावं समोर आली , कान्हा , बांधवगड , पेंच , ताडोबा वगैरे … जबलपूर , भेडाघाट , बांधवगड हा plan मस्त वाटला . पाच - सहा दिवसांत होण्यासारखा . घरी बोललो . बायको ,मुलं देखील हो म्हणाली . लगेच आई , बाबा , बंधुराजां (मु. पो . मुंबई) बरोबर बोलणे झाले . त्यांना देखील बेत पसंत पडला . म्हणजे एकूण सहा मोठे आणि तीन लहान असं नऊ लोकांच भ्रमण मंडळ तयार झालं . पुढचा प्रश्न म्हणजे कसं जायचं ? रेल्वे / विमान पर्याय . लगेच IRCTC ची आराधना सुरु केली . नवीन नियमानुसार आता चार महिने आधी रेल्वेचं आरक्षण होतं , त्यामुळे ही लढाई जिंकता येईल की नाही ? हा मोठाच प्रश्न होता . हर हर महादेव !!! बर्याच पर्याय आणि प्रयासाने जबलपूरची जायची , यायची तिकिटे मिळाली . हुश्श …. मोठीच लढाई जिंकली होती . पण …. Reservation च्या नादात एका गोष्टीकडे आम्ही लक्षच दिले नव्हते . बांधवगडच्या सफारी ह्या online बुक करता येतात आणि त्या ३ -४ महिने आधी बुक होतात . हे लक्षात आल्यावर बर्याच Resorts ना फोन लावले आणि बुकिंग साठी विचारले पण ईल्ले … सगळ्यांनी सांगितले आता सफारी नाही मिळणार . सफरीच नसेल तर तिकडे जाऊन काय करणार . शेवटी lifeline घ्यायचे ठरवले . बाईसाहेबाना इथे चौकशी करायला सांगितले . तिथे सुध्दा नकारघंटाच ऐकायला मिळाली , पण त्यांनी दुसरा पर्याय सुचवला . Why not Taadoba ? हम्म … Interesting. पण सफारींच काय?

मिळेल म्हणाले , २ दिवसांत सांगतो . थोडी धुगधुगी आली . २ दिवसांनी फोन केला , तर अजून नाही कन्फर्म. अजून २ दिवस थांबा . अरे देवा !!! मी तर बायकोला दगडूशेटला जाऊन यायला सांगितले . २ दिवसांनी सकाळी WhatsApp वर बायकोचा मेसेज "Safari available" . YES !!! लगेच रिप्लाय टाकला "बघितली दगडूशेटची कृपा … " तिचं लगेच उत्तर "मी गेलेच नव्हते " … ठीक है . ठीक है. होत असं कधीकधी . १५ ते १७ नोव्हेंबर , ४ सफारी (१५ ला दुपारी , १६ सकाळ / दुपार, १७ सकाळ ) असा बेत ठरला . त्यांनी Resort बुकिंग आणि सफारी असं package सांगितले , थोडं महाग वाटलं पण जास्त नाही . लगेच advance भरुन कन्फर्म केलं आणि जबलपूर चे Reservations कॅन्सल केलं . आता परत तोच प्रश्न , कसं जायचं ? ४ पर्याय …

१. रेल्वे ने नागपूर आणि तिथून ताडोबा बाय रोड (३ तास )

२. विमानाने नागपूर आणि तिथून ताडोबा बाय रोड

३. बसने चंद्रपूर . पुणे - चंद्रपूर खाजगी बसेस आहेत .

४. वरीलपैकी कोणताही नाही …जो आम्ही निवडला .

पुन्हा एकदा IRCTC ची आराधना चालू केली , पण ह्यावेळेस काही फळ मिळाले नाही . सगळ्या गाड्या फुल्ल … फार प्रवास करतात नाही लोकं . मग विमान कंपन्यांची availability बघायला सुरुवात केली . पण दिवस आणि भाडं ह्यांच गणित काही बसेना . ज्यादिवाशीच हवं ते नेमकं महाग . महाग म्हणजे काय च्या काही महाग . आता पर्याय बसचा . सौ. नी चौकशी सुरु केली. सगळ्यांनी सूर लावला अजून खूप अवकाश आहे . इतक्या लवकर काही सांगू शकत नाही . आम्ही समजलो काय समजायचे ते . दिवाळी चे दिवस , भाडं वाढवणार म्हणून आत्ताच काही सांगत नाहीयेत . पण पर्याय नव्हता . Just Wait and Watch .

दरम्यान माझ्या मित्राकडे चौकशी केली , तो नेहेमी पुणे - चंद्रपूर बसने प्रवास करतो . तो म्हणाला दिवाळीच्या दिवसांत हे लोकं खूप लुटतात . ३००० ते ३५०० तिकीट असू शकेल . मी हिशेब केला म्हणजे कमीतकमी ५४०००/- जाऊन येऊन लागणार . जास्त वाटले . पण काय करणार पर्याय नव्हता .

खरंच पर्याय नव्हता ?? का काही दिवसातच मिळणार होता ??

क्रमश:

प्रतिक्रिया

बाबा योगिराज's picture

26 Dec 2015 - 8:35 am | बाबा योगिराज

सुरुवात तर चांगली झालिये. पण पुढील भागात चित्र पण येऊ द्या.
पुलेशु.

एक एकटा एकटाच's picture

26 Dec 2015 - 11:08 am | एक एकटा एकटाच

पुढिल भागाच्या प्रतिक्षेत

छान लिहिलंय! पुभाप्र!

टोपीवाला's picture

26 Dec 2015 - 7:02 pm | टोपीवाला

मी चंद्रपूर ला राहतो, दि. २४/१२ ला ताडोबा फिरून आलो. एक वाघीण (सोनंम)व दुसरी (माया) तिच्या दोन पिल्यांसह दिसली. बाकी हरीण उदंड दिसतात. नीलगाय पण बरेच आहेत. हल्ली बर्यापैकी पर्यटकांना वाघ दिसत आहेत. गेल्या वीस वर्षात माझ्या अगोदर ५ फेर्या झाल्यात, परंतु वाघ दर्शन झाले नव्हते. सकाळी ६ ते ११ व दु. २ ते ६ अश्या दोन वेळेस एन्ट्री मिळते. मी २२ seater बस ने माझ्या मित्रांसोबत फिरलो. रु. ४०० प्रत्येकी, चंद्रपूर ते मोहुर्ली गेट २५ किमी असून सुमो करून किवां स्वतच्या वाहनाने जाता येते. तिथून वरील बस किवां जीप ( ६ सीटर)आहे. advance बुकिंग गरजेचे. चंद्रपुरात राहण्यासाठी उदंड हॉटेल आहेत. मोबाईल ने फोटो घेतलेत पण भंकस आलेत सबब upload केले नाहीत.

आमच्या एका नातेवाइकाचे फोटो इथे फेसबुकवरच्या पेजवर पहावाइल्डलाइफ फोटोग्राफी आहे.

वेल्लाभट's picture

29 Dec 2015 - 5:03 pm | वेल्लाभट

शैली आवडेश

पैसा's picture

29 Dec 2015 - 8:34 pm | पैसा

छान लिहिलंय, आता पुढचे भाग वाचते.