नसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर राजकीय पटलावर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या भेटीमागे कोणती राजकीय समीकरणे दडली आहेत हे जरी गुलदस्त्यात ठेवण्यात आले असले तरी विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबतची भेट असावी अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय.
या महिन्यांत आठ जणांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपतेय. मुंबईतून शिवसेनेचे रामदास कदम आणि काँग्रेसचे भाई कदम, नागपूरमधून काँग्रेसचे राजेंद्र मुळक, धुळेतून काँग्रेसचे अमरिश पटेल, नंदुरबारचे महादेव महाडिक(काँग्रेस), सोलापूरात राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे, बुलढाणातील शिवसेनेचे गोपीकिसन बजोरिया, नगरमधील अरुण जगताप (राष्ट्रवादी) निवृत्त होतायत. त्यामुळे या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ असल्याने मुंबईतील दोन जागांपैकी एका जागेवर शिवसेनेचा उमेदवार जिंकून येऊ शकतो. शिवसेनेचे रामदास कदम यांना परत उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र दुसऱ्या जागेसाठी चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.
मनसेकडे २९ मते असल्याने त्यांची ही मते या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. ही मते ज्यांच्या पारड्यात पडतील त्यावर दुसऱ्या जागेवर कोण वर्चस्व मिळवणार हे ठरणार आहे. त्यामुळे ही मते आपल्या पारड्यात घेण्यासाठी सर्वांचीच जुळवाजुळव सुरु झालीय. यामुळे की काय भुजबळ राज यांच्या भेटीला गेले होते अशी अटकळ बांधली जातेय.
दरम्यान, महाराष्ट्र सदन आणि कलिना भूखंड घोटाळय़ाप्रकरणी भुजबळांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे भुजबळांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रसमध्ये ते एकाकी असल्याचे दिसून येत आहे. तर विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर तसेच कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतही पक्षाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे सध्याच्या राजकारणात राज ठाकरे यांचीही अवस्था यथातथाच आहे. या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांची भेट होणे. व दोघांमध्ये तब्बल अडीच तास चर्चा होणे यामागे नक्कीच काहीतरी राजकारण रंगल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

प्रतिक्रिया
7 Dec 2015 - 10:02 am | अत्रन्गि पाउस
ती सदिच्छा भेट होती....
राज साहेबांच्या मातु:श्री आणि सौ भुजबळ ह्यांना भेटायचे होते ...आता त्या एकट्याच कशा जाणार ..सोबत श्रीयुत भुजबळ गेले असावेत आणि आता आलेच आहेत म्हटल्यावर कुणी बोलणार नाही का ?
बाकी अडीच तास म्हणजे ? २ स्त्रिया भेटल्यावर एवढा वेळ कमीच कि ...
21 Jan 2017 - 1:56 pm | सामान्यनागरिक
या मुद्द्याचे औचित्य संपले आहे. आता भुजबळ आणि राज ठाकरे दोघेही संपल्यात जमा आहेत. तेंव्हा हा धागा उडवावा.
21 Jan 2017 - 1:56 pm | सामान्यनागरिक
या मुद्द्याचे औचित्य संपले आहे. आता भुजबळ आणि राज ठाकरे दोघेही संपल्यात जमा आहेत. तेंव्हा हा धागा उडवावा.
21 Jan 2017 - 9:46 pm | पैसा
मला कळेना भुजबळ कधी सुटले.
5 Mar 2017 - 8:22 pm | सामान्यनागरिक
उडवा की हा धागा आता. आसपास दुर्गंधी सुटायला लागलीय .....
5 Mar 2017 - 9:50 pm | पैसा
ते उडवा बिडवायचे काम संपादक महाशयांचे.
6 Mar 2017 - 1:40 pm | गॅरी ट्रुमन
"Once a संपादक always a संपादक" असे माझ्यासकट अनेक मिपाकरांना वाटत असते त्याचे काय?
6 Mar 2017 - 1:57 pm | पैसा
नवी म्हण!
6 Mar 2017 - 4:30 pm | चौकटराजा
उडवायचे म्हणजे एक पेटी तरी लागणार . पैशाचे काम मग पैशाने नकार का द्यावा बरे ? :)
6 Mar 2017 - 4:40 pm | पैसा
=)) पेटी आणि खोके कुठे ठेवू?
11 Mar 2017 - 10:18 pm | टवाळ कार्टा
माझ्याकडे द्या पाठवून...सोबत काहीशे किलो काजूपण :ड
11 Mar 2017 - 10:29 pm | पैसा
तेवढं तिकडे उतरवून घे!