Skip to main content

कलेजी

लेखक जागु यांनी बुधवार, 02/12/2015 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः पाव किलो कलेजी २ मोठे कांदे चिरून ४-५ लसुण पाकळ्या ठेचून २ चमचे आल-लसुण पेस्ट अर्धा लिंबाचा रस (नसला तरी चालेल) पाव चमचा हिंग १ चमचा हळद २ चमचे मसाला किंवा १ चमचा लाल तिखट १ चमचा गरम मसाला २ मोठे चमचे तेल थोडीशी कोथिंबीर चिरून चवीनुसार मिठ पाककृती : प्रथम कलेजी कापून स्वच्छ धुवून घ्यावी. त्याला आल-लसुण पेस्ट आणि लिंबाचा रस लावून ठेवावा. भांड्यात तेल गरम करून त्यावर लसूण पाकळ्यांची फोडणी देऊन कांदा बदामी रंग येईपर्यंत तळावा. त्यात हिंग, हळद, मसाला घालून कलेजी परतवावी. आता भांड्यावर झाकण ठेवून त्यावर पाणी ठेऊन वाफेवर मिडीयम गॅसवर कलेजी शिजू द्यावी. मधून मधून परतावी. शिजल्यावर मिठ व गरम मसाला व कोथिंबीर घालून पुन्हा एक वाफ येऊ द्यावी व परतवून गॅस बंद करावा. झाली कलेजी तय्यार.

वाचने 9570
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

आहा ! तोंडाला पाणी सुटले हे फोटो पाहुन . मस्तच पाककृती जागु !

नॉनव्हेज (कधीमधी) खात असलो तरी अजून "कलेजी" खायचं "काळीज" झालेलं नाहिये. सो आपला पास...