आयुष्याच्या क्षितीजावर दूर गेलेल्या आठवणीचं आभाळ मनात दाटतयं,
"आतातरी परत ये खरं सांगतो" तुझ्याशिवाय फार एकट एकट वाटतयं
आठवतयं तुला................
दररोज सांजवेळी खिडकीत उभी राहुन माझी वाट बघायचीच तु,
परतण्यास अमळंसा उशीर झाला तरी खोटं खोटं रुसायचीच तु,
मात्र आता माझ्यासोबत हे खुळावलेलं घरटंही तुझीच वाट बघतयं,
"आतातरी परत ये खरं सांगतो" तुझ्याशिवाय फार एकट एकट वाटतयं
माहितीय मला..............
तुझ्या एका आठवणीवर सवडीने मुक्त बरसायचा तो,
घेउनी कवेत तुला अंगाअंगावर धुंद निथळायचा तो,
आज आता तुझ्यासोबत पुन्हा अगदी तसचं भिजावस वाटतयं,
"आतातरी परत ये खरं सांगतो" तुझ्याशिवाय फार एकट एकट वाटतयं.................
उमगत नाही...........
गेले कित्येक वसंत दारातला गुलमोहर आता ठरवून ही बहरत नाही
तुझ्या स्पर्शास पारखा पारिजात प्रितीचा सडा अंगणी शिंपडीत नाही
समोरच्या ढोलीतलं राघूच जोडप मात्र आपलं उगीचच हळहळतयं,
"आतातरी परत ये खरं सांगतो" तुझ्याशिवाय फार एकट एकट वाटतयं...................
समजावतो मी.....................
मनास माझ्या आता नाही येणे तुझे उभे आयुष्य सरले जरी,
नाही कळणार तुला माझी घुसमट माझा श्वास विरला तरी,
निराशेनं उचललेले हरएक पाउल, एका वेड्या आशेवर मागं हटतयं,
"आतातरी परत ये खरं सांगतो" तुझ्याशिवाय फार एकट एकट वाटतयं....................
प्रतिक्रिया
26 Nov 2015 - 11:45 pm | अभ्या..
लैच ब्येक्कार लिव्हतुयास मर्दा.
च्यायला. असलं आम्हाला कधीच जमणार नाही.
.
लिहित राहा रे. भारी आहे सगळं.
26 Nov 2015 - 11:52 pm | बाबा योगिराज
तेच म्हंतोय....
28 Nov 2015 - 9:23 pm | एक एकटा एकटाच
तुमची "वायला" अजुनही डोक्यात पिंगा घालतेय.
26 Nov 2015 - 11:51 pm | बाबा योगिराज
लै म्हणजे लगे लैच भेष्ट....
27 Nov 2015 - 3:42 pm | पद्मावति
केवळ अप्रतिम!!!
27 Nov 2015 - 3:53 pm | सूड
जमली आहे.
27 Nov 2015 - 6:15 pm | शिव कन्या
काय तल्खी आहे!
28 Nov 2015 - 9:16 pm | एक एकटा एकटाच
तल्खी
नविन शब्द सुचवल्याबद्दल
28 Nov 2015 - 12:02 pm | पालीचा खंडोबा १
सुरेख
28 Nov 2015 - 12:48 pm | कविता१९७८
मस्त
28 Nov 2015 - 12:55 pm | रातराणी
छानच!
28 Nov 2015 - 2:33 pm | सस्नेह
उदास .. :)
28 Nov 2015 - 2:33 pm | चाणक्य
आर्तता सहीसही उतरलीये अगदी.
28 Nov 2015 - 9:15 pm | एक एकटा एकटाच
सगळ्यांचे मनपुर्वक आभार
28 Nov 2015 - 9:17 pm | मांत्रिक
वाईट आहे!!! या लेखनातील विरहाची भावना!!!
खतरा ताकदीनं लिहिलंय!!! आवडलं!!!