ये तारा वो तारा हर तारा…
देखो जिसे भी लगे प्यारा
ये सब हो साथ मे,
तो जगमगाया आसमां सारा!
जगमग तारे, दो तारे,
नौ तारे, सौ तारे,
हर तारा ही शरारा…
ये तारा वो तारा...
अन्वयाला (माझी मुलगी) ऐकवत होतो हे स्वदेस मधलं गाणं...
शहारे आले ऐकून आणि बघून ही!
त्यात एक पडदा आहे ज्याच्या समोर शारुख नाचत असतो, तोच ज्यावर चित्रपट दाखवतात तो, २ बाजुनी एकच चित्र, पण एक 'मिरर-इमेज' वालं! त्याचवेळी चटकन एक आठवलं, अगदी तसाच प्रकार, लहानपणी गावातल्या शाळेत… सगळे जमायचे, चिंटर-पिंटर पासून आज्या-आजोबा! जमिनीवर सारवलेल्या शेणाचे तुकडे तोडत, कितीही झोप आलेली असताना, एकही सीन वाया न घालवता शेवटपर्यंत! कोणी शाल ओढून कोणी जैकेट अडकवुन! सुंदर चांदण्याचा प्रकाश, गावातल्या शाळेच्या आवारात, अर्धे ओळखीचे-अर्धे अनोळखी... पण काही दमदार / हास्यास्पद सीन घडला की जन्मोजन्मांतरी ओळख असल्यासारखी टाळी / दाद द्यायचे! खुप अप्रूप असायचं, आता घरोघरी टीव्ही झालेत, तेव्हा १०घरांपैकी २घरांकडे ब्लैकएंडव्हाइट आणि एकाकडे कलर टीव्ही असे, आणि असे सार्वजनिक चित्रपट वर्षातून एक-दोंदाच!
हे असे मी सारखे सारखे भुतकाळात का जातो! वर्तमान काही वाइट नाहीये! भूतकाळात पंख नव्हते, तरी उडायचो! आता पंख आलेत... पण त्याबरोबर जवाबदारी पण 'फ्री' आल्ये, मजा येते अजुनही उडायला... पण तेव्हाचं उडणं बंधनं नसलेलं, काही चुका झाल्या तर समजून घ्यायला मायाळू आकाश होते, जोरात पडलो तर कठोर जमीन तेवढ्या पुरती गादीत 'कन्व्हर्ट' व्हायची! अंगणाला कुंपण जरी असले तरी पलीकडचे अंगण नेहमी स्वागतच करत असे! आपल्या सारख्या सामान्य माणसांसाठी आकाशात तारे अजूनही तितकेच असतील, जीतके आपल्या लहानपणी पाहिलेले, पण आता आपण आभाळाकडे पहायला कमी लागलोय!
द्वेष वर्तमानाचा नाही आणि दोष भूतकाळाचा नाही! वेळ कोणासाठी थांबत नाही पण वेळोवेळी मी त्या वेळेत अडकतो जी वेळ निघून गेलेली असते! थोडसं खेळून येतो परत… तेव्हढा नशीबवान आहे अजूनही!
#सशुश्रीके
प्रतिक्रिया
15 Nov 2015 - 1:48 pm | बाबा योगिराज
मस्त लिहिता तुम्ही.
पुलेशु.
15 Nov 2015 - 2:33 pm | पद्मावति
मस्तं लिहिलंय..
....क्या बात है!! सुपर्ब.
16 Nov 2015 - 3:53 pm | बोका-ए-आझम
आवडले!
3 Feb 2016 - 8:31 pm | मयुरMK
मी पण !!!!
3 Feb 2016 - 8:39 pm | सूड
सुंदर लिहीलंत, मी पण मिनीटभर भूतकाळात एक फेरी मारुन आलो.
3 Feb 2016 - 8:59 pm | यशोधरा
आवडलं.