नमस्कार मंडळी,
सर्वांना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा. हि दिवाळी तुम्हा सगळ्यांना आनंदाची, सुख-समृद्धीची, उत्तम आरोग्याची आणि भरभराटीची जावो.
तर मंडळी दिवाळी किंवा कुठल्याही आनंदाच्या क्षणी खालील झटपट चॉकलेट्स बनवा आणि आपल्या प्रियजनांसोबत त्यांचा आनंद लूटा, भेट द्या. फार कमी साहित्य वापरुन हि यम्मी चॉकलेट्स बनतात.
वेल खालील साहित्याचं प्रमाण हे ४०-४५ खजूर ह्या प्रमाणात घेतलेत. तुम्ही ते तुमच्या अंदाजाने कमी/जास्त करू शकता.
साहित्यः
१. खजूर - ४५
२. व्हाईट चॉकलेट कंपाउंड - पाव कि.
३. स्टफिंग साठि - बदामाचे काप, मनुका, काजू किंवा तूम्हाला आवडतील ते ड्राय नट्स
४. टॉपींग साठी - तीळ, डेसीकेटेड कोकोनट, पिस्ता पावडर
कॄती:
१. खजूराच्या आतील बीया काढून नट्स स्टफ करुन घ्या. सर्व खजूर भरुन झाले कि खजूर फ्रिज मधे थोड्या वेळ सेट होण्यासाठि ठेवा
२. खजूर सेट होत आहेत तोपर्यंत तीळ आणि डेसीकेटेड कोकोनट ड्राय रोस्ट करुन गार होण्यास ठेवा
३. गार झालं कि वेगवेगळ्या बाउल मधे काढुन टॉपींग रेडी ठेवा. मी टॉपींग साठि अनुक्रमे भाजलेले खोबरं, तीळ, पिस्ता पावडर आणि चौथ्या बाउल मधे ह्या तिघांचं मिश्रण घेतलयं
४. ट्रे मधे बटर किंवा बार्चमेंट पेपर पसरवून ठेवा. हि सगळी तयारी झाली कि व्हाईट चॉकलेट बारीक चीरुन किंवा किसून ड्बल बॉयलर किंवा मायक्रोव्हेव मधे मेल्ट करुन घ्या
५. आता पुढील स्टेप्स ह्या झटपट करायच्या आहेत (चॉकलेट सेट होण्याच्या आत). सेट झालेले खजूर चॉकलेट मधे डिप करुन दोन फोर्क च्या सहायाने ट्रे मधे ठेवा. वरुन आवडत असलेल्या टॉपींग नी कोट करा. फोर्क नी उचलल्यावर अतिरि़क्त चॉकलेट ड्रॉप होईल
६. सर्व चॉकलेट कोट झाले की फ्रिज मधे सेट होण्यास ठेवून द्या. पुर्ण सेट झाले की चॉकलेट्स आपोआप सुटतील
७. आकर्षक वेष्टनात, डब्यात किंवा गिफ्ट बॉक्स मधे भरुन प्रिय व्यक्तीस दिवाळी भेट द्या. हि खास भेट सगळ्या मिपाकरांस...
टीपा:
१. कट टू कट परीस्थीती फार थोड्या वेळा येते. म्हणजे सगळे खजूर पण कोट झालेत आणि चॉकलेट सॉस पण उरला नाहिये. पण जर उरलाच (ज्याची दाट शक्यता असते) तर एका बटर पेपर वर उरलेलं चॉकलेट घाला. वरुन शील्लक राहीलेली टॉपींग एक एक करुन घाला. हलक्या हाताने प्रेस करुन फ्रिज मधे सेट होण्यास ठेवा. सेट झालं की हव्या त्या आकारात कापून चॉकलेट बार किंवा वड्यांचा लुफ्त घ्या.
२. चॉकलेट डब्यात घालून देणार असाल तर तळाशी आणि गोलाकार बटर पेपर घाला जेणेकरुन चॉकलेट्स डब्याला चिकटणार नाहित.
३. खजूर कोट करताना पाणी उकळलेलं भांड खालीच ठेवा जेणेकरुन चॉकलेट सतत लिक्वीड फॉर्म मधेच राहील.
४. व्हाईट चॉकलेट एवजी आवडत असल्यास डार्क चॉकलेट कंपाउंडहि वापरु शकता. फार पेशन्स असतील तर खजूर अर्ध्या व्हाईट आणि अर्ध्या डार्क चॉकलेटनी कोट करु शकता. पण प्रेझेंटेशनच्या दृष्टीने हे असं कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बो छान दिसतं. म्हणूनच तीळ आणि खोबरं पण हलकं लालसर भाजून घेतलय.
हॅप्पी दिवाली टू ऑल ऑफ यू!!!
वाचने
10196
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
आहा, मस्तं पाककृती.
यम्मी.....
मस्त .......
वाह मस्त दिसत आहेत चॉकलेट्स.
पुढच्या वेळी बनवून आणावे
वाह! वाह! झक्कास दिसतायेत
वावा..
अफाट कलाकृति. ऐन दिवाळीत
पाकृ साठी धन्यवाद.....
मी पण येणार
In reply to पाकृ साठी धन्यवाद..... by मुक्त विहारि
मी पण येणार
In reply to पाकृ साठी धन्यवाद..... by मुक्त विहारि
तुमच्याशिवाय डोंबोली परिसरात कट्टा करण्याची आमची हिंमत नाही....
In reply to मी पण येणार by सुबोध खरे
अरे जरुर मुवि
In reply to पाकृ साठी धन्यवाद..... by मुक्त विहारि
अगदी आत्ताच असा खजूर खात होते
हो हो हे नक्की जमेल मला ! इथे
सुंदर आणि पौष्टीक
चव झक्कास असणार , शिवाय
स्लर्पsssssssssssssssss
भारी!
काय देखणा फोटो आहे. मस्तच.
ओह ती जर्मन भाषा आहे का?
In reply to काय देखणा फोटो आहे. मस्तच. by मधुरा देशपांडे
या दीपक साहेब!
क्या बात क्या बात !! कल्पक
क्या बात !
(No subject)
धन्यवाद मंडळी
मस्तच!
खी खी खी
In reply to मस्तच! by पैसा