कट्यार पुन्हा काळजात घुसली

नितीनचंद्र's picture
नितीनचंद्र in जनातलं, मनातलं
2 Nov 2015 - 3:06 pm

पुरुषोत्तम दारव्हेकर लिखीत आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच संगीत असलेली संगीत नाटक कट्यार एक अजरामर नाटक आहे. डॉ. वसंतराव देशपांडे, नुकतेच निवर्तलेले पं. पदमाकर कुलकर्णी तसेच नव्या पिढीतील तीन दमदार गायक डॉ रविंद्र घांगुर्डे, चारुदत्त आफ़ळे आणि वसंतराव देशपांडे यांचा वारसा घेऊन आलेले राहुल देशपांडे यांनी खासाहेबांची भुमिका करुन हे नाटक पुन्हा पुन्हा रंगमंचावर आणले. या नाटकाला प्रत्येक पिढीचा वारसा आणि नविन पिढीतल्या चाहत्यांचा उत्साह हे नाटक नव्याने सादर करायला भाग पाडतो आहे.

जसे विविध गद्य नाटकातले कलाकार एकदा नटसम्राट करायला मिळाले म्हणजे नट म्हणुन एक मानाचा शिरपेच मिळतो या भावनेने ही भुमिका करतात तसे संगीत नाट्यप्रकारात अनेक नाटकांपैकी हे एक नाटक करायला मिळाले म्हणजे सुध्दा शिरपेच अशीच भावना किमान या नव्या पिढीच्या गायकांमध्ये असावी.

वसंतरावांच्या गायकीने वेड लावलेले अनेक गायक/श्रोते महाराष्ट्रात आहेत. ज्यांनी स्वत: वसंतराव देशपांडे यांच्या कडुन संगीताचे धडे घेतलेले पं. पदमाकर कुलकर्णी आणि त्यांचे शिष्य डॉ. रविंद्र घांगुर्डे यांना वसंतरावांनी गाजवलेली खासाहेबांची भुमिका करायचे मनात येणे नवल नाही. राहुल तर हीच सर्व गाणी ऐकत आणि कट्यार निर्मीतीच्या कथा ऐकत लहानाचा मोठा झाला असेल. आपल्या वडीलांकडुन किर्तनाचे धडे घेतलेला आणि किर्तन करणारा चारुदत्तला ही भुमिका करण्याची प्रेरणा कशी मिळाली हे त्यांच्याकडुन कधी काळी ऐकायला आवडेल.

मागच्याच वर्षी पंडीत पदमाकरजी हयात असताना मी त्यांना तुमच्या कडुन कट्यार बद्दल ऐकायचे आहे असे सांगताच पंडीतजी खुलले होते. हे सर्व व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा माझा मानस तसाच विरला. खर तर मला प्रत्येक खासाहेबांकडुन कट्यार चे काय गारुड आहे हे जाणण्याचा संकल्प होता पैकी पंडीत पदमाकरजींच्या जाण्याने ह्यातला काही भाग रेकॉर्डवर येण्याआधीच पुसला गेला.

पंडितजींच्या जाण्याने झालेला विरस सुबोध भावेंच्या नव्या सिनेमाच्या घोषणेने कमी झाला आहे. एखाद्या कथेला नाटकात नेपथ्याच्या मर्यादा येतात. राजे- रजवाडे असलेल्या कालवधीतली ही कथा राजगायकाचा महाल आणि छोट्या सदाशिवा बरोबर एका जुन्या शिव मंदीरात पंडीतजींचा रियाझ या दोनच सेटवर अडकुन पडते. किंबहुना नाटक म्हणुनच लिहायला घेतले असेल तर दारव्हेकरांना ते प्रसंग त्या मर्यादेतच लिहावे लागले असतील.

कट्यार च्या कथेवर येऊ घातलेल्या सिनेमाचे पहिले गाणे येऊन थडकल्यावर " सुर निरागस हो" हे गाणे आणि त्याचे चित्रीकरण नाट्यरुपांतरामुळे असलेल्या मर्यादा संपवुन एका नव्या भव्य आकृतीबंधात बांधले जाईल यात शंकाच नाही.

एक पिढी होती ज्यात जुन्या कथा चित्रपटात बांधुन त्याच्या भव्यतेसहीत पडद्यावर साकारत. हे निर्माते फ़क्त हिंदीतच सिनेमे करत. जुन्या पिढीत मुगले आझम असुदे किंवा त्यांचा कित्ता गिरवणारा संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा असुदेत. केलेला खर्च आणि उत्पन्न याचा मेळ घालण्यासाठी मराठी माध्यम अपुरे पडत असावे. यातुन एक काळ असा गेला ज्यात मराठी सिनेमा नव्या कल्पना नसलेल्या निर्मीतीच्या गर्तेत अनेक वर्ष अडकल्याने आपली हिंमत आणि वारसा आणि प्रेक्षक वर्ग ही हरवुन बसला होता.

नजीकच्या मराठी सिनेमात अनेक प्रयोग झाल्यामुळे आणि लोकांना भावल्यामुळे मला मराठी सिनेमा करायचा आहे असे अमिरखान सारखे निर्माते तर रजनिकांत सारखे सुपरस्टार जाहीर रित्या म्हणुन लागले आहेत. ही नांदी मराठी सिनेमाला सुवर्णकाळ येईल की काय अश्या काळाची आहे. या पार्श्वभुमीवर कोर्ट या मराठी सिनेमाला कोणत्याही प्रसिध्द स्टार कास्ट शिवाय ऑस्कर पुरस्काराला नॉमिनेशन होणे हा सुध्दा एक चांगला योग मानायला हरकत नाही.

कट्यारची कथा आता भव्य स्वरुपात पडद्यावर झळकेल ज्यात सचिन पिळगावकर खासाहेबांची तर पंडीतजींची भुमिका शंकर महादेवन रंगवणार आहेत. या सिनेमातले सेट डिझाइन रवी जाधव यांचे आहे तसेच आर्ट डायरेक्टर म्हणुन सुध्दा काम करत आहेत. रवी जाधव यांच्या सेट डिझाइनची झलक " सुर निरागस हो" या राजवड्यातल्या गणेश उत्सवाच्या भागाचे चित्रकरणासहीत चाहत्यांच्या समोर आल्याने कट्यारला काही नविन अ‍ॅगलमधे नुसते ऐकायला नाही तर पहायला मिळणार ही एक आनंदाची गोष्ट आहे.

शंकर महादेवनला या निमीत्ताने मराठी सिनेमात पहाणे आणि ऐकणे सुध्दा आगळाच आनंद देईल. मध्यंतरी राहुल देशपांडे आणि शंकर महादेवन यांनी काही गायन एकत्रीत केल्याचे दुरदर्शनवर केल्याचे पाहिले होते. त्यामागे असा काही संकल्प असेल याची कल्पना आली नव्हती.
या चित्रपटाला शंकर- एहसान -लॉय यांचे संगीत आहे. या त्रिकुटाने काही सिनेमांना हटके संगीत दिले होते. चाहत्यांना हवी असलेली नाट्य संगीताची तहान या सिनेमाच्या संगीताने भागवली जाते की संगीत नाटकाचे सिनेमात रुपांतर होताना काही वेगळ्या संगीत संकल्पना पुढे येतात हे पहाण्याचे बाकी आहे.

सुबोध भावे पुन्हा नाटकाप्रमाणे कविराज बाके बिहारींचीच भुमिका रंगवणार असे वाटत होते पण टीझर त्यांना सदाशीवाच्या रुपात आणतोय तर कविराज बाके बिहारी बहुतेक दुसराच प्रसिध्द नट रंगवणार असे दिसत आहे. उमेची भुमीका मृण्मयी देशपांडे तर खासाहेबांच्या मुलीची भुमिका अमृता खाडीलकर करणार असे दिसत आहे. गायकांची नावे या प्रमोत आलेली नाहीत. सचिन पिळगावकर गात असले तरी खासाहेबांची गायकी दुसराच पार्श्वगायकाला करावी लागणार यात शंका नाही. गायकांच्या यादीत फ़क्त शंकरचे नाव आत्ता दिसते आहे. प्रत्यक्षात ही गाणी राहुल की अजुन कोणी हे समजायला सिनेमाच प्रदर्शीत होण्याची वाट पहावी लागणार आहे.

download (1).jpg

सुबोध भावे यांनी कट्यारचे नाट्यप्रयोग केले आहेत ज्यात राहुल देशपांडे खासाहेब भुमीका करतात. या पार्श्वभुमीवर आणि दुरदर्शनवरची ती जुगलबंदी ऐकल्यावर एका गोष्ट जी कथेच्या मुळ रुपात बदल करुन येईल असे वाटते ती म्हणजे खासाहेब आणि पंडीतजींची दसरा दरबारातली जुगलबंदी. असे घडले तर कथेच्या मुळ स्वरुपात नसलेली एक गोष्ट जी चित्रपट पहाण्याला एक कारण मिळवुन देईल.

असे प्रयोग चित्रपट पुन्हा निर्माण करताना करावेच लागतात. संजय लीला भन्साळींचा देवदास पुन्हा पहाताना " डोला रे डोला रे " या गाण्यात माधुरी आणि ऐश्वर्या यांना एका फ़्रेम मधे आणण्याचा प्रयोग करावा लागला होता तोच प्रयत्न या निमीत्ताने होईल अशी एक आशा माझ्या मनात आहे. अन्यथा खासाहेब आणि पंडीतजी यांचा सामना झाला आणि पंडीतजी न गाताचा उठुन गेले ही मुळची कथा काहीशी चाहत्यांच्या अपेक्षा अपुर्ण ठेवणारी होती.
images.jpg

कथेत बदल होणार म्हणजे नाट्य प्रयोगाचे अस्तित्व अबाधीत ठेऊन नविन गाणी येणार हे " सुर निरागस हो" या निमीत्ताने जाणवले. यातुन कट्यारचे वैभव वाढणार अशी आशा बाळगायला हरकत नाही. मराठी प्रेक्शकांनी जसा बालगंधर्व हा सिनेमा डोक्यावर घेतला तसा नव्या स्वरुपातली नाट्य प्रयोग चित्रपटाच्या स्वरुपात मराठी सिनेमाला उंची मिळवुन देऊन एक नवा इतिहास घडवतो का हे समजायला फ़ारसा अवधी राहीलेला नाही. दिवाळीतच हा सिनेमा रिलीझ होऊन दिवाळीचा आनंद अनेक पटीने वाढवायला आपल्या समोर येतो आहे.

चित्रपटशुभेच्छा

प्रतिक्रिया

आदिजोशी's picture

3 Nov 2015 - 2:51 pm | आदिजोशी

घेई छंदची जुगलबंदी बघितली आत्ताच.
आपण सिनेमात गायकाची भुमीका करत आहोत हे विसरून महागुरू प्लेबॅकवर नॄत्य करत असल्यासारखे वाटले. देवा काय काय दाखवणार आहेस ह्या जन्मात अजून?????

बॅटमॅन's picture

3 Nov 2015 - 3:52 pm | बॅटमॅन

म्हाग्रवे णमो णमः =)) =)) =))

योगी९००'s picture

3 Nov 2015 - 8:25 pm | योगी९००

आपण सिनेमात गायकाची भुमीका करत आहोत हे विसरून महागुरू प्लेबॅकवर नॄत्य करत असल्यासारखे वाटले.

माफ करा.. मला तसे नाही वाटले. कदाचित त्या भुमिकेची गरज असावी म्हणून खांसाहेबांनी तसली अ‍ॅक्टींग केली असावी असे वाटले. पंडीतजींपेक्षा आपण चांगले गायक आहोत हे सिद्द करण्यासाठी थोडी ओवरअ‍ॅक्टींग जरूरी होती असे वाटले ते सचिनने नॅचरली केले आहे.

बाकी चित्रपट बघणेबल आणि ऐकणेबल असणार हे निश्चित..

योगी९००'s picture

3 Nov 2015 - 9:13 pm | योगी९००

आधी बघितलाय हा व्हिडीओ..अप्रतिम एवढेच म्हणतो. यांच्या तुलनेत सचिन कोठेच नाही.

पण एक गोष्ट मात्र की पं. लिमये स्वत: गात आहेत आणि सचिन त्या गाण्यावर अ‍ॅक्टींग करत आहेत त्यामुळे फरक हा असणारच..( मी काही सचिनचा फॅन नाही पण उगाचच झोडपलेले आवडत नाही... पुर्णपिक्चर पाहून सांगतो.)

प्रभाकर पेठकर's picture

3 Nov 2015 - 9:12 pm | प्रभाकर पेठकर

ही दोन गायकीच्या घराण्यातील जुगलबंदी आहे असे वाचले आहे. (संगितातील मला फार कमी ज्ञान आहे)
खाँसाहेबांचे व्यक्तिमत्व आक्रमक आहे आणि अशा व्यक्तिमत्वाला साजेसे त्यांचे शारीरीक हावभाव सुद्धा आक्रमक असणं नैसर्गिक असणार.
त्यांच्या संवादातूनही ते हेच दाखवितात. त्या हवेलीत आल्यावर तिथे असणारे 'मवाळ हळवे सुर जाऊ द्यात' (ह्या भवनातील गीत पुराणे) असे म्हणतात शिवाय ह्या 'घेई छंद मकरंद' गाण्याबाबतीतही ते म्हणतात 'गाण्याला चाल कशी नागिणी सारखी सळसळती असावी. विद्युलते सारखी चपळ असावी' आणि 'घेई छंद'ची द्रुत चाल ते नागिणीच्या आक्रमतेने पेश करतात. मला वाटते, त्यांच्या स्वभावाला साजेसे हावभाव ती भूमिका करणार्‍या सचिन ह्यांच्या कडून दिग्दर्शकाने (सुबोध भावे?) करुन घेतली आहे. जरा ब्रॉड अ‍ॅक्टींग आहे पण ते भूमिकेला साजेसे आहे.

योगी९००'s picture

3 Nov 2015 - 10:11 pm | योगी९००

+१

मला जे म्हणायचे आहे ते नेमक्या शब्दात व्यक्त केलेत..

योगी९००'s picture

3 Nov 2015 - 10:11 pm | योगी९००

+१

मला जे म्हणायचे आहे ते नेमक्या शब्दात व्यक्त केलेत..

प्रभाकर पेठकर's picture

3 Nov 2015 - 9:24 pm | प्रभाकर पेठकर

ही दोन गायकीच्या घराण्यातील जुगलबंदी आहे असे वाचले आहे. (संगितातील मला फार कमी ज्ञान आहे)
खाँसाहेबांचे व्यक्तिमत्व आक्रमक आहे आणि अशा व्यक्तिमत्वाला साजेसे त्यांचे शारीरीक हावभाव सुद्धा आक्रमक असणं नैसर्गिक असणार.
त्यांच्या संवादातूनही ते हेच दाखवितात. त्या हवेलीत आल्यावर तिथे असणारे 'मवाळ हळवे सुर जाऊ द्यात' (ह्या भवनातील गीत पुराणे) असे म्हणतात शिवाय ह्या 'घेई छंद मकरंद' गाण्याबाबतीतही ते म्हणतात 'गाण्याला चाल कशी नागिणी सारखी सळसळती असावी. विद्युलते सारखी चपळ असावी' आणि 'घेई छंद'ची द्रुत चाल ते नागिणीच्या आक्रमतेने पेश करतात. मला वाटते, त्यांच्या स्वभावाला साजेसे हावभाव ती भूमिका करणार्‍या सचिन ह्यांच्या कडून दिग्दर्शकाने (सुबोध भावे?) करुन घेतली आहे. जरा ब्रॉड अ‍ॅक्टींग आहे पण ते भूमिकेला साजेसे आहे.

काका, तुम्ही म्हणल्याप्रमाणे अभिनयात दिग्दर्शकाचाही वाटा आहेच. जर प्रत्यक्ष चित्रपटात अभिनय रुचला नाही तर त्याचा २५% वाटा तरी दिग्दर्शकाच्या पदरात घालणे भाग आहे.
आतापर्यंतच्या चित्रफीतींवरून तरी खानसाहेबांचे आक्रमक हावभाव हे उधोजीराजांसारखे अधिक वाटतात, बालासाहेबांसारखे नाही. (उसने अवसान)

सुमीत भातखंडे's picture

3 Nov 2015 - 3:48 pm | सुमीत भातखंडे

नसीरुद्दीन शाह कसे वाटले असते खाँ साहेबांच्या भुमिकेत? मला वाटतं जास्त चांगल्या प्रकारे न्याय मिळाला असता कॅरॅक्टरला

बॅटमॅन's picture

3 Nov 2015 - 3:52 pm | बॅटमॅन

यग्जाक्टली.

नाखु's picture

4 Nov 2015 - 8:44 am | नाखु

सरफरोश मध्ये गायकाचा तोरा-सल-चीड आणि अगतिकता सारं अभिनयाने दाखवलं आहेच.

तसही मराठीत देऊळ मध्ये अगदी हजेरी लावण्याचा प्रमाद दिग्दर्शकानेच करवून आणला आहे.

काकासाहेब केंजळे's picture

5 Nov 2015 - 9:56 pm | काकासाहेब केंजळे

नसीरुद्दीन शाह कसे वाटले असते खाँ साहेबांच्या भुमिकेत?
मला वाटतं जास्त चांगल्या प्रकारे न्याय मिळाला असता
कॅरॅक्टरला

नसरुद्दीन शाह काय???????? उद्या म्हणाल सिन कॉनरीसुद्धा चालेल!
नसरुद्दीन शाहला मराठी येते का नीट? माझं वैयक्तिक मत असे आहे की राहुल देशपांडेच शोभला असता, खच्चून मेक अप केला असता तरी चालले असते, कट्यारचा मध्यंतरी झी वर प्रयोग बघीतला ,त्यात छान ॲक्टींग केली त्याने,अगदी खाँ साहेब वाटत होता.

काकासाहेब केंजळे's picture

5 Nov 2015 - 9:59 pm | काकासाहेब केंजळे

नसीरुद्दीन शाह कसे वाटले असते खाँ साहेबांच्या भुमिकेत?
मला वाटतं जास्त चांगल्या प्रकारे न्याय मिळाला असता
कॅरॅक्टरला

नसरुद्दीन शाह काय???????? उद्या म्हणाल सिन कॉनरीसुद्धा चालेल!
नसरुद्दीन शाहला मराठी येते का नीट? माझं वैयक्तिक मत असे आहे की राहुल देशपांडेच शोभला असता, खच्चून मेक अप केला असता तरी चालले असते, कट्यारचा मध्यंतरी झी वर प्रयोग बघीतला ,त्यात छान ॲक्टींग केली त्याने,अगदी खाँ साहेब वाटत होता.

काकासाहेब केंजळे's picture

5 Nov 2015 - 10:01 pm | काकासाहेब केंजळे

नसीरुद्दीन शाह कसे वाटले असते खाँ साहेबांच्या भुमिकेत?
मला वाटतं जास्त चांगल्या प्रकारे न्याय मिळाला असता
कॅरॅक्टरला

नसरुद्दीन शाह काय???????? उद्या म्हणाल सिन कॉनरीसुद्धा चालेल!
नसरुद्दीन शाहला मराठी येते का नीट? माझं वैयक्तिक मत असे आहे की राहुल देशपांडेच शोभला असता, खच्चून मेक अप केला असता तरी चालले असते, कट्यारचा मध्यंतरी झी वर प्रयोग बघीतला ,त्यात छान ॲक्टींग केली त्याने,अगदी खाँ साहेब वाटत होता.

म्हागुरू खाँसाहेबांच्या भूमिकेत असणे मलाही जरा कसेतरी वाटतेय तरीही जालावर आल्यावर सिनेमा लग्गेच पाहणार.

मोगा's picture

4 Nov 2015 - 7:03 am | मोगा

दुसर्‍आ टेलरमध्ये सचिन चांगला वाटला

प्यारे१'s picture

4 Nov 2015 - 2:58 pm | प्यारे१

मनाच्या पाटीवर असलेल्या महागुरुंच्या ओरखड्यांशिवाय गाणं पाहिल्यास कोणतीही त्रुटी मजला दिसून आली नाही

नितीनचंद्र's picture

4 Nov 2015 - 3:54 pm | नितीनचंद्र

मायबोली आणि मिपावर प्रतिक्रिया सारख्याच आहेत. कदाचीत तेच प्रतिसादकर्ते दोन्ही कडे असु शकतील. ५० वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे असे म्हणणार्या सचीन यांचे स्व्तः च्या अभिनयाने गाजलेले सिनेमे जवळ जवळ नाहीत. मराठीत सुध्दा अशोक सराफ यांना जवळ करुनच त्यांनी बहुतेक सिनेमे काढले. स्वतःच निर्माता असल्यामुळे झालेली करीयर अस अनेकांच मत आहे. महागुरु पद यामुळे अनेक प्रेकक्षांची नाराजी आहे हे आत्ताच समजते आहे. बरेच वेळा पुर्वग्रह अशी मते बनविण्यास कारणीभुत असला तरी अशी मते का बनतात याकडे ही लक्ष जातेच.

पगला गजोधर's picture

4 Nov 2015 - 4:55 pm | पगला गजोधर

५० वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे असे म्हणणार्या सचीन यांचे स्व्तः च्या अभिनयाने गाजलेले सिनेमे जवळ जवळ नाहीत. मराठीत सुध्दा अशोक सराफ यांना जवळ करुनच त्यांनी बहुतेक सिनेमे काढले. स्वतःच निर्माता असल्यामुळे झालेली करीयर अस अनेकांच मत आहे.

सर, निर्माता ची जबाबदारी हि जास्त मोठी (नफा नुकसानीचा फटका शी संबंध), सचिन ने निर्मिती बरोबरच दिग्दर्शन, पटकथा वैगरे बाजू हि पाहिल्या, एकाहून ऐक चित्रपट केले, अशोक सराफ फार आधी पासून चित्रपटात होते, पण त्यांच्यातल्या टयालेंटचा जास्त चांगला वापर सचिन ने करवून घेतला (दिग्दर्शक म्हणून ...लक्षात राहू दे .. दिग्दर्शन हि खायची गोष्ट नाही… दिग्दर्शकाला चित्रपटरुपी जहाजाचा कप्तान म्हणतात ), अशोक सराफ सुपरस्टार सचिन च्याच चित्रपट मार्गे झाले (अर्थात अशोक सराफांचे अभिनयाचे टयालेंट त्यांना पूरक ठरले)
सचिन, अशोक सराफांएवढे अभिनयात सरस नसतील हि (जसे अशोक सराफ निर्मिती दिग्दर्शन पटकथा च्या बाबतीत सचिन एवढे सरस नसावे, माझ्या मताप्रमाणे), पण सचिनचा अभिनयाचा दर्जाही चांगला आहे.

प्रभाकर पेठकर's picture

4 Nov 2015 - 8:28 pm | प्रभाकर पेठकर

सचिन त्याच्या बालीश चेहर्‍यामुळे आणि तोकड्या उंचीमुळे मागे पडला असे मला वाटते. त्याला जर तगडी पर्सोनॅलीटी असती तर कदाचित तो अजून पुढे गेला असता. सर्व नायिका जर त्याच्या पेक्षा उंच असतील आणि तो एक १६ -१७ वर्षाचा मुलगा दिसत असेल तर प्राण, प्रेम चोपरा, शत्रूघ्न सिन्हा, अजित सारख्या खलनायकांना धोपटून काढतो आहे हे चित्र प्रेक्षकांनी स्विकारणे अवघड आहे त्यामुळे कोणी निर्माता/दिग्दर्शकाने त्याचा 'हिरो' म्हणून विचार केला नसावा. आणि ह्या उणीवेची त्यालाही जाणिव असल्याकारणाने त्याने स्वतःही व्यावसायिक हिन्दी चित्रपण निर्मिती करून आपले घोडे पुढे दामटण्याचे टाळले असावे.
दिग्दर्शन, अभिनय, निर्मिती, नृत्य ह्या शिवाय गाण्याची कलाही त्याला अवगत आहे. आशा भोसलें ह्यांच्या बरोबर आख्खा ३ तासांचा कार्यक्रम त्याने केला आहे. आणि आशा भोसले त्याला आपल्या बरोबर गाण्यासाठी घेतात म्हणजे त्याच्या जवळ नक्कीत गाण्याचे चांगलेच टॅलेन्ट आहे.

याॅर्कर's picture

4 Nov 2015 - 10:47 pm | याॅर्कर

उंची हा एक फक्त फॅक्टर आहे,अडथळा नाही

प्रभाकर पेठकर's picture

4 Nov 2015 - 8:53 pm | प्रभाकर पेठकर

अशोक सराफ फार आधी पासून चित्रपटात होते

सचिनच्या मानाने अशोक सराफ फार फार उशिरा चित्रपट सृष्टीत आला. (वयाच्या १८व्या वर्षी) सुरुवातीला अनेक वर्षे प्रायोगिक रंगभूमी आणि फार्सिकल नाटकांमध्ये कामे करून मराठी आणि हिन्दी चित्रपट सृष्टीत आला. तर सचिन वयाच्या ४थ्या वर्षापासून चित्रपट सृष्टीत होता. बाल कलाकार म्हणून त्याने ६५ चित्रपटात काम केले आहे. अशोक सराफ ६८ वर्षाचा तर सचिन त्याच्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. अशोक सराफच्या अभिनयाला मर्यादा आहेत तर सचिनच्या दिसण्याला (appearance) मर्यादा आहेत. त्यामुळे दोघेही हिन्दी चित्रपट सृष्टीत मागे राहिले.

नितीनचंद्र's picture

4 Nov 2015 - 3:54 pm | नितीनचंद्र

मायबोली आणि मिपावर प्रतिक्रिया सारख्याच आहेत. कदाचीत तेच प्रतिसादकर्ते दोन्ही कडे असु शकतील. ५० वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे असे म्हणणार्या सचीन यांचे स्व्तः च्या अभिनयाने गाजलेले सिनेमे जवळ जवळ नाहीत. मराठीत सुध्दा अशोक सराफ यांना जवळ करुनच त्यांनी बहुतेक सिनेमे काढले. स्वतःच निर्माता असल्यामुळे झालेली करीयर अस अनेकांच मत आहे. महागुरु पद यामुळे अनेक प्रेकक्षांची नाराजी आहे हे आत्ताच समजते आहे. बरेच वेळा पुर्वग्रह अशी मते बनविण्यास कारणीभुत असला तरी अशी मते का बनतात याकडे ही लक्ष जातेच.

पिलीयन रायडर's picture

4 Nov 2015 - 4:40 pm | पिलीयन रायडर

मलाही म्हाग्रु अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाहीत.
पण आत्ताच इथली एवढी चर्चा वाचुन "जुगलबंदी" पाहिली आणि मला तरी चांगला अभिनय केलाय सचिनने असं वाटलं. अ‍ॅग्रेसिव्ह देहबोली आवश्यक होती तशीच दाखवली आहे. मला तरी ते अंगविक्षेप वाटले नाहीत.

पण शेवटी एक डायलॉग मारलाय.. त्या उर्दुतुन मराठी लपत नाहीये.. तेव्हा गाण्याचं ठिक आहे, प्रत्यक्ष संवाद ऐकताना म्हाग्रु त्रास देणार असं वाटतय.

तरीही गाण्यांसाठी पिक्चर बघितला जाईल.

१९८०-९० च्या दशकात त्यांनी जी कामगिरी केली, ती कौतुकास्पद आहेच, पण म्हणून २००० च्या दशकात तशीच (१५-२० वर्षे जुनी) दिग्दर्शन व अभिनयाची शैली ठेवण्याचा प्रयत्न केल्याने तो बाळबोध व हास्यास्पद ठरला. आणि हे मुख्य कारण आहे या सगळ्या टीकेचे.

उदा. नवरा माझा नवसाचा. हा पिच्चर मला आवडतो. कधीही लागला असेल तर थोडावेळ तरी नक्की पाहतो. सचिन-सुप्रिया-अतुल उघडेबाबा कडे जातात तो शीन लई भारी आहे. पण दाताखाली खड्यासारख्या लागणार्‍या गोष्टी म्हणजे प्रत्येक गोष्टीचे स्टिरीयोटायपीकरण. उदा. तरुण मुलांचं टोळकं, मंदाकिनी सारखी दिसणारी मंदाकिनी नावाची मुलगी इ. काही बाळबोध विनोद. उदा पारशी आजीबाईसाठी गाडी परत मागच्या गावाला नेणं. काही अनाकलनीय गोष्टी. उदा. बाबू कालियाचे वर्णन करणारी व्यक्ती शेजारी बसलेल्या बाबू कालियाला ओळखू शकत नाही. व वर्णनावरून चित्र काढणारा वॅकी शेवटची रेष मारेपर्यंत बाबू कालिया ला ओळखत नाही. शेवटच्या आरतीला बाबू कालिया व इतर अनावश्यक पात्रांची उपस्थिती. असो.

चित्रपट उदा २: आम्ही सातपुते. इतकं स्टिरियोटायपीकरण की... असोच!

त्यांचा मानसपुत्र स्वप्नील जोशी पण बर्याच अंशी महागुरुंसारखा अतिरेक करतो. खूप जास्त अतिरेक करणाऱ्या महागुरूंना पोळक बम्बुंचे फटके द्यावे असा विचार आहे.

याॅर्कर's picture

4 Nov 2015 - 10:22 pm | याॅर्कर

स्वप्नील जोशी पण बर्याच अंशी महागुरुंसारखा अतिरेक करतो.

बरोबर.

यॉर्कर, मगाशी महागगुरुंवरचा रोश तुम्हाला खटकला होता आता 'स्वप्नील जोशी पण बर्याच अंशी महागुरुंसारखा अतिरेक करतो.' ह्या वाक्याला तुम्ही सहमती देताय. नवल आहे.

पण,बाकिच्यांच्या नजरेतून नेमका आकस कशाबद्दल आहे हे जाणून घ्यायचं होतं.

पण,बाकिच्यांच्या नजरेतून नेमका आकस कशाबद्दल आहे हे जाणून घ्यायचं होतं.

तुम्ही झीमराठीवाले आहात का? अशीच जरा शंका आली हो! ;)

याॅर्कर's picture

5 Nov 2015 - 8:43 pm | याॅर्कर

नाही ओ.
आम्ही फक्त मराठीवाले आहोत.

याॅर्कर's picture

4 Nov 2015 - 9:35 pm | याॅर्कर

पुढच्या वेळेस कास्टिंग मिपाकरांनी करावी.

अजया's picture

4 Nov 2015 - 10:32 pm | अजया

=))हे बाकी बरोबर बोललात!

बिहाग's picture

4 Nov 2015 - 9:51 pm | बिहाग

नाटकात कवीची भूमिका पण महत्वाची आहे ती कोणी केली आहे?
या नाटका बद्दलची बरीच माहित प्रभाकर पणशीकरांच्या आत्मचरित्रात आहे.

परत सचिन बद्दल बोलण्याचा मोह.. अशीही बनवा बनवि , आणि इतर चित्रपट देणारा हाच का तो माणूस इतकी अधोगती झाली आहे. अमिताभला लाल बादशहा किवा दिलीप कुमार ला किला मध्ये जे बधून वाटले तसेच आहे.

आपण स्वतःच स्वतःचे हसू करून घेत आहोत हे या माणसाला काळात नाही हे काही झेपत नाही.

भक्त प्रल्हाद's picture

5 Nov 2015 - 8:33 pm | भक्त प्रल्हाद

भीम्सेन जिन्चा हा दुवा पहा.
https://www.youtube.com/watch?v=dL1deOLUK1w

बिहाग's picture

7 Nov 2015 - 12:36 pm | बिहाग

बस का राव?

इथे ते स्वतः गात आहेत. पुणे लक्ष्मी पार्क मधले रेकॉर्दिन गाहे मल्हार रागातले.

( गायक बरेच वेळा श्रोत्यांना जागा कळावी म्हणून देहबोली वापरतात. )

सचिनच्या अभिनयाचा आणि गाण्यातला जागेचा संबंध शोधायला जा मग लगेच कळेल काय येडेपणा केला आहे.

कुठे भीमसेन , कुठे ??
फार फार फार फरक आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Nov 2015 - 8:44 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

लाल रंगाचा डबा फेम म्हाग्रुंच कैचं पहायचं नै असा निर्णय घेतलेला असल्याने चित्रपटाला पास!! रच्याकने नाटकाचं रुपांतर चित्रपटात करायची कल्पना रुचली नाही.

निशांत५'s picture

5 Dec 2015 - 9:01 am | निशांत५

दिल की तपिश आज है आफताब...... Salute to Rahul Deshpande कट्यार पुन्हा काळजात घुसली

पर्ण's picture

6 Dec 2015 - 1:03 am | पर्ण

महागुरू सिनेमाचे प्रमोशन करताना पण फार पुढे पुढे करत होता :))

आजच हा सिनेमा पाहिला व आवडला. छान वाटला. महागुरुंनी एकदाच पुसटशी जाणीव होऊ दिली, अन्यथा चांगले काम केले आहे. गाणी अटोपती घेतल्यासारखे वाटले, निदान अरुणी किरणी हे गाणे जरा मोठे हवे होते म्हण्जे सिनेमा संपताना ते डोक्यात चढले असते. तशीही सगळी गाणी नंतर बराचवेळ कानात वाजत राहिली. हा सिनेमा पाहताना मस्त वाटले पण "आम्ही सिनेमा पाहिला" हे सांगतानाही मज्जा वाटली. आता १ जानेवारीला नटसम्राट येतोय. इकडेही आला तर बरे वाटेल.