✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कट्यार पुन्हा काळजात घुसली

न
नितीनचंद्र यांनी
Mon, 11/02/2015 - 15:06  ·  लेख
लेख
पुरुषोत्तम दारव्हेकर लिखीत आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच संगीत असलेली संगीत नाटक कट्यार एक अजरामर नाटक आहे. डॉ. वसंतराव देशपांडे, नुकतेच निवर्तलेले पं. पदमाकर कुलकर्णी तसेच नव्या पिढीतील तीन दमदार गायक डॉ रविंद्र घांगुर्डे, चारुदत्त आफ़ळे आणि वसंतराव देशपांडे यांचा वारसा घेऊन आलेले राहुल देशपांडे यांनी खासाहेबांची भुमिका करुन हे नाटक पुन्हा पुन्हा रंगमंचावर आणले. या नाटकाला प्रत्येक पिढीचा वारसा आणि नविन पिढीतल्या चाहत्यांचा उत्साह हे नाटक नव्याने सादर करायला भाग पाडतो आहे. जसे विविध गद्य नाटकातले कलाकार एकदा नटसम्राट करायला मिळाले म्हणजे नट म्हणुन एक मानाचा शिरपेच मिळतो या भावनेने ही भुमिका करतात तसे संगीत नाट्यप्रकारात अनेक नाटकांपैकी हे एक नाटक करायला मिळाले म्हणजे सुध्दा शिरपेच अशीच भावना किमान या नव्या पिढीच्या गायकांमध्ये असावी. वसंतरावांच्या गायकीने वेड लावलेले अनेक गायक/श्रोते महाराष्ट्रात आहेत. ज्यांनी स्वत: वसंतराव देशपांडे यांच्या कडुन संगीताचे धडे घेतलेले पं. पदमाकर कुलकर्णी आणि त्यांचे शिष्य डॉ. रविंद्र घांगुर्डे यांना वसंतरावांनी गाजवलेली खासाहेबांची भुमिका करायचे मनात येणे नवल नाही. राहुल तर हीच सर्व गाणी ऐकत आणि कट्यार निर्मीतीच्या कथा ऐकत लहानाचा मोठा झाला असेल. आपल्या वडीलांकडुन किर्तनाचे धडे घेतलेला आणि किर्तन करणारा चारुदत्तला ही भुमिका करण्याची प्रेरणा कशी मिळाली हे त्यांच्याकडुन कधी काळी ऐकायला आवडेल. मागच्याच वर्षी पंडीत पदमाकरजी हयात असताना मी त्यांना तुमच्या कडुन कट्यार बद्दल ऐकायचे आहे असे सांगताच पंडीतजी खुलले होते. हे सर्व व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा माझा मानस तसाच विरला. खर तर मला प्रत्येक खासाहेबांकडुन कट्यार चे काय गारुड आहे हे जाणण्याचा संकल्प होता पैकी पंडीत पदमाकरजींच्या जाण्याने ह्यातला काही भाग रेकॉर्डवर येण्याआधीच पुसला गेला. पंडितजींच्या जाण्याने झालेला विरस सुबोध भावेंच्या नव्या सिनेमाच्या घोषणेने कमी झाला आहे. एखाद्या कथेला नाटकात नेपथ्याच्या मर्यादा येतात. राजे- रजवाडे असलेल्या कालवधीतली ही कथा राजगायकाचा महाल आणि छोट्या सदाशिवा बरोबर एका जुन्या शिव मंदीरात पंडीतजींचा रियाझ या दोनच सेटवर अडकुन पडते. किंबहुना नाटक म्हणुनच लिहायला घेतले असेल तर दारव्हेकरांना ते प्रसंग त्या मर्यादेतच लिहावे लागले असतील. कट्यार च्या कथेवर येऊ घातलेल्या सिनेमाचे पहिले गाणे येऊन थडकल्यावर " सुर निरागस हो" हे गाणे आणि त्याचे चित्रीकरण नाट्यरुपांतरामुळे असलेल्या मर्यादा संपवुन एका नव्या भव्य आकृतीबंधात बांधले जाईल यात शंकाच नाही. एक पिढी होती ज्यात जुन्या कथा चित्रपटात बांधुन त्याच्या भव्यतेसहीत पडद्यावर साकारत. हे निर्माते फ़क्त हिंदीतच सिनेमे करत. जुन्या पिढीत मुगले आझम असुदे किंवा त्यांचा कित्ता गिरवणारा संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा असुदेत. केलेला खर्च आणि उत्पन्न याचा मेळ घालण्यासाठी मराठी माध्यम अपुरे पडत असावे. यातुन एक काळ असा गेला ज्यात मराठी सिनेमा नव्या कल्पना नसलेल्या निर्मीतीच्या गर्तेत अनेक वर्ष अडकल्याने आपली हिंमत आणि वारसा आणि प्रेक्षक वर्ग ही हरवुन बसला होता. नजीकच्या मराठी सिनेमात अनेक प्रयोग झाल्यामुळे आणि लोकांना भावल्यामुळे मला मराठी सिनेमा करायचा आहे असे अमिरखान सारखे निर्माते तर रजनिकांत सारखे सुपरस्टार जाहीर रित्या म्हणुन लागले आहेत. ही नांदी मराठी सिनेमाला सुवर्णकाळ येईल की काय अश्या काळाची आहे. या पार्श्वभुमीवर कोर्ट या मराठी सिनेमाला कोणत्याही प्रसिध्द स्टार कास्ट शिवाय ऑस्कर पुरस्काराला नॉमिनेशन होणे हा सुध्दा एक चांगला योग मानायला हरकत नाही. कट्यारची कथा आता भव्य स्वरुपात पडद्यावर झळकेल ज्यात सचिन पिळगावकर खासाहेबांची तर पंडीतजींची भुमिका शंकर महादेवन रंगवणार आहेत. या सिनेमातले सेट डिझाइन रवी जाधव यांचे आहे तसेच आर्ट डायरेक्टर म्हणुन सुध्दा काम करत आहेत. रवी जाधव यांच्या सेट डिझाइनची झलक " सुर निरागस हो" या राजवड्यातल्या गणेश उत्सवाच्या भागाचे चित्रकरणासहीत चाहत्यांच्या समोर आल्याने कट्यारला काही नविन अ‍ॅगलमधे नुसते ऐकायला नाही तर पहायला मिळणार ही एक आनंदाची गोष्ट आहे. शंकर महादेवनला या निमीत्ताने मराठी सिनेमात पहाणे आणि ऐकणे सुध्दा आगळाच आनंद देईल. मध्यंतरी राहुल देशपांडे आणि शंकर महादेवन यांनी काही गायन एकत्रीत केल्याचे दुरदर्शनवर केल्याचे पाहिले होते. त्यामागे असा काही संकल्प असेल याची कल्पना आली नव्हती. या चित्रपटाला शंकर- एहसान -लॉय यांचे संगीत आहे. या त्रिकुटाने काही सिनेमांना हटके संगीत दिले होते. चाहत्यांना हवी असलेली नाट्य संगीताची तहान या सिनेमाच्या संगीताने भागवली जाते की संगीत नाटकाचे सिनेमात रुपांतर होताना काही वेगळ्या संगीत संकल्पना पुढे येतात हे पहाण्याचे बाकी आहे. सुबोध भावे पुन्हा नाटकाप्रमाणे कविराज बाके बिहारींचीच भुमिका रंगवणार असे वाटत होते पण टीझर त्यांना सदाशीवाच्या रुपात आणतोय तर कविराज बाके बिहारी बहुतेक दुसराच प्रसिध्द नट रंगवणार असे दिसत आहे. उमेची भुमीका मृण्मयी देशपांडे तर खासाहेबांच्या मुलीची भुमिका अमृता खाडीलकर करणार असे दिसत आहे. गायकांची नावे या प्रमोत आलेली नाहीत. सचिन पिळगावकर गात असले तरी खासाहेबांची गायकी दुसराच पार्श्वगायकाला करावी लागणार यात शंका नाही. गायकांच्या यादीत फ़क्त शंकरचे नाव आत्ता दिसते आहे. प्रत्यक्षात ही गाणी राहुल की अजुन कोणी हे समजायला सिनेमाच प्रदर्शीत होण्याची वाट पहावी लागणार आहे. download (1).jpg सुबोध भावे यांनी कट्यारचे नाट्यप्रयोग केले आहेत ज्यात राहुल देशपांडे खासाहेब भुमीका करतात. या पार्श्वभुमीवर आणि दुरदर्शनवरची ती जुगलबंदी ऐकल्यावर एका गोष्ट जी कथेच्या मुळ रुपात बदल करुन येईल असे वाटते ती म्हणजे खासाहेब आणि पंडीतजींची दसरा दरबारातली जुगलबंदी. असे घडले तर कथेच्या मुळ स्वरुपात नसलेली एक गोष्ट जी चित्रपट पहाण्याला एक कारण मिळवुन देईल. असे प्रयोग चित्रपट पुन्हा निर्माण करताना करावेच लागतात. संजय लीला भन्साळींचा देवदास पुन्हा पहाताना " डोला रे डोला रे " या गाण्यात माधुरी आणि ऐश्वर्या यांना एका फ़्रेम मधे आणण्याचा प्रयोग करावा लागला होता तोच प्रयत्न या निमीत्ताने होईल अशी एक आशा माझ्या मनात आहे. अन्यथा खासाहेब आणि पंडीतजी यांचा सामना झाला आणि पंडीतजी न गाताचा उठुन गेले ही मुळची कथा काहीशी चाहत्यांच्या अपेक्षा अपुर्ण ठेवणारी होती. images.jpg कथेत बदल होणार म्हणजे नाट्य प्रयोगाचे अस्तित्व अबाधीत ठेऊन नविन गाणी येणार हे " सुर निरागस हो" या निमीत्ताने जाणवले. यातुन कट्यारचे वैभव वाढणार अशी आशा बाळगायला हरकत नाही. मराठी प्रेक्शकांनी जसा बालगंधर्व हा सिनेमा डोक्यावर घेतला तसा नव्या स्वरुपातली नाट्य प्रयोग चित्रपटाच्या स्वरुपात मराठी सिनेमाला उंची मिळवुन देऊन एक नवा इतिहास घडवतो का हे समजायला फ़ारसा अवधी राहीलेला नाही. दिवाळीतच हा सिनेमा रिलीझ होऊन दिवाळीचा आनंद अनेक पटीने वाढवायला आपल्या समोर येतो आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा

प्रतिक्रिया द्या
30866 वाचन

💬 प्रतिसाद (134)

प्रतिक्रिया

नक्कीच! पिक्चर सुपर डुपर हिट

वेल्लाभट
Mon, 11/02/2015 - 15:12 नवीन
नक्कीच! पिक्चर सुपर डुपर हिट असणार यात वाद नाही !
  • Log in or register to post comments

कट्यार काळजात घुसली पाहिला !

उगा काहितरीच
गुरुवार, 11/12/2015 - 17:33 नवीन
कट्यार काळजात घुसली पाहिला ! पहिल्या दिवशी , पहिला शो . प्रचंsssssssड आवडला. महागुरू कधीकधी असह्य होतात. पण बाकी चित्रपट अप्रतिम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

सचिन पिळगावकर उर्फ

काकासाहेब केंजळे
Mon, 11/02/2015 - 15:24 नवीन
सचिन पिळगावकर उर्फ म्हागुरुंनी या सिनेमाच्या प्रमोमध्ये गाताना जे अंगविक्षेप केले आहेत ते बघुन त्यांच्या पोटात जंत वळवळ करत असल्याचे वाटते,पिळगावकरने कीतीही उर्दू लहेजा भाषेत आणण्याचा प्रयत्न केला तरीही त्याचे मराठी उच्चार लपत नाहीत, शंकर महादेवन नुसता ठोंब्या वाटतो प्रमोमध्ये.बाकी सेट ,वेशभुषा उत्तम आहे यात वादच नाही.
  • Log in or register to post comments

सचिन पिळगावकर या गुणी दिग्दर्शकाविषयी वैयक्तिक टीका, रुचली नाही

पगला गजोधर
Wed, 11/04/2015 - 11:07 नवीन
अरेरे, दादा कोंडकेचा सलग ९ चित्रपट सिल्वर ज्युबिली देण्याचा, विक्रम मोडणाऱ्या (सलग १२ सिल्वर ज्युबिली) सचिन पिळगावकर या गुणी दिग्दर्शकाविषयी, अशी वैयक्तिक टीका, मला रुचली नाही. सचिन म्हटलं कि (माझा पती करोडपती, गम्मत जम्मत, अशीही बनवाबनवी, अष्टविनायक, मायबाप … ) असे चित्रपट डोळ्यापुढे येतात. मला वाटते सचिन मनसे च्या चित्रपट सेना प्रमुखपदी आल्यापासून, त्याचावर ऐका विशिष्ठ राजकीय पक्ष्याच्या समर्थांकडून हिणवले जाण्याची,ही बाब असावी. मला वाटते सचिन पूर्वीच्या काळात जे काही दर्जेदार काम करून मराठी चित्रपटसृष्टीची सेवा केली आहे, निदान ती तरी ध्यानी ठेवून (एवढी सेवा त्याच्या टीकाकारांनीही कदाचितच केली असेल ), गेल्या काही वर्षामध्ये त्याच्याकडून अतिउत्साहात काही आगळीक झाली असेल, ती आपण पोटात घालून, निदान हा चित्रपट पाहायला जावून दिवाळी साजरी करूया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे

हेच

नाखु
Wed, 11/04/2015 - 12:35 नवीन
पुण्याई म्हटले आहे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

हे बाकी खर बर का काकासाहेब!

पामर
Fri, 11/06/2015 - 16:01 नवीन
सचिन 'पीळ'गावकर यांनी प्रोमोमधे जो थयथयाट केलाय..कहर! ऐन मैफिलित लेंग्यात झुरळ शिरुन पंचाईत झाल्याचा vibrant अभिनय मात्र जमलाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे

...

आशु जोग
Sat, 12/05/2015 - 02:30 नवीन
त्यांचा मोबाईल व्हायब्रेट होत असेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पामर

ह ह पु वा !

रमेश आठवले
Sat, 12/05/2015 - 02:55 नवीन
ह ह पु वा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पामर

उत्सुकता..

स्वाती दिनेश
Mon, 11/02/2015 - 16:01 नवीन
सुबोधच्या कट्यारच्या सिनेरुपाची उत्सुकता होती पण सगळे बाकीचे दिग्गज सोडून म्हागुरुंना का निवडले खाँसाहेब म्हणून? उत्सुकता धाडकन आपटली.. सिनेगृहात जाऊन पहाण्यापेक्षा जालावर येईल तेव्हा पाहणे पसंत करेन. स्वाती
  • Log in or register to post comments

+ १ , स्वयंघोषित महागुरुंना

स्रुजा
Mon, 11/02/2015 - 22:13 नवीन
+ १ , स्वयंघोषित महागुरुंना का म्हणुन खाँ साहेबांची भूमिका दिली असेल असा राहुन राहुन प्रश्न पडतो. कट्यार चं सिनेरुपांतर करण्याचं शिवधनुष्य पेलण्याचा नुसता विचार च नाही तर तो प्रत्यक्षात उतरवण्याची हिंमत दाखवली या एका मुद्द्यावर पण सुबोध भावेला पैकी च्या पैकी मार्क्स ! आशा करुयात की सिनेमा तेवढाच खास असेल देखील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

कट्यार पुन्हा काळजात घुसली-

कंजूस
Mon, 11/02/2015 - 16:07 नवीन
कट्यार पुन्हा काळजात घुसली- यानिमित्ताने राहुल आणि शंकर महादेवन जुगलबंदी .टिव्ही साउंड रेकॅार्डींग. राहुल आणि शंकर महादेवन जुगलबंदी ; MP3 ;Size 20MB
  • Log in or register to post comments

म्हागगुरुंना पाह्यलं आणि

सूड
Mon, 11/02/2015 - 16:08 नवीन
म्हागगुरुंना पाह्यलं आणि उत्सुकता विरली. आता थेटरात पदरचे पैसे खर्च करुन जाणार नाही.
  • Log in or register to post comments

+१

माझीही शॅम्पेन
Wed, 11/04/2015 - 12:53 नवीन
+१ ज्या कोणी दिव्य माणसाने चित्रपटाची casting केली आहे त्यानेच एकदम शिताफीने कट्यार पुन्हा (आम्हा मायबाप प्रेक्षकांच्या) काळजात घुस(वि)ली आहे ... संपूर्ण कथा ह्या पात्राच्या भोवती फिरत असल्याने महागुरूंना optionला टाकणे शक्य नाही आता चित्रपट आणि माहागुरुंची overacting बघण्याची इच्छा उरली नाही र च्या क ने .. नाना पाटेकर , विक्रम गोखले वा स्वता: राहुललाच ही भूमिका द्यायला पाहिजे होती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

नसरुद्दिन शहा एकदम मस्त शोभले असते

मीउमेश
Wed, 11/04/2015 - 21:02 नवीन
नसरुद्दिन शहा एकदम मस्त शोभले असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

+१ . नव्या कटयारमध्ये

सिरुसेरि
Sat, 11/07/2015 - 23:48 नवीन
+१ . नव्या कटयारमध्ये पंडितजी , खांसाहेब यां भुमिकांमध्ये सचिन खेडेकर , अतुल कुलकर्णी , संदिप कुलकर्णी असे कलाकार जास्त शोभले असते . तसेच शंकर महादेवन यांचा आवाज खांसाहेब व सुरेश वाडकर यांचा आवाज पंडितजी यांना शोभला असता .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

सचिन पिळगांवकरांची निवड

तुषार काळभोर
Mon, 11/02/2015 - 16:08 नवीन
मला यासाठी "दुर्दैव" हा शब्द वापरावासा वाटतो.
  • Log in or register to post comments

महागुरू _/\_

लई भारी
Mon, 11/02/2015 - 16:56 नवीन
'सचिन पिळगांवकर' नाव बघूनच अर्धा निर्णय झाला होता. ट्रेलर बघून बाकीच्या गोष्टी भारी वाटत असल्या तरी महागुरूंचा अचाट अभिनय(!) बघायला जाण्याची इच्छा होत नाही.
  • Log in or register to post comments

अपेक्षा उंचावल्यात या

उगा काहितरीच
Mon, 11/02/2015 - 17:05 नवीन
अपेक्षा उंचावल्यात या चित्रपटाकडुन , पाहूयात पूर्ण होतात का नाही ते . शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

महागुरू फेवरिंग विरुद्ध

वेल्लाभट
Mon, 11/02/2015 - 17:15 नवीन
महागुरू फेवरिंग विरुद्ध महागुरू नॉन फेवरिंग असा वाद या धाग्यत उफाळून येण्याची शक्यता दिसते.. आपापली मतं असू शकतात. असो.
  • Log in or register to post comments

कमीत कमी मिपावर वादाचा नवीन

टवाळ कार्टा
Mon, 11/02/2015 - 20:58 नवीन
कमीत कमी मिपावर वादाचा नवीन विषय तरी मिळेल त्या निमित्ताने =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

लौल !

वेल्लाभट
Tue, 11/03/2015 - 07:44 नवीन
लौल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

म्हाग्रू सोडून दुसरे लोक मेले

बॅटमॅन
Mon, 11/02/2015 - 17:19 नवीन
म्हाग्रू सोडून दुसरे लोक मेले होते की मुके झाले होते????? राहुल्देश्पांडेही चाल्लाअसता पण त्याला अ‍ॅक्टिंग कितपत येते काय माहिती.
  • Log in or register to post comments

नाटक

स्वाती दिनेश
Mon, 11/02/2015 - 17:29 नवीन
कट्यार नाटकात राहुलच करतो ना काम? माझीही पहिली रिअ‍ॅक्शन हीच होती. सगळे सोडून म्हागुरु काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

कट्यार नाटकात राहुलच करतो ना

बॅटमॅन
Mon, 11/02/2015 - 17:45 नवीन
कट्यार नाटकात राहुलच करतो ना काम?
असेल, मला माहिती नाही. मला वाटलेलं की तो फक्त गाण्यातला आहे. अ‍ॅक्टिंगही येते हे माहिती नव्हतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

आजकाल ज्याला अभिनय म्हणतात तो

अभ्या..
Mon, 11/02/2015 - 17:50 नवीन
आजकाल ज्याला अभिनय म्हणतात तो अन पूर्वीचा संगीत नाटकातील गायक नटांचा अभिनय यात बराच फरक असणार. संगीत नाटकात अभिनयाची गरज नसते असे नाही म्हणता येणार पण दमदार आवाज अन गायकी हाच यूएसपी असेल तर बाकी सीन सामान्य रुप अन अभिनयाने सुध्दा निभावून नेले जात असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

असेल, मला माहिती नाही. मला

विशाल कुलकर्णी
Wed, 11/04/2015 - 10:54 नवीन
असेल, मला माहिती नाही. मला वाटलेलं की तो फक्त गाण्यातला आहे. अ‍ॅक्टिंगही येते हे माहिती नव्हतं. म्हाग्रुंना तरी 'सचिन पिळगावकर'शिवाय इतर कुणाची अ‍ॅक्टिंग कुठे येते करायला? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

म्हग्रू बद्दल किती काही वाटत

अद्द्या
Mon, 11/02/2015 - 17:40 नवीन
म्हग्रू बद्दल किती काही वाटत असलं तरी . गाणी आणि सुबोध भावे साठी बघणार हा सिनेमा मी . . बाकी . . ज्यांना नावे ठेवायची आहे ते कशाला हि ठेवतात. यामध्ये बालगंधर्व , पु ल , पं भीमसेन जोशी या सारख्या दिग्गजांना प्रत्यक्ष ऐकायची / बघायची संधी आणि सुदैव लाभलेली लोकं जास्त आहेत . आमचा जन्म झाला नवता तेव्हा. प्रत्येक वेळी 'तुम्ही यांना ऐकलं पाहिजे होतात .. या नवीन लोकांत काहीच दम नाही . " च्यायला . एवढी आवड होती तर ठेवायचं होतं रेकोर्ड करून . ऐकलं असतं या चित्रपटाबद्दल ऐकलेली हि लेटेस्ट ओकारी . . "अरे कुठे ते देशपांडे आणि कुठे हा महादेवन . काही तरी सर आहे का ? " हो बाबा होते देशपांडे महान . त्यात वादच नाहीये . पण म्हणून महादेवन कसा फालतू ठरतो ? तुम्हाला नसेल बघायचं तर नका बघू . आपणच सर्वज्ञानी असल्याच्या थाटात दुसऱ्याचा मूड का खराब करताय ?
  • Log in or register to post comments

या चित्रपटाबद्दल ऐकलेली हि

बॅटमॅन
Mon, 11/02/2015 - 17:48 नवीन
या चित्रपटाबद्दल ऐकलेली हि लेटेस्ट ओकारी . . "अरे कुठे ते देशपांडे आणि कुठे हा महादेवन . काही तरी सर आहे का ? " हो बाबा होते देशपांडे महान . त्यात वादच नाहीये . पण म्हणून महादेवन कसा फालतू ठरतो ? तुम्हाला नसेल बघायचं तर नका बघू . आपणच सर्वज्ञानी असल्याच्या थाटात दुसऱ्याचा मूड का खराब करताय ?
कसंय ना अद्द्या, क्लासिकल संगीत मत्तु पिच्चर ही दोन क्षेत्रे अशी आहेत जिथे बद्धकोष्ठाचा विकार झालेली थेरडेशाही खूप बळजोर आहे. बाकी ठिकाणीही आहेच, पण या ठिकाणी प्रकर्षाने जाणवून येते. त्यातही क्लासिकल संगीत म्हणजे काय विचारता! प्युअर थेरडेशाही असते इथे. तुला अमुक एखादं आवडलं तर ते कसं फालतू आहे हे सांगण्यात जन्म घालवणारे बद्धकोष्ठी लोक्स खच्चून भरलेत. लक्ष द्यायचं नाय. बाकी म्हाग्रू सक्स पण पिच्चर बघणार हेवेसांनल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

अगदी .

अद्द्या
Mon, 11/02/2015 - 18:09 नवीन
अगदी . दुसरं म्हणजे . "स्टोरी बदलतील राव" . . अरे लेको . नाटक आणि सिनेमा. फरक असतो. आणि स्टोरी बदलली म्हणून ती वाईटच असेल हे कश्यावरून ठरवलं? बाजीराव मस्तानी च हि तेच कर्ताएत . . अरे एक ऐतिहासिक लव स्टोरी म्हणून बघा न! . . बाहुबली / मगधीरा इत्यादी डोक्यावर घेऊन नाचणारे हेच लोक बरं का . तुम्हाला माहितीये बाजीराव कसा होता . (तरी ९०% लोक त्याला यावनिशी संग करणारा म्हणूनच ओळखतात ) तुम्हाला माहितीये मस्तानी कशी होती ( पान खाल्ल्यावर गळ्यात रंग उतरणारी वगेरे वगेरे ) . तीच इमेज डोक्यात ठेवा आणि बसा घरी शांत . आम्ही आपले दीपिकाला बघून होतो खुश , सावळी असली तरी अति लैच भारी दिसते ती .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+११११११११११

बॅटमॅन
Mon, 11/02/2015 - 18:18 नवीन
ऐतिहासिक सत्याची काशी केली तरी मी एकदा तरी थेट्रात जाऊन बाजीराव मस्तानी पाहणारच. तेवढीच त्या निमित्ताने बाजीरावांची चर्चा होईल, लोक जरा मराठा इतिहासात इंट्रेस घेतील आणि महाराज सोडूनही मराठ्यांकडे अनेक वीर होते हे कळेल. मराठी इतिहासाला चांगले मार्केट उपलब्ध करून देण्यात या पिच्चरचा नक्कीच रोल आहे. त्यामुळे एकदा टोकन उपस्थिती लावायला तरी काहीच हरकत नसावी. आणि ट्रेलर पाहिलं त्यावरून चांगलंच वाटतंय. बॉलिवुडी मसाला वगैरे आहे, तेवढं चालायचंच. अन दीपिकाला सावळी काय म्हणतो बे. थोडी टॅन आहे म्हण. ;) ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला...(ॐ शांती ॐ) पण खास लोकाग्रहास्तव एक मागणी आहे आपली भन्साळीसाहेबांकडे. त्या पिच्चरात २ सीन्स पाहिजेत म्हणजे पाहिजेतच. १. बाजीरावसाहेब घोड्यावर बसल्या बसल्याच घाईघाईने कणसे मळून खाताहेत आणि बाकीचे लोक ते पाहून अचंबित होताहेत (बाहुबलीमध्ये शिवलिंग उचललेले पाहिल्यावरची रिअ‍ॅक्शन आठवा.) २. मस्तानी पान खातानाचा ज्यूस गळ्यातून आरपार दिसतो आहे. हे दोन शीन नसले तर भन्साळीसाहेबांचा छोटा का होईना निशेद करू आम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

थोडी टॅन आहे म्हण. >

अद्द्या
Mon, 11/02/2015 - 18:31 नवीन
थोडी टॅन आहे म्हण. > हाहाहाहा पिवळं पितांबर , मेलेलं मडं, वाकडं वळण इत्यादी इत्यादी पहिला असण्याची शक्यता आहे . दुसर्यासाठी CGI वापरावा लागेल . पण तरी तो आम्ही बघूच . आणि नसला तरी कणीस खात खात निषेध करत करत बघू च
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

रावबाजी ज्वारीचे नायतर

अभ्या..
Mon, 11/02/2015 - 18:34 नवीन
रावबाजी ज्वारीचे नायतर बाजरीचे खात असतील. तू मक्याचे खाणार. तेपण भाजून मीठ मसाला लावून. अद्द्या लेका निषेध तरी दमदार करावा माणसाने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

आता थेटरात दमदार निषेध नाही

अद्द्या
Mon, 11/02/2015 - 18:39 नवीन
आता थेटरात दमदार निषेध नाही करू देत राव इथे. . तो नंतर करेन कि हॉटेलात =]]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

रावबाजी?

बोका-ए-आझम
Mon, 11/02/2015 - 22:40 नवीन
असं दुस-या बाजीरावाला म्हणायचे ना? चूभूद्याघ्या. वाल्गुदेश्वर, प्रचेतसभाऊ वगैरे इतिहासपंडितांनी स्पष्ट केल्यास बरं होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बोकेश. दुसर्‍या रावसाहेबांंना

अभ्या..
Mon, 11/02/2015 - 23:48 नवीन
बोकेश. दुसर्‍या रावसाहेबांंना त्यांच्या इतर बाजींबद्दल म्हणत असतील पण पहिल्या रावसाहेबांना रावबाजी संबोधल्याचे माझ्या वाचनात आहे. पानिपत तर कादंबरीच आहे पण त्यातही ह्या कणसाच्या किश्श्यातच मल्हारराव बाजीरावांचा उल्लेख रावबाजी म्हणूनच करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

पानिपतातला किस्सा पाहिला

बॅटमॅन
Tue, 11/03/2015 - 11:51 नवीन
पानिपतातला किस्सा पाहिला पाहिजे, पण अदरवाईज़ बोकेश इज राईट. जनरली रावबाजी = दुस्रा बाजीराव असे ऐकले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

येक लंबर !

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 11/02/2015 - 18:56 नवीन
येक लंबर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

खरे आहे

मित्रहो
Fri, 11/06/2015 - 13:51 नवीन
तेवढीच त्या निमित्ताने बाजीरावांची चर्चा होईल, लोक जरा मराठा इतिहासात इंट्रेस घेतील आणि महाराज सोडूनही मराठ्यांकडे अनेक वीर होते हे कळेल.
बाजीरावच्या ट्रेलरनंतर काही लोकांनी त्याविषयी माहीती विचारली. मी काही विकीपिडियाच्या लिंक पुरवल्या. एका मित्राच्या म्हणण्यानुसार शिवाजीच्या पुढे मराठ्यांचा इतिहास माहीतीच नाही. कदाचित बाजीरावांचे कतृत्व लोकांना कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

बाजीराव मस्तानी बघणार राव!!

सूड
Mon, 11/02/2015 - 18:20 नवीन
बाजीराव मस्तानी बघणार राव!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

सुट्टीवर आलो असताना पोरगा खास

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 11/02/2015 - 19:01 नवीन
सुट्टीवर आलो असताना पोरगा खास आग्रहाने "बालगंधर्व" पहायला घेऊन गेला होता... तेव्हा आश्चर्य जास्त वाटलं होतं की मस्त पिक्चर बघितल्याचा आनंद जास्त झाला होता याचा अजून निकाल लागलेला नाही. पण त्याच्या आवडीचा अभिमान नक्कीच वाटला होता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

सूडने म्हणे बाजीराव मस्तानी

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 11/05/2015 - 20:41 नवीन
सूडने म्हणे बाजीराव मस्तानी बघुन भिकबाळी घातली कानामधे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

थेरडेशाही? वारलो!

बोका-ए-आझम
Mon, 11/02/2015 - 22:37 नवीन
महागुरूंऐवजी दुसरा कोणी घेतला असता तर चाललं असतं हे जरी कितीही खरं असलं तरी महागुरु हा ब-यापैकी ओळखीचा आणि त्यामुळे एक किमान गर्दी ensure करणारा घटक आहे. शिवाय जर दिग्दर्शकाने महागुरुंना नियंत्रणात ठेवलं असेल तर ते सुसह्य होतील. एवढे काही ते टाकाऊ नाहीत. आता जातो वाहावत कधी एखादा! उसकेलिए उसपे इतना चिल्लाओगे? बूढे की जान लोगे क्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

बापरे

चित्रगुप्त
Tue, 11/03/2015 - 12:51 नवीन
थेरडेशाही मोडीत काढून यंगशाही आणायची म्हणजे राहुलबाळ गद्दीनशीन होणार की काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

म्हणू देत रे

पैसा
Mon, 11/02/2015 - 20:24 नवीन
श्रीनिवास खळ्यांचे संस्कार आहेत शंकरवर. बाकी त्याची अफलातून गायकी वगैरेकडे सगळ्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले तरी त्याचं कोणतंही गाणं ऐकायला तेवढं पुरेसं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

वसंताराव देशपांडे आणि राहुल खासाहेबांची भुमिका करत होते/करतात

नितीनचंद्र
Mon, 11/02/2015 - 17:45 नवीन
शंकर महादेवन अशी भुमिका करतोय ( पंडितजींची ) ज्याना नाटकात फारसा वाव नव्हता. त्यामुळे महादेवची वसंतराव किंवा राहुलशी तुलना योग्य नाही. वर उल्लेख केलेली जुगलबंदी ऐकली /पाहिली तर शंकर महादेवन याचे गायन कौशल्य उत्तम आहे याची खात्री पटेल. अभिनय ते प्रथमच करत आहेत. त्याबाबत आत्ता काय बोलावे?
  • Log in or register to post comments

म्हाग्रू किंवा नो म्हाग्रू...

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 11/02/2015 - 17:57 नवीन
म्हाग्रू किंवा नो म्हाग्रू... केवळ "कट्यार... " आहे म्हणून आणि इतर कलाकार व गायक यांच्यामुळे नक्की थेटरातच बघणार !
  • Log in or register to post comments

घेई छंद मकरंद

याॅर्कर
Mon, 11/02/2015 - 18:50 नवीन
सुरत पिया कि न छिन बिसुराये . . . . क्लासच
  • Log in or register to post comments

वरच्या बर्याच प्रतिसादांशी

राजाभाउ
Mon, 11/02/2015 - 19:07 नवीन
वरच्या बर्याच प्रतिसादांशी सहमत. प्रोमोवरुन चागंला असेल असे वाटते पण महागुरुंना पाहुन काचकुच करतय मन.
  • Log in or register to post comments

गाण्यांसाठी बघावा वाटतोय

पैसा
Mon, 11/02/2015 - 19:19 नवीन
सचिन ची निवड जरा "ही" वाटली तरी गाण्यांसाठी सिनेमा बघावा वाटतोय.
  • Log in or register to post comments

सुरतपिया-राहूल

कंजूस
Mon, 11/02/2015 - 19:40 नवीन
सुरतपिया-राहूल टिव्ही ओडिओ रेकॅार्डिंग सुरतपिया-राहूल- ; MP3; size 10 MB
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा