बॅकपॅकिंग आणि कॅम्पिंग साहित्याची ओळख

इडली डोसा's picture
इडली डोसा in भटकंती
29 Oct 2015 - 11:04 am

कॅम्पिंग हा प्रकार वेगळ्या नावाने आपण भारतात करतच असतो. असे ट्रेक्स जेव्हा आपण दिवसभर वणवण करून कोण्या एका गडावर जातो ,तिथल्या मंदिरात किंवा गुहेत पथारी पसरतो. भोवतालचे तीन दगड एकत्र करून सोबत नेलेल्या सामानातून काही बाही शिजवून खातो आणि सोबत आणलेल्या पांघरुणात मस्त ताणून देतो. थोड्याफार फरकाने या अश्याच प्रकाराला बाहेरच्या देशांमधे हायकिंगआणि कॅम्पिंग म्हणतात. पुण्यात राहत असताना सह्याद्रीमध्ये एक दोन दिवसचे मुक्कामी नाईट ट्रेक भरपूर केले . तेव्हा हायकिंग आणि कॅम्पिंगसाठी कश्या प्रकारच्या गोष्टी उपलब्ध असतात ह्याची फारच जुजबी माहिती होती. आत्ता माझ्याकडे जे काही हायकिंग आणि कॅम्पिंग साहित्य आहे ते जर माझ्याकडे भारतात असताना देखील असले असते तर त्या ट्रेक्सना अजून धमाल आली असती.

आम्ही भारतातही बरंच ट्रेकींग केल्यामुळे अमेरिकेत आल्यावर सुद्धा इथे आपल्याला कुठे कुठे जाता येईल याचा अंदाज घ्यायला सुरुवात झाली आणि इथेही ट्रेकींग आणि त्याच्या जोडीने कॅम्पिंग सुरु झालं . हळु हळु जे गरजेचं आहे ते कॅम्पिंगच सामान आमच्याकडे जमा होत गेलं. त्याचीच माहिती या लेखात द्यायचा प्रयत्न आहे.

सुरुवातीला टेंट बद्दल बघू, कुठेही (भौगोलीक दृष्ट्या) आणि वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानात वापरण्यायोग्य टेंट हवा असेल तर डबल वॉल्ड, थ्री सीजन, वेस्टिब्युल असलेला टेंट घेतलेला चांगला. वेस्टिब्युल म्हणजे टेंटच्या दारासमोर थोडा आडोसा असलेला भाग , याचा उपयोग पावसात स्टोव्हवर खाणे तयार करण्यासाठी किंवा जास्तीचे सामान ठेवण्यासाठी होतो. जर मुख्यत्वे बॅकपॅकिंग प्रकारचे कॅम्पिंग करायचे असल्यास हलका साधारण दोन किलोच्या आसपास (पाच पौंड पेक्षा कमी )वजन असलेला टेंट घेतलेला बरा.
खालच्या फोटोमध्ये टेंटच्या समोरच्या भागात जो ताणून पुढे आलेला भाग आहे तोच वेस्टिब्युल एरिया
.

अजुन एक महत्वाची गोष्ट म्हणजे बॅकपॅक किंवा रकसॅक - ऑस्प्रे(Osprey) कंपनी अप्रतीम बॅकपॅक बनवण्यात अग्रेसर आहे. डॉयटर (Deuter) कंपनीसुद्धा चांगल्या प्रकारच्या बॅकपॅक बनवते. भारतात अ‍ॅडवेंचर वल्ड या कंपनीच्याही बॅकपॅक मिळतात. जर उद्देश नुसते एक दिवसाचेच ट्रेक्स करायचा असेल तर साधारण २० ते ३० लि. ची बॅकपॅक पुरेशी असते पण २ -३ दिवसांच्या ट्रेकसाठी ५०लि आणि ५ पेक्षा अधिक दिवसांच्या ट्रेकसाठी ७० लि. ची बॅकपॅक असेल तर सगळे सामान त्यात व्यवस्थित बसते.
माझ्याकडे ५० लि. ची अ‍ॅडवेंचर वल्डची बॅकपॅक आहे तर नवऱ्याकडे अ‍ॅडवेंचर वल्ड आणि ऑस्प्रेची ७०लि. ची. अ‍ॅडवेंचर वल्डच्या बॅगला खांद्यावर येणाऱ्या पट्यांना चांगले कुशनिंग आहे तसेच बॅग हेलकावे न खाता पाठीवर व्यवस्थित बसण्यासाठी कमरेला बांधायला सुद्धा एक पट्टा आहे. पाठीला आधारासाठी बॅगच्या आतल्या बाजुला दोन अल्युमिनीयमच्या पट्ट्या आहेत. ऑस्प्रेच्या बॅगला सुद्धा असेच खांद्याचे आणि कमरेचे पट्टे आहेत पण पाठीला वरपासुन खाली पर्यंत आधार देणारे जास्त चांगले पॅडिंग आहे.
फोटो अ‍ॅडवेंचर वल्डची बॅकपॅक आणि ऑस्प्रेची बॅकपॅक
.. .

आता स्लीपिंग बॅग आणि स्लीपिंग पॅड/मॅट निवडीबद्दल थोडी माहिती घेऊया .
साधारणत: स्प्रिंग, समर ,फॉल या दरम्यान कॅम्पिंग करायचे असल्यास २० ते ३० डिग्री फॅरनाईट (- ६ ते -१ डिग्री सेल्सिअस ) साठी तयार केलेली स्लीपिंग बॅग पुरेशी होईल तर low altitude विंटर कॅम्पिंगसाठी ० ते १५ फॅरनाईट(- १८ ते -९ डिग्री सेल्सिअस) साठी तयार केलेली स्लीपिंग बॅग घ्यावी. डाऊन आणि सिंथेटीक अश्या दोन प्रकारच्या स्लीपिंग बॅग असतात. सिंथेटीक प्रकारची स्लीपिंग बॅग ही डाऊनच्या तुलनेत थोडी जड असते पण ओली झाल्यास लवकर वाळते.
डाऊन (नारंगी)आणि सिंथेटीक (निळी) स्लीपिंग बॅग.
.

स्लीपिंग पॅड निवडताना त्याचे R रेटिंग महत्वाचे असते. जेवढे जास्त R रेटिंग तेवढे चांगले इन्सुलेशन पण तेवढेच जास्त वजनही वाढते मग या स्लीपिंग पॅडचे. ३ R रेटिंग असलेले स्लीपिंग पॅड वेगवेगळ्या वातावरणातल्या कॅम्पिंगसाठी पुरेसे होऊ शकते आणि त्यामानाने वजनाने देखील हलके असते. काही फुगवून वापरायची स्लीपिंग पॅडस कमी जागा व्यापणारी आणि वजनाने हलकी अशी असतात . Therm-a-rest, Exped, Big Agnes यांची स्लीपिंग पॅड चांगली आहेत. अगदीच हलके काही हवे असेल तर फोमचे स्लीपिंग मॅट ही मिळतात पण यात इन्सुलेशन फारच कमी असते.
**Exped आणि Big Agnes
...
Exped आणि Big Agnes गुंडाळी केल्यानंतर आकाराची कल्पना येण्यासाठी Nalgene बॉटल बरोबर
.

आता कॅम्पसाइटवर खाणे तयार करण्याच्या दृष्टीने महत्वाच्या गोष्टी म्हणजे स्वयंपाकाचा स्टोव्ह आणि भांडी
MSR या कंपनीचे Whisperlite / Dragonfly हे दोन स्टोव्ह वेगवेगळ्या इंधनावर (multiple fuel) वापरता येतात. त्यामुळे ते भारताबाहेर आणि भारतातही तेवढ्याच सहजतेने वापरता येऊ शकतात, शिवाय high altitude आणि थंड विरळ हवेत सुद्धा हे स्टोव्ह चांगले चालतात. GSI आणि snow peak ह्यांची भांडी चांगल्या दर्जाची वजनाला हलकी आणि कमी जागेत मावणारी आहेत. अमेरीकेत शक्यतो सगळ्या स्पोर्टींग गुडसच्या दुकानात फ्युल कॅनिस्टर मिळतो. मोठ्या सुपरमार्केट मध्ये कोलमन चे मोठे स्टोव्ह आणि फ्युल कॅनिस्टर मिळतात ते बॅकपॅकींग पेक्षा कार कॅम्पिंगसाठी जास्त सोयीस्कर असतात.
कुकिंग किट
...
High altitude मध्ये पाणी गरम करण्यासाठी उपयुक्त असे Jetboil भांडे बर्नरसहित(पाणी गरम झाले कि यावरचा इंडिकेटर नारंगी रंगाचा होतो) आणि नेहमीच्या कॅम्पिंगसाठी फ्युल कॅनिस्टरसह पॉकेट स्टोव्ह
...

या व्यतिरिक्त कॅम्पिंग आणि हायकिंगला पूरक अश्या गोष्टी म्हणजे चांगले सोल असलेले हायकिंग शुज (शक्यतो मोठ्या हाईकच्या आधी घेऊन वापरायची सवय करावी). हायकिंग पोल, Swiss knife, Nalgene बॉटल , dry compressions sacks(कमी जागेत कपदे व इतर साहित्य मवण्यासाठी) , हेड लॅंप, कॅम्पसाइट लॅंप , हॅमक अश्या गोष्टी सुद्धा उपलब्ध आहेत.
Nalgene बॉटल आणि हॅमक पॅक, हे हॅमक सगळ्यात पहिल्या फोटोमध्ये टेन्ट्च्या मागे दिसत आहे तेच आहे. हे दोन माणसांसाठीचे हॅमक असुन दोन्ही बाजुच्या बेल्टची क्षमता प्रत्येकी २०० पौंड (साधारण ९० किलो) आहे.
.

कॅम्पिंग आणि हायकिंग साहित्य घेण्यासाठी अजून जास्त माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मी माझ्याकडे जेवढी महिती आहे तेवढी संकलीत करण्याचा हा एक प्रयत्न केला आहे. इथेही जी जाणकार मंडळी असतील त्यांनी जे काही राहून गेले असेल त्याबद्दल माहिती देऊन हे संकलन वाढवावे अशी अपेक्षा आहे.

** Exped आणि Big Agnes छायाचित्रे आंतरजालावरुन साभार

प्रतिक्रिया

रामदास's picture

29 Oct 2015 - 11:09 am | रामदास

वेगळा विषय -निटनेटकी मांडणी -उपयुक्त माहीती. येऊ देत पुढचे लेख.

पिलीयन रायडर's picture

29 Oct 2015 - 11:23 am | पिलीयन रायडर

पहिलाच प्रतिसाद रामदास काकांचा!!

इडो.. यु आर लकी!!

लेख आवडला. खुप छान माहिती दिली आहेस. कधी जर कॅम्पिंग केलं तर नक्की तुलाच गाठणार!

कॅम्पिंगमध्ये साधारणतः कोणते पदार्थ खावेत म्हणजे शक्ति टिकुन रहाते ह्या बद्दल कुणी माहिती देऊ शकेल काय?

जर ट्रेक करण्यासाठी शक्ती कशी टिकुन राहते याबद्दल विचारत असशील तर ट्रेक किती कठीण आहे त्यावर ते अवलंबुन आहे. ट्रेक मध्ये फक्त खाण्यवर हे अवलंबुन नाही. जर लांब पल्ल्याचा ट्रेक करायचा असेल तर किति अंतर चालुन जाणार आहत त्यप्रमाणे तुम्हि किती समान उचलुन नेणार हे आधिच ठरवलेलं चांगलं असतं. मग ट्रेकची तयरी म्हणुन थोडे महिने आधि काही ठराविक व्यायम करता येतो ज्याने तुमचा स्टॅमिना वढायला मदत होते. या व्यायाम प्रकारात कार्डीओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग हे दोन्ही प्रकार असतात. त्यामुळे लांब अंतर चालुन जाणे आणि सोबत सामन वाहुन नेणे या दोन्ही द्रुष्टीने तुमची शारिरीक तयारी होते.
अशी तयारी न करता एक ट्रेक स्पर्धा केली होती आणि ती चांगलीच महागात पडली होती. तेव्हा पासुन हा धडा घेतला आहे. या बद्दल नंतर कधीतरी नक्की लिहिन.

इडली डोसा's picture

29 Oct 2015 - 9:19 pm | इडली डोसा

अजुन लिहायचा नक्की प्रयत्न करेन.

बरीचशी माहिती नेटवर वाचलेली आहे परंतू प्रत्यक्ष असे प्रश्न विचारता येत नाहीत कारण वेबसाइट आणि फिरणारे लोक तीन हजार मिटरसच्या ट्रेकसबद्दल बोलतात.
१) बॅकपॅक ची मापं लिटर्समध्ये आहेत.किती किलोसाठी आहे ते पाहिजे.पाणी तीन लिटरस आणि कपडे खाणे वगैरेचे तीन असे कमीतकमी सहा किलो वजन होतेच.
२) घरापासून डोंगराच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल तर लहान बॅकपॅकच ( भारतात ) नेणे सोपे जाते.
३) एक अशी चादर /ब्लॅन्केट असते ती म्हणे पांघरून बसून विश्रांती घेता येते.बुटांवरच बसल्याने बर्फाचाही त्रास हेत नाही .ही चादर पाहिली आहे का?
४) टोपीवर जो दिवा लावतात तो कसा चार्ज करतात अथवा चार्ज केलेला किती तास टिकतो?
धन्यवाद!

इडली डोसा's picture

29 Oct 2015 - 9:30 pm | इडली डोसा

सविस्तर प्रतिसाद थोड्या वेळात देते.

१) बॅकपॅक ची मापं लिटर्समध्ये आहेत.किती किलोसाठी आहे ते पाहिजे.पाणी तीन लिटरस आणि कपडे खाणे वगैरेचे तीन असे कमीतकमी सहा किलो वजन होतेच.

- तुम्ही किति दिवसच्या ट्रेकसाठी जाता आहात आणि काय सामान सोबत घेऊन जाणार यावर मुख्यत्वे हे किती वजन होइल ते अवलंबुन आहे. मी स्वतः ४० लि. च्या बॅकपॅक मध्ये २ दिवस मुक्कमाच्या ट्रेकसाठी १० कि. पर्यंत वजन घेतले आहे. ७० लि च्या बॅकपॅक मधे माझ्या नवर्‍याने एका गिर्यारोहण ट्रेकसाठी सधरण २० -२२ कि. वजन घेतले आहे. जर तुम्ही ग्रुप बरोबर ट्रेक करणार असाल तर काही गोष्टी कोमन असतात आणि त्याप्रमाणे वजन कमी जास्त होऊ शकते.


२) घरापासून डोंगराच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल तर लहान बॅकपॅकच ( भारतात ) नेणे सोपे जाते.


बर्‍याच एक दोन दिवसांच्या ट्रेक्ससाठी हे खरे असले तरी जर तुम्ही टेंट आणि स्लीपिंग बॅग वगैरे घेऊन जाणार असाल तर लहान बॅकपॅक कदाचित पुरेसे ठरणार नाही.


३) एक अशी चादर /ब्लॅन्केट असते ती म्हणे पांघरून बसून विश्रांती घेता येते.बुटांवरच बसल्याने बर्फाचाही त्रास हेत नाही .ही चादर पाहिली आहे का?


- याबद्दल मला खात्रीशीर सांगता येणार नाही कारण हा प्रकार सहसा गिर्यारोहण करताना होत. बर्फावरुन प्रवास असेल तर त्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे ट्रेनिंग तुम्ही केले नसेल तर बर्फावरुन चालणे धोकादायक ठरु शकते. श्यकतो अश्या ट्रेक्ससाठी जाणकार आणि मार्गदर्शक लोकांबरोबरच जावे.


४) टोपीवर जो दिवा लावतात तो कसा चार्ज करतात अथवा चार्ज केलेला किती तास टिकतो?


- टोपिवर लावयचा दिवा बॅटरीज(सेल) वर चालतो. त्यात कमी प्रकाश, तीव्र प्रकाश आणि चालु - बंद असे तीन पर्याय असतात. तुम्ही कोणता पर्याय आणि किती वेळ वापरता आहात या वर त्याचा चार्ज टिकणे अवलंबुन आहे. जर जास्त वापर होणार असेल तर नेहमी जास्तीच्या बॅटरीज जवळ बळगलेल्या बर्‍या.

खाण्यासाठी मी पोळ्या आणि खजूर नेतो ,टिकतात आणि खराब होत नाही.वरचे खाणे म्हणून बोरबोन बिस्किटस, फरसाण आणि केळा वेफरस.पाणी ,कपडे सर्व आठ किलोत बसतं.

इडली डोसा's picture

29 Oct 2015 - 11:35 pm | इडली डोसा

कमी वजनात जास्त उर्जा मिळण्यासाठी ट्रेक करताना अश्या प्रकरचे एनर्जी बार सुद्धा जवळ ठेवु शकतो. .

पद्मावति's picture

29 Oct 2015 - 2:33 pm | पद्मावति

खूप सुंदर लेख. रुची विशेषांकात तुझा कॅम्पिंग मधील खाण्यावर लेख वाचल्यावर खास कॅम्पिंग वर असा लेख यावा असे मनापासून वाटतंच होते. ती इच्छा या लेखामुळे पूर्ण झाली. अजुन तुझ्या अनुभावांबदद्ल, ट्रेक्स बद्दल लिही. वाचायला खूप आवडेल. पु.ले.शु.

अगदी असेच म्हणते. ट्रेक्स इथे मी केलेत भरपूर पण कँपिंग मात्र नाही केलेलं, मी ग्लँपिंग प्रकारात मोडणारी आहे ;) . पिरा ला पडलेले प्रश्न आहेत च. अजुन ही काही प्रश्न सुचतायेत.

तुझा लेख वाचुन मात्र आता एकदा तरी कँपिंग करावं असं वाटतंय. इतकी माहिती एकत्र दिली आहेस, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आणि आता पडलेले प्रश्न इथे विचारता येईल हे उत्तम सोय आहे ..

इडली डोसा's picture

29 Oct 2015 - 9:35 pm | इडली डोसा

प्रिमिटिव कँपिंग करुन बघ एकदा. पुन्हा ग्लँपिंग करणार नाहीस.

इडली डोसा's picture

29 Oct 2015 - 9:31 pm | इडली डोसा

नक्की लिहिणार.

तर्राट जोकर's picture

29 Oct 2015 - 2:59 pm | तर्राट जोकर

ह्या विषयावर धागा काढलात याचा खूप आनंद झाला आहे.

सूड's picture

29 Oct 2015 - 7:15 pm | सूड

पुभाप्र!!

अरे वा! मस्त लेख, आवडला एकदम. आशेच अजून येऊंद्यात.

रेवती's picture

29 Oct 2015 - 7:53 pm | रेवती

माहिती आवडली.

माहिती आवडली.कँपिंग करावंसं वाटायला लावणारा लेख आहे हा!

इडली डोसा's picture

29 Oct 2015 - 9:33 pm | इडली डोसा

कँपिंग करायला. आमच्याकडे एक यकष्ट्रा टेंट आणि स्लीपिंग बॅग आहे.

इडली डोसा's picture

29 Oct 2015 - 9:34 pm | इडली डोसा

प्रतिसाद आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार!

चतुरंग's picture

29 Oct 2015 - 9:37 pm | चतुरंग

पुढल्याच समरमध्ये उपयोगात आणली जावी अशी इच्छा बळकट करणारी माहिती!

-रंगा

चांगला धागा, मस्त माहिती.

माझे दोन पैसे..

१) सोबत एखादा चांगला इन्सेक्ट रिपेलंट स्प्रे / ओडोमास / तत्सम काहीतरी घ्यावे. हे जर मिळाले नाही किंवा उपलब्ध नसेल तर एखादा किटक / पाल / उंदीर मारण्यासाठी डिओ स्प्रे किंवा मूव्ह सारखे स्प्रे वापरावेत.

२) तीन दगडांची चूल / शेकोटी करायची तर दिवसभर गोळा केलेली लाकडे प्लॅस्टीकखाली व्यवस्थीत झाकून ठेवावीत संध्याकाळी पडणार्‍या दवामुळे लाकडे चिंब भिजतात

३) शेकोटीचा प्लॅन आधीपासून असला तर सोबत कांदे व बटाटे न्यावेत, शेकोटीमध्ये खरपूस भाजावेत - मित्रमंडळींना न सांगता कांदे बटाटे सोबत नेले तर मित्रांचा दुवा मिळू शकतो.

४) शक्य असल्यास तंबूभोवती एखादा कामचलाऊ चर खणून शेकोटीमधील निखारे + बारीक काटक्या टाकून ठेवाव्यात. - कोणत्याही परिस्थीतीमध्ये ही धुमसणारी आग तंबूपर्यंत येवू देवू नये.

५) कितीही सवय / सराव असला तरी शक्यतो दोन महिन्यातून एकदा घरच्या घरी तंबू लावण्याचा व नीट पॅक करून ठेवण्याचा सराव करावा.

६) कँपींगहून परत आल्यानंतर तंबू नीट स्वच्छ करूनच मग पुन्हा नीट पॅक करावा

७) कँपींगला जाण्याआधी व परत आल्यानंतर तंबूला व्यवस्थीत ऊन / हवा द्यावी.

८) शेकोटी / चूल / चर वगैरे आगवाल्या गोष्टी काम झाल्यानंतर पाणी शिंपडून विझवाव्यात.

९) बाकी झैरात म्हणून ट्रेकिंगच्या सूचनांसाठी ट्रेक करताना.. हा धागा पहावा

...आणि हे आमचे दोन आठवड्यांपूर्वी केलेल्या ताम्हिणी घाटातले सायकल + कँपींगचे फोटो.

.

.

.

.

.

तुम्ही तम्हिणित केलेले कँपींगही मस्तच.

कंजूस's picture

30 Oct 2015 - 6:38 am | कंजूस

१)**मी ग्लँपिंग प्रकारात मोडणारी आहे ;)
ग्लॅमरस का? रोडिज श्टाइल?

२) त्या टोपीच्या दिव्याची किंमत ,एक दोन प्रकारचे फोटो असले तर टाका कुणीतरी.

३)ट्रेकिंगच्या निरनिराळ्य प्रकाराबद्दल सहमत.ते २०-२२किलो नेणाय्रांना प्रणाम.माझे एकट्याचे असल्याने टेंट,कुकिंग इत्यादीला फाटा असतो.परंतू कधीतरी अचानक जागेवर असा ग्रुप भेटतो आणि काय मज्जाच.मॅगी सूप,कॅाफी,खिचडी वगैरे पाहुणा म्हणून.

४) मोदकचा फॅन आहे . तिकडे सर्व धागे वाचले आहेत .चारपैसे टिप्स आवडल्या.

५) माझ्याकडच्या एका टोपीस सोलर पॅनेलचा पंखा आहे.( एका नातेवाइकाने भेट दिलीय ).मला त्या पॅनेलवर मोबाइल चार्जर बनवता येतो का पहायचं आहे.

६)फर्स्ट एड म्हणून फक्त चिमटा,भिंग,तुरटीचा खडा आणि पॅरसिटामोल गोळ्या नेतो.

रोडीज नाही बघितलं कधी मी पण मी म्हणतेय ते ग्लँपिंग म्हणजे : आम्ही १००० आयलंड्स पैकी एका आयलंड वर दोन दिवस राहायला गेलो होतो , आजु बाजुला कित्येक मैल कुणी नाही, शेतं पसरलेली , समोर अथांग पाणी पण आम्ही जिथे उतरलो होतो तो एक सर्व सोयी सुविधांनी लगडलेला बंगला होता ! त्यात त्या बंगल्याचा मालक टोराँटो ला फिल्म इंडस्ट्री मध्ये प्रॉपर्टी इंचार्ज होता, बरंचसं फर्निचर त्याने अनेक सेट्स वरुन विकत घेतलं होतं.. हे ग्लँपिंग ! पचमढी ला जंगलात टेंट्स भाड्याने मिळतात. आतुन ती एक एसी रूम असते आणि आजु बाजुला जंगल. अजुन एक ग्लँपिंग उदाहरण. हाडाचे कँपर्स उपहासाने वापरतात बर्‍याचदा ही टर्म , पण मला काही वाटत नाही :P

पद्मावति's picture

30 Oct 2015 - 3:23 pm | पद्मावति

स्रुजा, ग्लॅमपिंग वर काहीतरी लिही नं. मी कुठेतरी यावर एक लेख वाचला होता. त्यातही तू म्हणतेस तसे टेंट पण आतून ए.सी, बाथ रूम्स वगैरे सगळ्या सोयी असतात. थोडक्यात best of both worlds. असेही अनुभव वाचायला आवडतील.

इडली डोसा's picture

30 Oct 2015 - 7:59 am | इडली डोसा

...
कँपिंग टेबल लँप
.

या ठिकाणी हेड लँप मिळेल असे दिसते आहे. किंमत फारशी नाही पण किती टिकेल माहित नाही.

श्रीरंग_जोशी's picture

30 Oct 2015 - 9:19 am | श्रीरंग_जोशी

उपयुक्त माहिती. सध्या वर वर वाचलय. निवांत वेळ मिळाला की तपशीलात वाचून मला पडणारे प्रश्न विचारीन.

आतिवास's picture

30 Oct 2015 - 10:07 am | आतिवास

हा कॅम्पिंगच्या मोहात पाडणारा धागा.

पैसा's picture

30 Oct 2015 - 11:03 am | पैसा

खूप छान लिहिलंय! मोदक, कंजूस सगळ्यांचेच प्रतिसाद खास!

@ मोदक आणि बार्बेक्यु झालाच पाहिजे!!

@कंजूस, मोबाईल चार्जिंगसाठी सोलर पॅनेल टोपीहून जरा मोठे लागते. तीही वजनाने तशी हलकी असतात. माझ्याकडे एक सोलर मोबाईल चार्जर आहे. गाडीने जाताना लावून ठेवते. बॅटरी संपायचा प्रश्न नाही. बॅकपॅकला सोलर पॅनेल अटॅच केलेले कोणत्यातरी साईटवर पाहिले आहे. बहुतेक ईबे असावे. उत्सुकता म्हणून बघा हवे तर.

प्रीत-मोहर's picture

30 Oct 2015 - 11:06 am | प्रीत-मोहर

सुंदर माहिती इडो. आजकाल एक कॅंपिंग लॅंप बाजारत आला अाहे ; छोटासाच. त्याला सोलर चार्जर आहे इलेक्ट्रिक चार्जर ही आहे आणि बॅटरी वर ही चालतो. खूप मस्त दिसत आहे हे प्रकरण. फोटो टाकते थोड्या वेळात

कंजूस's picture

30 Oct 2015 - 11:38 am | कंजूस

माझे सोलर छोटे आहे .फोटो टाकतो नंतर.मुख्य म्हणजे मोबाइलच्या चार्जरचे व्होल्टेज मिळाले पाहिजे.4.7 असेल तर तेच शिवाय प्लस माइनस बदलता येईल नाहीतर मोबाइलचा काशी ट्रेक.

टवाळ कार्टा's picture

30 Oct 2015 - 11:41 am | टवाळ कार्टा

सोलर फॅनवाल्या टोपीत हवा लागते का त्या फॅनची? मी घेणार होतो पण फॅनची हवा किती लागते ते चेक नाही करू शकलो म्हणून नै घेतली

मोदक's picture

30 Oct 2015 - 2:09 pm | मोदक

लाईट्स आणि लँप बद्दल..

आपली नक्की गरज काय आहे ते ओळखून त्या प्रकारातले दिवे घ्यावेत. म्हणजे नेमका वापर करता येतो.

मी घेतलेले आणि वापरत असलेले दिवे,

१) बिट्वीन पोर्टेबल टॉर्च - रिचार्जेबल - डायनामो (किंमत ४५०/-)

.

हा इटुकला टॉर्च अगदी आवश्यक इतकाच प्रकाश देतो. आपण तंबूमध्ये काहीतरी शोधत असताना शेजार्‍याची झोप डिस्टर्ब न करता वापरण्यासाठी किंवा फक्त आपल्यापुरता प्रकाश हवा असेल तर वापरता येतो. अगदी कुठेही जाताना सहज खिशात बसणारा टॉर्च आहे. यात एक डायनामो असतो व त्याला मागे एक पट्टी जोडलेली आहे जी इतरवेळी टॉर्चचा एक भाग होते. ती पट्टी गोल गोल फिरवली की टॉर्च आपोआप चार्ज होतो.

२) बिट्वीन टॉर्च - रिचार्जेबल - USB (किंमत ७००/-)

.

हा USB ने रिचार्ज होणारा टॉर्च आहे. याला तीन मोड असतात. साधा लाईट, प्रखर लाईट आणि ब्लिंकर. याच्या खाली लांबवर आलेला काळा भाग आणि टॉर्चचा मागचा भाग एकत्र जोडून एक लूप तयार करता येते त्यामुळे हा टॉर्च कुठेही पटकन अडकवता येतो. ठीकठाक प्रकाशाची आवश्यकता असेल तर हा टॉर्च उपयुक्त आहे.

३) हेडलँप - रिचार्जेबल - इलेक्ट्रिसिटी

.

तुमच्याकडे हेडलँप टॉर्च असेल तर हा डोक्यावर घालून डोंगरातून चालताना, स्वयंपाक करताना किंवा कोणतेही काम करताना हात मोकळे राहतात. हा आपल्या साध्या लाईटच्या पॉईंटवर चार्ज होतो.
हेडलॅंप घेताना प्रखर परंतु आकाराने लहान असा हेडलँप घ्यावा. खूप बोजड आणि मोठा हेडलँप असेल तर कपाळावर नीट बसत नाही व वापरताना त्रास होतो.

४) ऑनलाईट LED बल्ब - रिचार्जेबल - इलेक्ट्रिसिटी

.

हा बल्ब आपल्या घरी होल्डरला अडकवून ठेवता येतो. लाईटने चार्ज होतो व हवा तेंव्हा वापरता येतो. याला हुक असल्याने कोठेही अडकवता येतो. 5 ते 18 वॅटच्या दरम्यानचे बल्ब पुरेसे असतात.

५) एव्हरेडी LED टॉर्च - पेन्सील सेल - नॉन रिचार्जेबल

.

सरळ साधा टॉर्च. यात काहीही फॅन्सी नाही. पण स्लीक डिझाईनमुळे हाताळायला सोपा जातो.

६) टेबल लँप

याची माहीती वर इडली डोसा यांनी दिली आहेच!

७) Securitying कंपनीचा एकदम प्रखर आणि पॉवरफुल टॉर्च - बॅटरी सपोर्ट आवश्यक.

.

हा अत्यंत प्रखर आणि शक्तिशाली टॉर्च आहे. (माझ्या माहितीप्रमाणे) सर्वसाधारण चारचाकीचे हेडलाईट १००० ते ३००० ल्युमेन्सचे असतात. हा छोटासा लाईट तब्बल ५००० ल्युमेन्सचा आहे. या लाईटला काहीच तोड नाही.

आणखी काही शंका असल्यास जरूर विचारा.

मधुरा देशपांडे's picture

30 Oct 2015 - 2:33 pm | मधुरा देशपांडे

माहितीपुर्ण लेख आणि प्रतिसाद.

विशाल कुलकर्णी's picture

30 Oct 2015 - 3:37 pm | विशाल कुलकर्णी

हे भारीय राव. वाचनखुण साठवली आहे.

मोदक फार आभारी.राजमाचीला एका ग्रुपने तो तीन नंबर छताला टांगून ठेवलेला.तीन चार तास कार्यक्रम चाललेला.शिवाय तैलबैलाला एका रॅाकक्लाइमिंग वाल्यांकडे ते तंबू ,पाण्याची बॅाटल पाहिली होती.ती म्हणे त्यावरून ट्रक गेला तरी चेपत नाही.काय काय अफलातून सामकन असते.

प्रीत-मोहर's picture

30 Oct 2015 - 4:21 pm | प्रीत-मोहर

camping lantern

उदय's picture

30 Oct 2015 - 9:16 pm | उदय

ही माझी चेकलिस्ट

- Reservation printout
- Directions to park and map
- रोख रक्कम

Shelter and Bedding

- टेंट आणि टेंटचे पोल्स (एकदा पोल्स विसरल्यामुळे ३ तास वाया घालवून नवीन टेंट आणावा लागला होता).
- Hammer
- Tarp
- Sleeping bags
- Headrest/pillows

Clothes

Personal Hygiene
- Toothbrush & Toothpaste
- Towel(s)
- Soap
- Comb/Brush
- Nail Clippers
- Razor
- Toilet Paper

First Aid Kit

Cleaning Items
- Broom
- Detergent
- Dish rags
- Pot Scrubber

Cooking and Dining
- Drinking water
- Food
- Cooler
- Stove
- Propane
- Charcoal
- Starter fluid + lighter
- Bottle opener, Can opener
- Utensils
- salt, herb, spices
- cooking oil
- Tea, sugar, milk
- चहाची गाळणी
- Paper plates and cups, bowls
- Plastic silverware
- Paper towels, napkin
- सुरी
- Metal Shovel
- Trash bags
- tongs and spatula
- aluminum foil

Miscellaneous Items
- Walking sticks
- Headlight
- Flashlights
- Camera & charger for camera
- Cell phone & charger
- Binoculars
- Bird guide
- Bug spray
- Clothes pins
- Duct tape
- Swiss Knife
- Lantern
- Matchbox
- Pen and paper
- Rope
- Whistle
- Playing cards
- Battery cells (size C and D)
- Bulb
- Electric extension cord

इडली डोसा's picture

30 Oct 2015 - 9:56 pm | इडली डोसा

तुमची लिस्ट कार कॅंपिंगसाठी अगदी परिपुर्ण आहे.

उदय तिकडे दुसरं घर करता की काय?

एका नातेवाइकाच्या फार्महाउसवर त्याच्याबरेबर गेलो होतो. तिकडे गेल्यावर पिठलं भात किंवा खिचडी करू मजा येईल.स्टोवची पिन विसरल्याने ---एक बिस्किटाचा पुड्यावर रात्र काढावी लागली.

मुक्त विहारि's picture

31 Oct 2015 - 6:58 am | मुक्त विहारि

मिपावर यायचे सार्थक झाले.

वाखूसा.

पुभाप्र.

भ.खे., स.कु., इत्यादी मान्यवर ट्रेकर्सनी अधिक माहिती दिल्यास फार उत्तम.

गावाबाहेरच्या विहिरीतून,बोअरवेल,गडावरच्या टाक्यांतून पाणी घेण्यास उपयोगी डबा तीस फुट दोरीसह.पाण्याची बॅाटल त्यातच ठेवता येते.इतर कामासाठीही वापरता येतो.
बरेच डबे हट्टी असतात.पाण्यात डुबत नाहीत.

डब्याच्या एकाच कानाला दोरी गुंडाळली आहे का?

पियुशा's picture

2 Nov 2015 - 10:05 am | पियुशा

अतिशय माहीतीपुर्ण लेख :)