कॅम्पिंग हा प्रकार वेगळ्या नावाने आपण भारतात करतच असतो. असे ट्रेक्स जेव्हा आपण दिवसभर वणवण करून कोण्या एका गडावर जातो ,तिथल्या मंदिरात किंवा गुहेत पथारी पसरतो. भोवतालचे तीन दगड एकत्र करून सोबत नेलेल्या सामानातून काही बाही शिजवून खातो आणि सोबत आणलेल्या पांघरुणात मस्त ताणून देतो. थोड्याफार फरकाने या अश्याच प्रकाराला बाहेरच्या देशांमधे हायकिंगआणि कॅम्पिंग म्हणतात. पुण्यात राहत असताना सह्याद्रीमध्ये एक दोन दिवसचे मुक्कामी नाईट ट्रेक भरपूर केले . तेव्हा हायकिंग आणि कॅम्पिंगसाठी कश्या प्रकारच्या गोष्टी उपलब्ध असतात ह्याची फारच जुजबी माहिती होती. आत्ता माझ्याकडे जे काही हायकिंग आणि कॅम्पिंग साहित्य आहे ते जर माझ्याकडे भारतात असताना देखील असले असते तर त्या ट्रेक्सना अजून धमाल आली असती.
आम्ही भारतातही बरंच ट्रेकींग केल्यामुळे अमेरिकेत आल्यावर सुद्धा इथे आपल्याला कुठे कुठे जाता येईल याचा अंदाज घ्यायला सुरुवात झाली आणि इथेही ट्रेकींग आणि त्याच्या जोडीने कॅम्पिंग सुरु झालं . हळु हळु जे गरजेचं आहे ते कॅम्पिंगच सामान आमच्याकडे जमा होत गेलं. त्याचीच माहिती या लेखात द्यायचा प्रयत्न आहे.
सुरुवातीला टेंट बद्दल बघू, कुठेही (भौगोलीक दृष्ट्या) आणि वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानात वापरण्यायोग्य टेंट हवा असेल तर डबल वॉल्ड, थ्री सीजन, वेस्टिब्युल असलेला टेंट घेतलेला चांगला. वेस्टिब्युल म्हणजे टेंटच्या दारासमोर थोडा आडोसा असलेला भाग , याचा उपयोग पावसात स्टोव्हवर खाणे तयार करण्यासाठी किंवा जास्तीचे सामान ठेवण्यासाठी होतो. जर मुख्यत्वे बॅकपॅकिंग प्रकारचे कॅम्पिंग करायचे असल्यास हलका साधारण दोन किलोच्या आसपास (पाच पौंड पेक्षा कमी )वजन असलेला टेंट घेतलेला बरा.
खालच्या फोटोमध्ये टेंटच्या समोरच्या भागात जो ताणून पुढे आलेला भाग आहे तोच वेस्टिब्युल एरिया
अजुन एक महत्वाची गोष्ट म्हणजे बॅकपॅक किंवा रकसॅक - ऑस्प्रे(Osprey) कंपनी अप्रतीम बॅकपॅक बनवण्यात अग्रेसर आहे. डॉयटर (Deuter) कंपनीसुद्धा चांगल्या प्रकारच्या बॅकपॅक बनवते. भारतात अॅडवेंचर वल्ड या कंपनीच्याही बॅकपॅक मिळतात. जर उद्देश नुसते एक दिवसाचेच ट्रेक्स करायचा असेल तर साधारण २० ते ३० लि. ची बॅकपॅक पुरेशी असते पण २ -३ दिवसांच्या ट्रेकसाठी ५०लि आणि ५ पेक्षा अधिक दिवसांच्या ट्रेकसाठी ७० लि. ची बॅकपॅक असेल तर सगळे सामान त्यात व्यवस्थित बसते.
माझ्याकडे ५० लि. ची अॅडवेंचर वल्डची बॅकपॅक आहे तर नवऱ्याकडे अॅडवेंचर वल्ड आणि ऑस्प्रेची ७०लि. ची. अॅडवेंचर वल्डच्या बॅगला खांद्यावर येणाऱ्या पट्यांना चांगले कुशनिंग आहे तसेच बॅग हेलकावे न खाता पाठीवर व्यवस्थित बसण्यासाठी कमरेला बांधायला सुद्धा एक पट्टा आहे. पाठीला आधारासाठी बॅगच्या आतल्या बाजुला दोन अल्युमिनीयमच्या पट्ट्या आहेत. ऑस्प्रेच्या बॅगला सुद्धा असेच खांद्याचे आणि कमरेचे पट्टे आहेत पण पाठीला वरपासुन खाली पर्यंत आधार देणारे जास्त चांगले पॅडिंग आहे.
फोटो अॅडवेंचर वल्डची बॅकपॅक आणि ऑस्प्रेची बॅकपॅक
.
आता स्लीपिंग बॅग आणि स्लीपिंग पॅड/मॅट निवडीबद्दल थोडी माहिती घेऊया .
साधारणत: स्प्रिंग, समर ,फॉल या दरम्यान कॅम्पिंग करायचे असल्यास २० ते ३० डिग्री फॅरनाईट (- ६ ते -१ डिग्री सेल्सिअस ) साठी तयार केलेली स्लीपिंग बॅग पुरेशी होईल तर low altitude विंटर कॅम्पिंगसाठी ० ते १५ फॅरनाईट(- १८ ते -९ डिग्री सेल्सिअस) साठी तयार केलेली स्लीपिंग बॅग घ्यावी. डाऊन आणि सिंथेटीक अश्या दोन प्रकारच्या स्लीपिंग बॅग असतात. सिंथेटीक प्रकारची स्लीपिंग बॅग ही डाऊनच्या तुलनेत थोडी जड असते पण ओली झाल्यास लवकर वाळते.
डाऊन (नारंगी)आणि सिंथेटीक (निळी) स्लीपिंग बॅग.
स्लीपिंग पॅड निवडताना त्याचे R रेटिंग महत्वाचे असते. जेवढे जास्त R रेटिंग तेवढे चांगले इन्सुलेशन पण तेवढेच जास्त वजनही वाढते मग या स्लीपिंग पॅडचे. ३ R रेटिंग असलेले स्लीपिंग पॅड वेगवेगळ्या वातावरणातल्या कॅम्पिंगसाठी पुरेसे होऊ शकते आणि त्यामानाने वजनाने देखील हलके असते. काही फुगवून वापरायची स्लीपिंग पॅडस कमी जागा व्यापणारी आणि वजनाने हलकी अशी असतात . Therm-a-rest, Exped, Big Agnes यांची स्लीपिंग पॅड चांगली आहेत. अगदीच हलके काही हवे असेल तर फोमचे स्लीपिंग मॅट ही मिळतात पण यात इन्सुलेशन फारच कमी असते.
**Exped आणि Big Agnes
.
Exped आणि Big Agnes गुंडाळी केल्यानंतर आकाराची कल्पना येण्यासाठी Nalgene बॉटल बरोबर
आता कॅम्पसाइटवर खाणे तयार करण्याच्या दृष्टीने महत्वाच्या गोष्टी म्हणजे स्वयंपाकाचा स्टोव्ह आणि भांडी
MSR या कंपनीचे Whisperlite / Dragonfly हे दोन स्टोव्ह वेगवेगळ्या इंधनावर (multiple fuel) वापरता येतात. त्यामुळे ते भारताबाहेर आणि भारतातही तेवढ्याच सहजतेने वापरता येऊ शकतात, शिवाय high altitude आणि थंड विरळ हवेत सुद्धा हे स्टोव्ह चांगले चालतात. GSI आणि snow peak ह्यांची भांडी चांगल्या दर्जाची वजनाला हलकी आणि कमी जागेत मावणारी आहेत. अमेरीकेत शक्यतो सगळ्या स्पोर्टींग गुडसच्या दुकानात फ्युल कॅनिस्टर मिळतो. मोठ्या सुपरमार्केट मध्ये कोलमन चे मोठे स्टोव्ह आणि फ्युल कॅनिस्टर मिळतात ते बॅकपॅकींग पेक्षा कार कॅम्पिंगसाठी जास्त सोयीस्कर असतात.
कुकिंग किट
.
High altitude मध्ये पाणी गरम करण्यासाठी उपयुक्त असे Jetboil भांडे बर्नरसहित(पाणी गरम झाले कि यावरचा इंडिकेटर नारंगी रंगाचा होतो) आणि नेहमीच्या कॅम्पिंगसाठी फ्युल कॅनिस्टरसह पॉकेट स्टोव्ह
.
या व्यतिरिक्त कॅम्पिंग आणि हायकिंगला पूरक अश्या गोष्टी म्हणजे चांगले सोल असलेले हायकिंग शुज (शक्यतो मोठ्या हाईकच्या आधी घेऊन वापरायची सवय करावी). हायकिंग पोल, Swiss knife, Nalgene बॉटल , dry compressions sacks(कमी जागेत कपदे व इतर साहित्य मवण्यासाठी) , हेड लॅंप, कॅम्पसाइट लॅंप , हॅमक अश्या गोष्टी सुद्धा उपलब्ध आहेत.
Nalgene बॉटल आणि हॅमक पॅक, हे हॅमक सगळ्यात पहिल्या फोटोमध्ये टेन्ट्च्या मागे दिसत आहे तेच आहे. हे दोन माणसांसाठीचे हॅमक असुन दोन्ही बाजुच्या बेल्टची क्षमता प्रत्येकी २०० पौंड (साधारण ९० किलो) आहे.
कॅम्पिंग आणि हायकिंग साहित्य घेण्यासाठी अजून जास्त माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मी माझ्याकडे जेवढी महिती आहे तेवढी संकलीत करण्याचा हा एक प्रयत्न केला आहे. इथेही जी जाणकार मंडळी असतील त्यांनी जे काही राहून गेले असेल त्याबद्दल माहिती देऊन हे संकलन वाढवावे अशी अपेक्षा आहे.
** Exped आणि Big Agnes छायाचित्रे आंतरजालावरुन साभार
अजुन एक महत्वाची गोष्ट म्हणजे बॅकपॅक किंवा रकसॅक - ऑस्प्रे(Osprey) कंपनी अप्रतीम बॅकपॅक बनवण्यात अग्रेसर आहे. डॉयटर (Deuter) कंपनीसुद्धा चांगल्या प्रकारच्या बॅकपॅक बनवते. भारतात अॅडवेंचर वल्ड या कंपनीच्याही बॅकपॅक मिळतात. जर उद्देश नुसते एक दिवसाचेच ट्रेक्स करायचा असेल तर साधारण २० ते ३० लि. ची बॅकपॅक पुरेशी असते पण २ -३ दिवसांच्या ट्रेकसाठी ५०लि आणि ५ पेक्षा अधिक दिवसांच्या ट्रेकसाठी ७० लि. ची बॅकपॅक असेल तर सगळे सामान त्यात व्यवस्थित बसते.
माझ्याकडे ५० लि. ची अॅडवेंचर वल्डची बॅकपॅक आहे तर नवऱ्याकडे अॅडवेंचर वल्ड आणि ऑस्प्रेची ७०लि. ची. अॅडवेंचर वल्डच्या बॅगला खांद्यावर येणाऱ्या पट्यांना चांगले कुशनिंग आहे तसेच बॅग हेलकावे न खाता पाठीवर व्यवस्थित बसण्यासाठी कमरेला बांधायला सुद्धा एक पट्टा आहे. पाठीला आधारासाठी बॅगच्या आतल्या बाजुला दोन अल्युमिनीयमच्या पट्ट्या आहेत. ऑस्प्रेच्या बॅगला सुद्धा असेच खांद्याचे आणि कमरेचे पट्टे आहेत पण पाठीला वरपासुन खाली पर्यंत आधार देणारे जास्त चांगले पॅडिंग आहे.
फोटो अॅडवेंचर वल्डची बॅकपॅक आणि ऑस्प्रेची बॅकपॅक
.
.
या व्यतिरिक्त कॅम्पिंग आणि हायकिंगला पूरक अश्या गोष्टी म्हणजे चांगले सोल असलेले हायकिंग शुज (शक्यतो मोठ्या हाईकच्या आधी घेऊन वापरायची सवय करावी). हायकिंग पोल, Swiss knife, Nalgene बॉटल , dry compressions sacks(कमी जागेत कपदे व इतर साहित्य मवण्यासाठी) , हेड लॅंप, कॅम्पसाइट लॅंप , हॅमक अश्या गोष्टी सुद्धा उपलब्ध आहेत.
Nalgene बॉटल आणि हॅमक पॅक, हे हॅमक सगळ्यात पहिल्या फोटोमध्ये टेन्ट्च्या मागे दिसत आहे तेच आहे. हे दोन माणसांसाठीचे हॅमक असुन दोन्ही बाजुच्या बेल्टची क्षमता प्रत्येकी २०० पौंड (साधारण ९० किलो) आहे.
वाचने
12993
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन
पहिलाच प्रतिसाद रामदास
In reply to अभिनंदन by रामदास
पि. रा. शक्ती म्हणजे स्टॅमिना म्हणायचं आहे का?
In reply to पहिलाच प्रतिसाद रामदास by पिलीयन रायडर
धन्यवाद!
In reply to अभिनंदन by रामदास
बरीचशी माहिती नेटवर वाचलेली
धन्यवाद!
In reply to बरीचशी माहिती नेटवर वाचलेली by कंजूस
काही शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करते
In reply to बरीचशी माहिती नेटवर वाचलेली by कंजूस
खाण्यासाठी मी पोळ्या आणि खजूर
कमी वजन आणि जास्त उर्जा
In reply to खाण्यासाठी मी पोळ्या आणि खजूर by कंजूस
खूप सुंदर लेख. रुची
अगदी असेच म्हणते. ट्रेक्स इथे
In reply to खूप सुंदर लेख. रुची by पद्मावति
प्रिमिटिव करुन बघ
In reply to अगदी असेच म्हणते. ट्रेक्स इथे by स्रुजा
पद्मावति अजुन
In reply to खूप सुंदर लेख. रुची by पद्मावति
ह्या विषयावर धागा काढलात याचा
पुभाप्र!!
अरे वा! मस्त लेख, आवडला एकदम.
माहिती आवडली.
माहिती आवडली.कँपिंग करावंसं
या मग
In reply to माहिती आवडली.कँपिंग करावंसं by अजया
सगळ्यांचे आभार!
ब्येष्ट!
चांगला धागा, मस्त माहिती.
मोदक साहेब ...भारी धागा आहे तुमचा.
१)**मी ग्लँपिंग प्रकारात
रोडीज नाही बघितलं कधी मी पण
In reply to १)**मी ग्लँपिंग प्रकारात by कंजूस
स्रुजा, ग्लॅमपिंग वर काहीतरी
In reply to रोडीज नाही बघितलं कधी मी पण by स्रुजा
हेड लँप आणि कँपिंग टेबल लँप
उपयुक्त माहिती
आवडला
झकास!
सुंदर माहिती इडो. आजकाल एक
माझे सोलर छोटे आहे .फोटो
सोलर फॅनवाल्या टोपीत हवा
In reply to माझे सोलर छोटे आहे .फोटो by कंजूस
लाईट्स आणि लँप बद्दल..
माहितीपुर्ण लेख आणि प्रतिसाद.
हे भारीय राव. वाचनखुण साठवली
मोदक फार आभारी.राजमाचीला एका
हे बघा बर कसय
अजुन एक लिंक
माझी चेकलिस्ट
धन्यवाद उदय
In reply to माझी चेकलिस्ट by उदय
उदय तिकडे दुसरं घर करता की
मस्त धागा....
गावाबाहेरच्या विहिरीतून
डब्याच्या एकाच कानाला दोरी
In reply to गावाबाहेरच्या विहिरीतून by कंजूस
अतिशय माहीतीपुर्ण लेख :)