फ्रटेटो(इटालियन ओम्लेट)

वृषाली's picture
वृषाली in पाककृती
4 Sep 2008 - 5:22 pm

फ़्रटेटो (इटालिअन ओम्लेट)

साहित्य: ४ अंडी , चीज,सिमला मिरची(लाल,हिरवी,पिवळी), १ कांदा,१ टोमॆटो, लसुन पाकळ्या १/२,काळीमिरी पुड,मीठ,बटर,हिरवी मिरची,तिखट,हर्ब(इटालियन सिजनींग्स).

कृती:--------

प्रथम पॅन मध्ये बटर घालुन त्यात कांदा, टोमॆटो ,सिमला मिरची, बारीक चिरलेली लसुन परतुन घ्या.नंतर त्यात हिरवी मिरची घाला.थोडेसे तिखट,काळेमिरी पुड टाका.थोडे मीठ घाला.अंडयामधे चीज टाकुन ते चांगले फ़ेटुन घ्या .हे मिश्रण पॅन मध्ये टाका.वरुन हर्ब भुरभुरा.२ मिनटे झाकण ठेवा.हे परतवु नका. असेच पॅ न मधुन अलगद डीश मध्ये सर्व करा.
तुमचे फ़्रटेटो खाण्यासाठी तयार.:H

प्रतिक्रिया

निशा's picture

4 Sep 2008 - 5:34 pm | निशा

छान रेसिपी आहे. करून बघेल.

जैनाचं कार्ट's picture

4 Sep 2008 - 5:35 pm | जैनाचं कार्ट (not verified)

अरे वा !

एकदम सोपं आहे... ऋचा अजून एक डीश भेटली मला ट्राय करायला ;)

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

ऋषिकेश's picture

4 Sep 2008 - 6:19 pm | ऋषिकेश

वा! मस्तच वाटली कृती.. करून बघितली पाहिजे.
एखादा फोटूपण डकव ना!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Sep 2008 - 8:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्हाला चिकन इत्यादी काही त्यात घालायचं असेल तर तेही घालता येईल. स्पॅनिश लोक ते जरा जाडसर बनवता, त्याला ते टॉर्टीया (tortilla) म्हणतात.

प्रभाकर पेठकर's picture

4 Sep 2008 - 9:33 pm | प्रभाकर पेठकर

फिलिपिनो लोकं अशा तर्‍हेचा पदार्थ बनवितात त्याला 'फुआँग' की काय म्हणतात.
'चिकन फुआँग', 'क्रॅब फुआँग','प्रॉन्स फुआँग' असे विविध 'फुआँग' बनवितात.

धनंजय's picture

5 Sep 2008 - 2:48 am | धनंजय

यात शिजलेल्या बटाट्याचे तुकडे जरूर असतात.

मेक्सिकन आणि स्पॅनिश तोर्तिया मध्ये फरक असतो - मेक्सिकोमध्ये (आणि त्या अनुषंगाने संयुक्त राज्यांत) मैद्याच्या किंवा मक्याच्या पिठाच्या पोळीला तोर्तिया (टॉर्टिया) म्हणतात. स्पेनमध्ये १_६ म्हणतात त्याप्रमाणे या नावाचा ऑम्लेटचा प्रकार आहे. थाळीवजा खोल तव्यात शिजवलेले बटाट्यांचे तुकडे (वगैरे) फेटलेल्या अंड्यांबरोबर कमी आचेवर भाजून ही जाड "अंड्या-बटाट्याची पोळी" तयार करतात.

स्वप्निल..'s picture

5 Sep 2008 - 2:41 am | स्वप्निल..

मला वाटते की टॉर्टीया (tortilla) हा पोळी सारखा असतो.

बाकी हा पदार्थ करुन बघायला पाहीजे.

स्वप्निल..

संयुक्त राज्यांत (यू एसमध्ये) इटालियन खानावळींमध्ये मागवलेले पदार्थ घसघशीत प्रमाणात वाढतात, अशी ख्याती आहे.

दहा वर्षांपूर्वी मी एका इटालियन खानावळीत फ्रित्ताता मागवले, तर खानावळीच्या मालकाने सांगितले - तू जर थाळीत वाढलेला पदार्थ पूर्ण खाऊ शकलास तर तुझा फोटो काढून भिंतीवर लावू - त्याने भिंतीवरचे काही फोटो दाखवले. फोटोमधली मंडळी म्हणजे वजनदार नग होते, आणि माझी प्रकृती तशी किरकोळ होती.

खानावळवाल्याला माहीत नव्हते - (१) आमच्या घरी ताट स्वच्छ केल्याशिवाय आई ताटावरून उठू देत नसे, आणि (२) कॉलेजच्या वसतीगृहात मी अचाट सर्वभक्षी झालो होतो.

त्या "मॉम्स किचन" खानावळीत कित्येक वर्षे माझेही चित्र भिंतीवर लावले होते!

हाय हाय! वय गेले तसे ते पोलादी पोट गेले, ती शिडशिडीत शरीरयष्टीही गेली! आजकाल मी सॉसेज, हॅम, शक्यतोवर खातच नाही, अंडीही क्वचितच खातो, त्यामुळे या पराक्रमाची पुनरावृत्ती बहुधा होणे नाही.

विसोबा खेचर's picture

5 Sep 2008 - 8:25 am | विसोबा खेचर

पाकृ मस्तच. नक्की करून पाहणार...!

वृषाली, जमल्यास पाकृंचे फोटूही सोबत जोडलेस तर बरे होईल.... :)

आपला,
(आम्लेटप्रेमी) तात्या.

दिप्ती's picture

5 Sep 2008 - 4:44 pm | दिप्ती

छानच !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!