इंग्रजी विकिपीडियावर SWOT analysis नावाचा लेख उपलब्ध आहे. स्वॉट मध्ये सामर्थ्य, कमकुवतता, संधी आणि जोखीम यांचे विश्लेषण केले जाते याची बहुतेकांना कल्पना असेल.
एक तर मराठी विकिपीडियावर या संबंधाने लेख लिहिण्याचा माझा वेळ वाचवण्यासाठी मला माहिती लिहून अथवा अनुवादीत करून हवी आहे.
सर्वसाधारण चर्चेसाठी काही मुद्दे
* स्वॉट विश्लेषण म्हणजे काय ?
* आपण स्वॉट विश्लेषण कधी केले आहे का ?
* आपल्या निर्णय प्रक्रीयेत स्वॉट विश्लेषणे आपण कधी केली आहेत का ? अशा विश्लेषंणावर आधारीत आपण निर्णय घेऊन अंमल बजावणी केली आहे का ?
* स्वॉट विश्लेषण आपण वापरले असेल तर स्वॉट विश्लेषण टेक्नीकचे स्वॉट विश्लेषण आपण कसे कराल ?
* खाली स्वॉट विश्लेषण ओळख चित्र दर्शविले आहे. (अनुवाद साहाय्य मिपा सदस्यः गॅरी ट्रुमन)
** या चित्राची अधिक चांगली (शक्य झाल्यास एस व्ही जी आवृत्ती बनवून) विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात अद्ययावत करुन हवी आहे.
* या धागा चर्चेतील आपले प्रतिसाद विकिप्रकल्पातून वापरले जाऊ शकतात म्हणून कॉपीराइटमुक्त गृहीत धरले जातील.
* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतर टाळण्यासाठी आभार
प्रतिक्रिया
24 Oct 2015 - 1:16 pm | असंका
विकीवर दिसणारा लेख मराठीत अनुवाद करून हवा आहे? असा अनुवादित लेख तुम्ही मराठी म्हणून उपलब्ध करून देऊ शकता?