अपरिग्रह

बाजीगर's picture
बाजीगर in जनातलं, मनातलं
19 Oct 2015 - 5:52 am

मावशी थायलंड ला चाललीस न ,येतांना माझ्यासाठी पेन्सील शार्पनर्स आणायला विसरू नकोस" राजू मावशीला म्हणाला.पलीकडून मावशी म्हणाली "अरे तू सांगायला विसरला असतास तरी मी आणायचे ठरवलेच आहे, कारण स्टेशनरी मध्ये पेन्सील शार्पनर्स बघीतली कि आम्हाला तूच आठवतोस .किचन म्हधून आई कौतुकाने ऐकत होती.

राजूचा पेन्सील शार्पनर्स चा संग्रह प्रचंडच वाढला होता.वेगवेगळ्या रंगांचा ,आकारांचा हा संग्रह पाहून घरात येणारे इम्प्रेस होत ,मग राजूची कॉलर टाइट.रोज ती ढीगभर पेन्सील शार्पनर्स राजू पुसून ठेवायचा आणि शाळेतून आला कि आधी त्या कॉर्नरवर एक नजर टाकणार, जर एक हि वस्तू एकद्च तिकडे झाली कि त्याला कळायचे मग राजूचा त्रागा आणि आईला त्रास हे रोजचेच झालेले.
त्या संग्रहाला राजूच्या आठवणीही निगडीत झाल्या होत्या ,जसे हे शार्पनर ह्या दुकानातून घेतले, ते त्या मावशीने गिफ्ट दिले , हे राहुलने मागितले पण राजूने साफ नकार दिला ,ते पपांनी बंगलोर हून आणले ,हे आईकडून तुटले ,प्रचंड गोंधळ धातल्यावर पपांनी फेविकोलने जोडून दिले, वगैरे वगैरे.संग्रह दिवसेंदिवस वाढत चालला.कीर्ती शाळेतही पोचली. मग ज्यांना माहित नाही तेबघायला घरी यायचे.म्हणायचे," वॉव, राजू तू ग्रेट आहेस" , आई कौतुकाने पहायची आणि राजूची छाती गर्वाने फुगायची .

राजू नसला कि पपा त्या कॉर्नर कडे पहात ,हे फार होतेय असे ते म्हणत ,आई लाही ते पटत होत पण करणार काय ,राजूला दुखवणे त्या दोघांच्याही बसकी बात नव्हती .

आणि हे काका आले.उद्या राजूची परीक्षा ,त्यात घरचे काम ,स्वयंपाक, आईची धांदल उडालेली,राजूचा अभ्यास झाला होता पण रिव्हिजन बाकी होती ,आईने काकानाच विचारले ,राजूला त्या धड्याचे प्रश्न विचारता का म्हणून .काकांनी पुस्तक उघडले ,विचारले कुठला धडाआणि स्वत:च वाचत बसले ,अगदी हरवूनच गेले जणू.
राजूने त्यांना भानावर आणले ,म्हणाला विचारा प्रश्न, आणि काकांनी प्रश्न विचारायचा अवकाश ,राजूचे धडधड उत्तर येत होते ,आई समाधानाने हसली पण तिला एका गोष्टीचे आश्चर्य वाटले कि काकांकडून अजून राजूला शाबासकी सारखे शब्द निघत नव्हते .इकडे राजुही विचारात पडला कि काका मंद आहेत का .

काकांनी सर्व प्रश्न संपल्यावर ,विचारले ,"राजू,अपरिग्रह म्हणजे काय ?".तिकडे आई चपापली, हा प्रश्न काही उद्या शाळेत विचारणार नव्हते .पण राजू म्हणाला सांगतो.आई उत्सुकतेने वाट पाहू लागली. राजू नेहमी बोर्नविटा रॅपीड फायर प्रश्नांच्या वेळी होतो तसा अस्वस्थ होऊ लागला,पण काकांनी त्याला शांत केले ,"यु टेक युवर टाइम ", म्हणून ते शांतपणे,त्याच्याकडे उत्तेजनात्मक ,आश्वासक नजरेने बघत राहिले.आपण ह्यांना मनात उगाच "मंद" म्हणालो असे राजूला आता वाटले ,स्पर्धेची भावना निघून गेल्यावर त्याला चक्क शांत वाटले."हाच प्रश्न वर्गात रोहनने विचारला होता" राजू म्हणाला , काका स्मित करून ऐकत होते.राजू ने विचारात हरवत जवळचा पपांचा शब्दकोश घेतला, याचा अर्थ संग्रह च्या विरुद्ध .काकांनी हळूच पेन्सील शार्पनर्सरच्या संग्रहाकडे नजर टाकल्याचे राजूच्या नजरेतून सुटले नाही.
राजू म्हणाला ," बुद्ध म्हणाले होते ,सर्व दुखाचे कारण म्हणजे तृष्णा, हाव.म्हणून आपण 'अपरिग्रह ' अंगिकारले पाहिजे." आणि अपरिग्रह म्हणजे संग्रह न करणे.
काकांनी कौतुकाने मन डोलावली व पाठीवर प्रेमाने शाबासकी दिली.
आई हसतच बाहेर आली म्हणाली "वा, आज अभ्यास अगदी आदर्श चाललाय ,चक्क शब्दकोश बघून उत्तर म्हणजे कमालच झाली".
पण राजू नेहमीसारखा फुशारला नाही ,त्याचा चेहरा विचारी दिसत होता , काकाही विचारात पडले होते.स्वत:शीच बोलल्यासारखा राजू म्हणाला, सर्व दुखाचे कारण म्हणजे तृष्णा, हाव. आणि अपरिग्रह म्हणजे ....पुढचे शब्द तो बोलला नाही फक्त शार्पनारच्या संग्रहाकडे पाहत उभा राहिला.
काका म्हणाले ,"येस,राजू उद्याच्या परीक्षेत तुला ह्या धड्या वरचे चार मार्क्स तुला नक्की मिळतील " तेवढे पुरेसे आहेत कि त्या पेक्षा जास्त काही हवे. तू हुशार आहेस आणि तू अलरेडी त्या विचाराजवळ पोचला आहेस ,तुला तू सांगतो आणि करतो आहेस यातील तफावत जाणवली आहे ,
पपा केव्हा आले ते कुणालाच कळले नव्हते ,ते हि उत्सुकतेने पाहत होते कि याला न दुखवता कसे सांगायचे .
काकांनी विचारले,"मग करणार का आपल्यासंग्रहाचा त्याग?"
पपा आणि आई जागीच थरारले, कीती मेहनत केली होती पोराने ,आता तो बिथरणार बहुतेक..
पण तसे काहीच झाले नाही, बहाद्दर निर्भय निघाला , "काका,आई,पपा तुम्हीच सांगा ,हा संग्रह मी कसा डीस्पर्स करू?"
आईच्या डोळ्यात पाणीच आले ,पपानी नाकाने सु सु आवाज काढला , मग काकाच म्हणाले,"उद्या बुद्ध पोर्णिमा ना , मग हा धडा शिकण्यासाठी या पेक्षा चांगला दिवस कोणता"
" उद्याच शाळेत मित्रांना / शिक्षकांना कळव तू 'अपरिग्रह' भावनेचा आदर करण्यासाठी सर्वांची मदत मागणार आहेस, जवळच्या अनाथाश्रमातील छोट्या मित्रानाहीबोलव.आणि जातांना त्यांना एकेक शार्पनर्स घेऊन जायला सांग.
एक छानसा फोटो काढ या संग्रहाचा सर्व मित्रांसमवेत , एक वही ठेव ,त्यात लिहायला सांग ,मित्रांना काय वाटले तुझ्या अपरिग्रह ह्या साहसाविषयी.
राजूच्या चेहऱ्यावरचे निश्चयी भाव आता नेहमीच्या हसण्यामध्ये बदलले.आता मला तो धडा खरा कळला तो म्हणाला,उद्याच करतो ठरल्यासारखे , अपरिग्रह केल्यापासून टेन्शन जाऊन छान मोकळ वाटतय".
फुल मार्क्स काका मनापासून म्हणाले.

बालकथाविचार

प्रतिक्रिया

चुकीचा संदेश दिला जातो आहे या कथेतून असं नाही का वाटत?मुलांचा छंद आणि एकदम अपरिग्रह वगैरे?

तर्राट जोकर's picture

19 Oct 2015 - 4:44 pm | तर्राट जोकर

सहमत... या कथेतून लेखकाच्या मनात डोकावता येईल काय अशी शंका आली.

चांदणे संदीप's picture

19 Oct 2015 - 8:01 am | चांदणे संदीप

सविस्तर प्रतिसाद नंतर देतो.

कपाळावर हात मारल्याची स्मायली कल्पावी.

टवाळ कार्टा's picture

19 Oct 2015 - 4:21 pm | टवाळ कार्टा

कोणाच्या ?

द-बाहुबली's picture

19 Oct 2015 - 4:34 pm | द-बाहुबली

स्मायलीच्या...!

आदूबाळ's picture

19 Oct 2015 - 4:39 pm | आदूबाळ

काहीही हां...

मोठा झाल्यावर याच पोराला "बी हंग्री बी फूलिश" किंवा "यू क्यान विन" वाचायला लावणार...

तर्राट जोकर's picture

19 Oct 2015 - 4:50 pm | तर्राट जोकर

अगदी अगदी...

अपरिग्रहची भावना फार फार पुढची आहे. आपल्याजवळ जे नाही ते आधी मिळवावे. ते मनसोक्त उपभोगतांनाही त्याबद्दल नो-अटॅचमेंट ची भावना ठेवणे म्हणजे अपरिग्रह. या कथेत काका येण्याआधीचे प्रसंग योग्य आहेत पण त्यातून (किलर अटॅचमेंट) मुलाला बाहेर काढण्यासाठी अपरिग्रह हे हत्यार फारच असंबद्ध वाटते.

दिवाकर कुलकर्णी's picture

19 Oct 2015 - 10:01 pm | दिवाकर कुलकर्णी

मुलाना नव्हे तर मोठ्यानाहि अपरिग्रह नीच ऊच्चारता येईल का,
अर्थ नीट कळेल कां,
राजू अभ्यासातहि चांगला आहे ,मग कसली काळजी
त्यानं खोड रबराचाहि साठा करावा

चांदणे संदीप's picture

19 Oct 2015 - 10:29 pm | चांदणे संदीप

वर कंजूस म्हणतात तसं, अगदी चुकीचा संदेश जातोय खरा! पण तुम्ही स्वत: कोणता दृष्टीकोन बाळगून लिहिताय ते माहित करूनच पुढच बोलतो!
लेखाविषयीच बोलायच झाल आणि त्यातून कुणी काय घ्याव अस सांगायच झाल तर माझ मत अस आहे की असे नतद्रष्ट काका नसलेलेच बरे! कारण, अरे मुलगा हुशार आहे आणि ज्या वयात काहीतरी जमवणे वगैरेंसारखा अगदी नॉर्मल असा छंद त्याला आहे तर त्याला त्यापासून का परावृत्त करायच??
प्रत्येकाने काहीना काही छंद जोपासला पाहिजे, दुस-यांच्या छंदाला प्रोत्साहन दिले पाहिजे अर्थात विधायक असेल तरच! मी अशीही माणस बघीतली आहेत की ज्यांना कसला छंद, आवडच नसते. मग फावल्या वेळेत काय कराव याचं त्यांना 'झोपा काढाव्या' यापेक्षा चांगल उत्तर सापडत नाही. वर दुस-यांच्या आवडींना छंदाला रिकामे उद्योग वगैरे म्हणण्याच काम हे लोक अतिशय हिरिरीने करतात.
अशा काकांना कोप्रापासून ____/\____
(लेख वाचून वैतागलेला)
Sandy

उगा काहितरीच's picture

20 Oct 2015 - 12:03 am | उगा काहितरीच

सर्व जण कशाचा न कशाचा संग्रह करीतच असतात. मग काय सगळे वाईटच का ? अपरीग्रह या विषयावर जाणकार व्यक्तीकडून प्रतिक्रिया /लेख वाचायला आवडेल .

आदिजोशी's picture

20 Oct 2015 - 1:49 pm | आदिजोशी

कोणत्या वयाच्या मुलांना काय सांगावे ह्याचे भान मोठ्यांना असणे गरजेचे आहे.

स्वतःचं नाक न पुसता येण्याच्या वयात हे असले धडे मुलांना द्यायची काही आवश्यकता नाही. मुलाच्या खांद्यावरून आई बाबांवर गोळीबार करण्यासाठी लिहिलेली कथा आहे ही.

बायकांना सल्ला देणारं पुरुषांनी चालवलेलं सदर वाचल्यासारखं वाटलं.

द-बाहुबली's picture

20 Oct 2015 - 1:53 pm | द-बाहुबली

बायकांना सल्ला देणारं पुरुषांनी चालवलेलं सदर वाचल्यासारखं वाटलं.

पुरुष बायकांना कधीच सल्ले देत नसतात...

प्यारे१'s picture

20 Oct 2015 - 1:55 pm | प्यारे१

बाहुबली, यु मॅरीड?

द-बाहुबली's picture

20 Oct 2015 - 1:56 pm | द-बाहुबली

नो. बट आय न्यु अ फ्यु फेलास हु कांट डेअर टु बी स्मार्ट...

प्यारे१'s picture

20 Oct 2015 - 2:01 pm | प्यारे१

यु कॅन ऑल्वेज सजेस्ट बडी. यु डेअर अ‍ॅन्ड यु कॅन डु दॅट.

आफ्टर दॅट इट्स लाईक... हमने हमारी तरफ से पूरि कोशिश कि लेकीन...