कळली तर कळवा

Primary tabs

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
13 Oct 2015 - 10:48 pm

कळली तर कळवा

दुष्काळाच्या ज्वाळांमध्ये, जपून ठेव नर
गोठवलेल्या बर्फाखाली, अप्सरांचे घर

जबरदस्तीने घुसतो काय, साप कधी सांग
तूच आपल्याच बिळावरती, झाकण नीट धर

यंदा मुद्दल मागू नकोस, फुकट केळी ने
कामात येईल कधी काळी, गरज पडली जर

भिडाच एकदा निग्रहाने, बाकी बघू मग
कोण लोळणार खाली आणि, कोण चढेल वर

स्मशानातल्या मसन्याउदास, कुठे काय वर्ज्य
मेल्यावरती मर नाहीतर, जिवंतपणी मर

किती उपडणार आहेस तू, बस इतके ठरव
रोज वाढणाऱ्या धस्कटास, ’अभय’ असेल तर

                                    - गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अभय-गझलवाङ्मयशेतीगझल

प्रतिक्रिया

माहीराज's picture

14 Oct 2015 - 11:13 am | माहीराज

वाह छान ... शेतकऱ्याचे संपूर्ण आत्मचरित्र एका कवितेत वाचल्या सारखे वाटले.

गंगाधर मुटे's picture

15 Oct 2015 - 9:04 pm | गंगाधर मुटे

धन्यवाद सर.

जबरदस्तीने घुसतो काय, साप कधी सांग
तूच आपल्याच बिळावरती, झाकण नीट धर

म्हणजे ? नक्की काय म्हणायचंय ? आयत्या बिळात नागोबा म्हण कधी ऐकली नाही का . साप कधीही वारूळ स्वतः तयार करत नाही . जबरदस्तीनेच घुसत असतो

गंगाधर मुटे's picture

19 Oct 2015 - 7:35 pm | गंगाधर मुटे

जबरदस्तीने घुसतो काय, साप कधी सांग
तूच आपल्याच बिळावरती, झाकण नीट धर

नक्की जे म्हणायचंय, ते वरील ओळीतच आले आहे. त्यामुळे वेगळे स्पष्टीकरण द्यायची आवश्यकता नाही.
शिवाय तुम्हाला जे कळले नाही त्याविषयी विचारले असते तर काही सांगताही आले असते.तुम्ही काही न विचारता स्वतःचे जे मत आहे तेच ठाम व अंतिम समजून ठाम विधान केलेले आहे.

ख्ररं तर कोणत्याही कविवर त्याच्या कवितेचा अर्थ उलगडून दाखवण्याची वेळ येऊच नये. तो इतर कुणीतरी उलगडून दाखवला पाहिजे, असे मला वाटते.

पाटीलअमित's picture

17 Oct 2015 - 7:52 pm | पाटीलअमित

पटली तर पळवा
http://www.misalpav.com/node/33279