कळली तर कळवा
दुष्काळाच्या ज्वाळांमध्ये, जपून ठेव नर
गोठवलेल्या बर्फाखाली, अप्सरांचे घर
जबरदस्तीने घुसतो काय, साप कधी सांग
तूच आपल्याच बिळावरती, झाकण नीट धर
यंदा मुद्दल मागू नकोस, फुकट केळी ने
कामात येईल कधी काळी, गरज पडली जर
भिडाच एकदा निग्रहाने, बाकी बघू मग
कोण लोळणार खाली आणि, कोण चढेल वर
स्मशानातल्या मसन्याउदास, कुठे काय वर्ज्य
मेल्यावरती मर नाहीतर, जिवंतपणी मर
किती उपडणार आहेस तू, बस इतके ठरव
रोज वाढणाऱ्या धस्कटास, ’अभय’ असेल तर
- गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3061
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह छान ... शेतकऱ्याचे
धन्यवाद
In reply to वाह छान ... शेतकऱ्याचे by माहीराज
जबरदस्तीने घुसतो काय, साप कधी
नक्की काय म्हणायचंय?
In reply to जबरदस्तीने घुसतो काय, साप कधी by तुडतुडी
पटली तर पळवाhttp://www