हलव्याचे तिखले आणि हलवा फ्राय.

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in पाककृती
10 Oct 2015 - 10:19 pm

हलव्याचे तिखले.

साहित्य:-

१. हलव्याचे डोके,शेपूट आणि पोटाकडचे तुकडे.

.

२. एक वाटी ओले खोबरे.
.

३. एक चहाचा चमचा मिरचीपूड.
.
४. अर्धा चहाचा चमचा हळदपूड.
.

५. अर्धा चहाचा चमचा धणेपूड.

.

६. ७/८ काळीमिरी.
.

७. ७/८ लसूणपाकळ्या.

.

८. एक छोटाकांदा बारीक चिरून.
.

९. मीठ चवीनुसार.
.

१०. पाव वाटी तेल.

img src="https://lh3.googleusercontent.com/-zVtqz4qssmA/VhkxwItGFNI/AAAAAAAAAzk/y..." width="600" alt="." />
<
११. ३/४ कोकमे.
.

कृती:-

१. हलव्याचे तुकडे नीट चोळून खवले काढून धुवावेत.

२. हलव्याचे तुकडे,तेल,मीठ, कोकमे दोन चहाचे चमचे कांदा आणि दोन लसूणपाकळ्या वगळता बाकी सर्व मिक्सरमधून मुलायम वाटून घ्यावे.
.

३. वाटण तुकड्यांना चोळून घ्यावे.पाच मिनिटे तसेच ठेवावे.
.

४. लंगडी पातेल्यात एक चहाचा चमचा तेल घालून,गरम झाल्य्यावर त्यात लसूणपाकळ्या ठेचून घालाव्या. त्यावर तुकडे घालावेत.
.

५ तीन वाट्या पाणी,मीठ,कोकमे घालून उकळावे.

६ रस्सा दाट झाला की तिखले उतरावे.
.

७. उरलेले तेल फोडणीच्या लोखंडी कढईत गरम करावे.त्यात बाजूला काढून ठेवलेला चिरलेला कांदा घालून लालसर करावा.
.

८. तिखल्यावर ओतून लगेच झाकण ठेवावे.
.

९. दहा मिनिटांनी गरमागरम भासोबत वाढावे.

हलवा फ्राय.

साहित्य:-

१. ७/८ हलव्याच्या मधले तुकडे.(तुकडे जाडच काढावेत.)
.

२. एक चहाचा चमचा आले + लसूण + मिरची + कोथिम्बिरीचे वाटण.

३. एक चहाचा चमचा मिरचीपूड.

४. अर्धा चहाचा चमचा हळदपूड.

५. मीठ चवीनुसार.

६. अर्धा चहाचा चमचा चिंचेचा कोळ किंवा अर्ध्या लिंबाचा रस.(मी लिंबाचा रस वापरला आहे.)
.

७. तांदुळाचे पीठकिंवा रवा.(फोटो नाही.)

८. अर्धी वाटी तेल.

कृती:-
१. हलव्याचे तुकडे कातडीच्या बाजूने नीट चोळून,खवले काढून धुवावे.

२. तेल आणि तांदुळाचे पीठ वगळता सर्व एकत्र करून तुकड्याना चोळूनअर्धा तास ठेवावे.

३. पॅनमध्ये तेल गरम करून,तुकडे तांदुळाच्या पिठात घोळवून त्यात मांडावेत.
.

४ मंद आचेवर ५/६ मिनिटे होऊ द्यावेत.नंतर पुन्हा आंच वाढवून परतावे.आंच मंद करून ५/६ मिनिटे होऊ द्यावेत.अशा प्रकारे तळलेले तुकडे जाड कापलेले असल्याने वरून कुरकुरीत आणि आतून लुसलुशीत होतात.
.

प्रतिक्रिया

आधी गाजर हलव्याचे काहीतरी वाटले. हे दोन्ही माशांचे पदार्थ पाहून पुन्हा काही वर्षांपूर्वीची परिस्थिती आलीये. मत्स्याहार तरी करावा असे वाटू लागलेय. मागल्यावेळी ठरवल्यानुसार मी एक मासा खाल्ला होता.

इडली डोसा's picture

11 Oct 2015 - 12:38 am | इडली डोसा

आणि तिखले करायला पण सोपे वाटतायेत

कविता१९७८'s picture

11 Oct 2015 - 7:34 am | कविता१९७८

वाह ,माझी रेसिपी थोडी वेगळी आहे. एकदा या पध्दतीने बनवेन. हलव्याची स्कीन वातुळ असते म्हणुन खाताना ती काढुन खावी नाहीतर नडते.

पियुशा's picture

11 Oct 2015 - 12:48 pm | पियुशा

रेसेपी मस्त आहे :)
बाकी ते ९ न्म्बर्च लाल मीठ आहे काय ;)
चुकुन लाल तिखटाचा फटु मिठाच्या जागी लावलाय तेव्हढा दुरुस्त करुन घ्या तै :)

एस's picture

11 Oct 2015 - 5:46 pm | एस

छान पाककृती.

प्यारे१'s picture

11 Oct 2015 - 6:02 pm | प्यारे१

>>> हलव्याचे डोके,शेपूट आणि पोटाकडचे तुकडे.

बाकी काय शिल्लक राहतं?

नितिन५८८'s picture

11 Oct 2015 - 6:47 pm | नितिन५८८

पाककृती एकदम छान . . पण चहाचा चमचा खूपच मोठा दिसतोय