‘सवाष्ण’ नावाची गोष्ट

rutusara's picture
rutusara in काथ्याकूट
2 Oct 2015 - 2:26 am
गाभा: 

आज एका वेगळ्या विषयावर लिहिते आहे. विषय खरं तर नेहमीचाच…आपल्याही नकळत आपल्या आजूबाजूला घडत राहणारा…वर्षानुवर्षं हे असं चालत आलं आहे त्यामुळे ते असंच चालत राहणार असं म्हणून नकळत आपणही त्याकडे डोळेझाक केलेला…पण केवळ वर्षानुवर्षं पाळली गेल्यामुळे ती गोष्ट योग्य ठरते का?

मी जे लिहिलं आहे, त्या गोष्टी मला कायमच खटकत असत. ” हे असं का?” हा प्रश्न कायमच पडत राहायचा. पण ह्याआधी त्याची झळ चटका बसण्याएवढी मोठी नव्हती. आयुष्यात घडलेल्या काही घटनांनंतर मात्र ह्या सगळ्याबद्दल लिहिण्याची मनापासून इच्छा झाली. समाजपरिवर्तन करण्याची ताकद माझ्यात नक्कीच नाही पण तरीही हा लेख वाचून माझ्याप्रमाणे आणखी काही पावलं ह्या दिशेने पडली तर मला समाधानच वाटेल.

खरं तर आजच्या जगासाठी, मुख्यत्वे करून मुंबई आणि इतर मेट्रो- सिटीज मध्ये राहणाऱ्या आपल्या आजच्या पिढीसाठी “सवाष्ण” ह्या संकल्पनेला आणि ह्या शब्दाला फारसं महत्व राहिलेलं नाही. खरं तर शहरी भागात ही संकल्पना आणि ती जपण्यासाठी आपण पाळत असलेल्या नको त्या चालीरीती हे सगळंच हळूहळू संपुष्टात येऊ लागलंय. तरीही इतर भागातील आणि आपल्या जुन्या पिढीतील काही लोकांबाबत आपण असं ठामपणे म्हणू नाही शकत. माझा हा लेख मुख्यत्वे ह्या लोकांसाठी आहे. जे हा विचार आधीपासूनच करत आहेत, त्या सर्वांतर्फे मी फक्त व्यक्त होतेय.

बरंच काही बदलायला हवंय, पण सुरुवात सुरुवातीपासूनच व्हायला हवी, म्हणून हा लेख-प्रपंच. माझ्यासाठी हा फक्त एक लेख नसून तो एक विचार म्हणून मला पुढे न्यावासा वाटतो. त्यामुळे हा लेख आवडला आणि त्यातले मुद्दे पटले किंवा नाही पटले तरीही तुमच्या “comments ” ची अपेक्षा करते.
————————————————-

‘सवाष्ण’ नावाची गोष्ट

आपल्या समाजात अतिशय उच्च वर्गात मोडली जाणारी स्त्रियांची एक जात म्हणजे ‘ सवाष्ण’ बाई. म्हणजे जिचं लग्न झालेले आहे आणि जिचा पती जिवंत आहे अशी स्त्री. काय आहे आजच्या आपल्या समाजाची या सवाष्ण बायकांकडे बघण्याची मानसिकता? त्याहीपेक्षा कुठे कमी पडतो आहे आपला समाज ‘सवाष्ण नसलेल्या’ बायकांना जाणून घायला? आपल्या प्रगतिशील देशात आणि पुराणकाळापासून आजपर्यंतच्या इतिहासात घडून आलेल्या स्त्रीजीवनाबद्दलच्या अनेक सुधारणांमुळे वरील प्रश्नाची तीव्रता नक्कीच कमी झालेली आहे पण हे प्रश्न आजही आहेत. समाजाच्या सर्व स्तरात कमी अधिक फरकाने तरी नक्कीच आहेत.

सवाष्ण स्त्रीला आपल्या समाजात देवीस्वरुप समजतात. प्रत्येक मंगल कार्यात सवाष्ण बाईचं असणं आणि तिचं सहभागी होणं हे मांगल्याचं , पावित्र्याचं आणि शुभशकुनाचं समजलं जातं. सवाष्ण बाईने दुसर्‍या सवाशीणीला हळदी-कुंकू लावणं, तिची ओटी भरणं हे सगळं देवीचा आशीर्वाद मिळाल्यासारखंच पवित्र मानतात.

समाजाचा उच्च वर्ग, मध्यम वर्ग आणि खालचा वर्ग हे सर्वच वर्ग आपापल्या परीने, आपापल्या कुवतीनुसार त्यांचे रीतीरीवाज, प्रथा आणि परंपरा पाळत असतात आणि पुढच्या पिढीला हा वारसा जतन करण्याची शिकवण देत असतात. परंतु स्त्रीच्या ‘सवाष्ण’ असण्याला मात्र बहुतेक प्रथांमधे नको तितके आणि अकारण महत्व दिलेले दिसून येते.

‘सवाष्ण’ ही संकल्पना भारतात वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या प्रथांमधे जपली गेलेली आहे. लग्न करून घरात आलेल्या नववधूला “अखंड सौभाग्यवती भव” किंवा “सदा सुहागन रहो” असा आशीर्वाद दिला जातो. वरवर मंगल आणि पवित्र वाटणारी ही वचने खरं तर किती मोठा शाप किंवा अमंगल विचार पोटात दडवून असतात ह्याचा आपण कधी विचार करतो का? ‘सौभाग्य’ ह्या शब्दाचा अर्थ ‘चांगले भाग्य’. आणि आपल्या शास्त्रानुसार पतीच्या असण्यामुळेच स्त्रीला सौभाग्य प्राप्त होते त्यामुळे ‘सौभाग्यवती’ म्हणजे ‘पती जिवंत असल्यामुळे जिला चांगले भाग्य प्राप्त झाले आहे अशी स्त्री’. आपल्या आशीर्वादात आपण त्या नववधूला “कायम सौभाग्यवती रहा” असे म्हणतो. परंतु निसर्गचक्रानुसार पतीचे कायम जिवंत राहणे हे केवळ अशक्य असते. म्हणजेच आपल्या आशीर्वादात “पतीच्या आधी तुझे निधन होऊ देत” असा शापच आपण तिला देत असतो, हे किती भयानक आहे. विवाह करून नवीन घरात, नवीन आयुष्यात प्रवेश करताक्षणीच “आता पत्नी म्हणूनच नव्हे तर माणूस म्हणूनही तुझे स्थान नवर्‍यापेक्षा कसे खालच्याच पातळीवर आहे” हे नकळत पण किती सहजपणे आपल्या शापित आशीर्वादातून म्हणून जातो आणि यापुढील आयुष्याच्या प्रत्येक पर्वात हे दुय्यमतेचे ओझे कायम वाहत राहण्याच्या अपेक्षाही त्याला जोडुन टाकतो. भारतीय स्त्री च्या बाबतीत तिचे सवाष्ण असणे हे तिला एक वेगळा मान मिळवून देत असेलही परंतु दुसर्‍या बाजूने विचार केल्यास सवाष्ण असल्याने हा मान मिळणे हे तिच्या दुय्यमतेचेच प्रतीक नाही का?

आपल्या मराठमोळ्या घरात आपण वर्षभर निरनिराळे सण उत्साहाने साजरे करतो. तसंच प्रसंगानुरूप करावयाचे विधी, उत्सव, समारंभ ह्यात देखील सहभागी होत असतो. म्हणजे कुणाचे डोहाळेजेवण, कुणाचे बारसे, कुणाची मंगळागौर, कुणाच्या घरी पूजा वगैरे.

ह्या सगळ्या समारंभात सवाष्ण स्त्रियांना विशेष स्थान असते. सोहळ्यातल्या महत्वाच्या गोष्टी जसे हळदी-कुंकू लावणे, गजरा देणे, ओटी भरणे, औक्षण करणे, वाण देणे वगैरे ह्यात सवाष्ण बाईशिवाय पान हलत नाही कारण ह्या फक्त एका सवाष्ण बाईनेच करावयाच्या गोष्टी आहेत.

म्हणजे तिने केलेल्या ह्या सर्व गोष्टीतील मांगल्याचा, त्यातून मिळालेल्या पवित्र आशीर्वादाचा आणि संस्कारांचा संबंध आपण तिच्या नवर्‍याच्या जिवंत असण्याशी जोडत असतो. हे कितपत योग्य आहे? मग जर नंतर तिचा नवरा मरण पावला तर तिच्यातला हा पावित्र्याचा, देवत्वाचा अंशही त्याच्याबरोबर निघून जाणार का? तर्कशुद्ध विचार केल्यास खरंच हे पटण्यासारखे आहे का? त्याहीपेक्षा त्या स्त्री च्या बाबतीत हे माणुसकीला धरून आहे का? तिच्या नवर्‍याची उणीव तिला प्रकर्षाने जाणवू देण्याची यापेक्षा वाईट पद्धत नसेल.

‘सवाष्ण’ ह्या शब्दाची व्याख्या आजच्या काळात पुन्हा एकदा तपासून बघण्याची वेळ आली आहे.

जर एखादी स्त्री स्वत:च पापी असेल आणि अशाच एखाद्या समारंभात ती सहभागी झाली तर केवळ ती सवाष्ण आहे म्हणून तिने दिलेले आशीर्वाद पवित्र कसे मानायचे? मग ती सवाष्ण आहे म्हणून तिने केलेली पापे धुतली जातील का?

हेच आपण स्त्रीच्या पतिबद्दल सुद्धा म्हणू शकतो. वाईट चालीरितीच्या एखाद्या व्यसनाधीन झालेल्या नवर्‍यामुळे त्या स्त्रीस कसले एवढे मोठे सौभाग्य प्राप्त होते ज्यात इतरांना आशीर्वाद देण्याची शक्ती असते? मग हीच शक्ती त्या स्त्रीच्या नवर्‍याला चांगले वळण का नाही लावू शकत?

नवर्‍यापासून वेगळं राहत असलेली स्त्री, जी फक्त समाजाच्या नजरेत सवाष्ण आहे, तिला खरंच सवाष्ण म्हणता येईल का? जर तिचा नवरा जिवंत आहे, तर आपल्या व्याख्येप्रमाणे नवर्‍याच्या असण्यामुळे तिला जोडलं गेलेलं देवत्व, पावित्र्य नवर्‍याबरोबर राहत नसतानाही तिच्या बरोबर राहील का?

आपल्यासाठी खरंच स्त्रीचे सवाष्ण असणे इतके महत्वाचे आहे, तर मग प्रत्येक वेळी एखाद्या समारंभात सहभागी करून घेण्याआधी ती स्त्री खर्‍या अर्थाने ‘सवाष्ण’ आहे का, हे आपण कधीच का नाही तपासून पाहत?

या उलट एखादी अतिशय संस्कारी स्त्री, आपले संस्कार, चालीरिती पाळणारी, जीचा नवरा हयात नाही पण आपल्या आठवणीत, संस्कारात जिने त्याला जिवंत ठेवले आहे अशी स्त्री. तिने एखाद्या समारंभात इतर स्त्रियांना हळदी-कुंकू लावले तर त्यातून अशुभ असे काय होणार आहे? तिच्या चांगुलपणामुळे तिच्यामध्ये आलेल्या देवत्वाचे संस्कारच ती इतर स्त्रियांना वाटणार आहे असा ह्याचा अर्थ होत नाही का?

एखाद्या प्रेमळ, लेकुरवाळ्या, विधवा म्हातार्‍या आजीने एखाद्या डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमात गर्भवती स्त्री ची ओटी भरली तर त्याचा अर्थ तिने आपल्या सूरकुतलेल्या हातांनी अनुभवाचा, प्रेमाचा आणि मुलाबाळांवरील आशीर्वादाच्या छ्त्रछायेचा वारसाच तिच्या ओटीत टाकला असा अर्थ का नाही काढत आपण?

तिच्यातल्या मातृत्वाची, प्रेमळपणाची, चांगुलपणाची, संस्कारांची आणि तिच्या आशीर्वादाची किंमत आपण केवळ तिच्या नवर्‍याच्या न असण्यामुळे शून्य ठरवतो. खरंच हे योग्य आहे का? नवर्‍याबरोबर अनेक वर्षे संसार करताना ह्या सर्व विधींमध्ये मनापासून उत्साहाने सहभागी होणार्‍या स्त्रियांना, नवरा मरण पावताच आपण ह्या सर्व गोष्टींपासून वंचित ठेऊ लागतो, तेव्हा आपली परंपरा, शास्त्र ह्या पेक्षा पुढे जाऊन त्या स्त्री च्या मनाचा आणि भावनांचा विचार का नाही करत आपण?

आजही कित्येक घरात देवाचा नैवेद्याचा स्वयंपाक बनवण्याची परवानगी फक्त सवाष्ण स्त्री लाच असते. आजही समाजातल्या काही वर्गात विधवा स्त्रीला पांढरा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाचे कपडे वापरण्यास परवानगी नसते, केसात फूल, गजरे माळण्याचे स्वातंत्र्य नसते.

एखाद्या पुरुषाची पत्नी मरण पावली, तर त्याच्या घरगुती, सामाजिक सहभागात काहीच फरक पडत नाही. मग स्त्रीच्या च बाबतीत, तिच्या आयुष्यात, सामाजिक सहभागात एवढा मोठा बदल होणे हे आपण अपरिहार्य का करून ठेवतो?

हे खरं तर कुणीही हेतुपुरस्सर वागत नाही. ‘त्या’ स्त्रीचं अशा समारंभातून वगळलं जाणं सर्वांसाठीच दु:खद असत. पण आपल्या शास्त्रानुसार आपण सर्व काही पाळतो आहोत ही जाणीव त्या दु:खापेक्षाही वरचढ असते.

आपल्या शास्त्रात ह्या गोष्टीवर समाधानकारक विश्लेषणे असतीलही. परंतु ही शास्त्रे असंख्य वर्षांपूर्वी लिहिली गेली आहेत. ज्या काळात स्त्री चे अस्तित्वच पुरुषांवर अवलंबुन होते त्या काळातील ही शास्त्रे, परंपरा आहेत. तो काळ सोडून आज आपण बरेच पुढे निघून आलो आहोत. पुढे निघून येताना आपण विधवा स्त्रियांच्या बाबतीत बरेच उदारमतवादी होत केशवपन, सती, विधवा पुनर्विवाह ह्या सारख्या अनेक प्रथा बदलल्या. त्या वेळीही आपण आपल्या शास्त्रात बदल केलेच की. परंतु विधवा स्त्रियांचा आपल्या सामाजिक समारंभातील, विधींमधील सहभाग हा विषय कधीच हाताळला गेला नाही. त्या वेळच्या विधवांच्या समस्यांपेक्षा ही समस्या नक्कीच मोठी नाही. पण अतिशय वेगाने बदलत जाणार्‍या, स्त्री-पुरूष समानतावादी आपल्या जगात, समाजात प्रगतीचे आणखी एक पाऊल उचलण्याची आता गरज आहे.

तसं पाहायला गेलं तर या बाबतीत आपण थोडे-फार जागरूक झाले आहोत. नवीन विचारांच्या स्त्रियाच या बाबतीत पुढाकार घेताना दिसतात. पण तरीही जेव्हा हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात विधवा स्त्रियांना निमंत्रण दिले जाते आणि हळदी-कुंकू, वाण देऊन झाल्यावर त्यांच्याचसमोर आपण कसे हे जुने विचार मानत नाही ह्याची इतर स्त्रियांबरोबर चर्चा केली जाते तेव्हा ह्याच स्त्रियांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. त्यांनी उचललेले पाऊल हे जरी स्वागतार्ह असले तरीही त्यात एक उपकाराची, श्रेष्ठत्वाची भावना दिसून येतेच. तसच बदललेला हा दृष्टिकोन मुख्यत्वे करून फक्त हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमापुरताच मर्यादित असलेला दिसून येतो. काही अपवादात्मक उदाहरणे वगळली तर आजही मंगळागौर, लग्न, डोहाळेजेवण, साखरपुडा आणि इतर महत्वाच्या सोहळ्यांतील ओटी भरण्याच्या विधींमधे कुणी आवर्जून विधवा स्त्री ला सामावून घेतल्याचे दिसत नाही. तेथेही नकळत आपण या सवाष्ण बायकांनाच झुकत माप देतो आणि हा श्रेष्ठ – कनिष्ठ भेदभाव कायम ठेवतो.

ही प्रक्रिया आपण अगदी सहजपणे, नैसर्गिकरीत्या का नाही अंगिकारू शकत? “इतर स्त्रियांप्रमाणे मी देखील एक स्त्री आहे आणि म्हणूनच ह्या सोहळ्यात सहभागी होण्याचा माझा मान आहे” असा विचार जर सर्वच स्त्रियांनी केला आणि त्याला पुरुषांचीही साथ लाभली तरच विधवा स्त्रीचं असं मान्यता मिळणं सहज होईल, स्वाभाविक होईल, त्यात कोणतीही उपकाराची, उदारमतवादाची भावना असणार नाही आणि आपल्या घरातील मुलांना सुद्धा आपण नकळत योग्य विचार आणि दृष्टिकोन देऊन जाऊ.

आजची आपली पुढची किंवा मधली पिढी. म्हणजेच साधारण तिशी ते चाळिशीच्या मधल्या स्त्रिया. करियर करताना, उच्च शिक्षण घेताना जुन्या विचारांना, परंपरांना आपल्या बुद्धीच्या आणि तर्कशास्त्राच्या जोरावर तोलुन पाहणार्‍या पण त्याच वेळी वर्षानुवर्ष घरात आणि समाजात चालत आलेल्या सगळ्या रूढी, परंपराही जवळून पहिल्याने त्यांचाही मनात आदर बाळगणार्‍या स्त्रियांची ही पिढी. त्यांना लग्नसंस्थेबद्दल आदर असतो, विश्वास असतो पण त्यांना मंगळसूत्र, कुंकू, बांगड्या ह्या सौभाग्यलक्षणांची आवश्यकता वाटत नाही. जोडीदाराशी मित्रत्वाचं नातं आधी निर्माण करून एकमेकांना समजून घेत लग्न टिकवण्यावर आणि आपलं नातं समृद्ध करण्यावर त्यांचा विश्वास असतो. त्यासाठी कोणतीही सौभाग्यलक्षणं बाळगायची जरूरी नाही असा सरळ विचार ते करतात. पण वर्षानुवर्ष घरात चालत आलेल्या संस्कारांना स्मरून सणासुदीला, पुजेला वगैरे मात्र आवर्जून सगळी सौभाग्यालंकार घालून नटून- सजून तयारही होतात.

आज परदेशात राहणार्‍या कितीतरी मराठी मुली हळदी-कुंकू, डोहाळेजेवण असे सोहळे करतात. पण त्यात आपल्या “सौभाग्या”पेक्षा परक्या देशात एकमेकांना धरून राहून आपली संस्कृती टिकविणे हा हेतू असतो. नवीन पिढी हे असे सोहळे ‘सौभाग्य’, ‘ ‘सवाष्ण’ या संकल्पनांच्या खूप पुढे जाऊन ‘संस्कृती’, ‘संस्कार’ आणि ‘नातेसंबंध’ या संकल्पना जपण्यासाठी करताना दिसते. एखादी स्त्री सवाष्ण आहे ह्यापेक्षा एक चांगली व्यक्ती, एक समजून घेणारी मैत्रीण आपल्या संपर्कात रहावी आणि तिच्याबरोबर आपले नाते आणखी घट्ट व्हावे ह्या विचारांनी तिला अशा सोहळ्यांमध्ये सहभागी केले जाते.

आपली नवीन आणि जुनी पिढी कायम हातात हात घालून पुढे चालत असते. प्रत्येक वळणावर एकमेकांना साथ देत असते. जुनी पिढी नव्या पिढीला अनुभव, परंपरा आणि संस्कारांचा वारसा देत असते आणि नवी पिढी नव्या तंत्रज्ञानाबरोबरच नवे विचार आणि नवा दृष्टिकोन जुन्या पिढीला देते. ह्या देवाणघेवाणीमुळेच भारतीय संस्कृती पाश्चात्य संस्कृती पेक्षा वेगळी ठरते.

आज खरंच वेळ आली आहे जुन्या पिढीने नव्या पिढीचा नवा दृष्टिकोन धारण करण्याची. ‘सवाष्ण’ ह्या संकल्पनेची व्याख्या आणि गरज यांना या नव्या दृष्टीकोनातून तपासून पाहण्याची. कुठेतरी वाचलं होतं, ” समाज हा परिवर्तनशील असतो”. हे परिवर्तन आपणच घडवून आणायचं असतं.

पती आपल्यापासून कायमचा दुरावल्याचं दु:ख खूप मोठं असतं. पण आपल्या जुन्या पिढीतल्या स्त्रियांसाठी तेवढंच मोठं दु:ख असतं ते पुर्वी बाळगलेल्या सौभाग्यालंकारांना गमावण्याचं , कोणत्याही समारंभात कधीही आपली ओटी भरली न जाण्याचं आणि आपल्यालाही कुणाची ओटी न भरता येण्याचं, एखादा सुंदर गजरा केसात माळता न येण्याचं, नटून-सजुन सुंदर दिसण्याचा हक्क गमावण्याचं…

ही स्त्री आपल्यापैकीच कुणाची आई असु शकते, कुणाची बहीण, कुणाची वहिनी, कुणाची सासू…पण शेवटी ‘आपलं’च माणूस. आजच्या वेगाने धावत असलेल्या जगात जुनाट प्रथा कुरवाळत बसण्यापेक्षा खरी गरज आहे ती ‘आपलं’ माणूस जपण्याची. त्यांना हवं तसं दिसण्याचं, राहण्याचं आणि स्त्रियांच्या आनंदसोहळ्यात पूर्वीप्रमाणे मानाने सहभागी होण्याचं स्वातंत्र्य देण्याची….गरज आहे फक्त आपला दृष्टीकोन बदलण्याची… कारण पुढे टाकलेलं हे एक पाऊल कदाचित पुढच्या अनेक पावलांच्या दृष्टीने एक नवी सुरुवात असू शकेल …नाही का?

प्रतिक्रिया

रेवती's picture

2 Oct 2015 - 3:13 am | रेवती

लेखन आवडले.

rutusara's picture

5 Oct 2015 - 1:49 am | rutusara

धन्यवाद !!

परदेशात राहणार्‍याच नव्हे तर कितीतरी मुलीना माहेर सोडून, शिक्षण/लग्न झाल्यावर एखाद्या नव्या जागी नवा सन्सार मान्डताना अनुभवी स्त्री मैत्रीण लागते. अशी मैत्रीण "सवाष्ण" आहे किन्वा नाही किम्बहूना महाराष्ट्रियन आहे किन्वा नाही हे गौण ठरून तिच्याबरोबर नाते कसे जुळते आणि घट्ट होते हे या मुलीन्च्या दृष्टीने महत्वाचे असते. ‘सवाष्ण’ ह्या संकल्पनेची व्याख्या बदलताना अशा मुलीना अशा मैत्रिणीच ‘सवाष्ण’ वाटतील.

rutusara's picture

5 Oct 2015 - 1:51 am | rutusara

योग्य विचार !!....आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

राही's picture

2 Oct 2015 - 10:01 am | राही

'सवाष्ण' अशी काही खास जमात असू नये हे तत्त्व वैचारिक प्रबोधन, अंधश्रद्धानिर्मूलन, स्त्रीसबलीकरण या चळवळींमुळे निदान महाराष्ट्रात तरी वैचारिक पातळीवर कधीचेच मान्य झाले आहे. शहरी सुविचारी (सुशिक्षित नव्हे) उच्चवर्णीयांत त्याचे पालनही बर्‍यापैकी होते. जरूर आहे ती हे प्रबोधन तळागाळात पोहोचवण्याची. आज खरे तर या वर्गाला सर्वच प्रकारच्या प्रबोधनाची गरज आहे. स्त्रियांना आदर देण्यापासून, शौचालये बांधण्यापासून ते थेट गावकी-भावकीचे नियम न मानण्यापर्यंत, आजाराचे कारण भूतभुताटकी नसून रोगजंतूंचा संसर्ग आणि कुपोषण आहे हे गळी उतरवण्यापासून ते थेट स्वतःचे मत स्वतः ठरवण्यापर्यंत, विचार करायला लावण्यापर्यंत प्रबोधनाची गरज आहे.
आता तर कितीतरी स्त्रिया लग्न न केल्यामुळे, घटस्फोटामुळे एकट्या राहू शकतात. त्यांनी हिंमत बाळगून हा खास सामाजिक दर्जा झिडकारला आहे.
प्रबोधनाच्या चळवळींना बळ मिळेल तर हे सारे झटपट किंवा वेगाने घडू शकेल. मुळात प्रबोधनावरच पाय येतो आहे ही गोष्ट मला अधिक काळजीची वाटते.

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !! सवाष्ण असा दर्जा ही स्त्रियांपुढील अनेक समस्यांपैकी एक समस्या आहे. बरंच काही करण्याची गरज आहे आणि प्रामाणिक इच्छा असल्यास वावही आहे. लेखाच्या सुरुवातीला म्हंटल्याप्रमाणे मला हे विचार मुख्यत्वे अशा लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज वाटते जे आजही हे सगळं मानतात. शहरी भागातही अनेक सुशिक्षित घरात हे चित्र पाहायला मिळते आणि इतर भागात आणि विशेषतः जुन्या पिढीतील लोक हा विचार सहजपणे स्वीकारू शकत नाहीत, त्यांच्यासाठी हा लेख आहे. आपण त्याही पुढचे कटू सत्य सांगितलेत. एखाद्या अशा ज्वलंत प्रश्नावर लिहायला आणि ह्या माध्यमातून आवाज उठवायला मला नक्कीच आवडेल.

उगा काहितरीच's picture

2 Oct 2015 - 10:17 am | उगा काहितरीच

वेगळा व गंभीर विषय ! गंभीरपणेच चर्चा व्हावी हीच माफक अपेक्षा .

द-बाहुबली's picture

2 Oct 2015 - 11:25 am | द-बाहुबली

स्त्रिमुक्तीवादी लिखाण...!

नावडायचा प्रश्नच येत नाही.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद ...खरं तर स्त्री मुक्ती बद्दल बोलताना आपण म्हणजे आपला समाज अजूनही पूर्णपणे अशा संकल्पनांच्या बाहेर पडलेला नाही ह्याचीच लाज वाटते. ह्या सगळ्यातून बाहेर पडून आपण अजून पुढच्या पातळीवर स्त्री-मुक्ती चळवळ कधी राबवू शकणार हाच प्रश्न आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Oct 2015 - 12:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

सवाष्ण या शब्दाभोवती गुंफलेल्या भावनिक संकल्पना मुळातून बहुतेक मानवी समाजातल्या "वंशवृद्धी" च्या महत्त्वामुळे म्हणून निर्माण झाल्या असाव्यात. जुन्या काळात आयुर्मान (लाईफ एक्पेक्टन्सी) फार कमी (इ स पूर्व १०,००० ते इ स १९०० पर्यंत : ३० +/- १० वर्षे) होते. अर्थातच यातला जननक्षम असण्याचा काळ अजून कमी म्हणजे ५ ते १० वर्षे इतकाच असे. एवढ्या त्रोटक काळात शक्य असलेल्या गरोदरपण आणि प्रसूतीत, अभाव असलेल्या अथवा अपुर्‍या असलेल्या वैद्यकीय व्यवस्थेमुळे, माता व भृण/अर्भकमृत्युचे प्रमाण फार मोठे होते. याचा अर्थ जन्मापासून जननक्षम होईपर्यंत जिवंत राहणार्‍या माणसांचे प्रमाण खूप कमी होते. अर्थातच, त्यातल्या ५०% पेक्षा कमी जननक्षम (वंशवृद्धी करू शकणार्‍या) स्त्रीयांचे मानवी समाजात एक वेगळे आणि महत्त्वाचे स्थान राहिले आहे. विवाहसंस्कृती अस्तित्वात आल्यावर व पुरुषप्रधान संस्कृतीचा भाग म्हणून पुढे यात विवाहिता (उर्फ नवर्‍याची वंशवृद्धी करणारी स्त्री) हे एक कलम जोडले गेले असावे. "सवाष्ण" हा शब्द नक्की कधी अस्तित्वात आला याबाबत वाद असू शकतो, या सर्व प्रवासात तो तुलनेने बराच अर्वाचीन (गेली १-२ हजार वर्षे किंवा कमी वयाचा) असावा. पण त्या संकल्पनेचा साधारण प्रवास वर लिहिल्याप्रमाणे झाला असावा.

या सर्व कालप्रवासात, बहुतेक सगळ्या मानवी संकल्पनांप्रमाणेच, या संकल्पनेलाही अनेक अंधश्रद्धा, प्रथा आणि दंतकथांची जोड देऊन, एका गटाने दुसर्‍या गटावर वरचढपणा सिद्ध करण्याचे साधन बनवले ! असे करण्यामागे नेहमीचेच अनेक प्रकारचे सामाजिक, आर्थिक, मानसिक, इत्यादी हितसंबंध असू शकतात.

मात्र जसजसे स्त्रीचे सामाजिक-आर्थिक स्वातंत्र्य वाढत गेले आहे आणि वैद्यकीय सुविधा वाढत गेल्या आहेत तसतसे "सवाष्ण" या "पदवी"मुळे मिळणारे फायदे कमी कमी होत नगण्य झालेले आहेत व या कालबाह्य संकल्पनेचे महत्त्व आपोआप कमी कमी होत गेलेले आहे. इथे हा लेख वाचणार्‍यांपैकी अनेकांनी हा शब्द काही वर्षांनी वाचला-ऐकला असेल आणि त्यांच्या व्यक्तीगत जीवनात त्याला काही महत्व राहिले नसेल, तर फारसे आश्चर्य नाही !

आनन्दा's picture

2 Oct 2015 - 10:06 pm | आनन्दा

बव्हंशी सहमत.. पूर्वीच्या काळी सवाष्ण स्त्रियांपेक्षा आलवणातल्या स्त्रियांची संख्या जास्त असायची घरात असे ऐकून आहे.

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ... आपण फार छान विचार मांडलात. सवाष्ण ह्या शब्दाचा किंवा त्याहीपेक्षा त्या संकल्पनेचा प्रवास आणि पूर्व-इतिहास ह्या माहितीबद्दल धन्यवाद.

तर्राट जोकर's picture

2 Oct 2015 - 11:33 pm | तर्राट जोकर

लग्न झालेल्या स्त्रियांमधली चातुर्वर्ण्य पद्धती.
१. पहिला मुलगा असलेल्या व नवरा जीवंत असलेल्या स्त्रिया
२. सगळ्या मुलीच असलेल्या व नवरा जीवंत असलेल्या स्त्रिया.
३. अपत्यहिन व नवरा जीवंत असलेल्या स्त्रिया
४. अपत्यहिन व विधवा स्त्रिया.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद ...वर्षानुवर्ष आपण ह्याच बद्दल लिहितोय आणि बोलतोय हे खरंच दुर्दैवी आहे...

बॅटमॅन's picture

5 Oct 2015 - 12:25 pm | बॅटमॅन

अगदी अगदी!!!!!!!

बोका-ए-आझम's picture

3 Oct 2015 - 8:20 am | बोका-ए-आझम

छान लिहिलंय.विधवा स्त्रियांना हा भेदभाव सहन करावा लागतोच पण घटस्फोटित स्त्रियांनाही याचा त्रास होतो. जेव्हा समाजाच्या पाठिंब्याची गरज असते त्याच वेळी समाज त्यांना दूर सारतो. हे खरोखरच दुर्दैवी आहे.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद ...

मुक्त विहारि's picture

3 Oct 2015 - 8:25 am | मुक्त विहारि

डॉ. सुहास म्हात्रे ह्यांचा प्रतिसाद पण उत्तम.

rutusara's picture

5 Oct 2015 - 2:34 am | rutusara

धन्यवाद

इथे बर्याच जणांनी हा सवाष्ण कालबाह्य संकल्पना होत चालली आहे लिहिले आहे.परंतू लहानसहान गावात मात्र अजूनही सवाष्ण असण्याचे महत्त्व व त्या अनुषंगाने केली जाणारी सांस्कृतिक कर्मकांडं बघण्याची वेळ मला नेहमी आलेली आहे.याचे अतिरेकी उदाहरण म्हणजे विवाहित पण मूल नसणाऱ्या स्त्रीला सवाष्ण न मानणे हे मी स्वतः बघितले आहे.हे झुंडीचे मानसशास्त्रच आहे एक प्रकारचे.तुमचा विसंवादी सूर कुठेच्या कुठे उडवला जातो.
नुकतेच एका जवळच्या मैत्रीणीचे निधन झाले.तर लोक चक्क संतोष व्यक्त करत होते तिला सौभाग्यवतीचे मरण आले म्हणून.हे लोक तर शहरी उच्चशिक्षित ,मोठ्या पदावर कार्यरत.
माझ्या एका डाॅक्टर मैत्रीणीचा पहिल्या पतीच्या निधनानंतर पुनर्विवाह झालेला आहे.तिला तिची सासू कधीही हळदीकुंकू लावत नाही.त्यांच्यात बोडण असते ते करु देत नाही किंवा घरी सवाष्ण बोलवल्यास तिला कळवत नाही.हेही सर्व उच्चशिक्षित लोक.
हेच असे तर तळागाळातल्या लोकांना काय बोलावे.

द-बाहुबली's picture

3 Oct 2015 - 5:42 pm | द-बाहुबली

बघाना लोक कसे आहेत ते... मी अविवाहीत आहे म्हणून मला सत्यनारायणाच्या पुजेला बसु दिले नाही :( मी म्हटलो की माझ्यासारखी एक अविवाहीत मुलगी जोडीला बसवुन पुजलाकरु टाकु पण कोण ऐकेल तर शपथ :( या एकुणच प्रसंगाने मी इतका डिप्रेशन मधे गेलो आहे की मिप नसते तर काही माझा जिवाचे बरेवाइटच झाले असते :( :( :(

ही घटना आजच्या काळातीलच सुशीक्षीत म्हनवल्या जाणार्‍या स्मार्ट व सुसंस्कृत भागात घडली आहे...

प्रतिसादाबद्दल धन्यवाद ....आपण दिलेली उदाहरणे वाचताना खरंच खूप वाईट वाटले. आपण अजून इतके मागे आहोत ह्या सारखी दुर्दैवाची गोष्टच नाही. आपण लिहिले ते अगदी खरे आहे. शहरी भागात राहणारे आपण लोक निदान असा विचार तरी करतो. पण चार-चौघात जुन्या गोष्टींना झुगारून आपल्या विचारांप्रमाणेच प्रत्येक जण वागतोच असे नाही. वैचारिक पातळीवर ती गोष्ट आपल्यातल्या बहुतांशी लोकांनी स्वीकारली आहे पण घरगुती आणि सामाजिक समारंभात (फक्त हळदी-कुंकू समारंभ नव्हे) आपण त्या प्रत्यक्ष करतो का, ह्यावर हि संकल्पना आणि त्याला जोडल्या गेलेल्या अनिष्ट रूढी खरंच कालबाह्य झाल्यात का ते ठरेल. आपण लिहिलेले प्रश्न तर आणखी गंभीर आहेत. लोकांची मानसिकता आणि दृष्टीकोन बदलायला हवेत..आपल्या आजच्या पिढीतल्या लोकांनी आपल्या घरातील जुन्या जाणत्या लोकांना योग्य तो मान जरूर द्यावा, परंतु त्यांचा असा दृष्टीकोन बदलण्यासाठीही पुढाकार घ्यावा...बरेच वेळा आपण घरातील मोठे लोक म्हणून त्यांच्या मतांना आदर देतो आणि नकळत सवाष्ण आणि अशाच इतर संकल्पना जपण्यासाठी मदत करतो. सामाजिक पातळीवर तर बदल व्हायलाच हवेत पण आपण निदान आपापल्या घरापासून तरी सुरुवात करू शकतो.

जयन्त बा शिम्पि's picture

3 Oct 2015 - 5:19 pm | जयन्त बा शिम्पि

लेखातील मतांशी सहमत. पण त्यावर काळ हेच उत्तर असणार आहे
आता मसिक पाळीचे ते ' चार ' दिवस , याबाबत कोण किती बंधने पाळतो ?
मला आठवते की घरात एखादा शुभ प्रसंग येवू घातला असेल तर, ' गोळ्या '
घेवून , ते दिवस पुढे ढकलण्याची सोय आता झालेली आहे
त्यामुळे आणखी एक दोन पिढ्यानंतर , ' सवाष्ण ' ही बाब सुद्धा अशीच नजरेआड
होणार.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद...पण आपण केवळ काळावर का अवलंबून राहायचं ? आपण प्रत्येकाने आपापल्या घरापासून सुरुवात केली, आपल्या घरात ह्या अशा संकल्पना जपणारे लोक असतील तर त्यांचे मत परिवर्तन केले आणि आपल्या पातळीवर जरी हे सगळे विचार अनुकरणात आणले तरीही बरीच सुधारणा होईल, नाही का ?

मधुरा देशपांडे's picture

3 Oct 2015 - 7:17 pm | मधुरा देशपांडे

लेखन आवडले, आशयाशी सहमत आहे. पण अजयाताईशी बाडीस. पुर्वीपेक्षा मवाळ वातावरण झाले असले, तरीही सतत सवाश्ण बायकांना प्रत्येक कार्यात दिले जाणारे अवास्तव महत्व, आणि विधवा किंवा घटस्फोटितांना मुद्दाम तसे दाखवुन वेगळे करणे हे तसेच आहे. :(

धन्यवाद ...माझा मुद्दा अगदी हाच आहे..

एस's picture

4 Oct 2015 - 8:25 pm | एस

लग्नसंस्थेचे भारतीय समाजपद्धतीत असणारे अवडंबर यासारख्या मूर्ख प्रथांना कारणीभूत आहे.

हे लग्नसंस्थेचे जोखड जरा सैल व्हायला हवे.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद ...

कपिलमुनी's picture

5 Oct 2015 - 1:45 pm | कपिलमुनी

धाग्याचे धन्यवाद एकत्रच द्या !
ईएमाय मधे नको

मार्मिक गोडसे's picture

5 Oct 2015 - 11:55 am | मार्मिक गोडसे

लेखन आवडले.
प्रसंग-१
एका तरुण विवाहितेच्या अंतविधीत सोसायटीतील सवाष्णी तीची ओटी भरत होत्या व त्या तरुणीच्या कपाळाचे कुंकू स्वतःच्या कपाळाला लावत होत्या, असे केल्याने सवाष्णीचे मरण प्राप्त होते असे म्हणतात.

प्रसंग-२
सोसायटितील एका महिलेच्या पतीचे निधन झाल्यावर एका बाजुला त्या पतीच्या अंतविधीची तयारी चालू होती, तर दुसरीकडे त्या महीलेला हातात हिरवा चुडा, केसात गजरा व सवाष्णीसारखे हळदी कुंकू लावून सजवले जात होते . हे सर्व झाल्यावर शेवटी शेजारील सोसायटितील एका वृद्ध विधवा आजींच्या हाताने त्या महीलेच्या हातातील बांगड्या फोडल्या व कुंकू पुसले.

पहील्या प्रसंगात सवाष्ण नसल्यामुळे त्या विधवेने दूरून सर्व विधी बघायचे , दुसर्‍या प्रसंगात त्या विधवेला केवळ सवाष्ण नसल्याचा 'मान'.
केवळ परंपरा व चालीरीतीच्या नावाखाली सवाष्ण नसल्याची जाणीव करुन दिली जाते. एखाद्या घरातील विधवा सासू/आई ला आपल्या सुनेची/मुलीची ओटी भरता येत नाही. परंतू ह्याच सूना/मुली आपले मुल सासू/आईच्या 'ओटी'त टाकून दिवसभर घरकाम किंवा नोकरी निर्धास्तपणे करतात्, तेव्हा सासू/आईचे सवाष्ण नसणे खटकत नाही.

कालांतराने हळदीकुंकू, ओटी भरणे सारखे सवाष्णींचे विधी बंदही होतील, परंतू जोपर्यंत असे विधी चालू आहेत तोपर्यंत सवाष्णींना मिळणारा मान विधवांना मिळणे अशक्य वाटते.

इन कम's picture

5 Oct 2015 - 7:50 pm | इन कम

सह्मत आहे

आजही समाजात अशा पद्धती आहेत्,पण काही ठिकाणी आलेले 'दुर्मिळ'अनुभव.
१)मिपाकरांच्या डोंबोलीत एका ओळखीच्यांकडे सुनेचे डोहाळजेवण(ओटीभरण)होते.सुबांना वडील नव्हते.मात्र साबांनी
ठामपणे सांगितले पहिली ओटी सुबांच्या आईनेच भरायची.कारण तिच्या(आई) इतक्या मनापासुन शुभेच्छा आणि आशीर्वाद
दुसर्‍या कुणाच्याही नसतील.
२)माझ्या घरी आलेल्या एक नवविवाहीतेने हट्टाने माझ्याकडून ओटी भरून घेतली.(मी'कथित'सवाष्ण नसूनही)
३)माझी एक विधवा मैत्रिण घरी आलेल्या महिलांना निघताना नेहमीप्रमाणे हळदकुंकू लावते.काही महिला दचकतात्,काही सहजपणे लावून घेतात. हिचे म्हणने असे की मी आधी लावलेले चालत होते,मग आता असा काय फरक पडलाय माझ्यात?

मी स्वत:ही एखाद्या समारंभात जर कोणी हळदकुंकू लावले तर लावून घेते.नाही म्हणत नाही.आणि एखादी मला न लावता जर पुढे गेली तर वाईट वाटूनही घेत नाही.
महिलांना विधवा असण्याची जाणिव करून करून देणार्‍या बहुतांश महिलाच असतात.त्यामुळे महिलांनीच या बाबतीत पुढाकार घेऊन बदल घडवणे अपेक्षित आहे.(पुरूष सहसा या बाबतीत लक्ष घालत नाहीत.मात्र काही पुरूष घालत असतीलही.)
काही संस्थाही या बाबतीत बदल घडवीत आहेत.
प्रत्येक महिलेनेच या बाबतीत ठाम भुमिका बजावली तर समाज बदलायला वेळ लागणार नाही.

पदम's picture

5 Oct 2015 - 12:50 pm | पदम

अगदी सहमत आहे विचारांशी.

पैसा's picture

5 Oct 2015 - 1:24 pm | पैसा

बर्‍याच जणांनी लिहिले आहे. आता खूप जुनी गोष्ट झाली, २५ वर्षांपूर्वीची. माझे वडील नसल्याने आईवडिलांशी संबंधित लग्नातले विधी माझ्या काकांनी केले होते. ते मला तेव्हाही प्रचंड खटकले होते. त्या काकांच्या स्वतःच्या मुलीने रजिस्टर लग्न केल्याने त्यांना "कन्यादानाचे पुण्य" मिळाले नव्हते ते त्यांनी कमवले म्हणे. ज्या काकांचा मला वाढवण्यात काही सहभाग नव्हता, एरवी ५/७ वर्षांने जे मे महिन्याच्या सुटीत १५ दिवस येऊन जायचे आणि माझे वडील गेले तेव्हा जे उपर्‍यासारखे बाराव्याला येऊन गेले होते त्यांनी माझ्या आईवडिलांच्या जागी उभे रहावे या गोष्टीसाठी हसू की रडू हे कळत नव्हते. खरे तर मला रजिस्टर लग्न करणे आवडले असते पण माझ्या सासरच्या अतिशय जुनाट मंडळींमुळे वैदिक पद्धतीने लग्न करणे भाग पडले. बायको नसेल तर एकटा पुरुष धर्मविधीत भाग घेऊ शकतो. विधवा स्त्री मात्र नाही! वा रे समाज!

सुमारे ३० वर्षांपूर्वी नात्यातल्या काही स्त्रिया असले सवाष्ण, विधवा वगैरे काही पाळत नसल्याचे पाहिले आहे. ऑफिसमधे हळदीकुंकू आणणार्‍या बायका सर्व धर्माच्या सर्व सधवा, विधवा स्त्रियांना हळदीकुंकू देतात हेही पाहिले आहे. अगदी खेड्यातून सुद्धा सरसकट हे असेच असते असे नव्हे. ते प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत, शिक्षण, आजूबाजूचे लोक या सगळ्यावर अवलंबून असते. काहीजणींना स्वतःला पटत नसते पण सासू, नणदा, इतर नातेवाईक यांच्या विरोधात जाऊन काही करायची ताकद नसते. तेव्हा प्रत्येक व्यक्तीने स्वतःपासून सुरुवात करावी हे उत्तम.

मुख्यतः सवाष्ण प्रकाराबद्दल स्त्रियाच जास्त प्रमाणात विचार करतात असे वाटते.

द-बाहुबली's picture

5 Oct 2015 - 4:40 pm | द-बाहुबली

बायको नसेल तर एकटा पुरुष धर्मविधीत भाग घेऊ शकतो.

अहो तसे नाहीये. मी अविवाहीत आहे या कारणावरुन मला सत्यनारायणाच्या पुजेला बसु दिले नाही... अन समाजातील एकाही व्यक्तीने त्याविरोधी आवाज उठवला नाही :( मी त्यांना पुजेसाठी जिवंत जोडीदार घेउन येतो म्हटलो पण नकारच कानी आला.

मी अविवाहीत आहे या कारणावरुन मला सत्यनारायणाच्या पुजेला बसु दिले नाही

आपण त्यांचं घर उन्हात बांधू हां!!

द-बाहुबली's picture

5 Oct 2015 - 5:28 pm | द-बाहुबली

माझे म्हणने इतकेच आहे की जशी काही बंधने सवाश्ण नस्ल्याने स्त्रियांवर येतात तशीच पुरुषांवरही या समाजात येत असतात. पुरुष त्याचे इतके भांड्वल करते नसले तरीही ती येत असतात म्हणून धाग्यांमधे फक्त स्त्रियांनाच प्रोब्लेम येतो हा एकांगी विचार करणे चुक आहे. आणी हे म्हणने जर कोणाला धाग्याचय विषयाचा विचका करणे वाटत असेल तर आपण काय करणार ?

द-बाहुबली's picture

5 Oct 2015 - 5:36 pm | द-बाहुबली

मुनीजी मंद लोकांना स्वछ्चंद बनायची हौस आली की चांगल्या धाग्याचा विचका ते लोक करत राहणार त्याला आपला इलाज नाही, आपण काही झाले तरी त्यांच्या पतळीवर उतरुन त्यांना उत्तरेही देउ शकत नाही(संपादकीय बंधने असल्याने). मग आपल्या हातात धाग्याच्या विषयानुशंगाने सांगोपांग व विषयाचा सर्वांगीण उहापोह करायचा मनापासुन प्रयत्न करणे इतकेच काम चालु ठेवायचे. व मंद लोकांना दुरच ठेवायचे. अहो मिपा म्हणजे कट्टा आहे का ? हे विचारांचे व्यासपीठ आहे. इथे विचार केले जातात, स्विकारले जातात. नाकारले जातात पण गहन-अगहन म्हणून हिणवले जात नाहीत. ज्या मंद लोकांना गहनता, विरोधाभास हे वैचारीकतीचीच दुसरी अंगे आहेत हे स्विकारणे जड जाते त्यांनी मिपाव्यासपिठावर नांदावेच कशाला ? क्ट्टे करु लाइफ एंजॉय करावे ना ?

वारलोच!! आम्ही जातो क्ट्टे करुन वेंजॉय करायला. तुमचे गहन विचार चालू देत.

टवाळ कार्टा's picture

6 Oct 2015 - 5:02 pm | टवाळ कार्टा

अहो मिपा म्हणजे कट्टा आहे का ? हे विचारांचे व्यासपीठ आहे. इथे विचार केले जातात, स्विकारले जातात. नाकारले जातात पण गहन-अगहन म्हणून हिणवले जात नाहीत.

खिक्क

टवाळ कार्टा's picture

6 Oct 2015 - 5:00 pm | टवाळ कार्टा

ghanta

टवाळ कार्टा's picture

6 Oct 2015 - 5:03 pm | टवाळ कार्टा

सा.सं. ना विनंती की वरचा प्रतिसाद http://misalpav.com/comment/750848#comment-750848 याच्याखाली चिटकवावा (का चिकटवावा?)

टवाळ कार्टा's picture

6 Oct 2015 - 5:04 pm | टवाळ कार्टा

मिपा गंडले...माझे प्रतिसाद भलत्याच प्रतिसादाला उपप्रतिसाद म्हणून जात आहेत

पैसा's picture

6 Oct 2015 - 5:58 pm | पैसा

बरोबर जागेवर आहे तो.

टवाळ कार्टा's picture

29 Oct 2015 - 4:08 pm | टवाळ कार्टा

ल्ल्ल्लूऊऊऊ

बॅटमॅन's picture

29 Oct 2015 - 4:11 pm | बॅटमॅन

मिपावरच्या कंपूबाजीमुळे तर हे जास्तच मणात ठसलेय.

टवाळ कार्टा's picture

29 Oct 2015 - 4:19 pm | टवाळ कार्टा

खि खि खु

प्रसाद गोडबोले's picture

5 Oct 2015 - 6:02 pm | प्रसाद गोडबोले

"सवाष्ण ह्या शब्दाची व्युत्पत्ती सवत + असणं अशी आहे तस्मात आजच्या युगात कोणीच सवाष्ण नाही " असे मत आम्ही मांडल्या वर मोठ्ठा गहजब जाहला होता =))

बाकी लेख अन त्यावरील प्रतिक्रिया तद्दन बकवास ! स्पष्ट मस्त !

बॅटमॅन's picture

5 Oct 2015 - 7:35 pm | बॅटमॅन

लेख बकवास?

ओह आय सी.

दिव्यश्री's picture

5 Oct 2015 - 8:38 pm | दिव्यश्री
दिव्यश्री's picture

5 Oct 2015 - 8:38 pm | दिव्यश्री
पियू परी's picture

29 Oct 2015 - 2:29 pm | पियू परी

सॉरीच.. सवाष्ण हा शब्द "सहवासिनी" या शब्दाचा अपभ्रंश आहे.
सहवासिनी म्हणजे जी स्त्री स्वतःच्या नवर्‍यासोबत राहाते ती (इति एक कर्मठ गुरुजी).

त्यामुळे नवर्‍यावर रुसुन माहेरी गेलेली किंवा नवर्‍याने टाकलेली (सॉरी फॉर धिस वर्ड) किंवा माहेरी नेऊन सोडलेली बाई सवाष्ण नाही.

- हळद कुंकु इ. न लावणारी व लावुन न घेणारी पियु.

प्रसाद गोडबोले's picture

29 Oct 2015 - 4:00 pm | प्रसाद गोडबोले

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ

एकदम पुलंच्या कथेतील वाक्य आठवले "तुम्हा विनोदी लेखकांना हार्टच नसतं मुळी " =))))

इन कम's picture

5 Oct 2015 - 7:55 pm | इन कम

हाच विषय मलापण नेहमी सतावत असतो …. माझी एक शंका …. 'लीव्ह इन' मध्ये असणारी स्त्री हि सवाष्ण असते का??

दिव्यश्री's picture

5 Oct 2015 - 8:39 pm | दिव्यश्री
प्रसाद गोडबोले's picture

6 Oct 2015 - 5:42 pm | प्रसाद गोडबोले

आपल्या तीन प्रतिसादातील एकही प्रतिसाद कळाला नाही =))

बाकी मीही ह्या सवाष्ण कन्सेप्टच्या कट्टर विरोधात आहे , एक पुरोगामी म्हणुन - ऑफीसात , किमान आमच्या टीम मध्ये सवाष्ण बायका आजिबात रिक्रुट करु नयेत असे आमचे अजुन एक स्पष्ट मत आहे !

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ

बॅटमॅन's picture

29 Oct 2015 - 4:08 pm | बॅटमॅन

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ =)) =))

अता कोळहिती हल्ला होणार तुमच्यावर (तसा तो कधी होत नव्हता?) =))

टवाळ कार्टा's picture

29 Oct 2015 - 4:20 pm | टवाळ कार्टा

गिर्जाकाकू स्वतःवर लाल-पांढरी वर्तुळे रंगवून घेतोय =))

प्रसाद गोडबोले's picture

29 Oct 2015 - 4:44 pm | प्रसाद गोडबोले

लाल-पांढरी वर्तुळे रंगवून घेतोय

त्याने काय होते ?

अभ्या..'s picture

29 Oct 2015 - 6:23 pm | अभ्या..

लाल पिवळी असावीत बहुतेक.
हळदी कुंकवाची. ;)

लालपांढरीतून गिर्जाकाका "स्वत:ला बलीवर्दनेत्र बनवून घेतोय" असे अपेक्षित असावे.

प्रसाद गोडबोले's picture

29 Oct 2015 - 8:36 pm | प्रसाद गोडबोले

लालपांढरीतून

लाल पांढरी म्हणजे काय नक्की ?

आणि मी कुठे बरे चुकीचे बोललो आहे , एक नव-पुरोगामी म्हणुन मी ह्या मध्ययुगीन सवाष्ण संकल्पनेला विरोधच केला आहे की !

बॅटमॅन's picture

30 Oct 2015 - 12:37 pm | बॅटमॅन

एक नव-पुरोगामी म्हणुन मी ह्या मध्ययुगीन सवाष्ण संकल्पनेला विरोधच केला आहे की !

आमचेही मत असेच आहे हो!

टवाळ कार्टा's picture

29 Oct 2015 - 9:14 pm | टवाळ कार्टा

bullseye

प्रसाद गोडबोले's picture

30 Oct 2015 - 1:22 pm | प्रसाद गोडबोले

अय्या कित्ती क्युट आहे ... !!!

टवाळ कार्टा's picture

30 Oct 2015 - 1:26 pm | टवाळ कार्टा

बैल तुला क्युट वाटतात??? =))

प्रसाद गोडबोले's picture

30 Oct 2015 - 1:56 pm | प्रसाद गोडबोले

बैलां मध्ये २ प्रकार असतात : एक भारतीय बैल आणि इतर बैल

भारतीय बैलांच्या पाठीवर वशिंड असते म्हणुन त्यांना सवशिंड बैल म्हणतात , बाहेरच्या बैलांना असे वशिंड नसते .

आजही आपल्या कडे सवशिंड बैलच श्रेष्ठ समजले जातात , इतर बैलांना कमी लेखले जाते ही गोष्टी मला कायमच खटकत असत.

-कोणत्याही बैलांना गायींना आणि विशेष करुन म्हशींना न घाबरणारा
प्रगो

बॅटमॅन's picture

30 Oct 2015 - 2:03 pm | बॅटमॅन

सवशिंड- एक गोष्ट असा नवीन धागा निघू शकेल यावर.

टवाळ कार्टा's picture

30 Oct 2015 - 5:45 pm | टवाळ कार्टा

=))

प्यारे१'s picture

30 Oct 2015 - 1:27 pm | प्यारे१

साजेसं गाणं निवडा-
1. इन आँखों की मस्ती
2. आँखों ही आँखों में
3. उडे जब जब जुल्फे तेरी
4. ओ हसीना जुल्फों वाली
5. तू मेरे सामने मई तेरे सामने

आत्ता एवढीच. सध्या घाईत आहे

प्रसाद गोडबोले's picture

30 Oct 2015 - 1:29 pm | प्रसाद गोडबोले

जीवन से भरी तेरी आँखे , मजबुर करे जीने के लिये =))))

कानडा's picture

30 Oct 2015 - 1:41 pm | कानडा

आँखे तेरी ... कितनी हसी
के ईनका आशिक .. मै बन गया हू

---
कानडा

पिलीयन रायडर's picture

6 Oct 2015 - 5:10 pm | पिलीयन रायडर

सवाष्ण असो वा नसो.. मुळात बायका एकमेकींना जाता येता हळद-कुंकु का लावतात हेच मला समजलेलं नाहीये अजुन... मी तरी आवर्जुन लावत नाही, आई / साबांनी जळजळीत कटाक्ष टाकला किंवा "आवाज लावला" तर चुकीच्या क्रमाने न चुकीच्या बोटाने लावते.

बाकी सवाष्ण म्हणुन विशेष मान देणे, जेवायला बोलावणे मुर्खपणाच आहे. परंतु तो संपायला फार फार वेळ जावा लागणारे.

द-बाहुबली's picture

6 Oct 2015 - 5:53 pm | द-बाहुबली

हे मान्य करायची प्रांजळता आज फार कमी स्त्रिया दाखवतात याबद्दल आपले मनापासुन विषेश कौतुक.

बाकी मला सुध्दा अजुन हे कळाले नाही की पतिव्रता असणे हा प्रकार स्त्रियांनी आणला (पाळला त्याचा आदर्श जगासमोर आणून दिला) तर एकपत्नीव्रताचा आदर्श केवळ श्रीरामचंद्रांनी घालुन दिला. आज कोट्यावधी पुरुष (भारताबाहेरील सुध्दा यात अमेरिकेचा प्रेसीडंट सुध्दा येतो) एका पुरुषाने आदर्श घालुन दिलेले निर्माण केलेले एकपत्नीव्रत जगत आले आहेत. पण एकापेक्षा जस्त स्त्रियांनी पतिव्रतेचा आदर्श जगासमोर घालुनही आज स्त्रिया या स्त्रियांनीच निर्माण केलेल्या पतिव्रतेच्या संकल्पनेपासुन दुर का पळतात ? पतिव्रता असणे ही तर सवाष्ण असण्यापेक्षाही मोठी गोष्ट गणली जाते. ज्या गोष्टीची तक्रार पुरुष करत नाहीत निमुटपणे पाळत आहेत त्याबाबत स्त्रिया का उथळ बनल्या आहेत ?

पिलीयन रायडर's picture

29 Oct 2015 - 2:38 pm | पिलीयन रायडर

काय???? मला हे ही समजलं नाहीये!!!

पण मी काय म्हणते.. जौ द्या ना.. आपल्याला काय करायचय?!

पियू परी's picture

29 Oct 2015 - 5:47 pm | पियू परी

म्हणजे??

स्त्रीया पतिव्रता नसतात असं म्हणायचंय का तुम्हाला?

बॅटमॅन's picture

29 Oct 2015 - 5:54 pm | बॅटमॅन

अंहं. 'आजकाल' पतिव्रता कन्सेप्टपासून स्त्रिया दूर पळताहेत असे त्यांचे म्हण्णे आहे.

एकवेळ कट्टप्पा ने बाहुबली ला का मारलं ते समजेल पण आपले द बाहुबली नेमकं काय म्हणतात ते झटकन समजायचं नाही. ;)
बाहुबली हलकं घ्या.
-प्यारेकालकीय का काय तो

प्रसाद गोडबोले's picture

29 Oct 2015 - 6:20 pm | प्रसाद गोडबोले

पतिव्रता असणे ही तर सवाष्ण असण्यापेक्षाही मोठी गोष्ट गणली जाते.

पुलं मोड ऑन

ह्म्म ......ह्या विषयावर एकदा आपल्याशी सविस्तर चर्चा करायची आहे मला !

पुलं मोड ऑफ्फ