बारकुले दिवस

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
27 Sep 2015 - 2:05 pm

"ऊठ बाबा, चुलीतली राख घीऊन दात घास" जख्खड म्हातारी, आज्जी कुठली.
"बग माजा कसा भिंगतुय!" सकाळपारी भोवरा फिरवायचा रोजचा पराक्रम.
"आये, मी न्हाय जाणार साळंला" खाकी चड्डी पाढरा शर्ट. शेंबुड पुसणारा गबाळा अवतार.
"चल रै भावड्या, कालची गणितं सोडवलीका?" दोन वेण्या घातलेली थोरली बहीण. गुडीगुडी.
"तायं, मला गाभुळ्या चिच्चा दि की काढुन" वाटेतल्या झाडाकडे अंगुलीनिर्देश करत.
"पाटीवर बदकाचे चित्र काढा" फळ्यावर छडी ठेवत मास्तरीण. ढबरी.
"चौघडे वाजले .......सुरवंटराव उदास झाले.......सोनुताई सोनुताई..." एका सुरात अख्खा वर्ग.
"आज डब्यात शिरा आणलायं" बोरीच्या झाडाखाली पंगत.
"सरयं बाजुला, मला ध्वु दी आधी" बारकुल्या तोटीवर डबे धुवायला गर्दीच गर्दी. तिच्यात मुसंडी मारत.
"पुं..गी .. कु..णाची.." आतल्या गड्यांना औट करायच्या नादात. रिंगणाबाहेर फिरत फिरत.
"सुकडी घ्या रे" शाळा सुटण्याची चाहुल. डबे काढुन तयार.
"ये आता तुज्यावर राज्य, यी शिवायला" परतीच्या वाटेवर शिवनापाणी.
"आयं, म्या चाल्लु खेळायला" दारातुन दप्तर घरात भिरकावत बाहेरच्या बाहेर सुसाट.
"मलाबी घ्या रै" आता लौंपाट खेळाय मजा येणार.
"आज्जे, राकीसाची गोष्ट सांगकी" निद्रादेवीच्या कुशीत शिरत. मायेची ऊब पांघरत.

भाषाजीवनमानप्रकटनलेखप्रतिभा

प्रतिक्रिया

पैसा's picture

27 Sep 2015 - 4:11 pm | पैसा

छोटुकल्याचे छोटेसे जग! मस्त आहे!

बाबा योगिराज's picture

27 Sep 2015 - 4:30 pm | बाबा योगिराज

बालपनीचा काळ सुखाचा.
मस्त लिहिता राव तुम्ही.

ज्योति अळवणी's picture

28 Sep 2015 - 12:45 pm | ज्योति अळवणी

आवडली. पण गावाकडच्या भाषेची सवय नसल्याने अडल्यासारख होत होतं वाचताना.

यशोधरा's picture

28 Sep 2015 - 10:07 pm | यशोधरा

किती गोड लिहिलंय! :)