बाप्पाचा नैवेद्य : चिकू खजूर फज

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
26 Sep 2015 - 6:23 am

चिकू खजूर फज
साहित्यः १.५ वाटी चिकूचा गर,
१ वाटी ओलसर खजूर, खजूर ओलसर नसेल तर थोड्या पाण्यात १०-१५ मिनिटे भिजवून घेणे.
१.५ वाटी ते २ वाट्या साखर,
२५० ग्राम खवा,
१ मूठ काजू+ १ मूठ बदाम पावडर
कृती:
चिकू व खजूर यांचा पल्प करून घेणे. परतणे.
खवा मोकळा करून घेणे व वेगळा परतून घेणे.
चिकू व खजूराच्या मिश्रणात हा खवा मिक्स करून परतणे.
साखर घालून परतत रहाणे.
काजूपावडर व बदाम पावडर घालून परतणे.
मिश्रण घट्ट होत आले की थाळ्यात घालून पसरणे.
वड्या पाडणे.
काजूने /चांदीच्या वर्खाने जसे हवे तसे सजवणे.
हे फज असल्यामुळे वडी आतून ओलसर असते.

.

प्रतिक्रिया

dadadarekar's picture

26 Sep 2015 - 6:38 am | dadadarekar

मस्त

बहुगुणी's picture

26 Sep 2015 - 6:52 am | बहुगुणी

एक बाळबोध शंका:

तयार झाल्यानंतर या वड्या फार काळ शिल्लक राहण्याची शक्यता जवळजवळ शून्यच असली तरीही राहिल्याच तर - चिकू घातला असल्याने - हा फज रेफ्रिजरेट करायला लागेल का टिकवण्यासाठी? साखरेचे क्रिस्टल्स तयार होतील का? प्लास्टिक रॅप किंवा अल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळून ठेवावेत का?

स्वाती दिनेश's picture

26 Sep 2015 - 11:14 am | स्वाती दिनेश

जनरली चॉकलेट फज करताना तेव्हा तो सेट करायला फ्रिजमध्ये ठेवतात. त्यात आपण कन्डेस्ड मिल्क घालतो ह्यात खवा घातला आहे त्यामुळे सेट करायला फ्रिजमध्ये ठेवायला लागत नाही.
प्लास्टिक किवा आलूफोलीत गुंडाळण्या इतका वेळ टिकत नाहीत हो, आधीच फस्त होतात.
स्वाती

अजया's picture

26 Sep 2015 - 8:28 am | अजया

मस्तच पाकृ आहे.

नूतन सावंत's picture

26 Sep 2015 - 8:53 am | नूतन सावंत

सुरेख पाककृती.

रेवती's picture

26 Sep 2015 - 9:05 am | रेवती

पाकृ आवडली. वेगळीच आहे.

मितान's picture

26 Sep 2015 - 9:57 am | मितान

छानंच !!!
असा प्रसाद खायला मी कुठेही जाईन ;)

संजय पाटिल's picture

26 Sep 2015 - 11:23 am | संजय पाटिल

चिकू + खजूर जबरा कॉम्बिनेशन. मस्तच होणार यात काहि शंका नाही.

कविता१९७८'s picture

26 Sep 2015 - 11:48 am | कविता१९७८

मस्तच

पद्मावति's picture

26 Sep 2015 - 1:13 pm | पद्मावति

अतिशय अनोखी पाककृती. मस्तं, मस्तं. फज अती टेंप्टिंग दिसताहेत.

अरे वा! मस्त दिसतेय की हे फज! :-)
खरंच शिल्लक रहाणार नाही हे, लगेच फस्त होईल!

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Sep 2015 - 1:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम ! फोटो काढायला शिल्लक कसा राहिला हा पदार्थ ?!

मधुरा देशपांडे's picture

26 Sep 2015 - 1:31 pm | मधुरा देशपांडे

मस्त. आता इथे चिकु कुठुन आणायचे?

पैसा's picture

26 Sep 2015 - 5:06 pm | पैसा

अगदी वेगळा पदार्थ! रंग पण कसला छान आलाय!

स्वातीतै, एकत्रच परतायचे का चिकू आणि खजूर?

स्वाती दिनेश's picture

26 Sep 2015 - 6:42 pm | स्वाती दिनेश

एकत्रच परतायचं दोन्हीचा पल्प करून.
स्वाती

वोक्के. करुन पहायचा बेत करत आहे! :P

दिपक.कुवेत's picture

7 Oct 2015 - 2:40 pm | दिपक.कुवेत

बाकि फज अप्रतिम दिसत आहेत.

पियुशा's picture

27 Sep 2015 - 11:12 am | पियुशा

य्म्म य्म्म दिसताहेत ;)

मनीषा's picture

28 Sep 2015 - 9:08 am | मनीषा

छान दिसतहेत वड्या

अत्रुप्त आत्मा's picture

28 Sep 2015 - 11:12 am | अत्रुप्त आत्मा

फोटूत उडी मारुण खाल्या गेली आहे

सानिकास्वप्निल's picture

28 Sep 2015 - 3:49 pm | सानिकास्वप्निल

वाह! वाह! अगदी तोंपासू दिसतयेत वड्या.
रंग ही सुरेख आलाय.