Skip to main content

बाप्पाचा नैवेद्य : चिकू खजूर फज

लेखक स्वाती दिनेश यांनी शनिवार, 26/09/2015 06:23 या दिवशी प्रकाशित केले.
चिकू खजूर फज साहित्यः १.५ वाटी चिकूचा गर, १ वाटी ओलसर खजूर, खजूर ओलसर नसेल तर थोड्या पाण्यात १०-१५ मिनिटे भिजवून घेणे. १.५ वाटी ते २ वाट्या साखर, २५० ग्राम खवा, १ मूठ काजू+ १ मूठ बदाम पावडर कृती: चिकू व खजूर यांचा पल्प करून घेणे. परतणे. खवा मोकळा करून घेणे व वेगळा परतून घेणे. चिकू व खजूराच्या मिश्रणात हा खवा मिक्स करून परतणे. साखर घालून परतत रहाणे. काजूपावडर व बदाम पावडर घालून परतणे. मिश्रण घट्ट होत आले की थाळ्यात घालून पसरणे. वड्या पाडणे. काजूने /चांदीच्या वर्खाने जसे हवे तसे सजवणे. हे फज असल्यामुळे वडी आतून ओलसर असते. .

वाचने 9212
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

एक बाळबोध शंका: तयार झाल्यानंतर या वड्या फार काळ शिल्लक राहण्याची शक्यता जवळजवळ शून्यच असली तरीही राहिल्याच तर - चिकू घातला असल्याने - हा फज रेफ्रिजरेट करायला लागेल का टिकवण्यासाठी? साखरेचे क्रिस्टल्स तयार होतील का? प्लास्टिक रॅप किंवा अल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळून ठेवावेत का?

In reply to by बहुगुणी

जनरली चॉकलेट फज करताना तेव्हा तो सेट करायला फ्रिजमध्ये ठेवतात. त्यात आपण कन्डेस्ड मिल्क घालतो ह्यात खवा घातला आहे त्यामुळे सेट करायला फ्रिजमध्ये ठेवायला लागत नाही. प्लास्टिक किवा आलूफोलीत गुंडाळण्या इतका वेळ टिकत नाहीत हो, आधीच फस्त होतात. स्वाती

छानंच !!! असा प्रसाद खायला मी कुठेही जाईन ;)

मस्त. आता इथे चिकु कुठुन आणायचे?

अगदी वेगळा पदार्थ! रंग पण कसला छान आलाय!