चिमणी आणि कारटं (लघुत्तम कथा)

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
14 Sep 2015 - 3:07 pm

भुरभुर चिमणी बाळाच्या हातावर जाऊन बसली.
बाळराजे खुश झाले. भुरभुर चिमणीला टकामका बघत राहीले.तान्हुला हात पुढे करून तिला पकडायला लागले. चिमणी भुर्रकन आकाशी ऊडाली. बाळराजे बघतच राहीले.बोबडया बोलांनी च्युव च्युव करत तिला परत बोलवु लागले. चिमणी झाडाच्या फांदीवर बसली. तिथुनच बाळराजेंना न्याहाळु लागली. मधुनच उडायची, वळचणीला फिरायची. बाळराजे दुडुदुडु धावले. चिमणीला पकडायचा पण करून राहिले. चविष्ट अमिषं दाखवुन तिला फशी पाडण्याचा प्रयत्न करू लागले. पण चिमणी बधली नाही. बाळराजेंच्या कचाट्यात सापडली नाही.

बाळराजे उदास झाले. तोंड पाडून गपगार बसले. चविष्ट खाऊकडं बघेनासे झाले. गाल फुगवुन त्यांनी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला. त्यांना वेगवेगळी अमिषे दाखवू जायला लागली. त्यांना आभाळात फेकुन पुन्हा झेलले गेले. ईवल्याश्या पिपाण्या तुताऱ्यांसारख्या फुंकल्या गेल्या. चविष्ट खाऊ तोंडात भरवले गेले. पण बाळराजे बधले नाहीत.

कुठुणतरी वाऱ्याची झुळुक आली बाळराजेंचे दु:ख आपले मानुन पुढे गेली. उनाड वाऱ्याने चिमणीशी युद्ध पुकारले. झाडाझाडांच्या फाद्यांनी आपला पाठींबा दर्शविला. जोरदार वादळ सुरु झाले. पाऊसही क्रोधीत होऊन कोसळायला लागला. अवकाशाच्या रणांगणात एका चिमणीसाठी महायुद्ध पेटले. चिमणीचा नि:पात अटळ होता. ईवल्याशा पंखात बारा हत्तींचे बळ घेऊन भुरभुर चिमणी वळचणीला आली. भिजलेल्या पंखात गारगार वाऱ्यात तिला हुडहुडी भरली. खुंटीवर बराचकाळ थरथरत राहिली. रात्री कधीतरी खाली जमीनीवर धारातिर्थी होऊन पडली.

बाळराजे उदास झोपले होते.
आज स्वप्नात ते आकाशी उडत होते.

कथासमाजप्रकटनप्रतिभा

प्रतिक्रिया

रातराणी's picture

14 Sep 2015 - 3:16 pm | रातराणी

टकामका दिसलं आणि ड्व्ले पानाव्ले ;)
आता गोष्ट वाचते.

रातराणी's picture

14 Sep 2015 - 3:19 pm | रातराणी

वा! मस्त आहे गोष्ट!

फ्रँकली सांगायचं तर मला समजली नाही.

हॅन्स अँडरसन्स च्या परी कथे सारखी आहे गोष्ट

जव्हेरगंज's picture

14 Sep 2015 - 9:16 pm | जव्हेरगंज

अगदी योग्य शब्द वापरला. परीकथाच लिहायचा प्रयत्न होता.

जव्हेरगंज's picture

14 Sep 2015 - 6:26 pm | जव्हेरगंज

बालहट्ट आणि चिमणीचा मृत्यु यातला योगायोग दाखवायचा होता.
कथा मुद्दामच बाळबोध ठेवली होती, फण ती खरेच बाळबोध झाली की काय?.
आता या बाळबोध कथेवरील काही बाळबोध प्रश्न.
हा आपला ऊगाच टाईमपास.

१. चिमणी नामक पक्षी बाळराजे नामक कारट्याच्या हातावर का जाऊन बसला?
२. वाऱ्याची झुळुक नक्की कुठुन आली? ही झुळुकचं होती की कळलाव्या नारद?
३. बाळराजेंच्या सत्याग्रहाचे पुढे नेमके काय झाले? हा बाळराजेच होता की ..................?
४. पिपाण्या नेमक्या किती डेसिबलमध्ये फुंकल्यांस तुताऱ्यांसारख्या वाजतील?

प्रात्यक्षिक -
बाळराजेंच्या अगम्य भाषेत झाडावर बसलेल्या चिमणीस परत बोलवा.

कार्यशाळा -
'गाल फुगवुन बसलेल्या कारट्यांना वठणीवर आणण्याच्या घरगुती उपाययोजना' यावर एक परीसंवाद घडवा.

चित्रकला-
पंखात बारा हत्तींचे बळ घेऊन आकाशात उडणारी चिमणी रेखाटा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Sep 2015 - 8:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

अखेरचा प्रकल्प-
आपणच आपल्या कथेचे शवविच्छेदान करा.

(टाईमपासच आहे ना ? मग, ह घ्या... किंवा हे घ्या ;) )

जव्हेरगंज's picture

14 Sep 2015 - 9:02 pm | जव्हेरगंज

अखेरचा प्रकल्प- :)

हे मिपाचे व्यसन आता सोडलेच पाहीजे.

तरीही नाही समजली. ही 'भयगूढकथा' वगैरे असावी असे वाटले. जाऊ द्या.

प्यारे१'s picture

14 Sep 2015 - 9:35 pm | प्यारे१

+१११