भाग २
त्यादिवशी सकाळपासून विक्रम मस्त मूडमध्ये होता. तो यायच्या अगोदरच गिता आली होती आणि एका जुन्या केसचा अभ्यास करत होती. त्यामुळे तो आत आला तेव्हा स्वतःशीच हसत होता ते तिच्या लक्षात आल. तो पेपर्स लावत होता तेव्हा गिता त्याच्याजवळ गेली आणि तिने त्याला हळूच विचारल;"काय विकी आज काही स्पेशल? एकदम मस्त मूडमध्ये दिसतो आहेस!"
तिच्याकडे वळत तो म्हणाला;"गिता काल खूप दिवसांनी राजन भेटला. मग आम्ही प्रकाश आणि हरीला जाऊन भेटलो. मस्त गप्पा मारल्या. मी त्याना आपल्याकडे आलेली ती नवीन केस आहे ना त्याबद्धल सांगितल. ती ग... १२ वर्षांची सिमरन येते ना तिची केस. poor girl! आई जाऊन ३ महिने झालेत पण अजूनही ती ते स्वीकारायला तयार नाही. तिला अजूनही वाटत की तिची आई घरी आहे आणि फक्त तिच्याशी बोलते कारण तिचे बाबा सारखे टूरवर असतात. खर सांगू का अस वाटत ग मुलांना. त्यांना अस आईशिवाय राहावं लागणार ही कल्पना नकोशी वाटते. आजारी असली तरी चालेल पण आई हवी असते ग त्या वायात. मलासुद्धा खूप त्रास झाला होता आई गेली हे स्वीकारताना. जाऊ दे! पण तुला माहित आहे; हरी म्हणाला तिला भूत बाधा झाली असेल. मग मी त्याना समजावलं की भूत बित काही नसत. हा एक आजार आहे. त्याला परनोइड स्चीझोफेनिया म्हणतात. मग त्याचे सगळे सिम्प्तम्स सांगितले. एकूण सगळ समजावलं तर राजन खूष झाला. मला म्हणाला विकी तू ना डॉक्टरच व्हायला हवा होतास. किती व्यवस्थित समजावतोस तू हा इतका अवघड विषय. मी म्हणालो की आईच आजारपण मी खूप जवळून बघितलं आहे. त्यामुळे तेव्हापासूनच माला इच्छा होती डॉक्टर व्हायची. पण मग बाबा नको म्हणाले म्हणून मी नाही गेलो त्या फिल्डमध्ये. जाम खुश होते माझे मित्र माझ्यावर. मग आम्ही एकत्र जाऊन पार्टी पण केली. रात्री उशिरापर्यंत गच्चीवर बसलो होतो आम्ही. अगदी बाबा बोलवायला वर येईपर्यंत. बाबा आले आणि ते तिघे पळाले. पण खूप मज्जा आली काल." सगळ सांगताना विक्रम खूप खुश होता. हसत होता. गिताला हे आवडल नाही की विक्रमने इथे आलेली केस त्याच्या मित्राना सांगितली. पण ती त्याबद्धल त्याच्याकडे काहीच बोलली नाही. उलट तिने विचारल;"अरे विकी; मी पण तुला म्हंटल होत न की तू साय्कोलोजीस्ट व्ह्यायला हवा होतास. मग तू राजनला का नाही सांगितलस की गिता पण मला अस म्हणाली." तिने अस म्हणताच तो त्याच्या तंद्रीत म्हणाला;"छेछे! मी तुझा उल्लेखही करत नाही. त्याना तू नाही आवडत. तुझ्याबाद्धाल बोलायला लागलो की ते निघून जातात. जसे बाबा आले की जातात ना तसे."
तिचा उल्लेख झाला तर निघून जातात? हा काय प्रकार आहे? तिच्या मनात आल. पण गिताला त्याहीपेक्षा दुसरीच एक गोष्ट खटकली. विक्रम क्लिनिक मधली अत्यंत कॉन्फीडेनशल माहिती त्याच्या मित्रांबरोबर शेअर करत होता. ते बरोबर नव्हत. त्यामुळे डॉक्टर आले तेव्हा ती मुद्धाम काम काढून त्यांच्या केबिनमध्ये गेली आणि तिने त्याना सांगितल;"डॉक्टर काका विक्रम आपल्याकडे येणाऱ्या केसेस त्याच्या मित्रांशी डिस्कस करतो."
डॉक्टर समोरचे पेपर्स बघण्यात गढले होते. त्यांनी मान वर करून गीताकडे बघितलं आणि विचारल;"कोणी सांगितल तुला अस गिता?"
"काका तो स्वतःच मला सांगत होता आत्ता की त्याने काल त्याच्या मित्राना सिमरनची केस सांगितली." गिता म्हणाली.
डॉक्टर खरातानी तिच्याकडे चमकून बघितल आणि विचारल,"तुला सांगितल त्याने की तो त्याच्या मित्राना काल भेटला?" गिता म्हणाली;"हो!"
"अजून काय काय सांगितल त्याने गिता?" डॉक्टरांनी समोरची फाईल बंद केली आणि तिला बसायला सांगत विचारल.
आता गिताला थोड विचित्र वाटल हे सगळ. कारण तिच्या मते सिमरनची केस विक्रमने मित्रांमध्ये डिस्कस कारण अयोग्य होत आणि डॉक्टरांनी त्याला त्याबद्धल समज द्यायला हवी अस तिला वाटत होत. पण डॉक्टर खराताना विक्रमला समाज देण्यापेक्षा त्याने काय काय सांगितल यात जास्त इंटरेस्ट होता अस तिच्या लक्षात आल. मग तिने शांतपणे तिच आणि विक्रमच एकूण झालेलं बोलण त्याना सांगितल.
"तो म्हणाला काल रात्री तो मित्रांबरोबर होता?"ती म्हणाली. "हम! ok! या अगोदर कधी तुझ आणि त्याच त्याच्या मित्रांबद्धाल बोलण झाल होत का?" डॉक्टरांनी तिला विचारल. मग गीताने मागे घडलेला प्रसंगसुद्धा त्याना सांगितला.
डॉक्टर खरात थोडावेळ विचार करत बसले आणि मग त्यांनी गीताकडे सरळ बघत तिला विचारल;"गिता, are you interested in vikram?"
अचानक डॉक्टर काकांकडून आलेल्या त्या प्रश्नाने गिता गोंधळली."काय काका? I mean, का?" तिने काकाना विचारल.
"गिता if so then I think i should tell you few facts about vikarm."
विक्रम बद्धलचे facts? आता मात्र गिता पुरती गोंधळली होती. "काय झाल काका?" तिने त्याना विचारल.
"गिता, विक्रम is a case of schizophrenia." डॉक्टर खरात म्हणाले आणि गिताला मोठा धक्का बसला. "पण काका त्याच्यात मला असे कोणतेच सिंतम्प्स दिसले नाहीत. तो शांत स्वभावाचा आहे हे मान्य. पण तो त्याच काम अगदी मन लावून करतो; माझ्याशी आणि आपल्या झाडू काढायला येतात त्या बाईंशी चांगला बोलतो. अस काही एकलकोंडा आहे किंवा लोकांपासून दूर रहायचा प्रयत्न करोत आहे अस काहीच दिसलं नाही काका. त्याच बोलण कधी मला irrational किंवा निरर्थक नाही वाटल." ती तिची मत पटापट मांडायला लागली.
डॉक्टर खरात हसले आणि म्हणाले;"बेटा तुला तो आवडायला लागला आहे न? माझच चुकल. मी तुला अगोदरच कल्पना द्यायला हवी होती. पण अजूनही वेळ गेलेली नाही. नको गुंतूस त्याच्यात."
गिता डॉक्टरांकडे बघून हसली."काका, मला तो आवडायला लागला आहे हे खर आहे. स्मार्ट आहे. चांगला दिसतो आणि well mannered आहे तो. पण प्रश्न माझ्या आवडण्याचा नाही आहे आत्ता. काका मी देखील साय्कोलोजीचाच अभ्यास केला आहे. तरीही मला कळल नाही की तो actually एक पेशंट आहे आणि इथे ट्रीटमेट साठी येतो आहे; कमाल आहे माझी."
"बेटा विक्रम इथे ट्रीटमेटसाठी नाही येत. तो खूपच सुधारला आहे. infact त्याचा हा आजार खूप लवकर लक्षात आल्याने त्याची ट्रीटमेट लवकर सुरु झाली आणि eventually आम्ही त्याला विश्वासात घेतून सगळ समजावलं. सुरवातीला त्याने एकूणच सगळ नाही स्वीकारलं. पण मग कधीतरी त्याला पटल आमच सांगण आणि मग मात्र त्याची recovary खूपच पटकन झाली. गेली काही वर्ष तो माझ्या ओब्झार्वेशन खाली आहे. पण हळूहळू त्याचे स्चीझोफ्रेनियाचे सिम्पटम्स कमी झाले. त्यामुळे त्याची औषध मी स्वतःच त्याच्या वडिलांशी बोलून कमी केली. असे पेशंट्स कायामचे बरे होत नाहीत हे तुलाही चांगलाच माहित आहे. but slowly and eventually they can lead a reasonable normal life." काकांनी गिताला माहिती दिली.
"किती वर्ष झाली तो ट्रीटमेट घेतो आहे काका? आणि औषध कधी बंद केली?" गीताने काकाना विचारल. तिच्यातली सायकोलोजीस्ट आता बोलत होती.
डॉक्टर खरातानी गिताला माहिती दिली. ते म्हणाले;"गिता विक्रम १४ वर्षांचा होता तेव्हा त्याची आई देवाघरी गेली. खर तर मिसेस राजे.... विक्रमची आई.... अनेक महिने आजारी होत्या. त्याना रक्तातली कावीळ झाली होती. आणि ते खूप उशिरा लक्षात आल. त्यांनी तो आजार अंगावर खूप काढला होता. त्यामुळे त्यातच त्यांचा अंत झाला. विक्रमने त्याच्या लहानपणी त्याच्या आईला फक्त औषध घेताना आणि आजारी असलेली बघितलं होत. विक्रमचे वडील कायम खूप busy असायचे. त्यामुळे विक्रम, त्याची आजारी आई आणि त्याची आजी असेच घरात असायचे. त्याची आजी कायम सुनेला टोचून बोलायची आणि विक्रमलासुद्धा त्याची आई आजारी असते त्यावरून बोलायची. विक्रमला खूप वाईट वाटायचं. पण तो खूप लहान होता त्यात आई आजारी असल्याने तो त्याच्या आजीवर जास्त अवलंबून होता. त्यामुळे आवडल नाही तरी त्यावर काय react करायचं ते त्याला कधी सुचायचं नाही. एक-दोन वेळा त्याने वडिलाना सांगायचा प्रयत्न केला. पण विक्रमसाठी त्यांच्याकडे वेळच नव्हता. आपल काम आणि आजारी पत्नीची ट्रीटमेट यातच ते अडकून गेले होते.
कधी लवकर आलेच घरी आणि विक्रमला घरात बघितल तर त्याला म्हणायचे की त्याच्या वयाच्या मुलाने घरात बसू नये संध्याकाळी. मित्रांबरोबर खेळावं. पण त्याना हे माहित नव्हत की त्यांच्या बिल्डिंगमध्ये विक्रमच्या वयाची मुलच नसतात. बाबांनी मित्र कर आणि बाहेर खेळत जा सांगितल म्हणून मग विक्रम रोज संध्याकाळी बाहेर जायला लागला.
हळू हळू तो घरात थोडा बोलायला लागला. त्याला काही मित्र मिळाले होते अस तो आईला सांगायचा. आम्ही खाली खेळतो अस म्हणायचा. त्याच्या आईला खूप आश्चर्य वाटायचं. कारण तिला माहित होत की त्यांच्या बिल्डिंगमध्ये कोणी मुलच नाहीत. त्यातूनही त्यांच्या मनात यायचं जर त्याला मित्र मिळाले असतील आणि ते खाली खेळत असतील तर आपल्याला आवाज कसा नाही येत; कारण ते लोकं पहिल्या मजल्यावारच राहात होते. त्यांनी ही गोष्ट विक्रमच्या बाबांच्या कानावर घालायचा खूप प्रयत्न केला. पण त्यांनी ते फारस मनावर नाही घेतल. काही दिवसांनी विक्रमची आई गेली. विक्रमने मात्र ते मान्य केल नाही. तो नेहेमी म्हणायचा त्याची आई त्याच्याशी बोलते. ती इथेच आहे. सुरवातीला त्याच्या वडिलाना वाटल की आई गेल्याच्या दुखःमुळे विक्रम अस बोलत असेल. पण हळूहळू त्यांच्या लक्षात आल की विक्रमचा त्याच्या म्हणण्यावर पूर्ण विश्वास आहे. कारण तो वडील घरात असतानादेखील आईशी बोलत असल्यासारखा स्वतःशीच बोलायचा. तो इतर कोणावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. हे लक्षात आल्यावर त्याच्या आजीने घरात हंगामा केला. सुनेच्या नावाने बोट मोडली. त्यांच मत होत की नातवाला सुनेच्या भुताने पछाडल आहे. त्यामुळे विक्रमचे वडील दुपारी घरात नसताना एक दोन वेळा त्यांनी कोणा साधू बाबांना बोलावून होम-हवन करवले घरात. त्याचा अजून जास्त negetive effect झाला विक्रमवर. तो खूपच एकटा रहायला लागला घरात असताना आणि शाळेत देखील.. मुळात बाबा घरात नसताना तो बाहेरच रहायचा. कुठे असतोस अस विचारल तर म्हणायचा की मित्रांबरोबर होतो."
"अरे? काका याचा अर्थ विक्रमची केस बरीच complicated आहे." गिता मन लावून एकत होती. डॉक्टर थांबले तस तिने तिच मत सांगितल.
"गिता खरा प्रोब्लेम पुढे आहे." डॉक्टर म्हणाले.
"म्हणजे काय काका?" गीताने आश्चर्य वाटून विचारले.
"गिता, विक्रमची आई गेल्यानंतर साधारण सहा महिन्यानंतरची गोष्ट आहे. त्याचे वडील त्या दिवशी थोडे लवकर घरी आले. विक्रम घरात नव्हता म्हणून सहज त्याला शोधायला ते बाहेर पडले. त्यांना विक्रम बिल्डींगच्या मागच्या बाजूला पाण्याच्या टाकीवर कोणाशीतरी बोलतो आहे अस दिसलं. म्हणजे विक्रम एकटाच होता. पण लांबूनही हे कळत होत की तो कोणाशीतरी बोलतो आहे. मध्ये एक झाड असल्याने विक्रमला त्याचे बाबा दिसत नव्हते. ते अजून जवळ गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आल की विक्रम खरच बोलत होता कोणाशीतरी. पण त्याच्या आजूबाजूला कोणीच नव्हत. त्यांना वाटल लपाछापी खेळत असतील. पण तस नव्हत. विक्रम त्याच्या बाजूलाच कोणीतरी आहे अस बोलत होता. अगदी तावातावाने बोलत होता. त्याच्या वडिलांनी गोंधळून त्याला हाक मारली. विक्रम एकदम चमकला आणि त्याने वळून बघितल. बाबांना बघून तो धावत त्यांच्याकडे आला आणि म्हणाला... बघा ना बाबा मगासपासून मी हरीला सांगतो आहे की राजानला बोलावूया त्याशिवाय खेळायला मजा येणार नाही. राजन सांगतो तो खेळ खेळायला मजा येते. पण हरी एकतच नाहीये. म्हणे राजन नसला तरी आपण खेळूया. बाबा एकदम चक्रावले. त्यांनी परत विक्रम जिथे उभा होता तिथे बघितले. त्याना खात्री झाली की तिथे कोणीच नाही. त्यांनी विक्रमचा हात धरला आणि त्याला घेऊन घरी आले. त्यांनी त्यांच्या आईला म्हणजे विक्रमच्या आजीला विचारल की विक्रमचे मित्र कधी घरी आले आहेत का? त्या म्हणाल्या मी त्याला म्हंटल अनेकदा घेऊन ये घरी. अलीकडे अंधार लवकर होतो; घरातच खेळा. मी कुठे तुला शोधायला येऊ. पण तो कधी त्याना घरी आणायला तयार होत नाही.
हा एकूण प्रकार विक्रमच्या बाबांना लक्षात नाही आला. पण panic न होता त्यांनी त्यांच्या family डॉक्टरना गाठलं. ते सर्वात योग्य काम त्यांनी केल. त्या डॉक्टरांनी त्यांना माझ नाव रेकमेंड केल. आणि अशा प्रकारे विक्रमची केस माझ्याकडे आली." डॉक्टर खरात बोलताना थांबले. त्यांनी एकदा घड्याळाकडे बघितल आणि ते गीताला म्हणाले;"बेटा आपण दुपारी किंवा रात्री क्लिनिकच्या वेळेच्या नंतर बोलू. आता माझी अपोइन्त्मेन्त आहे. मुख्य म्हणजे विक्रमला अस अजिबात वाटायला नको की आपण त्याच्याबद्धल बोलतो आहोत इथे. त्यामुळे आता तू बाहेर जा आणि त्याच्याशी पूर्वीसारखीच वाग. ठीके?"
प्रतिक्रिया
13 Sep 2015 - 5:53 pm | द-बाहुबली
हा भागही उत्तम.
कथा मस्तच आहे. अगदी एकादमात वाचलीही होती.
टीकाही (अगदी वैयक्ती भासली तरी) सकारात्मकतेने घ्यायचा आपला उमदा अॅटीट्युड मला आवडला. आता अजिबात थांबु नका.. नवीन नवीन लिखाण मिपावर करतच रहा. मिपावरील काही दर्जेदार लिखाण करणार्यांत आपण लवकर सामावीष्ट व्हाल असा विश्वास आहे. पुढील लिखाणाला शुभेछ्चा. लिखाण करायला आपल्याला कंपुचा न्हवे विचारांचा आधार लागतो ही नक्किच स्फुर्तीदायक बाब आहे. नवसदस्यांनी आपल्याकडुन शिकण्यासारखेही बरेच काही आहे.
कथा रोचक. धन्यवाद.
एक भाग टाकल्या नंतर पुढील भाग किमान दोन दिवसांनी टाकला तर वाचकांना ती वाचायला त्यावर मंथन करायला पुरेशी उसंत मिळते. असो.
13 Sep 2015 - 5:59 pm | ज्योति अळवणी
आठवडाभर तशी मी बिझी असते. म्हणून दोन भाग एकत्र टाकले आहेत. मग कदाचित ३ आणि ४ पुढील आठवड्याच्या शेवटी प्रकाशित करणे जमेल. असो.... प्रत्येकाचा दृष्टीकोन!