हैलो, ह्यलो.....

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
10 Sep 2015 - 8:15 pm

१.
"हैलो, रामराम ,काय चाललय?"
"रामराम, काय नाय बरायं की"
"जेवन झालं का?"
"न्हाय अजुन, सैपाक हुतुय"
"कदी आला कामावरनं?"
"हि काय आत्ताच यीवुन बसलुयं"
"काय म्हणतयं पौसपाणी"
"चिरचिर हाय चालु, तिकडं कसायं?"
"न्हाय काय, पाऊस न्हाय, कीळीचं अवघडायं, बोरचं* पण पानी आटलयं"
"व्हय, यील की कुठं जातुयं?, आजुन दोन म्हैन हाईत."
"कसला यीतुयन काय.... हीत भिकला लागायची येळ आली "

२.
"ह्यलो, कोन भावड्या का?"
"हा मीच बुलतुय, बोलाकी नाना,"
"आरं काय चाललयं, तिकडं जावुन ईसरला का काय आमाला, कंपनी काय म्हणतीय?"
"आसा कसा ईसरीन, कंपनी काय रूच्चीच ओ, लय दिवसांनी फोन केला?"
"पिंट्याला काम बघकी लका, कंपनीत बग कुनाला तर इचरून"
"जागा न्हायत्या राव कंपनीत बी, बगतु तरी ईचारून सायबाला"
"बग बग लका, नुस्ता घरी बसुन लुळतुय, शीतीला बी पानी न्हाय, काय पैकाच जवळ राह्यना."
"ते बी खरच हाय मना"
"पाऊस हाय कारं तिकडं?"
"........"

३.
"ह्यलो"
"हा बोल"
"काय भावड्या शेरात जावुन लय मोटा सायब झाला काय?, कदितरी फोन करत जा लगा"
"आरं न्हाय, हित कामात काय कळत नाय, तु तर करत जाकी."
"वाट्सँप कराय बरा येळ मिळतु रं?, फुटु, बिटु, जोरातच हाय म्हन की"
"तेवडाच आपला टायमपास, बर काय इशेश?"
"लगा आयट्या झालायं, कुटतरी नुकरी बघकी तुज्या वळकीन"
'नुकरी काय घरी बसुन लागती वय? फिर की भाईर जरा'
"बास का राव, मन्लं तु तर काय करचील, आरं म्हाताऱ्यानं भाईर काडायचचं बाकी ठीवलयं. नळाला* बी आजुन पानी सुट्ल न्हाय, गावात तर कुत्र बी दिसना"
"यील यील पाऊस, कशाला काळजी करतुयं?"
"कस्ला यीतुय आयघालीचा* दोन म्हैन झालं, टिपका न्हाय"
"........"

टिपा:
बोर- कुपनलिका
नळ- कँनॉल
आयघालीचा- ग्रामीण शिवी

- © जव्हेरगंज

भाषासमाजजीवनमानप्रकटनलेखप्रतिभा

प्रतिक्रिया

जेपी's picture

10 Sep 2015 - 8:24 pm | जेपी

बर मग.
आता काय करायचा.

जव्हेरगंज's picture

10 Sep 2015 - 8:44 pm | जव्हेरगंज

हे ही खरचं आहे म्हणा.
जरा जास्तच धागे आलेत या विषयावरचे.

चांदणे संदीप's picture

10 Sep 2015 - 10:56 pm | चांदणे संदीप

छान लिहिले आहे, खरं, पाऊस आल्यावर लेख आला की हो तुमचा! :)

हिवसाळ्याच्या प्रतिक्षेत असलेला
Sandy

जव्हेरगंज's picture

10 Sep 2015 - 11:22 pm | जव्हेरगंज

हो संदीपजी, रोज त्या बातम्या पाहुन आतुन ढवळुन जायचं.
पाऊस आलाय हि आनंदाची गोष्ट आहे.
हिवसाळा शब्दप्रयोग छान आहे.