वटवट्या/Prinia

जागु's picture
जागु in मिपा कलादालन
5 Sep 2015 - 11:05 am

फ्लेमिंगो दर्शनासाठी गेले तेव्हा खाडीच्या रस्त्याला ह्या वटवट्याचे दर्शन झाले. साधारण चिमणी एवढा किंवा लहान म्हणा ह्याचा आकार. खुप अ‍ॅक्टीव्ह आहे हा पक्षी आणि धीटही. हा पळेल म्हणून मी भराभर फोटो घेत होते पण मला आजिबात न घाबरता ह्याने फोटो काढून दिले. अर्थातच ह्याच्या आवाजामुळे ह्याला वटवट्या हे नाव पडले आहे. गवत-झुडुपावरील किडे ह्यांचे भक्ष असते.

हा वटवट्या
१)

खालचे सगळे फोटो पिल्लू वटवट्याचे आहेत.
२)

३)

४)

५)

६)

७)

८)

प्रतिक्रिया

वाह! बहुतेक राखी वटवट्या (अ‍ॅशी प्रिनिया) आहे. जुव्हेनाईलचे फोटो झक्कास आहेत. फार छान..!

अजून येऊ द्यात.

सुधांशुनूलकर's picture

5 Sep 2015 - 11:24 am | सुधांशुनूलकर

हा अ‍ॅशी प्रिनियाच आहे.

फोटो खूपच छान. हा खूप चळवळ्या, एका जागी स्थिर न राहणारा पक्षी आहे.

मांत्रिक's picture

5 Sep 2015 - 11:34 am | मांत्रिक

मस्त माहिती व छान फोटो!

सुबोध खरे's picture

5 Sep 2015 - 11:39 am | सुबोध खरे

फोटोमध्ये आपला बुकमार्क मध्यभागी असल्यामुळे प्रत्येक फोटोत त्याच्या कडे लक्ष जाते त्यामुळे फोटो सुंदर असूनही त्यातील मजा जात आहे.

अलिकडेच माझे बरेचसे फोटो फेसबुकच्या वेगवेगळ्या पानांवर चोरी झालेले लक्षात आलेत. त्यामुळे मी असे वॉटरमार्क टाकते.

अरे! हा माझ्या बागेत नेहमी दिसणारा पक्षी आहे.नाव माहित नव्हते.हाच सकाळी उठवतो की काय आम्हाला! एक पक्षी पहाटेपासून बडबड करत असतो खरा!!

स्वीप्स, सुधांशू,मांत्रिक धन्यवाद.

अजया हा नावाप्रमाणेच वटवट्या आहे.

प्यारे१'s picture

5 Sep 2015 - 3:53 pm | प्यारे१

स्वीप्स? काय हे?
खंतावलेत ते. गेले तब्बल सव्वा दोन तास काही खाल्लं नाही त्यांनी. swaps आहे ते. आम्ही स्वैप्स पण नाही लिहीत. 'स'ला व आणि वर चंद्र.
बाकी फ़ोटो छान ओ जागुतै.

घाईत चुकून झाले बरे दुरुस्त करते स्वॅप्स.

मस्त मस्त फोटो. काही पोझ तर लैच आवडल्यात.
अवांतरः विंग्लिश नाव मस्त वाटतेय. प्रिनीया.
छोट्या हॉटेलला किंवा कॅफेला द्यायला छानेय. मला तर लोगो पण करावासा वाटूलाय.
एखादे अँड्रोईड अ‍ॅप करावे काय डेव्हलप?

एक एकटा एकटाच's picture

5 Sep 2015 - 5:55 pm | एक एकटा एकटाच

मस्तय

खूपच छान फोटो टिपले आहेत.

नांदेडीअन's picture

6 Sep 2015 - 9:46 am | नांदेडीअन

नाही हो, Ashy Prinia (राखी वटवट्या) वाटत नाहीये हा पक्षी.
बहुतेक Plain Prinia आहे.

कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

नांदेडीअन's picture

6 Sep 2015 - 9:47 am | नांदेडीअन

बाय द वे, फोटो छान आल्या आहेत. :)

पहिले छायाचित्र हे राखी वटवट्याचे आहे. नंतरची छायाचित्रे मात्र प्लेन प्रिनियाच्या जुव्हेनाइलची आहेत.

नांदेडीअन's picture

6 Sep 2015 - 5:43 pm | नांदेडीअन

पहिले छायाचित्र हे राखी वटवट्याचे आहे. नंतरची छायाचित्रे मात्र प्लेन प्रिनियाच्या जुव्हेनाइलची आहेत.

नाही हो.
उलट पहिला फोटो तर नक्कीच Plain Prinia चा आहे.

Ashy Prinia पक्षी हा आहे.
prinia

अत्रुप्त आत्मा's picture

6 Sep 2015 - 10:08 am | अत्रुप्त आत्मा

WoW