गुजरात.......८ - रानीकी बाव...

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in भटकंती
4 Sep 2015 - 9:56 am

=================================================================
भाग १... भाग २... भाग ३... भाग ४... भाग ५... भाग ६... भाग ७... भाग ८ (रानीकी बाव)...
=================================================================

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
एकूण प्रवास ३५०० कि. मी.
गाडी: मारुती रिट्झ
तक्रार : शून्य.

गुजरातच्या प्रवासाच्या शेवटच्या दिवशी आम्ही रानीकी बाव या प्रसिद्ध विहीरीला भेट दिली. त्याचे एक छायाचित्र मी मागील लेखाच्या शेवटी टाकले होते तेच आता येथे परत टाकतो.

.......यानंतर आम्हाला पाटणला जगप्रसिद्ध असलेली रानी की बाव पहायला जायचे होते; त्याबद्दल पुढच्या भागात.
पण तेथील एक अप्रतीम शिल्प येथे ट्रेलर म्हणून टाकायला हरकत नाही. हा फोटो मला दोन भागात काढावा लागला कारण मधे खांब येत होते. त्यानंतर लेन्स करेक्शन करुन एकत्र केला आहे.....

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

ही विहीर सोळंकी घराण्याच्या भीमदेव नावाच्या राजाच्या राणीने बांधली अशी नोंद आहे. हा राजा मुलराजाचा मुलगा. याचा काळ होता १०२२ ते साधारणत: १०६३. म्हणजे ज्या काळात जेरुसलेममधे मुसलमान व ख्रिश्चन क्रुसेडमधे एकामेकांचे गळे घोटत होते तो हा काळ. हे घराणे अनहिलवाड पट्टन या गाचाचे म्हणून ओळखले जायचे. या घराण्याचे राजे बरेच ताकदवान असावेत कारण ज्या प्रकारची शांतता असे बांधकाम करण्यास लागते ती त्यांनी थेथे राबविली होती हे उघड आहे.

सगळ्यात मागे दिसते आहे ती विहीर..ही गावकर्‍यांना थोडीफार माहीत होती.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

पाटण शहराची स्थापना झाली ७४६ साली राजपूत राजी वनराजा चावडा याच्या काळात. ही गुजरातची राजधानीही काही काळ होती. काही काळ म्हणजे अंदाजे ६०० वर्षं.
चावडा घराणे अंदाजे ७४६ ते ९४२
सोलंकी घराणे अंदाजे ९४२ ते १२४४
वाघेला घराणे अंदाजे १२४४ ते १३०४
या घराण्यांनी पाटणहूनच गुजरातवर राज्य केले. अनहिलवाड (पूर्वीचे पाटण) हे त्या काळातील फार मोठे शहर असावे.

आत शिरल्याशिरल्या दिसणार्‍या शिल्पांनी सुशोभीत भिंती..
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

११८० साली महंमद घोरीने पाटणवर आक्रमण केले पण सोळंकींनी ते परतवले पण दुर्दैवाने पुढे त्याच्याच एका सरदाराने म्हणजे कुतुबुद्दीन ऐबकने १२०० च्या आसपास पाटणचा विध्वंस केला. पुढे दिल्लीच्या सुलतानाचा र्‍हास झाल्यावर गुजरातचा सुलतान स्वतंत्र झाला व त्याने त्याची राजधानी अहमदाबादला हलविली. साहजिकच त्यामुळे पाटणचे महत्व कमी कमी होत गेले.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

काळाच्या ओघात या विहिरीला पाण्याचा पुरवठा करणार्‍या जमिनीखालील झर्‍यांनी जमिनीतील हालचालींमुळे त्यांचे पात्र बदलले आणि नंतर ही विहीर संपूर्णपणे गाळाने भरली. त्यामुळेच त्यातील अप्रतीम शिल्पे मुसलमानांच्या आक्रमणापासून वाचली नाहीतर याचेही तुकडे पडले असतेच. जी शिल्पे गाळात गाडली गेल्यामुळे वाचली तीच आता वातावरणाशी संबंध येताच झिजत जाणार हा काळाचा व निसर्गाचा खेळ आहे असेच म्हणावे लागेल. ही विहीर तेथे आहे हे गावकर्‍यांना माहीत होते कारण वृद्ध माणसे सांगतात की त्यांनी त्या विहीरीतून पाणी काढले होते पण वटवाघळांमुळे त्यांची कधी आत जायची हिंम्मत झाली नसावी. पण त्यांना फक्त त्या विहीरीबद्दल माहिती होती. त्या विहिरीच्या पाण्याकडे उतरण्यासाठी ज्या पायर्‍या होत्या त्यावर जमलेल्या मातीवर ही मंडळी शेती नांगरत असत.

अप्सरा...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

विहिरीची मापे पाहिली तर आपण तोंडात अचंब्याने बोटे घालतो. ६४ मिटर लांब, एका बाजुला २७ मिटर व एका बाजुला २७ मिटर. खोली आहे जवळजवळ २३ मिटर.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

श्रीविष्णू वराह अवतार...
भूदेवीला एका हिरण्यकश्य नावाच्या राक्षसाने पळवून पाताळात एका सरोवरात लपवून ठेवले. पृथ्वी नाहीशी झाल्यामुळे सगळीकडे हाहा:कार माजला. त्यावेळे तेथे प्रकट होऊन श्रीविष्णूने वराहाच्या अवतारात जाऊन त्या राक्षसाचा वध करुन भूदेवीला आपल्या सुळ्यांवर बसवून वर आणले.....अशी काहीतरी गोष्ट आहे ती...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

यातील मूर्तींचा खजिना सापडला १९५० च्या मध्यास. भारतीत पुरातत्व खात्याने ५० वर्षे कष्ट करुन हा खजिन्याची गाळापासून सुटका केली व दहाच वर्षात युनेस्कोने रानी-की-बावला जागतिक वारसाचा दर्जा बहाल केला. या विहीरीत एकूण २९२ खांब असले असते पण आता त्यातील २२६ खांब जागेवर आहेत. आत्ता ज्या जमिनीवर उभी आहे त्या जमिनीवर मला वाटते अजून बरेच काही सापडण्यासारखे असणार. तेथे उत्खनन का केले जात नाही हा संशोधनाचा विषय ठरावा. गुजरात-कच्छ ते पार सिंधपर्यंत ख्रिस्तपूर्व काळापासून अशा अतिखोल विहिरी खणण्याचे ज्ञान स्थानिक लोकांकडे उपलब्ध होते हे निर्विवाद. पाण्याच्या काठाने असलेले बांधकाम ना फक्त सूर्याच्या तीव्र किरणांपासून व उष्णतेपासून संरक्षण करायचे पण मला वाटते तेथे पाण्याने गारवाही निर्माण होत असावा. विशेषत: राण्यांसाठी... आता एवढ्या खोलवर असलेल्या पाण्यापर्यंत पायर्‍यांवरुन पोहोचायचे म्हणजे वर्तुळाकार (चौकोनी पण स्कृचे तत्व) आकारात पायर्यास हव्याच. २३ मिटर खोल उतरण्यासाठी किती वेळ लागेल याचा हिशेब केला तर त्या वेळात भिंतीवरील शिल्पे पहात पहात खाली उतरणे हे स्वाभाविकच म्हणायला हवे. हे वाचून तुम्ही तेथे गेलात तर आपल्या डोळ्यासमोर राण्या, त्यांच्या दासी व इतर लवाजमा त्या पायर्‍या उतरत आहेत हे दृष्य निश्चितच उभे राहील.. शिवाय या मजल्यांवर त्या काळातील खास बायकांची तुळशीबागही भरत असे.

एक सुंदर बासरीवादक..
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

ओठांची रंगरंगोटी करणारी एक सुंदर स्त्री...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

आळस देणार्‍या स्त्रियांच्या सौंदर्याबद्दल आपल्या साहित्यात बरेच काही लिहिले गेले आहे व अशा स्त्रियांची शिल्पेही विपूल प्रमाणावर सापडतात. असेच एक शिल्प कोपेश्वराच्या मंदिरावरही आहे...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

बहुतेक मदन...हातात उस व दुसर्‍या हातात बाण हे त्याची चिन्हे दिसत आहेत....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

पायर्‍यांच्या कडेला असलेल्या भिंतीवरचे कोरीवकाम...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

कृष्णधवलची मजा काही औरच असते...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

आम्ही गेलो तेव्हा विहीर कुठे दिसेना म्हणून आम्ही एका माणसाला विचारले देखील. मी फार पूर्वी येथे आलो होते हे खरे पण आता सर्वच बदललेले दिसले. त्याने बोट दाखविलेल्या दिशेला आम्ही चालू लागलो आणि अचानक थोडी दूर दगडांची एक जमिनीवर आलेली एकफुट उंचीची पायरी दिसली. थोडे पुढे गेल्यावर त्या पायरी पलिकडील दृष्य बघून ताजमहाल जसा एकदम समोर येतो त्याची आठवण झाली. २३ मिटरची खाली उतरण्यास आपल्याला चार मजले सात जिन्यांच्या सहाय्याने उतरावे लागतात. आता फक्त एकाच मजल्यापर्यंत जाता येते. पण पूर्वी तिसर्‍या मजल्यापर्यंत उतरण्याची परवानगी होती. एका नतद्रष्ट माणसाने एका मुर्तीचा हात तोडल्यामुळे ती सुविधा बंद करण्यात आली. मुर्तींचा दगड तसा ठिसूळ आहे त्यामुळेही असेल कदाचित.

लहानसहान हजारो शिल्पे...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

गुढरम्यता....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या प्रकारच्या खांबावर सगळा डोलारा उभा आहे..
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

भिंतींवरचे शिल्पकला...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

खांबांवरची नक्षी
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

खालच्या मजल्यावर आपल्याला जाता येत नाही पण आपण ज्या पायर्‍या उतरुन जातो त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरुन आपल्याला आतील शिल्पांचे दर्शन घडते. सगळ्यात वर दिलेले छायाचित्र अशाच आतील भातील श्रीविष्णूच्या मूर्ती आहे. ते कसे काढले आहे तेही दिलेलेच आहे. अशीच अजून दोनतीन शिल्पे.. आत अंधार असल्यामुळे याची छायाचित्रे काढण्यास थोडे अवघड आहे...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

ही आतील भागात असल्यामुळे तुलनेने सुस्थितीत आहेत फक्त यावर जळमटे साठलेली दिसतात आणि शिवाय कबुतरांचा त्रास आहेच...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

पग घुंघरू...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

श्री गणपती...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

माझी ह्युमन शॅडो ऑन डिव्हाईन ब्युटी ही कथा ज्या फोटोवरुन सुचली ते छायाचित्र..

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

एकूण ५०० प्रमुख व जवळजवळ ११०० लहान शिल्पे कोरलेली आहेत. पण ती अशी कोरली आहेत की एवढी शिल्पे असून कोठेही दाटीवाटी झाली आहे असे वाटत नाही. शिल्पांएवढेच महत्व मोकळ्या जांगांनाही कसे असते हे आपल्याला येथे कळते. ही सगळी विहीर श्रीविष्णूच्या अवतारांवर आधारलेली आहे. महाभारतातील प्रसंग, रामायणातील प्रसंग, काही जैन ऋषींच्या मूर्ती तसेच बुद्धाच्याही एकदोन मूर्ती आहेत. अप्सरा, नृत्यांगना व विषकन्यांची अगणित शिल्पे आहेतच.

किसकी सुरत चमक रही है इस आरसी में......
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

सगळ्यात आत पाण्याच्यावर मोडकळीस आलेली शिल्पे....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

जेथे पाणी आहे ती विहीर. यावर पाणी उपसण्यासाठी मोटी आहेत त्या जुन्याच आहेत का तुलनेनी नंतरच्या काळातील याची कल्पना नाही....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

विहीरीच्या बाजूने घेतलेले पायर्‍यांचे छायाचित्र...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

सगळ्यात शेवटच्या मजल्यावरील भिंती आता कोसळायच्या परिस्थितीत असल्यामुळे तेथे कोणालाच जाण्यास परवानगी नाही पण तेथेही शिल्पे आहेत व वातावरण गुढरम्य आहे. भुकंपप्रवण प्रदेश असल्यामुळे पुरातत्व खात्याला जमिनीतील हालचालींची नोंद घ्यावी लागते. त्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी काचेच्या पट्ट्या ठेवल्या आहेत. थोडीजरी हालचाल भुगर्भात झाली तर या खाली पडतात किंवा फ़ुटतात. आता अर्थात आधुनिक उपकरणेही आणलेली असावीत.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

दगड निर्जीव असतात असे म्हणणार्‍यांनी रानी-की-बावच्या पायर्‍या एकदा उतरायलाच पाहिजेत. मला खात्री आहे त्यांना त्यांचे शब्द मागे घ्यावे लागतील.

जयंत कुलकर्णी
गुजरातची सहल समाप्त.... :-)

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

4 Sep 2015 - 10:15 am | सुबोध खरे

अप्रतिम लेख

लेखमाला पुरी करून चित्ररुपात दाखवल्याबद्दल शतश: धन्यवाद.

सौंदाळा's picture

4 Sep 2015 - 10:48 am | सौंदाळा

अप्रतिम लेखमाला आणि छायाचित्रे
तुम्ही लेखमालेच्या सुरुवातीला प्रवासवर्णन माझा प्रांत नाही असं काहीतरी म्हणाला.
पण संपुर्ण गुजरात सहलीचे वर्णन आणि फोटो बघताना खुप मजा आली.
तुमच्याकडुन अजुन प्रवासवर्णनांच्या प्रतिक्षेत :)

बहुगुणी's picture

4 Sep 2015 - 10:54 am | बहुगुणी

जयंतराव, वा!

काय सुरेख प्रकाशचित्रे आणि लेख आहे! नियमित वाचन होत नसल्याने या आधीचे भाग वाचलेच नव्हते, आता पापक्षालन केलंच पाहिजे. या वीकेंडला मालिकाच वाचून काढायला हवी!

(या लेखातल्या पहिल्या चित्रातला जोड कळत नाही इतका बेमालूम आहे, कसा केलात ते वेळ असेल तर उदाहरणासह स्टेप बाय स्टेप दाखवा.)

ज्यांचे वाचन माझ्यासारखे चुकले असेल त्यांच्या साठी आधीच्या भागांचे दुवे:

भाग १
भाग २
भाग ३

भाग ४
भाग ५
भाग ६
भाग ७

विजय_आंग्रे's picture

4 Sep 2015 - 11:00 am | विजय_आंग्रे

सविस्तर माहीती आणि फोटो आवडले.

इस्पिक राजा's picture

4 Sep 2015 - 11:14 am | इस्पिक राजा

अतिसुंदर छायाचित्रे, वर्णन देखील झक्कास.

मी-सौरभ's picture

4 Sep 2015 - 12:38 pm | मी-सौरभ

मला एक पण प्रकाशचित्र दिसत नाहीये :(

रानी की वाव दगडात रचलेलं काव्य आहे.तुमच्या फोटोंनी डोळ्यांचे पारणे फिटले!

प्रचेतस's picture

4 Sep 2015 - 1:40 pm | प्रचेतस

अगदी अगदी.

एकापेक्षा एक सरस शिल्पे आणि त्यांना तितकीच न्याय देणारी सुरेख छायाचित्रे.

अप्रतिम शिल्पकलेचं तितकंच देखणं प्रगटीकरण जयन्तरावांनी आपल्या लेखणी आणि छायाचित्रांतून करवलं आहे.
तुमच्या प्रत्येक लेखासाठी एक एक टोपी तुम्हाला द्यावी लागते. आज अजून एक.

अभ्या..'s picture

5 Sep 2015 - 6:38 pm | अभ्या..

+१ सहमत
अगदी अप्रतिम अशी छायाचित्रे अन ओघवते लेखन.

अशीच विहीर अहमदाबाद जवळ अडलज येथेही आहे.

कपिलमुनी's picture

4 Sep 2015 - 3:02 pm | कपिलमुनी

फोटो खुप सुंदर ! ट्रिप आवडली.

रमेश आठवले's picture

4 Sep 2015 - 9:24 pm | रमेश आठवले

काळाच्या ओघात हि महान वास्तू मातीच्या गाळा खाली झाकली गेली आणि म्हणून त्या मुळे नन्तरच्या विध्वंसा पासून वाचली असे आपण लिहिले आहे. मला वाटते कि अजंठा चा बचाव ही असाच, नन्तरच्या काही शतकात खूप जंगल वाढल्याने, झाला असावा. निजामाच्या राज्यात एका ब्रिटीश अधिकाऱ्याने त्याचा शोध घेतला आणि त्याला प्रसिद्धी मिळवून दिली.

दीपा माने's picture

5 Sep 2015 - 8:05 am | दीपा माने

खुपच सुंदर फोटो आणि लेखही!

दीपा माने's picture

5 Sep 2015 - 8:06 am | दीपा माने

खुपच सुंदर फोटो आणि लेखही!

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Sep 2015 - 12:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम लेखमाला आणि चित्रे !

फार देखणे फोटो.सुरेख लेखमाला.

असंका's picture

5 Sep 2015 - 3:25 pm | असंका

दगड निर्जीव असतात असे म्हणणार्‍यांनी रानी-की-बावच्या पायर्‍या एकदा उतरायलाच पाहिजेत. मला खात्री आहे त्यांना त्यांचे शब्द मागे घ्यावे लागतील.

एक सेकंद तरी मला नक्कीच असं वाटलं की हे सगळं जिवंत आहे....
(आपल्या फोटोग्राफीचं कौशल्यही आहेच म्हणा ...)

अनेक धन्यवाद!!

सुरेख छायाचित्रे आणि वर्णन !

दगड निर्जीव असतात असे म्हणणार्‍यांनी रानी-की-बावच्या पायर्‍या एकदा उतरायलाच पाहिजेत. मला खात्री आहे त्यांना त्यांचे शब्द मागे घ्यावे लागतील.

अगदी नेमके ...

खटपट्या's picture

5 Sep 2015 - 8:26 pm | खटपट्या

जबरदस्त मालिका.

अशीच बाव सातार्‍याजवळ आहे असे ऐकीवात आहे.

जयंत कुलकर्णी's picture

5 Sep 2015 - 8:58 pm | जयंत कुलकर्णी

ती बाव मोठी आहे पण एवढी मोठी नाही शिवाय तुलनेने फारच अलिकडची.... हे प्रकरण फारच अचंबित करणारे आहे...

जयंत कुलकर्णी's picture

5 Sep 2015 - 8:58 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

अत्रुप्त आत्मा's picture

5 Sep 2015 - 9:19 pm | अत्रुप्त आत्मा

अप्रतिम !
शतशः धन्यवाद.. हो जयंतकाका. मस्त मस्त मस्त. :)

सुहास झेले's picture

5 Sep 2015 - 9:19 pm | सुहास झेले

वाह जबरदस्त ....

दगड निर्जीव असतात असे म्हणणार्‍यांनी रानी-की-बावच्या पायर्‍या एकदा उतरायलाच पाहिजेत. मला खात्री आहे त्यांना त्यांचे शब्द मागे घ्यावे लागतील. _/|\_

पैसा's picture

5 Sep 2015 - 10:01 pm | पैसा

अप्रतिम देखणी, श्रीमंत शिल्पे आहेत ही! विहीर बुजली गेली त्यामुळे सुरक्षित राहिली, नाहीतर काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही!

पद्मावति's picture

5 Sep 2015 - 10:49 pm | पद्मावति

अप्रतिम प्रवास-मालीका.
उत्तम वर्णन आणि फोटो बहारदार. अद्भुत प्राचीन मंदिरे, शिल्पकला, बारीक नक्षीकाम पाहून डोळ्याचे पारणे फिटले. त्याचबरोबर वाढवणा चे पक्षी, हरप्पा कालीन लोथल, मोंढेरा चे सूर्य मंदिर आणि रानीकी बाव -- केवळ अद्भुत. सगळेच फोटो सुंदर आहेत पण त्याहीपेक्षा तुम्ही प्रत्येक ठिकाणाचं जे बारीक सारिक ऐतिहासिक तपशीला सकट वर्णन केले आहे त्यामुळे ही सफर अतिशय रंजक झाली आहे.