एक गोष्ट त्यांची पण !!!:
रात्रीचे दहा तरी वाजले असतील . ती वाट बघत होती, म्हणजे तशी एकटीच आली होती ती विमानतळावर, कुणाला तरी जवळच्या माणसाला "रिसीव" करायला . गर्दीत असूनही आज ती जर हरवली होती . खर तर इराला वाट पाहण्याचा कधीच कंटाळा नाही यायचा. एखादे पुस्तक, मासिक किंवा आजू बाजूच्या माणसांचे निरीक्षण हा तिचा छंद होता , त्यामुळे वेळ कसा घालवायचा हा प्रशन तिला कधीच पडल नाही .
पण आज मात्र वेळ पळत नव्हता अन विचार तर नाहीच नाही . आपण स्वतः का आलो आहे इथे ह्याचा विचार तिच्या मनातून जात न्हवता . खर तर , तिच्या मनात दुसरेच विचार हवे होते, थोडे हूर हूर लावणारे , लग्न अगदी काही दिवसांवर आले होते . पण ....इरा सतत घड्याळाकडे बघत होती , कोणत्या हि क्षणी तो बाहेर येयील , आपल्याला काय वाटेल त्याला पाहिल्यवर हेच तिला झेपत नाही असे वाट होते
इराला कंटाळा आला आहे असे वाटे पर्यंतच .....तो आला "इतक्या वर्ष नंतर पण तो अजून तसाच , तेवढ्याच वयाचा कसा काय दिसू शकतो"....... "इरा............", त्याचा त्या उत्साही सादेने तिची विचार शृंखला तुटली.... " अग ये इकडे तिकडे काय बघातीयेस...ओळख आहे ना......, कशी ग तू अशी कायम आपल्याच नादात, तुझ्या पार्टनर ला पण अशीच पकवतेस का ग , आपल्यातच हरवून :) "
आकाश बोलतच होता अन इराला काय बोलायचे , काय कारायाच्रे तेच सुचत नवते....आणि हा मात्र मधली सगळी वर्षे गायब करूनच आला होता जणू काही
इराला त्याचा " पार्टनर " शब्द खटकला , तिच्या या आवडत्या पुस्तकावरून आकाश तिची खूप खेचत असे , आणि तुला दुसर्याच क्षणी त्यातलाच संदर्भ तिला आठवला "पाठीला पाठ लावून आलेली भावंडे "
"अहो बहिणाबाई , बघतच बसणार कि मला घरी पण नेणार आहेस ?"
"अरे , sorry एकदम बराच काही आठवले आणि काही सुचलास नाही रे , किती वर्षे झाली रे तुला बघून, चल लगेच निघू यात "
" तुला बरे पाठवले कि आई नि , स्वतः गाडी घेवून, लग्न दहा दिवसावर आलाय आणि , अर्थात तुझ्या हट्टापुढे कुणाचे काय चालणार म्हणा , तशी पण तू आमची लाडोबा आहेस , कोण कोण डेरे दाखल झालाय ग ?, काही पण म्हण तू मस्त वाटती आहेस आता , आय मीन online दिसतेस त्या पेक्षा , मला खरच नाही वाटत आहे कि तू इतकीमोठी झालीयेस , मला अजून पण ती शाळेच्या गणवेश मधली आठवतेस ग ......किती वर्षे गेली न उडून ...अत्तारासारखी"
इरा सफाईने गाडी चालवत होती , मुंबई - पुणे तिचा जणू रोजचा रस्ता होता , तिला असे वाटले कि तिला जी मधली वर्षे सतत डाचत आहेत , जाणवत आहेत , ती याची गावी नाहीतच जणू मुळे, कसे जमते ह्याला हे , पण तो जे बोलतोय ते अगदी मनापासूनच , त्याला आत एक बाहेर एक जमलाच नाही मुळात ....आणि याच्या या प्रश्नांची काय उत्तरे देणार , घर तर पाहुण्यांनी भरलाय , पण याच्या साठी कुठे जागा आहे त्यामध्ये, कसे सांगायचे याला कि याची सोय कुठे केलेय ते ... जावू दे आता नकोच काही बोलायला या बद्दल ....
"अग तू काय मौन व्रत घेतले आहेस कि काय ?"
"अरे नाही , लक्ष जर traffic कडे होते, तू सांग कसा आहेस आणि प्रवास कसा झाला तुझा ? तुला भूक लागली असेल तर थांबू आपण, नाही तर मागे डब्या मध्ये लाडू आणि sandwitches आहेत घे न तू "
"लाडू , अरे वा आई नि केलेले दिसतात "
"नाही रे , मीच केलेत , बघ हा ...काही झाले तुला तर तुझ्या जबाबदारी वर खा"
"बाप रे , असू असू दे तेवढी रिस्क घायला काय हरकत आहे तुझ्या बद्दल, तो जो सो called तुझा पार्टनर आहे ना निमिष नावाचा , त्याच्या रिस्क पुढे हे तर काहीच नाही :)
"आकाश , तुला कानपिळी साठी बोलवले आहे विसरू नको आणि तू झोप थोडा वेळ , पुणे आले कि उठवते तुला " इरा नि मस्त पैकी आवडती गाणी लावली आणि ..
आकाश थकला होता , कित्येक मैलांचे आणि वर्षांचे अंतर कापून तो आला होता , दमला होता , झोपून पण गेला
आणि मग इरा , समोर रस्ता , गाणी आणि सोबतीला असंख्य विचार ....हा खरच आला , केवळ आपल्या साठी , म्हंटले तर कसलाच पुढचा मागचा विचार न करता ....आणि एकी कडे फक्त माझाच विचार करून .....
का बोलावले मी याला , मला आत्ताच का गरज वाटली याची . खर तर मी जेव्हा जेव्हा अडखळले , गोंधळले तेव्हा तेव्हा हा होता . पण आता असा काहीच नाहीये , मी निमिष ला स्वत निवडलाय .
त्याला मी आणि आकाश किती वर्षे ओळखतंय , पूर्ण वेळ देवून, आणि विचार करून हे लग्न ठरलाय . तरी मला आकाश येई पर्यंत इतके बैचेन का वाटत होते , आणि आता तो आहे तर उगाचच मन भरून आलाय आणि जर बरे वाटतय ........अरॆऎऎऎए
"इरा , लक्ष कुठाय , सावकाश चालव , कंटाळा आला असेल तर आपण थांबू पाच मिनिट . बाई साहेब लग्न आहे तुमचे विसरू नका आणि जर जमले तरी माझी पण काळजी करा ..."
अरे सॉरी, परत नाही होणार असे , आणि नको थांबायला , पोचत च आलोय आपण , अजून अर्धा तास फार तर , तू झोप . त्याने परत डोळे मिटले. तरी मन थोडेच झोपणार ते तर जागेच , किती विचारांचे काहूर माजले होते त्याच्या मनात. खर तर त्याला इतक्यात कुणा समोरच परत यायचे नव्हते , प्रश्न चुकवावे असे म्हणून नाही तर उत्तरे द्यायचा कंटाळा आला होता म्हणून .
"मी आलो आता सुद्धा केवळ या पोरी साठी . किती माया आहे तिची आपल्यावर , आणि किती विश्वास . भावा पेक्षा मैत्रीच नाते म्हणूनच अधिक घट्ट . पण आपल्या येण्यामुळे वातावरण गढूळ तर नाही न होणार . केवळ इराचे लग्न आहे म्हणून , हे प्रश्न निसटतील . जावू दे मी माझ्या परीने प्रयत्न करीन कि लग्न घर अगदी आनंदी असेल , जसे असायला हवे तसाच .'
" बंधूराज , उठा !!! हम अपनी मंझील पोहोच गये " .
" हो ग , हा बघ मी जगच तर आहे "
"दादा, समान बाहेर काढू गाडी तून पटपट "-
"अग इरे आपण इथे कुठे आलोय , म्हणजे आपण नवीन घर घेतलीये आणि तुम्ही लोकांनी साधे कळवले पण नाही मला "
"फार प्रश्न नको न विचारू, आधी वर तर चल"
इराला अजूनही कळत नव्हते कि याला कसे सांगायचे कि आपण कुठे आलोय ते . जे काय सुचेल ते बोलायचे इतकाच ठरवून तिने डोर बेल वाजवली . आणि आकाश त्याला वेगळाच tension कि दार कोण उघडेल , आई , बाबा कि आणि कुणी .....आणि समोर आल्यावर काय किती हि नाही म्हंटले गेल्या पाच वर्ष मध्ये कधीच समोर समोर येणे झालेच नव्हते . कधी तरी फोन बस...जे काही काल्याचे ते इरा कडूनच. दार उघडले , दारात निमिष "दोस्ता, वेलकम " असे म्हणून निमिषनि कडकडून मिठी मारली , आकाशाला , आकाश खडबडून जागा झाला आपल्याच विचारातूनच , आणि मग त्याच्या एकदम लक्षात आले कि दरवाज्यावर पाटी होती "इरा आणि निमिष" या नावांची
"काय रे निमिष, तुला खरच मी आल्याचा इतका आनंद झालाय कि हा आनंद दुसरे कुणी तरी आहे माझ्या सोबत , म्हणून "
"बस काय आकाश , अरे आपली गाठ आधीची , हिच्याशी आता कुठे सूत जमलाय , गाठी- गुंता व्यायला अजून वेळ आहे :)"
"चला, मग मी निघते रे भावा , तुमची युती आघाडी सगळे आहे तसे आहे , तेव्हा मी विरोधी पक्षात जायच्या आधी जाते "
"अग, इरा इतक्या उशिरा कुठे जातेस , आणि ती पण एकटी . थांब कि , का तुझा भावी नवरा काय चहा -कॉफी देतोय का बघू या कि "
"नको रे , घरी उगाच दंग होईल उशिरा गेले तर , तुला तर माहीतच आहे .... घर डोक्यावर घेतील सगळे जण. तू झोप इथे मस्त, आरामात राहा"
"म्हणजे मला वर पक्षात ढकलेले दिसतंय , काय दिवस आले आहेत, बघ बाबा निम्या तूच "
"दादू...प्लीज......",
"इरा , अग ये गम्मत केली मी , लगेच असे डोळ्यात पाणी काय आणि तसाही तुझेच घर आहे न आहे मग मी राहीन निवांत आणि तुझ्या या होणार्या नवऱ्यावर लक्ष पण ठेवीन जा तू सावकाश आणि ए ठोम्ब्या जा तिला सोडून ये खाली"
"दादा , उद्या दुपारी जेवेयाला भेटू , मी सकाळी फोन करते . गुड नाईट"
आकाश , घर पाहत होता , त्याची आणि इराची आवड निवड किती सारखी होती , दोघांकडे असलेली
सौन्दर्य दृष्टी सुद्धा सारखीच असावी याचे त्याला खूप कौतुक वाटत होत , तेवढ्यात निमिष परत आला.
"खूप बोलायचे आहे रे तुझ्याशी आकाश , तुझ्या या लाडक्या बहिणाला लागांसाठी तयार करायला फार कष्ट घ्यावे लागले बाबा मला, शेवटी तूच धावून आलास देवासारखा ",
"मग काय करणार , तुम्ही दोघे असे हट्टी, मला लक्ष घालावाच लागले . अरे पण तू एकटाच कसा इथे , काका काकू नाही आलेत का इथे अजून ?"
"आले आहेत रे , उद्या भेटतीलच आपल्याला , आता झोपू आपण . तुझी रूम तुझ्या बहिणीने छान अवरलिये. गुड नाईट"
आकाश खूप थकला होता आणि म्हणूनच त्याला गाढ झोप लागली .
" ओ भाऊ राया , आता उठता का आपण , सुर्व्या आल्या डोईवर "
"उठतो ग आक्का , पाच मिनिट ,.."
आकाश ला वाटले कि हि बाय खरच आलीये कि स्वप्न पडलाय आपल्याला , म्हणून त्याने डोळे उघडले , तर समोर कुणीच नाही :). अधून मधून हे असे स्वप्न पडायचे त्याला
भाग -२
आपल्याला अशी अधून मधून स्वप्न पडतात , आणि कदाचित आपल्याला आवडतात सुद्धा , थोडेसे झोपेतच त्याच्या मनात हे विचार येत होते . आकाश स्वप्नाळू कधीच नव्हता , पण हि अशी स्वप्ने त्याला आज काळ आवडायची . आपण एकटे नाही आणि आपली काळजी करणारे आपल्या जीव भावाची व्यक्ती आहे याची जाणीवच होती ती
पण हे स्वप्न आहे कि सत्य , पण डोळ्यांवर ची झोप अधिक प्रभावी ठरली आणि जागा झालेला झोपी गेला . इरा खरच आली होती का ? कि परत केवळ स्वप्न आणि भास ।
अंदाजे २ तास तरी झाले असतील , आकाशाला जाग आली , म्हणजे अजूनही नुसताच पडून राहावे असे त्याला वाटत होते , इरा नि येवून उठवावे आणि आपले स्वप्न खरे असावे अस हि त्याला वाटत होते , पण ….
तो उठला , आजूबाजूला नजर फिरवली आणि एकदम प्रसन्न वाटले त्याला , घरी आल्यासारखे . काल गडबडीत त्यानी आपली खोली निवांत पहिलीच नवती . आता पहिली आणि स्वताशीच हसला तो .
आपल्या सगळ्या छोट्या छोट्या आवडी निवडी किती जपल्या आहेत या पोरीने . खोलीची रंगसंगती , चादरीच रंग इथपासून ते अगदी …अरेच्चा , निशिगंध आणि गुलाबाची फुले सुद्धा आहेत कि इथे फुलदाणीत . खर तर "फ्लॉवर पॉट म्हण्याचे होते मला , पण इरा आठवली , इथे असती तर म्हणाली असती काय रे मराठी वापरायची लाज वाटते कि काय आता तुला :).
आकाश चे अलीकडे असच होत होते , सगळे संवाद स्वताशीच , विचारांच्या गर्दीत तो एकटाच :)
आकाश आवरून बाहेर आला
"शुभ प्रभात निमिष "
"काय रे आकाश , सकाळी सकाळी इरा चढली का तुला , शुभ प्रभात वगैरे "
"ए , पण ती आली होती का रे सकाळी "
"नाही "
"नक्की ?"
"हो आकाश , पण तू असे का विचारतो आहेस"
"इरा नक्की आली होती , या वेळी भास नाही , खर होते ते , प्लीज , सांग ना ""
"पण तुला असे का वाटतय , कि इरा आली होती "
"हे बघ , मला निशिगंध आणि गुलाब किती आवडतो ते तिला माहितीये आणि काळ रात्री ती फुले खोलीत नव्हती आणि आता आहेत . "
"शाब्बास , व्योमकेश बक्षी , अजून तुम्ही हुशारी टिकवून आहात तर "
"म्हणजे इरा आली होती न , मग कुठाय आणि मला न उठवता का गेली ?"
"अरे हो हो , गेलीये पण येणारे , अर्ध्या तासात येते म्हणाली . आणि ब्रेकफास्ट , म्हणजे न्याहारी एकत्र करू म्हणाली . बघ ना , तुमच्या दादा- ताई च्या प्रेमात मला उपाशी ठेवलाय , जाऊ दे चहा घेणार न तू , मी करतो एकदम सुंदर पैकी चहा आणि मग देतो तुला सुंदर पैकी कपातून "
"अरे चहा तर पाहिजेच , आणि काय रे अजून हे सुंदर पैकीच वेड आहेच वाटते , आणि ए कम ऑन तू आणि सकाळ पासून उपाशी , थापा नको मारू आता , लग्न दहा दिवसावर आहे , सुधारा आता "
"अरे म्हणजे काय खास नाही पण खाल्लाय जर आपले उगाच एवढस,खाली जावून , इडली सांबर, वडा पाव , एक पोहे आणि दोन चहा आणि …आणि काही नाही , बस तू मी आलोच आपला चहा घेवून"
"वाह , निमिष , तू अगदी गृह कर्तव्य दक्ष झाला आहेस हा , चहा एकदम फक्कड , अगदी मला हवा तसा
"काय करणार बाबा, तुझ्या बहिणीश संसार करायचा न , तुला गम्मत सांगू , ती खूप आनंदात आहे रे तू आलास म्हणून . मला दहा वेळा बजावून गेली कि तुला कसा चहा आवडतो ते , पार पकलो मी … पण मला छान वाटत होते कि या सगळ्या घडामोडी नंतर हि तुम्ही दोघे मात्र अजून हि तितकेच जवळ आहात , कदाचित जर जास्तच . मजा सांगू तू येणार म्हणून तिने आलं , चहा मसाला आणि चहाची गवती पात सुद्धा आणून ठेवलीये घरात . मला म्हणाली त्याला चहा करून दे बाकी काय हवे नको बघ , तिकडे सगळे स्वताच करतो . आणि तिने पाण्याचा माठ भरून ठेवलाय काल , आणि त्यात वाळा आणि मोगऱ्याची फुले सुधा ताकालीयेत , तुला आवडतात म्हणून . मला तर वाटते , त्या बायका नवरा साठी कसे हरतालिका , वाट सावित्री वगैरे करतात न तसे अशी बहिण मिळायला तू काही तरी व्रत केले असशील . "
"हो खर आहे हे . फार जीव आहे रे तिचा माझ्या आणि माझा सुद्धा तिच्यावर . आता तुला सोपवातोय तिला म्हणजे काळजीच नाही . खरच , मला कळतंय रे , मी आलोय म्हणून ती खुश तर आहेच , पण मला इथे, आमच्या घरात नसून सुद्धा , घरी आल्याचे सुख मिळावे म्हणून झटतीय ती . मला कळतंय कि मला इथे राहा असे सांगण्यात तिला खूप मनस्ताप होतोय , पण मी बोलेन तिच्या शी . I am comfortable here and she should not worry about t. She should enjoy these days and my stay in India. anyways whats pla for today "
"अरे राहा रे माझ्या सोबत मजेत , आपण पण किती वर्षात असे निवांत नाही भेटलोय , आणि माझ्या इथे तरी कोण आहे रे , आई - बाबा कधी येतील काय माहित , आज- उद्या असे त्यांचे सुरु आहे . जवळच आहे येतो वगैरे वगिरे आणि भावंडे काय आहेत पण आणि नाहीत पण . मी पण जाम खुशीत आहे रे , आणि खरे सांगू दु:ख एकट्यानं जगू शकतो रे , पण आनंद वाटून घेणारे कुणी नसेल न तर बाकी काही उरत नाही मग, आनंद सुद्धा . जावू दे . साला बघ तू आलास न बृहस्पती कि हे असे होते तत्वज्ञान वगैरे वगैरे . पण हे बृहस्पती , हे ऋषिवर आपण स्नान करून घ्यावे . तो पर्यंत कुमारी इरावती आपली न्याहारी घेवून प्रवेश करेलच . तूर्तास आपण स्नानगृहा कडे प्रस्थान करावे आणि मी आपल्या बल्लावला दुपारच्या भोजनाच्या सूचना देवून येतो"
आकाश हसत हसतच आता गेला, निमिष काही तरी बारीक सारीक कामात होता , तेवढ्यात फोन ची रिंग वाजली ,
"निमिष, इरा बोलतीय "
"कळले ग, खास रिंगटोन ठेवलाय तुझ्या साठी , रडक्या बाळाचा , हि हि "
"ए , नेहमी नेहमी काय रे तेच तेच विनोद , इकडे राडा झालाय आणि मी जाम कातावालीये"
" अग हो, हो जर थंड हो , काय झाले ते सांग "
" अरे यार , ह्यांनी केळवणं ची आमंत्रण घेवून ठेवली आहेत , तरी मी सांगितले होते कि जे काय असेल ते आकाश यायच्या आता संपवा . आधी त्याला तुझ्या कडे उतरवलाय , त्यात आम्ही त्याला सोडून हे असे जायचे , केळवण खात फिरायचे , कसा तरीच वाटतय रे . तो पण आमचा आहे कि . त्याला इकडे बोलावून मी काय केलाय चांगले कि वाईट , म्हणजे त्याला आनंद वाटतोय कि त्रास होतंय हे च काळात नाहीये रे "
"इरा , शांत हो आणि तू जा , मी आकाश ला घेवून बाहेर जातो , ब्रेकफास्ट करतो , एक काम करीन आमच्या एक दोन दोस्ताना पण बोलावतो म्हणजे बेस्ट . आणि त्याला सांगेन मी कि तुला आता यायला जमत नाहीये "
"बरे , तू म्हणतोयेस तर तसाच करु. मी दुपारी जेवण झाले कि येते , आपण चार वाजता बाहेर पडू . चल ठेवते आता "
"हो, काळजी घे , आणि शांत पणे घे "
इराला , आता से वाटत होते कि आकाश ला इकडे येवून खरच आनंदी आहे न
"इरा , आटप लवकर "
"हो , आलेच आई, पाच मिनिट "
इराचे घर पाहुण्यांनी भरले होते , घर माणसांनी , आनंदानी आणि वेगवेगळ्या सुगंधानी भरलेले , फुलांच्या , अत्तरांच्या , तोरणाच्या , होमाच्या , आणि वेगवेगळ्या गोड तिखट तळप च्या वासानी . फक्त एक गंध तिथे न्हवता , राखीचा , भाऊ बिजेच्या औक्षणाचा . पण इरानि आई बाबांना सांगितले कि होते कि आकाश येयील आणि काही जबाबदाऱ्या तोच पार पाडेल . खर तर घरच्यांनी पण तो आला तर हवाच होता , पण पाच वर्षात भेट नाही म्हणून कुणालाच अवघड वाटायला नको म्हणून त्याने सध्या तरी निमिष कडे राहावे असे आई ला वाटत होते . तिने इराला काल पासून शंभर वेळा तरी , कळात नकळत त्याच्या बद्द्ल विचारले होते . इरा;ला पण ते जाणवले , पण उघड पणे आई बाबा दोघे पण बोलणार नाहीत हे हि तुला ठावूक होते
"इरा, अग काय कुठे हरवली आहेस , पोचलो कि आपण . "
"काही नाही बाबा असच . आकाश आला आहे काल "
"हो माहितीये , आम्हाला . पण ग आता त्याला बोलवणे खरच शक्य नाहीये बेटा"
"शक्य आहे , पण तुम्हालाच नकोय . जावू दे . ठरल्या प्रमाणे मी संध्याकाळी त्याच्या सोबत खरेदी ला आणि मेनू ठरवायला जाणारे आहे . ती जबाब दारी त्याला द्यायची असे ठरलाय न आपले . तुम्ही येतंय का . बघ जमले तर . कमीत कमी मेनू ठरवायला तरी या "
"बघू , आता तर आता चल , आणि जास्त विचार नको करू , फक्त आनंदी राहा "
"आकाश शिवाय, आनंदी , हं "- इरा
आता नेहमी प्रमाणे आई ला मध्ये पडावेच लागले
"इरा , बास आता , हा विषय इथेच बंद कर . आकाश तुझा भाऊ आहे आणि आमचा कुणीच नाही का ? पण आता हि वेळ नाहीये . आपण घरी गेल्यावर बोलू . रागावू नको ग , पण तुझ्या कडे आता लोक आता तुझ्याकडे नवरी म्हणून बघतात , मग तू पण छान आनंदी असायला नको का . बर तुझ्या मर्जीने तुझ्या आवडत्या माणसाशी लग्न होतंय आणि तुला हवे तसे आकाश पण आलाच आहे कि आता . "
" ह, कळतंय मला , चल आता आई "
इराला वाटत होते कि निमिष नि काय सांगितलाय आकाश ला काय माहित .
इकडे निमिष च्या घरात
"आकाश , चल रे आपण बाहेर खावून येवू माझी एक दोन काम पण करायची आहेत ती पण करू "- निमिष
" अरे पण , इरा ?"
"तिला कळवले आहे मी . ती दुपारी ४ वाजता येयील आता ,"
'बर , चल मग "
आकाश आणि निमिष बाहेर पडले . आकाश आजूबाजूला पाहत होता . ५ वर्षात बराच फरक पडला आहे कि शहरात पण . जाता जाता त्याला बरेच परिचित आणि खूप सारे अपरिचित अश्या खुणा दिसत होत्या . आणि इतक्यात त्याला ती, दिसली तीच हि बाग , आणि त्याला एकदम आठवले , असे वाटले कि इरा आहे त्या झोपल्यावर , त्याचे लक्ष जर इकडे तिकडे झाले आणि "इरा आआआ …. " आकाश जोरात ओरडला , तेव्हाच नाही आता सुद्धा ……
भाग तीन
थोडेसे पूर्वीचे , संगती लागावी म्हणून :
आकाश आणि निमिष बाहेर पडले . आकाश आजूबाजूला पाहत होता . ५ वर्षात बराच फरक पडला आहे कि शहरात पण" . जाता जाता त्याला बरेच परिचित आणि खूप सारे अपरिचित अश्या खुणा दिसत होत्या . आणि इतक्यात त्याला ती, दिसली तीच हि बाग , आणि त्याला एकदम आठवले , असे वाटले कि इरा आहे त्या झोपल्यावर , त्याचे लक्ष जर इकडे तिकडे झाले आणि "इरा आआआ …. " आकाश जोरात ओरडला , तेव्हाच नाही आता सुद्धा ……
" आकाश , अरे काय झाले ……… इरा कुठे दिसली का तुला ? आणि इतका का घाबरून ओरडत आहेस ? काय झाले काय ? , पाणी पी थोडे , तुझ्या शेजारी आहे बघ बाटली "
"सॉरी , अरे काही नाही असच, असे वाटली कि इरा पडतीये खाली जोरात आणि मी पोचे पर्यंत …।"-निमिष
" अरे , तू इतका आणि तो पण असा विचार नको करू, आणि मध्ये कुठे इरा पडतीये वगैरे , लहान आहे का ती आत्ता , आणि हो माझ्या प्रेमात पडलीये आणि आता संसारात पडतीये म्हणून ओरडत असशील तर इराआआ---- ऐवजी आकाश सांभाळ असे तरी ओरड . पण खर संग न काय झाले कारण माझ्या पीजे वर पण हसत नाहीयेस मनापसून , बैचैन का आहेस ?"
"काही नाही दुल्हे बाबू , आपण थांबलो खायला कि सांगतो "
"अरे पोचलोच कि आपण , मस्त पैकी मिसळ चापू आधी , मग ठरवू next काय ते "
आकाश आणि निमिष गाडीतून उतरले , खर तर निमिष ला जाणवले कि काही तरी बिनसले पण नक्की काय ते कळत नवते . अशी काय आहेत हि बहिण भावंडे , इरा पडतीये ह्या कल्पनेने पण हा केवढा बैचेन आहे , नाही तर आमचे भाऊ खरेदी ला या म्हंटले तर आता वेळ नाही , मग वेळ नाही , तरी बरी नुसते खरेदीला मदत करायला यायचं , पैसे नाही खर्च कारयाचे आहेत . आकाश ला विचारायला पाहिजे काय झाले ते , इतक्या वर्षांनी आलाय , थोडे मन मोकळे झाले तर त्यालाच बरे वाटेल
"आकाश , आता संग कि मगाशी काय झाले ते "
"काही विशेष नाही रे , ती दिसली "
"कोण ??????, म्हणजे तुझ्या इतक्या मैत्रिणी होत्या त्यातली कोण ?"
"काय रे तू पण , ती म्हणजे ती बाग . आम्ही जुन्या घरी राहायचो तेव्हा नाही का आपण सगळे जायचो ती …"
"आपण सगळे , नक्की न … खर तर आकाश , तू बागेत जायचास तुझ्या लाडक्या बहिणी साठी आणि म्हणून आम्हाला खेळायला तिथे बोलावायाचास आणि यायलाच लागयाचे, कारण क्रिकेट चे किट , badminton ची राकेट हे सगळे तुझ्या कडेच होते न , बर ते जावू दे . बाग बघून ओरडलास "
"तुला आठवते का रे निमिष , एकदा इरा झोपल्या वरून पडली होती त्या बागेत "
"हो , म्हणजे अंधुकसे आठवतोय , आपण जाम घाबरलो होते , आणि तिला तुमच्या दवाखान्यात नेले होते . काका ओरडले होते आपल्याला दुसर्या दिवशी । लक्ष कुठे असते तुमचे आणि लक्ष देत येत नसेल तर तिला अजिबात नेऊ नका वगिरे वगिरे "
"हो , अगदी बरोबर , अंधुक काय , स्पष्ट आठवतंय कि तुला "
"पण आकाश इतक्या वर्षांनी का आठवले तुला , आणि आठवले तरी इतके घाबरायला काय झाले आता ?, आणि तेव्हा पण काही फार लागले नवते "
'हो , फक्त चार टाकेच तर पडलेत , आणि सगळी लहान मुले अशी एकदा तरी पडतातच , त्यात काय इतके , इट्स ओके , अस आईनी ऐकवले रे मला ,. पण माझ्या साठी ते चा------र टाके होते. तुला आठवतंय का कि आपण दवखान्यात घेवून गेलो तील तेव्हा ती किती रडत होती आणि माझा शर्ट रक्ताने भिजला होता . अजून हि आठवते मला . आता विषय निघालाच आहे म्हणून सांगतो , लहान पाणीच्या काही काही आठवणी आपल्या पिच्छा सोडत नाही त्यातलीच हि एक , मला अह्जूनही असाच स्वप्न पडते कि इरा पडतीय आणि तिला वाचवायला कुणीच नाहीये आणि मी तिच्या पर्यंत पोचू शकत नाहीये "
"अरे आकाश , असे काय करतोयेस , आता किती वर्षे झाली त्या घटनेला आणि मला अजून हि कळात नाहीये कि त्याचा इतका का परिणाम झालाय तुझ्या वर . म्हणजे आपल्या प्रत्येकच्या आयुष्यात असे असतच कि कधी तरी किंवा आपली भावंडे पडलीये , त्यांना लागलाय किंवा खूप आजारी पडलीत , अगदी तू सुधा पडला होतास कि , हात मोडला होता तुझा , ते विसरलास , त्या मानाने इराला काहीच लागले नव्हते रे "
"हो , खरय . ए तुला आठवतंय का रे निमिष , माझा हात मोडला होता तेव्हा मी इयत्ता ९ मध्ये असेन आणि इरा असेल चौथी मध्ये , पण रोज माझे दप्तर कार पर्यंत स्वत : घायची , पेलायची नाही तरी , रोज डबा खायला पण आपल्या सोबत यायची , आणि रोज हट्ट करायची कि दादू मीच तुला भरवणार , खर सांगू तुम्ही सगळे खूप चेष्टा करायचा माझी , पण मला कधीच फिकीर नाही वाटली त्याची ., का सांगू कारण आजी नंतर तसे मला कुणीच प्रेमाने भरवले नाही रे , म्हणजे आई कधी तरी असायची पण ती तरी काय करणार , तुला हॉस्पिटल , कॅम्पस या सगळ्यातून वेळच कमी मिळायचा . इरा माझी बहिण नाही , तर माझे कुटुंब आहे रे "
"ते सगळे खरय मित्रा , मला माहितीये आणि जाणवलय सुद्धा आणि म्हणूच इतक्या गोड मुलीशी मला आयुष्यभर एकत्र जगायचं , फार जीव लावते यार हि . पण इराच्या पडण्याचा अजुनही इतका प्रभाव का आहे तुझ्यावर ते सांग . विषय बदलू नको . म्हणजे त्या हि पेक्षा किती तरी अश्या गोष्टी आयुष्यात कळल्या आहेत तुला , ज्याने तू असा अस्वस्थ झालास तर मी समजू शकतो "
"विचारतोच आहेस तू निमिष म्हणून सांगतो , कदाचित तुझा पण दृष्ट्कोन कळेल मला. आपण दवाखान्यात गेलो इराला घेवून तेव्हा , मी तर घाबरलो होतोच , पण इरा पण घाबरली होती आणि नेमके त्या दिवशी च आई , बाबा दोघे पण दवाखान्यात नव्हते , कॅम्प साठी जवळ असणाऱ्या एका खेड्यात गेले होते , आणि आजी पण बाहेर गावी गेली होती . टाके सुद्धा विनीता मावशीने घातले . मी आई ला फोन केला होता रे निरोप द्यायला , तेव्हा काय मोबाईल नवते , पण तिला निरोप मिळाला होता . ती विनीता मावशी सोबत बोलली आणि मग निरोप दिला कि संध्याकाळ पर्यंत पोचतेच आहे म्हणून . आमचच हॉस्पीटल त्यामुळे सगळ्यांनी सांभाळून घेतले रे . घरात काय आमचे नोकर चाकर असायचेच सोबतीला , म्हणजे घराच्या सारखेच होते , पण …मला वाटत होते कि हातातली सगळी कामे टाकून आई नि लगेच यावे आणि इराला कुशीत घेवून विचारावे कि कशी आहेस बाळा , घाबरू नकोश वगैरे . आई आली म्हणजे तशी लवकर आली . इराला जवळ पण घेतले आणि मला ओरडली पण नाही , पण इतकच म्हणाली, तुला इराची जबाबदारी घायचो असेल तर घे नाही तर आम्ही आहोतच कि काही तरी व्यवस्था करू , बाकी काही नाही पोरीला काही झाले तर …. तिच्या स्वरात काळजी होते रे , पण काही तरी नव्हते . एखाया दिवशी बघ भाजीत सगळे घातले तरी चव येत नाही आणि काय राहालीये ते पण काळात नाही , असे काही तरी वाटले मला . मग काय बाबा आले आणि शाळा घेतली आमच्या दोघांची , इराची पण . इरा , आणि मी आजी च्या खोलीत झोपनर होतो त्या दवशी कारण ती खालच्या मजल्यावर होती . मला उगाच वाटले कि आई पण इरा सोबत झोपेल , पण तिला काही तरी काम होते म्हणे , कसले तरी रिसर्च चे . मला काय वाटले कुणास ठाऊक , पण मी आई ला म्हणालो , कि थांब न आजच्या रात्री इथेच , कदाचित इरा उठली तर , तिला तूच हवी असशील आणि तुला तरी झोप लागणार आहे का ? काय आहे ते काम इथेच कर , दिवा सुरु राहिला तरी चालेल आम्हाला . तसे आई नि काही आढे वेढे घेतले नाहीत , ती थाबली , रात्री बराच वेळ जागी होती , मध्ये मध्ये उठून इरा कडे पाहत पण होती . सगळे होते पण तरी हि , माहित नाही , असे वाटले कि काही तरी नाहीये या सगळ्यात , काळजी आहे , जबाबदारी आहे , प्रेम ?, प्रेम सुद्धा आहे पण आई ची माया थोडी आटली आहे का ? म्हणजे आई वाईट नाहीये , पण आज आता ती इराची आई नाही तर पालक वाटतीये , कदाचित दिवसभर दमली असेल , आणि इतके काही जास्त लागले पण नाहीये , त्यात आई डॉक्टर म्हणजे तिला खरच किती लागलाय हे कळते ना म्हणून पण कदाचित ती …, "
"अरे , हो आकाश पण तरी हे सगळे तुझे विचारच ना आणि तुला नक्की काय खटकले , आई लवकर आली नाही हे का ?"
"नाही , ती कामात होती आणि इरा वर उपचार झाले होते आणि आजच्या इतकी दळण वळणाची साधने पण नवती तेव्हा , त्यामुळे ती या पेक्षा लवकर येवूच शकली नसती आणि ती विनिता मावशी सोबत दोन वेळा बोलली पण होती . मला काय खटकल माहितीये "पोरीला काही झाले तर ", मधला काळजीचा स्वर , काही तरी वेगळा होता , संकटात पडल्या सारखा आणि तिचे आपणहून रात्री न थांबणे . मी म्हंटल्यावर लगेच थांबली ती , म्हणजे तिने तसे इराला झोपवले होते , पण तिने आपणहून थांबायला हवे होते . तेव्हा पासून मला पक्के डोक्यात बसले कि आता इरा माझी जबाबदारी आहे , तिच्या साठी कुणी थांबो अथवा न थांबो , मी आहे , माझ्या इरा साठी . नेहमीच त्या घटनेने मला ह्याची जाणीव दिली म्हण किंवा त्या एका प्रसंगात माझे आणि इराचे नाते बदलले असे म्हण , म्हणूच कदाचित आता इतके सगळी स्पष्टीकरणे मिळून सुद्धा हि ती घटना माझ्या मनात पक्की बसली आहे . कधी कधी हातातून काही निसटते आहे असे वाटले कि मला असाच स्वप्न पडते . आता कारण म्हणजे ती बाग इतकाच . जावू दे आपण फारच गंभीर विषयाकडे वळलो, पण तू विचारलास मला बरे वाटले. कधी कधी प्रश्नाची उत्तरे मिळाली कि नवीनच प्रश्न समोर येतात , आणि उत्तरे बरोबर असून हि पटत नाहीत . "
" मित्रा , काळजी नको करू , मी तुझ्या इराला कधीच दुखावणार नाही , जरा भावूक झालोय म्हणून सांगतो , विश्वास ठेव "
"अरे ए आकाश , भावूक हो तू , पण एक लक्षात ठेव , दहेज मे हम आ राहे है . मी काळजी गेईन असे म्हणून मला कटवु नको, कट करून "
"नाही रे , तुला न कटवता , मिसळीचा कट मागवतो "
"अरे , दुपारी कुठे जायचं रे आकाश "
"मेनू ठरवायला, अरे तोच नेहमीचा हॉल ,तुझ्यावेळी ठरवले होते कि तेच रे …I am sorry , चुकून बोललो कि तुझ्या वेळी असे "
"असू दे रे , बित गायी बात गयी ,आणि असे काही नाही , इरानि सांगितलं मला कि लग्न केले आहे तिने …"
"इरा म्हणजे न , अवघड आहे , मी म्हंटले होते तिला कि आकाश ला काही बोलू नकोस . तू आधीच तिकडे एकटा , त्यात उगाच पुन्हा जुन्या आठवणी त्यापाणु कटू आठवणीना उजाळा कशाला द्या "
"नाही रे , इतके काही नाही वाटत मला , आणि तसे पण जो काही निर्णय आम्ही दोघांनी घेतले त्याचे वैषम्य नाही आहे मला . जे झाले ते योग्यच होते . माझे आणि तिचे आयुष्य एकत्र कधीच सुखाचे झाले नसते. न माझ्या , न तिच्या आणि ना … कुनाच्याच . आई आणि बाबांना खूप मनस्ताप झाला, त्यांना मला समजून घेणे तेव्हा पण जमले नाही आणि आता पण त्यांच्या आवाक्या बाहेरचे आहे सगळे . आणि इराची तेव्हा पासून कसरत सुरु झाली , आई बाबा आणि मी अशी नात्यांची तारांबळ . "
"अरे पण , तिला पण नकोच होते क हे लग्न , नाही तर तिने परत कशाला लग्न केले असते , ते पण प्रेम बिमात पडून . आणि मग आता काका काकुना काय प्रोब्लेम आहे , हे तर माहितीये न कि तू काय फक्त एक मार्गी लग्न मोडायचा निर्णय घेतला नव्हतास "
"निमिष , फक्त ते आणि तितकाच कारण असते तर मग कशाला , आमच्या या नात्याला खूप कंगोरे आहेत आणि म्हणूच गुंता पण मोठा आहे . लग्नासाठी नकार किंवा त्याची करणे हे आणि इतकाच आमच्यातल्या तणावाचा कारण आहे असे वाटते तुला . खूप वर्षापासून हा तणाव होता आमच्यात , हे एक निम्मित झाले फक्त कि तो तुम्हा सगळ्या समोर आला . असे बराच काही आहे अजून . जावू दे , परत गंभीर विषय नको आणि मला पण एन्जॉय करायचे आहे तुमचे लग्न . मी त्या साठी आलोय न इथे आणि तसाही तू फार वेळ गंभीर संभाषण करू नाही शकणार . आता आपण तुझ्या भाषेत 'सुंदर पैकी चहा घावू आणि सुंदर पैकी तुझी काम उरकू "
"अरे म्हणजे आय अति महत्वाची कामे आहेत , माझे shopping राहिलंय अजून , साला कुणाला वेळच नाही यार . बरे झाले तू आलास , आता तुलाच राबवतो "
"रोजगार हमी योजनेवर आल्यासारखे वाटतय मला . फ़ोरेन रिटर्न वेठ बीगार . पण निमिष , कमीत कमी तुझ्या आई बाबा न तर घेवू यात न बरोबर जाताजाता "
"ते काही तरी वेगळ्या गडबडीत असतील , हा होम ते हवन . यांना पत्रिका द्यायची , आमंत्रणे बाकी आहेत वगैरे "
"अरे पण विचारू तर खरे , मी विचारले तर नक्की येतील बघ . आणि काकुनी काय लाडू बीडू बनवालते त्याची चव पण चाखता येयील "
"मग चल, तसाही आई नि काळ पासून १०० वेळा तरी मला सांगितले आहे आकाश ला काय हवे नको ते बघ आणि त्याच्या सोबत घरी एखादी चक्कर टाक म्हणून "
"चल मग , म्हणजे वेळेत काम करु नाही तर ती आमची बया ४ म्हणजे ४ ला हजर होईल आणि माझे डोके खाईल "
" ए थांब निमिष , इराला फोन करतो , जरा गम्मत , कश्यावर ताव मारतिये ते तर कळेल…लागला फोन, ए काय ग काय खातीयेस तरी काय ? इकडे आम्हाला सोडून , माझा नाही भावाचा तरी विचार करायचास "
"अरे ए , निमिष आधी फोने वर हेलो तरी म्हणत जा , लगेच काय चौकश्या , फोन कुणी पण उचलू शकतो . आणि फालतू गप्पा नकॊ, काही काम असेल तर सांग , मी आता विनीत मावशी कडे खाण्यात बीझी आहे , कळले . आणि काम नसेल तर ठेव फोन , नाही तर मीच ठेवते ?"
"काय ग इरा , निमिष चा फोन वाटते , अग मी त्याला पण घेवून ये म्हणाले होते "- विनिता मावशी
"नको ग, त्याला कशाला , नंतर आहेच कि मग लग्न नंतर , सारखे त्याचेच कौतुक करता मग तुम्ही लोक , दहीवडे मस्त झालेत एकदम "
"आकशाला पण खूप आवडतात न ग , खर तर म्हणून केले , उगचाच वाटले कि तो पण येयील आणि म्हणून चौघांच्या आवडीचे पदार्थ केले न मी . तो एकटाच चुकला बघ . येणार आहे का नाही तो ? आता तुझे लग्न म्हणजे येणारच म्हणा , पण आज चुकला बघ "- विनीता
"मावशी , तू घरचीच आहेस , म्हणून खोटे नाही बोलत , तो कालच आला आहे "
"इरा……"- इराची आई
"ए बोलू दे ग तिला , बोल ग इरा तू . कधी आलाय आकाश आणि त्याला का नाही आणलस मग , तो काय परका आहे का ? आणि त्याला माझ्या कडे आणायला काय प्रोब्लेम आहे . तुला माहितीये न कि मला तुम्ही दोघे मुलासारखेच आहेत आणि तू नुसते सांगितलास असतास न तर माझ्या आमंत्रणाची वाट पण पहिली नसती त्याने आणि आई ला घाबरता का तुम्ही अजून पण . ती काय म्हणाली असती तर मी सांगितले असते का ते . तुम्ही चौघे आहात तिघे नाहीत कुटुंब म्हणून किती वेळा सांगितलाय मी तिला . जावू दे बेटा , त्याला संग येवून जायला , जमेल तसे "
"अग मावशी , तो आला असता का ग , पण काळ रात्री उशिरा आलो न , आणि आज आकाश आणि त्यांचे मित्र भेटणार होते कोण कोण म्हणून मीच नाही आणले त्याला . आई बाबाचे काही नाही ग तसे "
"असो , या निम्मितने का होईना , तो घरी आलाय , बरे वाटले . बर मी त्याच्या साठी न देते सगळे थोडे थोडे डब्यातून , तू घेवून जा हा "
इरा विचारात होती कि मावशीला जर आकाश यावासा वाटला तर आई बाबा का नाकी म्हणले . मावशी काही आमची नातेवाईक नाही पण खूप जवळची आहे , माल आणि आकशा ला तिने लहान पण पासुन पाहिलये , मग ती जर आकाश ला माफ करू शकते तर आई बाबा का नाही ? कधी तरी मला जमेल का मला हे सगळे परत पहिल्या सारखे करायला . लहानपणी एकदा चित्र काढायला घेतले आणि मधेच जर खोडले न तर असे वाटायचे कधी कधी कि पहिलाच चांगले आले होते , आता परत तसच काही जमायाचे नाही , तेव्हा आजी म्हणायची , कि बाळा चिडचिड करू नको , थोडा वेळ काहीच करू नकोस आणि मग परत नवी सुरवात कर . तसा अजून थोडा वेळ देवून नवीन सुरवात करावी लागणर का मला ?, आकाश- इरा आणि आई -बाबा अश्या समांतर रेषा झालाय आहेत जणू , एकाच प्रतलात कधीच न मिळणाऱ्या …
"इरा , काय करायचं , तू खरच आकाश ला डबा देवून येतेस का ? आम्ही जातो घरी "- आई
"नको , उगाच हेलपाटा मला , तसे हि आपण त्याला सांगितले नव्हते आणि आत उगाच कशाला ?"
"पण मावशीनी इतका प्रेमाने दिलाय आणि त्याला आवडतात न ग …………" - आई
"मग तूच नेउन दे न , इतके प्रेम उफाळून आलाय तर "
" इरा , बेटा , प्लीज , तू तरी । जावू दे , मी संगीतीये न तू दाबा देवून ये आणि तसा हि आम्ही तुला पण ऐन वेळी संगितले न हे केळवणं चे मग , त्याला पण तसाच सांग . "
"ठीक आहे , निघा तुम्ही , मी दादू कडे जाऊन येते "
इरा पोचली , हे दोघे अजून आलेले दिसत नाहीयेत , फोन करून यायला हवे होते . जावू दे किल्ली तर आहे , डबा ठेवून , message करते . इराने दार उघडले, फ्रीज उगडून त्यात डबा ठेवला आणि ती आकाशाच्या खोलीत गेली . खोली आवरलेली होती , काही वस्तू मात्र काढून ठेवल्या होत्या . आकाशानी सगळ्यासाठी गिफ्ट आणल्या होत्या .
हा असा कसा आहे इतका कुल , लहान पण पासून असाच आहे , इकडे आग लागली तरी हा असाच शांत . बर्फ पण कमी थंड असेल . मी याच्या जागी असते तर , आई बाबांकडे येवून सरळ कचकचा भांडले असते .
इतक्यात तिला दार उघडल्याचा आवाज आला आणि गम्मत करावी म्हणून ती आवाज न करता तशीच थांबली
"निमिष प्लीज , हे बघ जे झाले ते झाले, आता उगच इराला यातले काही सांगू नकोस , ती बिचारी आधीच किती वैतागली आहे , हि कसरत करताना . मला उगाच आलो असे वाटते , तुमचा एवढा आनंदाचा काळ आणि हा नात्यांचा ताण . न्हाणून आता तिला हे काही सांगू नकोस "
"काय सांगायचे नाहीये मला आकाश ?",
भाग ४
थोडेसे पूर्वीचे
"निमिष प्लीज , हे बघ जे झाले ते झाले, आता उगच इराला यातले काही सांगू नकोस , ती बिचारी आधीच किती वैतागली आहे , हि कसरत करताना . मला उगाच आलो असे वाटते , तुमचा एवढा आनंदाचा काळ आणि हा नात्यांचा ताण . न आता तिला हे काही सांगू नकोस "
"काय सांगायचे नाहीये मला आकाश ?",- इरा न राहवून आतून बाहेर आली
"काही नाही ग , आमचे गुपित आहे ते "- निमिष
"पण ते माझ्या बद्दल , म्हणजे माझे नाव आले तुम्ही बोलताना , मला कळलाच पहिजे "- इरा
"बर बाई , सांगतो, अग , आकाश मला सांगत होता कि , सांगू का आकाश ?"
"ए अरे निमिष , काय ठरलाय आपले , मग गप्पा बैस न "
"अरे , सांगतो रे , तशी पण ती शेरलॉक ची fan आहे , काळजी नको करो , मी सांगतो तिला , समजून घेईन ती "
"ए आता , पाल्हाळ नका लावू तुम्ही दोघे , निमिष सरळ सांग मला , नाही तर … मी बोलणार नाही , नको त्या पेक्षा लग्न cancel "
"अग ए , सांगतो बाबा आकाश . अग आकाश म्हणत होती म्हणजे सांगत होता कि त्याला किती गर्लफ्रेंड आहेस , म्हणजे आता कुणाचा नंबर आहे वगैरे . तुला आवडणार नाही म्हणून तुला सांगत नव्हतो आम्ही "
"अच्छा , म्हणजे दादुला खूप गर्लफ्रेंड आहेत , काय रे तुम्ही मोठे झालात आणि मी बालवाडी छोटा गट का रे अजून "
"म्हणजे , तुला काय म्हण्याचाय "- आकाश
"ए हे बघ आकाश , तुला एखादी मैत्रीण असेल हि , म्हणजे तशी खास किंवा जवळची पण असेल , more than friend वगैरे , पण आता हा विषय नव्हता . आणि यात माझ्या पासून लपवण्या सारखे काय आहे . नसेल सांगायचे तर नको सांगू , मी जाते परत "
"इरा , आता म्हणालीस ना ग कि बालवाडी मध्ये नाहीये आणि अजून तशीच चिडतेस , इडूली -चीडूली सारखी . मीच सांगतो काय झाले , आम्हाला अनुचे आई बाबा भेटले . समोर आले , मग बोलावे लागल"- आकाश
"नेमकी , नको ती माणसे भेटतात तुला आणि ज्यांना भेटायला पाहिजेस ते मात्र …"- इरा
"इरा , हा विषय आता इथेच बास. तस पण नमस्कार कसे आहात इतकाच बोलणे झाले. बर तू इथे कशी आता "- आकाश
"अरे , विनिता मावशीने तुमच्या साठी डबा दिला आहे . ते खावून घ्या आणि आराम करा जरा . मग परत येते मी , जमले तर आई बाबा पण येतील "
इरा गेली . निमिष ला वाटले कि आकाश नि खरे सांगितले , पण किती शांत पणे आणि विषय हि बदलला , पण ते आता भेटायला नको होते . आता त्याच्या डोक्यात परत , अनु , ठरलेले आणि मोडलेले लग्न , आणि सगळेच दुष्ट चक्र . हा इरा पासून काही सुद्धा लपवून ठेवत नाही , पण अनु बद्दल चे त्याचे गुपित मात्र त्याने लपवून ठेवले आहे . आणि कुणालाच ते इराला सांगता येणार नाही . त्या भाबड्या पोरीला एक प्रकारे आपण फसवतो आहे का ? पण तिच्या आणि आपल्या सगळ्यांच्या हिताचे आणि सुखाचे आहे ते
निमिष चे खरे होते , अनु चे आई बाबा भेटले आणि आकाश भूतकाळात गेला म्हणजे ओढला गेला . त्याच्या आवडीचे पदार्थ असूनही , त्या चवी पेक्षा , आठवणीची चव कटू होती बहुतेक
अनु , आकाश आणि निमिष वर्ग मित्र . म्हणजे अनु तशी त्यांची काही खास मैत्रीण नव्हती . पण मैत्रीण होती . तिला आकाश आवडत होता आणि तिला बरोबर माहित होते कि आकाश ला आपल्या बद्द्दल अगदी आपणहून प्रेम नाही जाणवले तरी त्याला कसे आपले से करायचे ते . तशी ती हुशार होती , महत्वाकांक्षी होती , आणि चांगली होती , सगळ्यांच्यात मिळून मिसळून . आकाश च्या घरी तिचे येणे - जाणे होते . आणि आकाशाच्या आईची ती fan होती . तिला त्यांच्या सारखे व्ह्यायचे होते , डॉक्टर . आकाशच्या घरी पण ती छान मिसळलि होती , आकाशाचे आई बाबा , आजी आणि इराला पण ती आवडायची . पण आकाश च्या मनात काय होते ते मात्र तिला कळा नव्हते . तिने पण ठरवले कि आधी शिक्षण आणि मग बघू . आकाशाला डॉक्टर व्हायचे कि नाही हे पण तिला माहित न्हवते . खर तर आकाश - निमिष -इरा हे त्रिकुट होता आणि ते त्याचा चौकोन करायला तयार न्हवते , म्हणजे मुद्दामून नाही , पण त्यांचे गुळ पीठ छान जमले होते म्हणून अनुला घीस्खोरी करता येत न्हवती . अनु च्या गप्पा असायच्या पण आकशा पेक्षा इरा सोबत किंवा आकाशाच्या आई सोबत
"अनु, तुला पण डॉक्टर च व्हायचे आहे न ग ?"- शाळेत जाणारी इरा , अनुला विचारात होती
"हो ,. आणि मला पण म्हणजे तुझा दादू पण डॉक्टर होणार वाटते "
"त्याचे तसे ठरले नाहीये अजून , पण माझे ठरलय , मी डॉक्टर होणार आणि अगदी आई सारखीच. दादू म्हणतो मला कि तू काय बाई होशील , हुशार आहेस "
"मग आहेसच कि तू हुशार , आकाश चे बरोबर आहे "
"खर सांगू का तुला अनु , आकाश जास्त हुशार आहे , त्याचे प्रेम आहे न खूप माझ्या वर , म्हणून त्याला वाटते कि आपली बहिण लई भारी . पण मला ना कधी कधी वाटते त्याच्या सारखे व्हावे . एकदम कुल आणि हुशार आणि मस्त एकदम . :). त्याचे राहू दे , तू डॉक्टर झालीस न कि आमच्या हॉस्पिटल ला च ये , मग थोड्या वर्षांनी मी पण येयीन आणि मग मस्त बघ एकदम . रोज भेटू आपण ."
"पक्का इरा , नक्की असाच करू . आकाश आला तर माझा निरोप सांगशील न त्याला आणि निमिष ला पण संग म्हणव . चल भेटू परत , बाय "
"हो मी सांगेन त्यांना तुझा निरोप , बाय "
आकाश नि रिसर्चला जायचे ठरवले आई बाबान विशेष पसंत नव्हते ,पण तेवढी मोकळीक होती त्यांच्या घरात. इराला मात्र आपला भाऊ डॉक्टर च व्हयला हवा होता म्हणजे त्यांना एकत्र practice करता आली असती . निमिष चा घराचा व्यवसाय होता आणि त्याला लहान पण पासून त्यात रस होता , म्हणून त्याने engg ला प्रवेश घेतला . अनु मात्र डॉक्टर च होणार होती आणि तिनी तीच वाट निवडली . पण कसे कुणास ठावूक हे ऋणानुबंध टिकले .
आकाश , पुण्यात येवून जावून असायचा , पण अनु नि मात्र घरी येणे -जाणे ठेवले होते आणि आकाश ला पण ती अधून मधून भेटायची . तिला मनापसून आवडला होता तो आणि हळू हळू हे सगळ्यांच्या लक्षात येत होते . तिच्या आई वडिलांना आणि आकाशाच्या पण . त्यांना सगळ्यांना हे मान्य होते , आता प्रश्न होता आकाशाचा , त्याला लगेच विचारण्यात अर्थ नव्हता , त्यामुळे कुणीच काही करू शकत नव्हते .
इरा पण बारावी नंतर मेडिकल ला गेली . आणि बघता बघता आणि दोन वर्षे निघून गेली . अनु नि आकाशच्या आई ला जोइन केले . आता आकाशाला विचारावे असे सगळ्यांना वाटत होते , पण कसे . म्हणजे आकाश चे काही सांगता येत नाही , त्याचे ठराविक मित्र मंडळ आहे , आणि कुणी मुलगी त्याच्या आयुष्यात नाही , पण अनु बद्दल तो असे काही व्यक्त झाला नाही , असे आकाशच्या आई ला वाटत होते . मग परत इराच मध्ये पडली ,
" आई , मी विचारते ग त्याला , हळूच गप्पा मारताना "
"झाले , तू विचारणार म्हणजे , तो आणखी आम्हालाच ओरडेल . इतक्या लहान मुलीचे बघ काय चाललाय , तुमचे लक्षच नाहीये घरात , इरा बघा काय बोलतीय , एवढीशी आहे …. "
"ए आई त्याचे पुरे , आता मला बॉय फ्रेंड असेल अश्या वयात आहे मी , लहान थोडी न आहे . तू नको काळजी करू मी आणि घेते त्याला घोळात . आणि तसा हि त्याला जर दुसरे कुणी आवडत नसेल आणि समज अनु वर त्याचे प्रेम नसेल , तरी चांगली मुलगि आहे ती , त्यांच्या आवडी निवडी पण सारख्या आहेत आणि आपल्याला आवडते कि ती आणि मला पण पसंत आहे , हवे असेल तर फक्त साखर पुडा करू आता , "
"इरा , तुझी स्क्रिप्ट तयार आहे कि अगदी , आणि मुद्दे सूद . ठीक आहे मी बाबा आणि आजी शी बोलते , तो पर्यंत काही गडबड नको करू . आकाश हो म्हणला तर बराच होईल बाई . मुलगी पण चांगली आहे आणि मला हॉस्पिटल मध्ये पण घराचच माणूस होईल "
"हो न , आणि काही वर्षांनी मी पण असेंच कि , आपण सगळेच घराचे , मस्त न. ए आम्ही दोघी पण तुअम्च्य सारखे कॅम्प घेणार, मम्मा , मला न अगदी तुझ्या सारखे व्हायचे आहे , लोक म्हणतील बघ कि आई सारखीच आहे अगदी इरा म्हणून "
"इरा , आधी डॉक्टर तो हो मग पुढचे पुढे आणि झोपायला जा आता "
कसे काय माहित पण , इरा नी , आकाश ला पटवले . म्हणजे तसा तो अनुच्या प्रेमात वगैरे न्हवता , पण अनु चांगली मुलगी होती , तो तिला ओळखत होता आणि मुख्य म्हणजे घरच्यांना पसंत होती , पण त्याला लगेच लग्न करणे शक्य न्हवते , कमीत कमी वर्ष भर तरी , पण तो हो म्हणाला
इरा खूप खुशीत होती , साखर पुड्या ची तयारी करायला तिने आई ला खूप मदत पण केली होती . अनु सोबत आणि आकाश सोबत तिने खूप खरेदी पण केली होती . साखरपुडा छान झाला आणि नाते पक्के झाले . आकाश अधून मधून मुंबई हून पुण्यात येत असे . आणि आला कि ,
"इरा , चल , बाहेर जायचय , अवर लवकर , तू मी अनु आणि निमिष "
"ए तुम्ही जा न , मला नाही जमणार रे , तुमचे काय बाबा , आता तुम्ही बर्या पैकी सेट आहात , माझे अजून शिक्षण नाकी आहे . खरच नाही जमणार , खूप अभ्यास आहे "
"इरा , तुला विचारून ठरवले होता न , तेव्हा तर नाचत नाचत हो म्हणालीस , आता काय झालाय , आणि तुला दुसरे काही काम नाहीये , तुला बरे वाटतय न "
"हो रे , वाटतय आणि खर तर मला माझ्या फ्रेंड्स सोबत जायचंय , प्लीज . "
"ठीक आहे , हे बघ निमिष चा प मेसेज आलाय , नाही जमणार म्हणून , काय यार तुम्ही लोक . इतक्या दिवसांनी आलोय मी आणि तुम्हाला वेळच नाहीये ,"
"दादू , हे बघ उद्या चा वेळ तुझ्या साठी म्हणशील तेव्हा , पण आता जा तू , ती अनु वाट बघत असेल ,म्हणजे प्यार भर इंतजार ………। हे झार , लवकर जा आणि तिचा इंतजार खत्म कर "
"इरा , फालतू बडबड बंद कर , उद्या बघतो तुला "
आकाश गेला . इरानिच निमिष ला पण बेत cancel करायला सांगितले होते . तिला असे वाटत होते कि दादांनी फक्त अनुला असा पण वेळ द्यावा . आणि तिने तसे आई ला बोलून दाखवले आणि आई ला लगेच पटले , ती इराला म्हणाली सुद्धा कि मीच आकशा ला सांगणार होते ,. इतके दिवस ठीक होते , आणि तू पण आता मोठी झालीयेस कि तुला पण तुझे जग आहेच कि . आणि एक दिवशी तू पण जाशील कि या घरातून , मग काय करेल हा कि तुझ्या मागून याला पण पाठवयाचे . इरा फक्त हसली , तिला खर तर आकाश ला खूप काही सांगायचे होते , आई जरी म्हणाली कि तुझे आता एक वेगळे जग आहे तरी , तरी आकशचे आणि तिचे असे एक वेगळे जग होताच कि . तिला वाटले , आई म्हणेल कि ग असे काही नाही अनु ला जसा वेळ देईल तो तसा तुअल पण देईल कि आणि आई अलीकडे एक दोन वेळा आपल्याला म्हणाली पण कि तू पण जाशील कि एक दिवस हे घर ,सोडून म्हणजे लग्न झाल्यावर . हे काय आता नवीनच , पहिले शिक्षण आणि मग बाकी सगळे , अगदी हॉस्पिटल सुद्धा , असे म्हणणारे आई बाबा , हे काय एकदम . कदाचित दादू चे लग्न ठरल्या मुळे आम्ही मोठे झालाय असे वाटतय त्यांना :)
इरा , जर वेळ बाहेर जावून आली , जेवली आणि झोपायला गेली . आकाश आलेले कळले तिला , पण ती उठली नाही
पण तिला काही अस्पष्ट आवाज ऐकू येत होते , आई आणि आकाश चे . खर तर आकाश इतक्या आवाजात काहीच बोलत नाही , आज काय झालाय . काही नाही आई नि परत लग्नाची तारीख वगैरे बोलणी सुरु केली असतील म्हणून वैतागल असेल , सकाळी करते मी मूड ठीक एकदम त्याचा , आणि इरा झोपली
"आई , अनु सांगत होती ते खरय ?"- आकाश
"कशाबद्दल ?"
"मी हॉस्पिटल मधल्या बदल बद्दल बोलतोय आणि तू तिला इतके involve का करून घेतीयेस आता पासून "
"अरे आकाश , असे काय . ती आपलीच तर आहे आता आणि तू पण नाहीयेस. मला आणि बाबांना व्याप नाही झेपत आता आणि आम्हाला बाकीचे कॅम्पस घायला जावे लागते , ते आवडते आम्हाला "
"मान्य , ती आपली आहे , पण होणार आहे आणि विनिता मावशी आहे न , आणि आता एक दोन वर्षात इरा पण येयीलच कि हाताखाली . आणि तुझे काय असे वय झालाय . मला काही पटत नाहीये हे "
"हे बघ , आकाश, विनिता आहेच आणि मान्य कि ती पण घरच्या सारखीच आहे , आणि इरा चे काय रे , ती लहान आहे अजून आणि पुढे PG करणारे कि आणि काही , ते ठरले नाहीये , आणि लग्न होवून दुसरी कडे गेली म्हणजे किंवा कुठे तरी जाईल पहाडात , practice करायला , तिच्या रक्तातच आहे ते "
"आई , ठीक आहे , पण ए दोन वर्ष काय ते कळेलच न आणि लग्न झाले तर ती हॉस्पिटल मध्ये येवूच शकते कि इरा , शेवटी हॉस्पिटल आजोबांचे आहे , ते चालवायला आपले कुणी तरी हवाच कि . मला अजून हि असे वाटतय कि अनु नवीन आहे , आणि तिचा स्वभाव चांगला आहे पण थोडा उतावळा आहे आणि महत्वाकांकशी . तिच्या साठी हे सगळे नवीन आणि अप्रूप आहे , अजून हि विचार कर . आणि एक लक्षात ठेव माझे आणि इराचे एकाच रक्त आहे , आम्ही पहाडात जावू नाही तर आणि कुठे , आणि ती जाईल तर मी पण जावू शकतो., बाबा किंवा आजी समोर प्लीज हे असे बोलू नको आणि . असो मला काय वाटले ते सांगितले "
"आकाश , तू पराचा कावळा करतोयेस . असे काही नाहीये . आणि तुझ्या बोलण्याचा मी विचार करेन आणि इराचे म्हणशील तर मला इतकाच म्हण्याचे आहे कि ती लहान आहे तशी अजून . मुले किती पण मोठी झाली तरी आई साठी लहानच असतात . आणि मुलींची एक वेगळीच काळजी असते आई वडिलांना . तुला नाही कळणार , कारण तू इराचा भाऊ आहेस , आई वडील नाहीस . जावू दे , तू जा आणि झोप आता . आणि तुझे म्हणणे विचारात घेईन मी "
आकाश झोपायला गेला खरा , पण त्याला हे सगळे पटत न्हवते हे खरे , त्याला नेहमीच वर्तमानात जगायला आवडायचे , भूतकाळात तो शिरायचा नाही आणि भविष्य ची काळजी करत जगू नये असे त्याला वाटायचे . अनु त्याला चांगली वाटत होती , पण काही काही गोष्टी मात्र त्याला पटत न्हवत्या . असे वाटत होते कि एखादे गाणे छान आहे , म्हणजे सूर ताल , लय अगदी सगळे छान आहे , पण काही तरी हरवले त्यात कदाचित भावच उमटत नाही आहेत त्या गाण्यात , अनुच आणि त्याचे नात हि असाच होता का कदाचित
झरझर सगळा भूतकाळ त्याच्या समोरून सरकत गेला आणि तो वर्तमानात आला . अनु शी लग्न मोडल्याचा दु:ख तर अजिबात न्हवते त्याला आणि पश्चाताप तर अजिबातच नाही . इरासाठी , त्याच्या आयुष्यातला एक निखळ आणि निर्मल प्रेम समोर आणि आनंद समोर हे काहीच न्हवते . आजी असती तर तिला सारे कळले असते , आपल्या मनातले. पण असू दे इराला तिचे प्रेम मिळतंय आणि निमिष इराला नक्की जपेल , आपण निम्म्या जबाबदारीतून मुक्त झालो आता , असे वाटले त्याला आणि स्वताशीच हसला तो आणि नकळत त्याने त्याचे आवडते गाणे लावले
" मुस्कराहट सी खिली रहती है आँखों में कही
और पलको पे उजाले से झुके रहते हैं
होंठ कुछ कहते नहीं, कापते होठों पे मगर
कितने खामोश से अफसाने रुके रहते हैं-"
भाग पाच
एक गोष्ट त्यांची पण :भाग पाच
गाणे तर एकीकडे सुरु होते , कानावर पडता होते पण आत शिरत न्हवते , कारण आठवणीचा कल्लोळ उठला होता , प्रवासामुळे असेल किंवा मानसिक थकव्या मुळे असेल , आकाशच डोळा लागला . आणि किती वेळ गेला काय माहित , इरा त्याला उठवत होती , अरे एकच दिवसात दुस्रान्द्या हे स्वप्न , भारतात आल्यामुळे या स्वप्नाची फ्रिक्वेन्सी वाढली काय ? ,
"अरे ए , उठ ना , आवर . माझाच चुकले तू ई निमिष अश्या दोन महान माणसांच्या जीवावर मी लग्न करायचा घात घातलाय . झोपला तुम्ही दोघे पण निवांत , उठ , झोपून झोपून बघ कसा ,मंद झाला आहेस "
"बाप रे , इरा खरच तू आलीयेस "
"म्हणजे आकाश , मी येणारच होते "
"आग तसे न्हवे, मला वाटले स्वप्न आहे "
'"स्वप्न?"
"अग हो , पण जावू दे ती एक मोठी स्टोरी आहे , मी आवरतो पटकन . तुझ्या त्या हिरो ला आवरायला सांग "
"त्याचा क्लास घेवूनच तुला उठवायला आलीये मी , आवारात आलाय त्याचे . मी चहा टाकते पटकन , मग आपण निघू "
आकाश नि पटपट आवरले , किती तरी दिवसांनी , वर्षांनी इराच्या हातचा चहा प्यायला मिळाला . एक आठवडा इरा आणि एक आठवडा आकाश अशी त्यांची दुपारच्या चहाची वाटणी होती , आणि किती तरी वर्ष तशीच होती . चहा , साखर , दुध , पाणी तेच , पण करणारा बदलला कि चहाचा स्वाद बदलतो , नात्यांचे पण तसाच काही , माणूस बदलला कि दृष्टीकोन बदलला , असे आकाश ला वाटून गेले .
"ऐका ना मुलानो , पहिले मेनू ठरवू , अर्धा तास लागेल फार तर आणि आई बाबांनी त्यांच्या सूचना दिल्या आहेत नेहमी प्रमाणे "
"म्हणजे ते येणार नाहीयेत इरा ? मला भेटले पण नाहीयेत आल्या पासून "
"एक तर तुला येवून अजून एक दिवस पण होतोच आहे दादू , आणि तिकडे जम गडबड आहे रे . त्यांना काय झेपतच नाहीये दोघांना . म्हणजे कामाला माणसे आहेत तशी , पण इतके दिवस , किंवा वर्षे त्यांना काही पाहावे लागत न्हवते आणि तुझ्या साखर पुड्या पर्यंत आजी होती , तसे त्यांना काही करावे लागत न्हवते . कसे असते न , माणूस असताना जी जाणीव होत नाही , ती जाणीव तो माणूस नसला कि प्रकर्षाने होते आणि त्या माणसाची उणीव कधीच भरून निघत नाही मग . माझाच बघ न , आजी गेली आणि नंतर तू तिकडे , खूप एकटे वाटायचे घरात . आई बाबा असतात पण तरी …. असो कदाचित हि जाणीव त्यांना पण झालीये आणि म्हणून मला म्हणाले कि आता आकाश आला आहे तर आमची निम्मी काळजी कमी झाली "
"खरच सांगीति आहेस इरा "
"म्हणजे काय आकाश , अरे त्यांचे खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि तुला हि ते माहितीये , पण आईस ब्रेक करायला पाहिजे , ते भेटायला नाही आले , पण तू फोन पण नाही केलास . असू दे मेनू ठरवताना कर म्हणजे बोलणे पण होईल "
इरा गाडी पार्किंग मधून बाहेर काढायला गेली , आकशा निमिष ला म्हनला
"अरे आमची हि छोटी इरा किती मोठी झालीये रे , एकदम जबाबदार माणसा सारखी , म्हणजे समजूतदार तर ती होतिच पण आता जे बोलली न , एकदम मोठी झालीये असे वाटतंय "
"अरे म्हणून तर लग्न होतंय न तिचे माझ्याशी :), भारी सिलेक्शन आहे माझे "
"कळले , चल "
इरा नि खरच फोन केला घरी , बाबा सोबत बोलली आणि आकाश कडे दिला फोन . तसे क्वचित कधी तरी त्याचा फोन होत असे आई बाबांशी , म्हणजे तोच करायचा , इराचा हट्ट म्हणून . आकाश नि कामाचे बोलणे केले आणि विचारले कि बाकी तयारी कशी सुरु आहे लग्नाची
बाबा इतकाच म्हणले "तूच बघ कि एखादे दिवशी घरी येवून "
आकाशला वाटले कि घरी ये म्हणाले , पण लगेच त्याला वाटले कि एखादे दिवशी असे म्हणाले :) , त्याचे च तर घर होते . कदाचित त्यांना घरी ये म्हणायचे होते . आकाश ला जर बरे वाटले
"आता काय इराबाई ?"
"आता , दागिने खरेदी , आणि उद्या थोडी कपडे खरेदी आहे , उद्या आई ई विनीत मावशी येणार आहे , निमिष आइनि काकुना आय मीन मझ्या सासू बाईना पण बोलवले आहे आणि तुम्ही दोघे ठीक १०. ३० ला उद्या तयार राहा "ओ ग्रुप लीडर , उद्याचे उद्या , आजचे आवरू आता , ए यार आकाश , तुझी बहिण लेडी हिटलर आहे यार . "
"अरे मग आता cancel करू लग्न , करू का सांग "- आकाश
" अरे , तुम्ही दोघे बहिण भाऊ म्हणजे न , एकाला झाकावे आणि दुसर्याला काढावे "
इरा , आकाश आणि निमिष खरेदीला बाहेर पडले
"आकाश ची चोइस मस्त आहे . माझ्या साठी किती काय काय आणायचो तो . बाहेर गेला सेमिनार ला किंवा कोन्फ़रस ला कि माझ्या कडे नवीन वस्तू आलीच "
"बघ बाबा आकाश , हिला पटवायला मी इतके गिफ्ट्स दिले , पण कौतिक नाहीच आमच्या नशिबात "
"अरे , ह्याच्या गिफ्ट्स म्हणजे न , सगळ्या अतरंगी एकदम . म्हणजे मस्त असायच्या पण विअर्ड असायच्या "
आकाश ला खरच परत आठवले , कि आपल्याला इरा साठी काही तरी घ्यायला नेहमीच किती आवडायचे . अगदी लहान पणी तिला काळात न्हवते तेव्हा तिचे फ्रोक सुद्धा माझ्याच आवडीचे असायचे . आई इरा ला हे घे न अशी सारखी भुणभुण असायची आईच्या मागे आणि आई म्हणायची अरे स्वतासाठी पण हट्ट कर कि कधी तरी [?]
खरेदी संपवून , जेवण करून निमिष आणि आकाश घरी आले आणि इरा तिच्या घरी परताली
आकाश हातात पुस्तक घेवून झोपायच्या तयारीत होता , पण मनात आठवणीचे पुस्तक उघडले होते न . त्याला आठवले कि त्याने एकदा इरा साठी हिऱ्याचे कानातले घेतले होते , त्याच्या सुरवातीच्या कमाई तून , इरा ला तशी या सगळ्याची आवड कमीच , आपलीच हौस जास्त . पण आपण आणले असले कि इरा आवर्जून वापरायची . आकाशाला पुन्हा जुना संवाद आठवला ,दुपारी अर्धी राहिलेली आठवण , जणू मध्यंतर संपल्या प्रमाणे पुन्हा सुरु झाली पुढच्या भागात
"आकाश , तू नाराज नको होवू . मी बोलेन या विषयावर बाबांशी पण आणि आजी सोबत पण आणि मग आपण ठरवू कि अनु ला किती जबाबदारी द्यायची वगैरे . खर तर मुले आई सोबत बायकोच्या हकाक्साठी भांडतात आणि आम्ही देतोय आपणहून तर तू "
"आई , तू हे काय नवीन काढले आहेस हक्क वगैरे . आपल्या घरात हि भाषा कधीच न्हवती . जे काही आहे ते आपले सगळ्यांचे आहे न . नशिबानी आणि कर्तृत्वानी या घरात पैसा कधीच कमी न्हवता आणि आपण कुणीच कोत्या मानाने वागलो नाही आहोत. तूच लहान पणी, आम्हाला कधी सुद्धा आमच्यात आणि घरात किंवा हॉस्पिटल मध्ये काम करणरया लोकांच्या मुलांमध्ये फरक करून दिला नाहीस , आणि आता काय हक्क वगैरे , आज हक्क म्ह्नाणाली आहेस उद्या दुसरे काही "
"आकाश , ताणू नको . आणि ती पण घरात येयील मग तिचा काही हक्क असेल कि नाही या वर . "
" आहे न , मी कुठे नाही म्हणतोय , पण तिला तो हक्क मिळवू दे न . ती येवू तर दे , इतकाच माझे म्हणणे आहे . खूप आधी पासून हे असे मला नाही ठीक वाटत आहे . आपल्या घरात जे अहि आहे ते सगळ्यांचे , माझे , तुझे , बाबांचे आणि इराचे सुद्धा . आणि जे माझे हे ते तिचे आहेच कि . पण म्हणून जे इराचे आहे ते तरी तिला देवू नकोस "
"आकशा तुला काय म्हणायचे आहे ?"
"हे बघ , मला हे बोलायाचा होतच तुझ्या सोबत . मी इथे नसताना काही तरी बदललाय , म्हणजे माझ्या मागच्या भेटीत आणि आता . म्हणजे नक्की नाही माहित , पण काही तर बदल झाले आहेत असे मला वाटते "
"असे काही नाहीये , पण हो एक गोष्ट म्हणजे , आजी म्हणाली म्हणून मी आणि बाबाबी अनु ला आणि तिच्या घराच्यान , घरातली इतर बऱ्याच गोष्टींची कल्पना दिली , . म्हणजे तसे आज्जी नि त्यांना सांगितले सगळे . आपली आर्थिक परिस्थिती असेल किंवा नातेवाईक आणि बाबाचे लहानपण , तुमचे लहानपण वगिरे , तिचे असे म्हणणे आहे कि मुलीच्या लोकांना सगळे माहित हवे आत्या तर तुझी बाहेरच आहे अमेरिकाला ती काय परत यायची नाही, तुझ्या लग्नाला च येते असे म्हणाली आहे तरी आणि काका , त्यांना तर हे जग सोडूनच किती वर्षे झाली . त्यामुळे आता तसे तुझे बाबा आणि तू "
"आणि इरा आणि तू "
"हो "
"मग काय म्हणाले , काही नाही , बरे झाले तुम्ही सांगितले असे म्हणाले . मुद्दाम अनु समोरच सांगितले सगळे "
"बरे झाले . पण माझा मुद्दा तो नाहीच आहे आई . "
"अरे काही बदलले नाहीये इकडे , तुझे काही तरीच "
"मग इराची खोली का बदलली आहे , ती पण काही बोलली नाही मला . म्हणजे मेल मध्ये किंवा फोन वर , तू पण काही बोलली नाहीस "
"ते तू इरालाच विचार न. तीच म्हणाली कि हि खोली मी आणि दादू वापरायचो आणि हि तशी मोठी खोली आहे , तर मग मी दुसरी खोली वापरेन , हि आपण रिनोवेट करू दादू आणि अनु साठी अनु म्हणून ती आत दुसऱ्या खोलीत राहतीये . "
"पण मला न विचारता का कारभार करता तुम्ही असले , आणि ती एक लहानच आहे , अक्कल कमी आहे तिला , पण आई तू तरी । कमीत कमी आकशाला विचारू असे म्हण्याचास कि "
"अरे पण इराच म्हणाली कि दादूला काय विचारायचं , माझे अनुशी बोलणे झाले आहे "
"अनु शी बोलणे झाले पण , मला आज अनु काहीच नाही बोलली या बद्दल "
"अरे इतक्या दिवसांनी भेटलास , त्यामुळे बाकीच्या गप्पात राहून गेले असेल "
"तरीच ती , मला काही तरी होम डेकॉर वगैरे सनग्त होती , पण हे नाही म्हणाली काही . का बरे ? न सांगण्या सारखे काय आहे ?"
"अरे असेल काही तरी तिचे आणि इराचे , कुणी सांगायचे ते , पण काय रे तू अनु साठी काही सुद्धा आणत नाहीस . काही तरी घेवून दे तिला . बरे वाटते मुलीना जर आणि आज काल तर तसा ट्रेंड पण हे "
"हे तू बोलतियेस आई ?"
"नाही , तुझ्या बहिणीचा निरोप आहे तुला . मला म्हणाली आई तूच सांग . मी सांगितले तर त्याला परत वाटेल हि काय लहान आहे हिला कळतंय . "
"आग पण आई , मध्ये मध्ये मी आणत असतो कि काही तरी , दर वेळी काय . आणि नाही त्या सवयी नको आहेत मला . आणि तसा हि अनु ला काय कमी आहे . मी काही आणले कि हिचे गेस सुरु होतात , कुठून घेतले , किती ग्रैम चे आहे , कोणता ब्रान्ड , किती किंमत आणि …. आग अनु खूप ऐशो आरामात वाढली आहे , तिला गिफ्ट दिले तरी काही अप्रूप किंवा कौतुक नाहीये त्याचे , मग मला नाही आवडत "
"अरे असतो एखाद्याचा स्वभाव . आणि आपल्या घरात नेहमीच वेगळे वातावरण होते , पैसे असले तरी म्हणून तुम्हा मुलांना हे जरा नवीन आहे . पण बाकी ती चांगली आहे "
"हो ग , म्हणून तर मी लग्नाला हो म्हणालो न . आणि खर आहे एखादी गोष्ट सोडायला हवी , बाकी दहा चांगल्या असतील तर . मी घेईन उद्या तिच्या साठी काही तरी . पण खर सांगू इराणी आणि तिने हे रूम चे मला सांगायला हवे होते आणि तू प्लीज परत ते हक्क बिक्क नको बोलू , मला कसातरीच वाटते "
"ओके बेटा आणि तू झोप आता , उशीर झालाय "
आकाश नि ठरवले कि उद्या अनु ला आणि इरा ला या बद्दल विचारायचे . सकाळी उठला , इरा मात्र तो उठायच्या आधोच निघून गेल होती , खर तर नेहमी पेक्षा ती लवकर का गेली हे त्याला कळले न्हवते आणि आज तर सुट्टी आहे हिला आज काय काम निघाले इतके , पण कुणाला विचारणार , सगळेच बाहेर गेलेले दिसतात .
तेवढ्यात फोन वाजला
"हेल्लो आकाश "
"हा बोल निमिष "
"अरे इरा चा निरोप आहे तुला कि ती उद्या सकाळीच परत येयील , तिचे काही तरी काम आहे म्हणून मैत्रिणी सोबत बाहेर गेलीये , तिने आई ला फोन करून सांगितले , तू झोपला होतास म्हणून तुला नाही उठवले म्हणाली "
"ओं तुला कसे कळले , अरे मला वाटेत भेटली , योगायोगाने . मग म्हणाली मित्राला निरोप सांग . आणि म्हणाली कबाब मे हड्डी होवू नकोस . चल ठेवतो आता. जमले तर दुपारी चक्कर टाकतो "
"बर , पण ये शक्यतो . तुझ्या शी थोडे बोलायचे आहे "
"बरे , बाय "
आकशला काही काळात न्हवते कि इरा कुठे गेली आणि जवळ पास कुठे गेली असेल तर मी पण गेलो असतो कि . आणि उद्या एकाच दिवस आहे मी हे माहित असून सुद्धा गेली . आणि काळ तर म्हणाली मला कि उद्याचा पूर्ण दिवस तुझ्या सोबत . परत फोन वाजला
"हेलो , अनु बोलतिय "
"बोल ग "
"अरे , तुझे आवरले कि इकडेच ये न , मला पण आई नि आज ऑफ दिलाय हॉस्पिटल मधून . जर बाहेर जावून येवू , माझी किरकोळ कामे पण आहेत आणि आपल्याला पूर्ण दिवस मिळेल एकत्र "
" येतो मी . पण आई , अनु आणि आता तू पण कुणीच काही सनग्त नाहीये मला . तुमचे तुम्ही काय ठरवताय काय माहित "
"अरे , माझा आणि इराचा प्लान होता आजच , तुला सरप्राईज करायचे . पण ती शहाणी स्वतच गायब आहे आता "
"म्हणजे , तुला पण माहित आहे कि ती घरी नाहीये ते ."
"हो , अरे मगाशी आईना फोन केला न तेव्ह्या त्या म्हणल्या कि इरा सकाळीच बाहेर गेलीय आणि उशीर झाला तर उद्याच येयील बहुधा . मग तू येतोस न "
"हो येतो , तासाभरात , "
आकाश ला इराचे हे नसणे च सरप्राईज होते , पण त्याला वाटले कि आता मोठी झालीये ती , स्वताचे पण आयुष्य आहेच कि तिला आणि तेवढी स्पेस तर द्यायली हवी तिला पण .
"वाह , अनु छान दिसत आहेस कि एकदम आज."
"म्हणजे , तुला खरच सौंदर्य दृष्टी आहे म्हणायची ."
"अरे म्हणजे काय , इराला विचार , माझी आवड चांगली आहे म्हणून तर तिचे सगळी खरेदी माझ्या सोबत असते , कपड्या पासून अगदी कानातल्या पर्यंत . ए तुझे पण इर्रिंग छान आहेत, हिऱ्या चे आहेत का ग ? पण मुंबईला डिझाईन जास्त पाहायला मिळतात . मला आठवते इराला पण मी असेच आणले होते एकदा हिऱ्या चे , तिला खूप आवडतात ते "
" हो , म्हणाली मला ती एकदा . आज बघ कसे डिच करून गेली आपल्याला "
"असुये दे ग. तुझी काय ती काम आटोपली कि आपण जरा खरेदी करू ,तुझ्यासाठी . काय घायचे ते ठराव "
" वाह , आज काय एकदम मस्त मूड दिसतोय "
"हो आहे खरा"
गाडी चालवताना सहज विषय काढून आकाश नि अनुला विचारलाच रूम बद्दल .
"काय मग , अनु , काय काय प्लानिंग रूम सजावटी बद्दल , इरा नि रूम खाली केलीये . खर तर तिचा फार जीव आहे त्या रूम वर , म्हणजे तिची घरातली फेवेरेट जागा आहे ती "
" हो अरे , म्हणजे ती काही बोलली का तुला ?"
"कशा बद्दल ?"
"अरे हेच रूम बद्द्ल "
"नाही, का ग ?"
"अरे काही नाही , म्हणजे तसे सांगण्या सारखे किंवा न सांगण्या सारखे काहीच नाहीये . काय झाले कि मध्ये मी आपल्या घरी आले होते न , तेव्हा मी आणि अनु गप्पा मारत होतो , तर सहज बोलणे झाले . आजी म्हणत होत्या कि आई बाबा ची रूम आपण घेवू आणि आई बाबा दुसरऱ्या बेडरूम मध्ये शिफ्ट होतील. मी म्हणाले कि मला वाटले कि हीच रूम आमची असेल , म्हणजे तुझी रूम तीच आपली नाही का . कारण तशी ती रूम मोठी आहे आणि छान view पण आहे . मग इरा च म्हणाली कि आवडली असेल हि रूम तर तुम्ही घ्या हि आणि ती शिफ्ट होईल दुसऱ्या रूम मध्ये . तसे पण तुमचे घर इतके मोठे आहे कि , बाकीच्या खोल्या बंदच असतात. मग इरा म्हणाली कि जर चेंज करावे लागेल इंटिरियर , तर मग मी लगेच रूम रिकामी करते , काम सुरु करता येयील . अरे कसली उत्साही आहे ती , लगेच आई बाबा शी बोलून , माझ्या सोबत आली पण डेकोरेटर कडे आणि काम पण सुरु केले . मला म्हणाली दादू ला सांगू नको "
"हं "
"अरे मला वाटले . इरा बोलली असेल तुला "
"नाही तिचे काही बोलणे नाही झाले माझ्याशी तसे, कारण काळ मी तुला भेटायला आलो आणि सकाळपासून हीच गायब आहे . तसे मी विचारले तिला कि रुम का शिफ्ट केलीस तर मला म्हणाली गम्मत आहे नंतर सांगते . ती काय पण म्हणेल ग , कि तुम्ही हि रूम घ्या वगैरे , तुम्ही कशाला ऐकता ग तिचे "
"अरे पण आकाश , ती आपण हून म्हणाली आणि मला पण आवडली होती ती रूम आणि आई पण म्हणाल्या कि खोल्या जास्त आणि माणसे कमी , इरा ला जिथे हवे तिथे ती राहू शकते आणि तसाही २-३ वर्षांचा तर प्रश्न आहे . इरा कदाचित पीजी करायला बाहेर पण जाईल आणि इथे असली तरी तसे काय बिघडत नाही , इतके मोठे घर आहे . आणि आज न उद्या ती पण लग्न होवून जाईलच कि "
"बाप रे , केवढा पुढचा विचार आणि काय ग सारखे इराच्या लग्नाचे किंवा बाहेर जायचे हे काय काढलाय तुम्ही "
"तुम्ही म्हणजे ?"
"तू आणि आई नि . ती पण असाच काही तारो म्हणत होती "
अरे म्हणजे काय इरा काय अशीच आयुष्यभर सोबत राहणार आहे काय आपल्या ?मोठी झालीयए ती आता , "
"अरे पण इतकी पण मोठी नाहीये ती . आणि जर तिला लगनच करायचे नसेल किंवा साम्ह्जा तिच्या होणाऱ्या जोडीदार कडे त्याचे घर नसेल , तर ते आपल्या घरात राहू शकतात , मला तर आवडेल बाबा . मी असाच मुलगा शोधतो . आणि जर तर डॉक्टर असेल तर प्रश्नच नाही , हॉस्पिटल ला पण मदतच होईल न "
"काही पण आकाश , असे कसे होईल . म्हणजे असे नसते कधी ."
"का असे झाले तर काय हरकत आहे . बरे घराचे राहू दे , पण डॉक्टर असेल तर बरे होईल न , म्हणजे आई बाबांना काळजी नकोच . तू , इरा आणि तो , म्हणजे आमची परंपरा सुरु राहील "
"हं , तशी आता आईना काळजी नाहीये , मी जोइन झाल्या पासून "
"ते आहे , पण तू पण नवी आहेस न अजून आणि आई बाबा तसे फिट आहेत , काम करायला . खर तर मी डॉक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती , पण माझी इच्छा पण ऐकली त्यांनी . आणि इरा आहेच कि त्यांचे स्वप्न पूर्ण करायला . ती rank होल्डर आहे, आणि हुशार, समंजस , आणि संवाद कौशल्य , चांगली डॉक्टर होईल ती "
" नक्कीच . पण आज काल खूप struggle आहे अरे . आपला सेट अप जुना आहे आणि आई बाबा नि खूप नाव करून ठेवलाय , म्हणून खूप शिकायला मिळतंय "
"अग , आई बाबा तरी खूप नंतर . खर तर आजी सांगते कि आजोबा आणि तिने जेव्हा दवाखाना सुरु केला न तेव्हा सुरवातीला खूप त्रास झाला . त्या काळी पण आजी डॉक्टर होती , आणि नंतर माझा काका . तसा लवकर गेला तो पण मला थोडा थोडा आठवतोय . बाबा ला तर डॉक्टर व्यायचे नव्हते, पण काका त्याचा रोल मोडेल म्हणून तो झाला . आणि आई तर खरे , हुशार पण तिची परिस्थिती पण न्हवती . आमच्या हॉस्पिटले मध्ये तिचा भाऊ होता admin ला . काकाचा मित्र तो . काकाला कळले कि आई खूप हुशार आहे आणि तिला डॉक्टर व्यायचे आहे . त्या;अ अगदी बहिणी सारखी ती म्हणून मग काका नि माझ्या आजी आजोबाना सांगितले आणि तिचा मेडिकल चा खर्च केला सगळा . आणि मग हॉस्पिटल मध्ये ती जोइन झाली आणि बाबाचे आणि तिचे जमले . आणि मग काय , आपली सारखाच , शुभ मंगल सावधान. मग काही वर्षात काका गेला आणि त्या धक्क्याने आजोबा पण . जावू दे . तुला तर सगळे सांगितले न आजीनी परवा "
"हो रे , सांगितले . माहितीये मला सगळे आणि माझ्या साठी ओके आहे सगळे त्यात काय . "
"गुड . बर चल तुझ्या साठी जर खरेदी करू "
अनु आणि आकाश नि बरीच खरेदी केली , अनु नि आठवणी ने इरा साठी पण घेतले बघून आकाशाला बरे वाटले . सकाळ पेक्षा त्याचा मूड बरा होता, पण काही वेळेच , जाता जाता अनु म्हणालीच
"अरे , तू उद्या आहेस न , मग येतोस का सकाळी , मी माझी वेळ सांभाळून तुला कळवते हवे तर "
"नाही , उद्या नको , मला इरा आणि निमिष बोलायचे आहे , मला त्यांना पण वेळ दिला पाहिजे "
"अरे पण , ते काय असायचे कि नेहमी तुझ्या सोबत , इतके दिवस लहान असल्या पासून , हवे तर आपण सगळे एकत्र जावू "
"नको , मला फक्त त्यांना भेटायचे आहे , तुला कसा भेटलो न तसाच आणि एकत्र असायचे म्हणशील तर आत आपण सुद्धा आहोतच कि इतर जन्मभर "
"अरे पण , आई म्हणत होत्या कि हॉस्पिटल ची अजून जबाबदारी येयील तुझ्या वर मग तुला वेळ नाही मिळणार , म्हणून मग "
"असू दे , त्यातूनहि जमले तर थोडा वेळ आपण सगळे जावू बाहेर आणि हो या पुढे प्लीज मला जे काय असेल ते सांगा तुम्ही लोक , हे रूम चे जे काही आहे ते काय मला पटले नाहीये "
"ठीक आहे , मग संग तूच इराला कि आम्हाला ती रूम नकोय "
"मी असे म्हणालो नाहीये , मी फक्त इतकाच म्हणतोय कि मला पण सांगत चला इतकच. आणि पाहिले मी इराला झापणार आहे , फार मोठी झाल्या सारखी वागते ती आणि तुम्ही तिला खात पाणी घालतंय . जावू दे . भेटू उद्या जमले तर "
"बरे , बाय "
आकाशला बाकी काही प्रोब्लेम नवता , पण अनु उगाच चिडली आणि म्हणाली कि सांग आम्हाला ती रूम नकोय . इरा पण हट्टी आहे , पण आई ला आणि अनु ला कळायला हवे कि ती तिची रूम आहे . आज्जी शेजारची आणि वेगळी रूम हवी म्हणून गोंधळ घातला होता पोरीने लहान पणी , आणि मग तिला कधी कधी एकटे वाटायचे किंवा भीती वाटली तर मी जायचो त्या रूम मध्ये . मग हळू हळू शिफ्ट च झालो मी पण तिथे . लहान पणीच्या किती आठवणी , खेळणी , पुस्तके सारे काही जपून ठेवले होते त्या रूम मध्ये आपण . माझे लग्न ठरल्या वर इरा म्हणाली पण , कि आपली दोघांच्या मुलांसाठी आपण हि खोली राखून ठेवू नंतर , या खोली मधले बालपण जपायचे आहे मला . कसली आवडली होती मला तिची कल्पना . आणि अनु ला वाटले हि खोली माझी असे . माझी नाही इराची होती , किंवा आमच्या दोघांची होती ती , एक क्षणात इत ती द्यायला तयार झाली , आणि मला न विचारता , सांगता . तिचे त्या खोली बद्दल चे स्वप्न , मला नाही जपता आले . असे कसे होवू शकते . भावंडामध्ये सगळ्या गोष्टींची वाटणी नसते , हे तुला - हे मला अशी . ती खोली आमच्या दोघांची होती , आणि म्हणूनच मला ती माझ्या एकट्याचा वाट्याला नको होती . जसे आपण आई बाबा , आजी आजोबा त्यांचे प्रेम आणि आठवणी नाही वाटून घेवू शकत तसच हे पण . इराचे किती प्रेम आहे आपल्या वर आणि मन पण किती मोठे आहे .
आकाश घरी पोचला तरी काय माहित या एका छोट्या गोष्टीनी त्याचे मन उदास होते आणि इरा न्हवती तर आणखीनच उदास होते , तो तिच्या नव्या रूम मध्ये राहत होता सध्या . हि पण रूम छान होती , तसे तर त्यांचे घरच छान होते . पण आकाश येणार म्हणून तिने त्याचं आवडीची फुले रूम मध्ये ठेवली होती . तो सहज रूम मध्ये पुस्तके उलटी-पालटी करत होता आणि त्याला औषधा ची लिस्ट पडलेली दिसली , वर इराचे नाव होते . विनिता मावशी कडून औषधे घेतली हिने , काय झाले होते मागच्या , महिन्यात फोन वर एक दिवस आड बोलायची आम्ही , आई पण काही नाही बोलली आणि इरा पण आणि अनु पण . न राहवून त्याने विनिता मावशीला फोन केला
"काय ग कशी आहेस ?"
"बरेच दिवसांनी आठवण झाली तुला , आता काय बायको येणार म्हणजे आम्हाला सुट्टी "
"असे नाही ग , आणि काय ग तू स्वतचे क्लिनिक सूर केलस का "
"हो रे , म्हणजे संध्याकाळी घरीच जर , हॉस्पिटल मध्ये फक्त सकाळीच जाते मी , होत नाही आता मला तितकसे
आणि किती दिवस कष्ट करायचे . नव्या लोकांना संधी नको द्यायला "
"म्हणजे , आणि मला कुणीच नाही बोलले हे , अरे काय चालले हे , आलाय पासुन नवीन नवीन काही तरी "
"अरे तसे काही नाही , मला जर कंटाळा आला आहे , तुझी आई तर मला सोडायलाच तयार न्हवती म्हणून सकाळी यायचे असे ठरलाय . अरे नोकरी करणार्याला retirement असते , आम्हाला काय . म्हणून मीच ठरवलंय . आणि अरे मी संध्यकाळी फक्त ठराविक लोकांना कन्सल्ट करते , ज्यांना बाहेर परवडत नाही त्यांना . "
"आणि इराला पण का ? काही औषधा ची यादी दिसली , म्हणून विचारतोय "
"अरे काही विशेष नाही . तिला जर ३-४ दिवस ताप होता . म्हणून आली माझ्या कडे. मला म्हणाली घराचे डॉक्टर नकोत , औषधांचा आणि पथ्याचा मारा करतात , त्या पेक्षा तू बरी , डॉक्टर लांब असेल तर जरा बरे असते , नाही तर मला रूम च्या बाहेर पण पडता यायचे नाही . काही नाही रे , दगदग आणि जर बोर झाली असेल , तू नाहीस , आता आई असते तुझी पण आता तुझ्या लग्नाची तारीख पण ठरेल मग तिची पण गडबड असते रे . आणि हिला तरी कुठे वेळ असतो, अभ्यास , मित्र मैत्रिणी . तरी निमिष आहे इथेच म्हणून बरे आहे म्हणाली . अरे रूम बदलाली , तर सवय नाहीये म्हणून जर झोप झाली नाही असे म्हणत होती . काळजीच काहीच नाही . "
"बरे , पण तरी मला सांगायचं न तिने फोन वर . रोज काय भाजी खाली ते सांगते आणि हे "
"अरे उगाच तुला काळजी म्हणून नसेल बोलली . इतकाच . आता ओरडू नको तिला "
"नाही ग , आणि ओरडायला भेटू तर दे "
आकशाला आल्या पासून अस्वस्थ वाटावे अश्याच घटना होत्या सगळ्या . निमिष पण बोलला नाही आपल्याला काहीच . निमिष ला सांगतो या पोरी वर लक्ष ठेवायला अधून मधून आणि आई ला पण सांगायला पाहिजे कि इतके दिवस मी होतो आणि आजी पण होती सो तशी गरज न्हवती . म्हणजे आई चे पण लक्ष असायचे पण तिला रोज बारीक सारीक गोष्टी नाही बघायला लागायच्या . पण आता मी पण नाहीये इथे आणि माझे लग्न ठरलाय तर एवढे त्याच्याच मागे लागण्या सारखे काय आहे त्याच्या आणि इरा हुशार आहे , समंजस आहे म्हणून ठीक , पण तरी थोडे लक्ष नको का तिच्या कडे. ती मुलगी बडबड खूप करेल पण त्रास असेल कसला तर कुणाला कळायचा नाही अगदी आई ला सुद्धा सांगणार नाही . आकाश ला झोप लागली
"दादू उठ , चहा केलाय मी , लवकर उठ "
"इरा, तू कधी आलीस आणि मला न सांगता का गेलीस काल तू ?"
"स्टोरी आहे मोठी , नंतर बोलू, तुझा लाडका निमिष पण येतोय , आता इकडच . मी आवरते "
"इरा , एक मिनिट , मला खूप विचारायचे आहे तुला "
"अभी के अभी ?, चहा पिताना नाही का चालणार ?"
"नाही , आता "
"हे बघ , काल जाने खरच गरजेचे होते आणि रूम बद्दल म्हणशील तर , मला वाटले ते मी केले , इतका अधिकार आहे मला या घरात , आता हा विषय नको , "
"आणि आजारी होतीस त्याचे काय ?"
"त्याचे काय , औषध घेतले बरी झाले आणि तुला नाही सांगितले कारण उगाच कशाला तुला त्रास , तू इअक्दे आला असतास पळत "
"मग त्यात काय झाले , यायला नकॊ गरज असेल तर "
' हो पण , गरज सगळ्यांना असेते न , आईला , बाबांना , अनुला सुद्धा , तेव्हा नाही तू येत हातातले काम टाकून "
"इरा , काही तरी काय , मी प्रत्येक खेपेस त्यांच्या साठी पण आलोय ना . पण तुझ्या बाबतीत जेव्हा मला वाटेल माझी गरज आहे तेव्हा मी येणार , मग बाकीच्या लोकांना,. अगदी तुला सुद्धा ती गरज नाही असे वाटले तरी. एक लक्षात ठेव इरा , मी फक्त भाऊ नाहीये तुझा , माझ्या पासून काही लपवायचे नाही कधीच . कसे सांगू मी तुला , "
"अरे हो , कळले , नाही होणार आता असे , पण आवर निमिष येयील आणि अनु सुद्धा "
"तिला का बोलवले आहेस ? , असू दे . "
इरा आवरून खाली आली , अनु , निमिष आणि आकाश गप्पा मारत होते .
"इरा किती गोड दिसातीयेस "- अनु
"मस्का बाजी ,अरे नवऱ्याची बहिण , महत्वाची बाबा. काय म्हणा हा अनु वाहिनी , तुम्ही हुशार खऱ्या "- निमिष
"गप रे , निमिष , उगाच काय ?"- इरा
"इरा, एक विचारू का ग ? मी आणलेले ते कानातले तू घालत नाहीस का आता . अग , अनु ला तसलेच आणायचं विचार आहे माझा मुंबई हून , म्हणून लक्षात आले कि outdated आहेत ते आता "
"नाही रे , म्हणजे आहेत ते कुठे तरी असेच , लक्षात नाही आता . शोधून ठेवते "
"एक मिनिट इरा , ते किती महाग आहेत माहितीये न तुला आणि तू असे कुठे पण ठेवणारी नाहोयेस "- निमिष
"निमिष, तू यात पडू नको हा उगाच , मी आणि माझा भाऊ बघून घेवू काय असेल ते "- इरा
ते चोघे बाहेर पडले , थोड्या वेळानी या मुली काही तरी खरेदी करत होत्या , आणि आकाश आणि निमिष कॉफी शॉप मध्ये बसून होते .
"आकाश , तुला एक सांगू . मला असे वाटतय कि ते कानातले अनु कडे आहेत . मला पहिली सरखे वाटतात . खरे तर माझ्या लक्षात नसते आले पण मध्ये एकदा , मी आणि इरा असाच बाहेर आलो होते आणि अनु भेटली तर इरा तिला म्हणाली कि तुला छान दिसतात बघ हे इरिंग. मला तेव्हा इतके काही लक्षात नाही आले . मी इरले नंतर विचारला तर म्हणाली कि अरे पर्व अनु आली होती तेव्हा गपाप सुरु होत्या , गिफ्ट्स वगिरे . तेव्हा ती इरली म्हणाली कि तुझी कडे क्लासी असते सगळे , मस्त आणतेस तू . तर इरा तिला म्हणाली कि अग मला तर आवड पण नाहीये पण आधी आईची आणि नंतर आकाश ची हौस. तुला काही हवे असले तर घे यातले यातले . मग अनुला त्या earrings आवडल्या आणि इराणी देवून टाकल्या "
"मग मला का नाही सांगितले . म्हणजे मगाशी विषय निघाला तेव्हा पण आणि काळ माझे अनुचे बोलणे झाले झाले तेव्हा पण अनु नि काहीच नाही सांगितले आणि अनुला काय कमी आहे रे , एकुलती एक आहे ती . मला माहितीये कि तिला पैशाचे काही नाही विशेष ."
"हो ते मात्र आहे , ती तशी नाहीये . पण अरे हारच आवडले असेल आणि इराणी दिले न आपणहून मग ?"
"अरे पण का , मी आणले होते न तिच्यसाठी . मी आईला पण हेच म्हणतोय कि जे इराचे आहे ते इराचे आहे आणि जे अनुचे ते अनुचे "
"आणि तू ?"
"मी अनुच होणारा नवरा , सहजीवी आहे आणि इराचा भाऊ आणि बरा काही आणि विचारले नाहीयेस पण सांगतो तुझा मित्र . आणि मी अनु वर कधीच अन्याय नाही केलाय इरा मुळे किंवा तुझ्या मुळे . आणि रूम किंवा कानातले किंवा हॉस्पिटल या मधले जे काही झालाय त्यात माझी काहीच हरकत नाहीये . फक्त हे सगळे माझ्या पासून लपवले याचा त्रास होतोय मला . आई नि लपवले आणि इरा नि पण , आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अनु नि . मला नाही आवडत लपवा छपवी आणि विषय निघाल्यावर पण तिने सांगू नये . एक सांगू , जेव्हा लोक जाणून बुजून एखादी गोष्ट करतात आणि जेव्हा त्यांना त्याचा गिल्ट वाटतो न तेव्हाच ती लपवतात . मला वाटले इराला तिची स्पेस हवीये , खर तर तीच माझ्या साठी स्पेस तयार करतीये आणि जपातीये आणि ते करताना ती मला ते कळू देत नाहीये , आणि अनु नि काही मागितले आणि इरा नि दिले तर कदाचित मला आवडणार नाही आणि मी आणि अनु मध्ये वाद होतील म्हणून मला टाळणे हे इराचे गिल्ट . हे रूम आणि इरिंग चे अनु नि कसे काय स्वीकारले , कदाचित या सगळ्यावर म्हंज घर , हॉस्पिटल आणि माझ्या वर तिचा जास्त हक्क आहे आता , हे दाखवताना ती अशी वागतिये पण ते कदाचित तिला पण पटत नसावे , म्हणून अनुचे गिल्ट . पण आईचे काय , तिच्या वर तर इराच हक्क आहे न अनु पेक्षा , अगदी तिच्याच भाषेत बोलायचे तर . आणि बाबा न बरे चालतंय हे सगळे . गोष्टी छोट्या च आहेत , पण मला त्या वेगळ्या दिसत आहेत
आई बाबा न तर कसलच गिल्ट नाहीये , मग मला का नाही सांगत हे सगळे , त्यांना कसले गिल्ट आहे?
:भाग ६
आकाश ला येवून खरा तर एखादा दिवसच झाला होता , पण त्याला मात्र आपण किती तरी दिवस इथेच आहोत असे वाटत होते , क्षण भर हि पिच्छा न सोडणारे विचार आणि भूतकाळ . त्याला वाटले कि आपण तिकडे दूर एकटे होते पण तरी मन इतके बेचैन नाही झाले कधी आणि आता आपल्या माणसांमध्ये आलोय तर , पण असच असते बहुतेक. मी किती हि वरून दाखवले कि मी शांत आहे तरी खळबळ आहेच कि मनात . लहानपणी असे कधी सुद्धा वाटले नाही कि असे काही प्रश्न आपल्या समोर उभे , राहतील ज्यांची उत्तरे मिळून सुद्धा , न मिळाल्या सारखी , आणि नवे प्रश्नच उभे करणारी . सगळ छान चालले होते कि , सुखवस्तू कुटुंब , उत्तम शिक्षण , सुशिक्षित आई वडील आणि एक गोड बहिण , आणि काय हवे . आणि अनु शी लग्न ठरले तेव्हा पण , एक सुशिक्षित, हसमुख आणि घरच्यांना आपलीशी वाटणारी आयुष्याची साथीदार , सारे काही अगदी "परफेक्ट". पण मला परफेक्ट असे कधीच काही नको होते मला बस समाधानी आणि सगळ्यांना जोडून ठेवणारे आयुष्य हवे होते . मला कधी वळणाचे, घाटाचे रस्ते ,मानवलेच नाहीत , मग आयुष्य तरी कसे मानवेल . त्याला वाटले आपण पाच वर्ष मध्ये एकदा जरी येवून गेलो असतो , तर मन मोकळे झाले असते . आकाश निरभ्र झाले असते . आत्ता ,म्हणजे असे आहे कि आभाळ भरून आलाय , आकाशाला काळ्या मेघांनी झाकून टाकलाय आणि पाऊस बरसावा असे वाटतय आणि तो तर तर काही मनावर घेत नाहीये .
मनानी थकलेला माणूस झोपेच्या आहारी जातो खरा , पण मन जगच राहते . आकाशाला लवकर जग आली आणि आपले आवरून तो खाली आला , सकाळी एक छाकर मारून यावी असा त्याचा विचार होता . त्याला काय वाटले कुणास ठावूक पण त्याची पावले आपोआपच हॉस्पिटल कडे वळली . त्याच्या लक्षात आले कि निमिष आणि इराचे घर हे हॉस्पिटल पासून जवळ आहे, आणि त्याच्या आणि आपल्या आई बाबांना पण तसे काही दूर नाही .
"आकाश "
आपल्याला कोण हक मारताय असे त्याला वाटले आणि त्याने वळून पहिले , अरे विनीता मावशी .
"काय रे , आकाश , ओळख लागतीये का माझी ?"
"काय ग मावशी , तुला विसरून कसे चालेल मला , खाल्ल्या दही-वड्यांना आणि औषधान तरी जगले पाहिजे मला. पण एक सांगू , मी गेलो न तेव्हा जेवढी तरुण होतीस त्या पेक्षा आता वातातीयेस खरे "
"कंठ फुटला म्हणायचं तुला, तू पाठवलेला ipod वापरते बघ मी . हे बघ रोज सकाळी फिरायला येताना छान उपयोग होतो मला . आणि काय रे माझी खेचतोस काय तरुण दिसते म्हणून . बर मला संग कसा आहेस तू ? आता असे कर माझ्या बरोबर घरीच चल, सकाळचा नाश्ता आमच्या सोबत कर , काल चुकला आहेस तू "
"अग पण , निमिष आणि इरा माझी वाट बघतील आणि कदाचित आज आई पण भेटेल"
"म्हणजे , तू जून घरी गेलाच नाहीयेस ?"
"नाही आग निमिष पण एकटाच आहे , आणी लग्न घरात माझी विश्रांती पण नसती झाली न म्हणून "
"हं , लक्षात येतेय रे माझ्या "
"एक काम कर, तू त्यांना फोन करून माझ्या घरीच बोलव , नाही तर तू नष्ट कर आणी मग जा त्यांच्या सोबत बाहेर "
"बर , चल , मी कळवतो त्यांना . तसे मला तुझ्या सोबत पण खूप गप्पा मारायच्या आहेत "
आकाश मागच्या वेळी विनीता मावशी कडे आला होता तेव्हा आणू त्याच्या सोबत होती , मावशीने जेवायला बोलावले होते , खर तर तिने सगळ्यांना बोलावले होते , पण आई - बाबा नाही म्हणाले , म्हणजे त्यांना जमत न्हवते . मग इरा पण नाही म्हणाली , घरी आजी जवळ थांबते असे म्हणाली आणी नाही आली . विनीता मावशी खर तर आईची द्साहाकारीच न्हवे, तर खूप जवळची मैत्रीण . तिला एक मुलगी होती , पण ती लहानपणीच दगावली , त्यमुळे मावशीने अगदी स्वतच्या मुलांसारखे प्रेम केले आपल्यावर . खर तर तिची मुलगी असती तरी तिनी आपल्यावर तितकाच प्रेम केले असते , तिचा स्वभाव च मायाळू . इरा वर तर विशेष जीव तिचा . मी गेलो तेव्हा म्हणाली होती
"आकाश , जायचे तर जा तुला , पण वर्ष भारत परत ये . मला , इराला आणी तुझ्या आई बाबा न पण तू हवा आहेस . तुझे मन शांत झाले कि ये . आणी फक्त इतकाच लक्षात ठेव कि माणूस परीस्तीही प्रमाणे वागतो , आणि काही लोकांना थोडा जास्त स्वार्थ असतो , काही लोकांना कमी . पण म्हणून एकदम कुणालाच दोषी ठरवू नकोस . इराची काळजी मी आणी आई घेवूच . तू जा निवांत "
"ये रे आकाश "
आकाश भानावर आला
"हे काय , काका कुठे आहेत "
"बाहेरगावी गेले आहेत , येतील २ दिवसात . मी गेले नाही , तुझी आई म्हणाली कि थांब , मला तेवढाच आधार "
"हो ते पण आहेच , तुझ्या इतके जवळच तिला कुणीच नाही "
"हो रे , पण खर सांगू इरा खूप समंजस आहे . तिने तुझ्या आई ला खूप सावरलाय , आणी बाबांना पण आणि हॉस्पिटल पण छान सांभाळते . कधी कधी तर तिचा कामाचा उरक आणी मन लावून काम करणे पहिले कि तुझ्या आजीची आणी काकाची आठवण येते मला . म्हणजे तुझे आई बाबा आणी मी असे एकत्र जितके करायचो न तितके हि एकटे करते जबाब दारिनी आणी सगळ्या सहकार्यांशी अगदी छान वागते . गर्व जसा नाहीच तिला . खर तर दुर्गम भागात जावून प काम करायचे होते तिला पण नाही जावू शकली , पण आमचे कॅम्पस घायचे काम तिने सुरु ठेवलाय आणी वाढवले पण आहे. पैसे , प्रसिद्धी , यश या सगळ्याचे काही वाटत नाही तिला "
"मावशी , हे मी का तुला सांगायला पाहिजे कि रक्तातच आहे तिच्या ते . खर सांगू मी गेल्या ५ वर्षात तुम्हा सगळ्यांशी बोलत होते , पण इकडे खर काय घडले होते काय माहित "
"सुरवातीला त्रास झाला सगळ्यांनाच . तुझी आई तर , फारच अस्वस्थ होती . पण इरा , तिला नक्की काय झाले ते काळातच न्हवते न , कि तुझे आणि अनुचे असे काय बिनसले ते . तू तिला इतकाच सांगितलेस कि तुला परदेशी जायचं आणि तिला जायचे नाहीये , आणि त्या मुळे होत आहेत . तिला सुरवातीला पटतच न्हवते , मग हळू हळू आम्ही तिला समजावले , तू पण तिच्याशी बोलतच होतास . मग हळू हळू ठीक झाले सगळे . "
"हो मला माहितीये , ती लागांसाठी पण तयार न्हवती . म्हणून निमिष नि पण तिला लवकर विचारले नाही , थांबला तो . म्हणून मग मीच बोललो तिच्याशी . खर सांगू का , मी जेव्हा गेलो तेव्हा फार काही ठरवले न्हवते स्वत बद्दल "
"मग , आता ठरवले कि नाही ? आई तुझी विचारेल कि नाही माहिती नाही , पण मीच विचारते तुला हक्काने . "
"लग्न बद्दल म्हणत असशील , तर खर सांगू का . पाच वर्ष पूर्वी काहीच ठरवले न्हवते . म्हणजे एक अनुभव कटू आला म्हणून ते नातच नाकारणे नाही पटत मला . मी ज्या वातावरणात , देशात वाढलो तिथे असलेले लग्न संस्थेचे आणि आयुष्याच्या जोडीदाराचे असलेले नाते मला माहितीय आणि मान्य सुद्धा आहे . आपल्या सुख दुखाच्या वाटेवर साथ देणारे कुणी तरी हवाच असते कि ग आपल्याला . मनमुराद एकटे जगायला पण एक पिंड लागतो आणि कदाचित माझा तो नव्हता . पहिले एक वर्षे असाच गेले , सेट होण्यात . मग हळू हळू मी रमलो अग . मी लग्न मुद्दामून टाळले नाही , पण फारसे कुणी आयष्यात डोकावले नाही आणि कुणी आले हि नाही तसे कि लग्न करावे "
"खरे आहे , आपण नाती लादून नाही घेवू शकत स्वतावर . आणि तुझी तयारी दिसली नः म्हणून आई नि पण काही लक्ष नाही घातले तुझ्या "
"मावशी , पण आई नि कधी मोकळे पानांनी मला विचारले सुद्धा नाही . मी एक दोन वेळा सुरवातीला म्हणालो सुद्धा कि तुम्ही कुणीतरी इकडे येवून जा . पण तेव्हा ते माझ्या वर थोडे से चिडले होते . आई ला तर असे वाटत होती कि तिला आणि अनु ला जणूमी गुन्हेगार ठरवले आहे आणि हाच माझा अपराध आहे . मग त दरी वाढतच गेली , इच्छा नसताना पण . तरी इरा होती म्हणून एवढे तरी संबध राहिले नाही का "
"हो , पण इरा मुळेच हि दरी निर्माण झाली न आकाश ?"
"मावशी तू सुद्धा ?"
"नाही आकाश , मी सुद्धा असे म्हणू नकोस . जसा तू तशीच ती , माझ्या कडेच कधीच भेद भाव नव्हता . पण तुला असे नाही का वाटत कि थोडा पजेसिव आणि थोडा हळवा आहेस इरा बद्दल . म्हणजे अनु आणि तुझ्या आई च्या काही काही गोष्टी न पत्न्या सारख्या होत्या . खर तर अनु ला इराची वाटणी नको होती , पण सुरवातीला असे नव्हते . तुझ्या आई सोबत सगळ्या गप्पा गोष्टी, बोलणी झाल्यावर तिच्या पण हे लक्षात आले कि , तुझ्या आई ला ती सहज तयार करू शकते , या गोष्टी साठी . म्हणजे ते घर इराचे राहिलाच असते , तिला प्रेम हि मिळाले असते . पण खास करून हॉस्पिटल मध्ये अनु ला , तिच्या वरचढ कुणी नको होते आणि इरा निष्णात डॉक्टर होणार हे आरश्य इतके स्वच्छ होते . तुझ्या आई ला हि असे वाटले कि आपल्या या वारास्याची हक्कदार अनुच , खर तर तू , पण तू नाकारालास म्हणून तुझी बायको . इरा च्या बाबतीत तुझ्या आई बाबांनी सगळी कर्तव्ये पार पडलीच असती , पण कदाचित कुठे तरी हि मुलगी आहे , लगन झाले कि काय माहित कुठे जाईल किंवा तिला दुर्गम भागात काम करायचे होते , तुमचा तो वारसा इरा नि चालवावा असे आई ला वाटत असेल कदाचित "
"तिला असे वाटत होते कि तिची तीव्र इच्छा होती तशी ?"
"आकाश , तुझ्या आई बद्दल तू असा विचार कसा करू शकतोस , इराची पण आई आहेच कि ती . पण मुला बद्दल कदाचित थोडी जास्त माया , किंवा मोह वाटत असेल तिला . मुलगा आपल्या जवळ राहावा म्हणून सुने ला असे अडकवून ठेवायचे होते तिला इतकाच "
"तुला पण असे वाटतय का ग कि माझे जर अतीच झाले . आणि तू म्हणालीस न कि मी हळवा आहे , आहेच मी पण तुअम्च्य सगळ्यांच्या बाबतीत आहे न , खर संग मावशी कळायला लागल्या पासून , कधी तरी तुला मुल नाही याची हौस मौज मारू दिली का ग मी , मग तुझ्या बाबतीत मी हळवा झालो तर चालते कि तुला आणि आई ला . मग इरा तर बहिण आहे माझी . आणि मी possessive नाही तिच्या बद्दल पण protective नक्कीच आहे बद्दल . आणि अग सगळ्या गोष्टी मागे काही करणे असतात , परिस्थिती असते . आई बाबा तसे कायम व्यस्त होते , आजी कर्तृत्वान खरी , पण आम्हा मुला साठी तिनी वेळ दिला . आई ला हॉस्पिटल मधेच काम करायला आवडायचे , पण बाबा आणि आजी साठी तिला कॅम्पस आणि बाकी सामाजिक कार्यात भाग घायला लागायचा . इरा कुटुंबात आली आणि मला खूप आनंद झाला , इवलीशी छोटी शी इरा , तिच्या सोबत माझा वेळ मस्त जायचा . मला मित्र होते , पण तरी घरातला एकटेपणा मात्र इराणीच दूर केला . आणि मला हळू हळू आवडायला लागले तिची बारीक सारीक जबाबदारी घायला . शाळेत सुधा मी तिच्या बालवाडीच्या वर्गात हळूच डोकावून यायचो आणि तिला सुद्धा प्रत्येक बाबतीत मी हवाच असायचो . आणि मग वयाच्या एका अश्या टप्प्यावर , जेव्हा मी धड मोठा पण नव्हतो आणि छोटा पण , अश्या काही गोष्टी घडल्या कि मला इरा बद्दल जास्तच काळजी आणि जबाब दरी वाटायला लागली मला, काही काही माणसांशी आपले ऋणानुबंध परमेश्वरानी च जोडून दिलेले असतात. सगळ्याच भाव बहिणीचे नाते आमच्या सारखे असतील असे नाही , पण म्हणून आमचे नाते नाकारता कसे येयील . माझी फक्त इतकीच अपेक्षा होती कि इरा कोणत्याच बाबतीत डावलली जावू नये . माझ्या जोडीदाराने , माझ्या गुण दोष सकट आणि माझ्या बहिणी सह माझा स्वीकार करावा . समजा इराचे आई वडील हयात नसते तर , हीच जबाबदारी घेतली नसती का ग ?"
"पटतय मला आकाश . कदाचित पाच वर्षापूर्वी जे घडले ते चांगल्या साठीच असेल . आणि तेव्हा तुझे पण वय काय फार मोठे नव्हते . आम्ही मोठ्या लोकांनी जर समजून घायला हवे होते . तुला २ वर्षात परत आणायला हवे होते आणि इरा ला पण या आधी लग्ना बद्दल विचारायाले हवे होते . नात्यामध्ये दुरावा येत राहतो कारण सगळेच आपल्या भूमिकेव ठाम राहतात . पण खर सांगू आकाश तुला , आम्हा मोठ्या माणसाना , पालकांना तुम्ही मुलांनी पण माफ करायला शिकले पाहिजे . आम्ही पण माणूसच आहोत . आम्हाला पण चुका करण्याची मुभा आहेच कि . आणि आमच्या पिढीला , हि जी तूंची स्पेस नावाची concept आहे न , ती वयाच्या चाळीशी नंतर मिळाली आहे रे , त्या मुळे सुद्धा कदाचित आमचे असे झाले असेल कि आमच्या सुप्त इच्छा , महत्वाकांक्षा , त्या वयात उफाळून आल्या . ज्या गोष्टी तरुण असताना आम्ही नाकारू शकलो नाही त्याचा उदेर्क असेल बहुधा . आई बाबांना एक संधी दे आणि जर कधी चुकले असतील तर समजून घे . इराचा जसा पालक आहेस न , तसाच त्यांचा हो . त्यांना त्याची गरज आहे आणि खर सांगू इरा हि जबादारी घेतीय , तिला काही अंशी मुक्त कर "
"मावशी ।"
"हो आकाश , ऐक माझे , आमंत्रणाची वाट नको बघू . घरी जा . आणि किती पण अवघड वाटले तरी तसाच जा आणि राहा , पाच वर्ष पूर्वी सारखा . समज काही घडलेच नाही . तू नॉर्मल वागलास न कि सगळेच तसेच वागतील आणि पाहुणे आणि समज्ची तमा तू कधी पासून बाळगायला लागलास . लग्न मोडताना सुद्धा तू पर्वा केली नाही मग आत का? आणि इरा साठी सुद्धा जा "
"तू म्हणतीयेस ते पटतंय मला ., मी निमिष सोबत बोलतो , त्याचे आई बाबा पण यायचे आहेत राहायला आणि बरे झालो बोललो आपण , मला आता खूप मोकळे वाटतय . म्हणजे आई भेटेल न आता त्याचा ताण खूप कमी झालाय बघ आणि नाश्ता पण मस्त झालाय "
" हो रे , मला पण बरे वाटले बघ तू आलास .आणि एक विचार कर , जर कुणी चांगली मुलगी , मैत्रीण असेल आणि आवडत असेल तर नक्की विचार कर . म्हणजे लग्न सर्व काही आणि आयुष्य तेच असे मी मनात नाही . पण शक्य असेल आणि मना सारखे जोडीदार मिळाला तर हे नाते पण स्वीकार , त्यात हि मझा आहे यार "
"मावशी , तुझे शेवटचे वाक्य सांगून गेले हा कि तू अलीकडेच परत तुज आहे तुज्पाशीचे पारायण केलेस "
" आता कसे , माझा मुलगा वाटतोस , बरोब्बर ओळखलस तू :)"
"चल मी पाळतो आता "
आकाश मावशीच्या घरातून निघाला , असे वाटले कि भरलेले आभाळा मोकळे झालाय , आकाश निरभ्र झालाय आणि सर पडून घेल्याने मृदगंध दरवळतोय . मनाची ती प्रसन्नत घेवून आकाशनि पुढचे पाऊल टाकायचे ठरवले
बेल वाजली , दार उघडले , आई नि … आई आणि निमिषाच्या घरात . आश्चर्याचा धक्काच होता , म्हणजे आई भेटली कि काय बोलायचे हे तो ठरवत होता आणि अनपेक्षित पणे तीच समोर .
"दादू , काय रे झाले का लाड करून घेवून . मावशीनी खूप कौतुकानी खायला खटले असेल "
"हो ग ", असे म्हणून आकाश आई कडे वळला , मावशीचे शब्द त्याच्या कानात घुमत होते
"आई , चहा करतेस . चहा पिवून , मी आवरतो मग लगेच बाहेर पडू "
"हो करते"- आई इतकाच बोलली
"आई , मला पण आणि आले आणि पात घालून कर "
"पाहिलेस आकाश , तुझी बहिण आता मला चहा कसा करायचे ते सांगतीये आणि ते पण का , तुझ्या साठी , तुला हवे तसा . मला आहे ठावूक ताई साहेब "- आई
"काय ग आई "
"बर , इरा , निमिष आणि आई तुम्ही तिघे इथे आहात तर मला काही तरी सांगायचे आहे तुम्हाला "
"काय ?"- इरा , निमिष आणि आई तिघे हि जर कालाजीनेच म्हणाले
बाप रे आता काय सांगेल आहे , मी इथे आले म्हणून हा परत तर जाणार नाही न निघून , पण आपण हून बोलला आणि इरा साठी आलाय तर …आईच्या मनात भरभर प्रश्न येत गेले .
दादू आईशी बोलेल आपणहून असे वाटले नव्हते , पण नोर्म वाटला मग वाढला पूर्वीची शांतता होती का ती ? असे इराला वाटले
आणि निमिष त्याला खर तर काही सुचतच नव्हते
आकाश नि पुढे बोलणे सुरु केले
"अरे मी काय न्यायाधीश आहे आणि शिक्षा सुन्वणार आहे का , असे चेहरे बनवायला . निमिष पण सॉरी मित्रा "
"का रे ?"
" अरे काही नाही , मी उद्या सकाळी जायचे म्हणतोय "
"कुठे , अजून लग्नाला चांगले ८-१० दिवस आहेत कि आकाश आणि त्या साठी आलास न तू ?"- आई
"दादू ?"
"अरे पूर्ण ऐका तरी , आई मी उद्या सकाळी आवरून येतोत आपल्या घरी . दुपारी जेवयालो येतोय मी . मी तिकडे असेन तर मला जास्त मदत करता येयील आणि इराची पण धावपळ कमी होईल . आणि निमिश्चे आई बाबा उद्या संध्यकाळ पर्यंत येत आहेत , म्हणजे त्याला पण कंपनी आहे आता . "
"आता काय बोलू मी , राहा म्हणालो तर , काकू कम सासूबाई चिडणार आणि होणारी बायको सुद्धा . आणि जा म्हणालो तर मित्र म्हणेल गरज सरो मित्र मरो "
"मला ठावूक आहे निमिष कि तुला जर त्रास होईल मी इथे न राहल्याने . म्हणजे इरा मला भेटायच्या निम्मित्ताने जास्त येवू शकणार नाही न "
"नको , तसे पण अति तिथे मत , लागणं आधीच भांडण नको , तू आपला तिकडेच राहा "- निमिष
"ठरले तर मग , आई उद्या प्लीज गाडी पाठव समान खूप आहे "
"हो पाठवेन , हवे असेल तर बाबा पण येतील "
इरा खुशीत होती , तिला आपल्या भावाचे खूप कौतुक वाटले . किती छान सांभाळून घेतले त्याने , आता आई पण ख्सू आहे . दाखवणार नाही ती , स्वभावाच नाही तीच . मी हट्टाला पेटले म्हणून इथे तरी आली .
"चला , मुलानो पटपट बाहेर पडू यात , निमिष तुझ्या आई बाबा न पण डायरेक्ट दुकानातच बोलाव . उरकून टाकू खरेदी . आणि निमिष तू आणि तुझा मित्र दोघांनी आज आटपा काय ते "
संथ पाणी वाहते झाले होते , अर्थात आरश्य इतके स्वछ नक्कीच नाही . आई आकाश च्या निर्णय बद्दल काहीच बोलली नाही . आकशाला खरेदी करायला सुचवून , एक प्रकारे त्याच्या येनचे स्वागत केलेच होते तिने , पण घरी येण्या बद्दल ती मौनच होती . पण येवू नको असे हि नाही म्हणाली .
इरा खुशीत होती , आई गप्प होती , निमिष थोडा confuse होता कि आकाशाला जमेल का तिथे राहायला , आणि आकाश , सगळ्या भावना मिसळून गेल्या होत्या , घरची ओढ , इरा सोबत त्या घरात राहण्यातली गम्मत , आई बाबा कसे स्वीकारतील आपले येणे, याचा थोडा तणाव , पण तरी त्याला छान वाटत होते . परीक्षे मध्ये पेपर चांगले गेले कि कसे निवांत वाटते , पण निकालाची हुरहूर राहतच न ते काही तरी
सगळे काही छान होईल , असे मनात ठेवूनच सगळे बाहेर पडले . पाच वर्षे म्हणजे एक पिढी नि काळ पुढे सरकला . वाटेत हॉस्पिटल लागले , आई म्हणाली दोन मिनटात येते , मग इरा पण सोबत गेली . आकाश नि सहज पहिले बाहेर तर , मोफत उपचार विभागाचे नामकरण झाले होते , इराणी आजी आणि काकाच्या नावाने हा विभाग , परत पुनर्जीवित केला होता . काकाची एक हलकीशी स्मृती त्याचे डोळे पाणावून गेली आणि आजीच्या मायेन डोळ्या दाटून आले , इतके कि त्याला मिटून घ्यावे लागले . तो स्वताशी म्हणाला , इरा नि तुमची स्मृती अशी जपली आणि मी …मि तूंची स्मृती जपेन आयुष्यभर , माझ्या पद्धतीने
भाग सातवा
आई आणि इरा हॉस्पिटल मधून अक्षरश: पाच मिनिटात आल्या आणि आकाशाची विचारांची मालिका थांबली . वातावरण हलके राहावे म्हणून असेल किंवा मुळातच स्वभाव म्हणून असेल पण इरा नि गप्पा सुरु ठेवल्या होत्या . तसा हि निमिष गाडी चालवत असल्यामुळे तिला चिक्कार निवांत वेळ होता
"५ वर्षात पण खूप बदल वाटतोय ग मला इकडे "- आकाश
"म्हणजे काय , अरे ५ वर्षे हा मोठा काल आहे , दोन वर्ष मध्ये generation gap जाणवते आज काल, हो किनई ग आई "-इरा नि आई ला हि संभाषणात आणण्याचा प्रयत्न केला
'आजूबाजूला बदल होत असतातच आकाश , आपण स्वीकारतो कसे त्यावर आहे सगळे . मी एका छोट्या घरातून आणि छोट्या शहरातून आले होते आई बाबा सोबत . शहरात थोडे जास्त पैसे मिळतील आणि आम्हाला शिक्षण चांगले मिळेल या हेतूनी . या शहरात नवीन होते , किती हि हुशार असले तरी सुरवातीला जर बुजालेच मी . तुझ्या काकांनी आर्थिक मदत केली आणि तुझ्या बाबांनी खूप सांभाळून घेतले मला . तुझ्या बाबांनी आत्मविश्वास दिला मला या शहरात वावरायला . अर्थात त्या वेळा आजच्या इतके मोठे , वाढलेले आणि कॉस्मो नव्हते हे शहर . तुझ्या आजी नि तर माझा कायापालटच केला . एकाच वाक्य म्हणाल्या त्या , शहरे आणि आजूबाजूची माणसे बदलत राहतात , आपण हि काळा प्रमाणे बदलायचे , पण आपली नैतिक तत्वे सांभाळून . आणि ज्याच्या कडे ज्ञान , प्रामाणिक पणा आणि माणूस जोडायची कला आहे ना , तो पृथ्वीच्या पाठीवत कुठे हि राहू शकतो , सुखात . माझ्या आयुष्यात हे लोक आले नसते तर माझे आयुष्य नक्की वेगळे असते , कदाचित लौकिक अर्थाने सुखी असते , पण इतकी समृद्ध असते कि नाही कुणास ठावूक . आयुष्यात काही वेळा चुकली असेन मी सुद्धा , शेवटी माणूसच आहे . पण जगताना खूप म्हत्वाचे निर्णय घेण्यामध्ये खूप मदत केली मला तुझ्या आजीने , बाबांनी आणि काकांनी . आज तुझा काका , अवि हवा होता , त्याला खूप आनंद झाला असता , तुम्हा दोन्ही भावंडांचे एकमेकांवर असलेले प्रेम बघून . त्याचे आणि तुझ्या बाबाचे पण असाच होते अगदी . पण आता मला या शहरात राहायचा कंटाळा आलाय . कुठे तरी जवळ पास पण निवांत छोट्या गावात राहावे असे वाटतय ".
"आई , अजून इतक्यात तरी अहि नाही ह . मला एकटे पडायला होईल ."
"इरा, अग एकटे असायला काय झालाय , निमिष आहे कि हक्काचा आता . त्याला कटकट कर आता :) आणि आकाश पण आलाय कि परत आता , बरोबर आहे न आकाश . आणि अग मी काय लगेच चाललीय का ."
आज आकाशाला आई वेगळीच वाटत होती थोडी .त्याला वाटत पाच वर्षात शहर च काय पण आई पण थोडी बदलली आहे असे त्याला वाटत होते . स्वतः बद्दल , आपल्या घरंच्या बद्दल आई इतकी मोकळे पणानि कधीच बोलली नव्हति. आजी , काका , ती आणि बाबा यांचे जुने फोटो खूप वेळा पहिले होते आम्ही , कधी कधी तिच्या सोबत सुद्धा , ती पाहताना रमायची , पण बोलली कधीच नाही , कधी आठवणी सांगितल्या नाहीत . आई खरच एकटी पडलीये का कि विचार करून करून थकलीये ती . कि आपले जे काही बोलणे झाले तेव्हा पाच वर्षापूर्वी, त्यमुळे थोडी बदलली आहे . कदाचित आज मी तिला थोडे समजून घेवू शकतो , कदाचित काही इ साठी माफ हि करू शकतो . तेव्हा मी पण पंचविशीत च होतो कि . काही का असेना पण आता मी थोडे समजून घायला च हवे . आणि मी आणि ती दूर झालो तरी , इरा त्यांना दुरावली हेच विशेष . मला हि तेच तर हवे होते . आता तर मला उलट , त्या दोघी एकमेकांच्या जास्त जवळ आल्या आहेत असा वाटतय . Two is a company and three is crowd and may be that third personwas me . आणि एक गोष्ट त्याच्या लक्षात आली कि आई नि त्याला परत येण्या साठी सुचवले आहे बोलता बोलता . खरच मी यावर काहीच विचार नाही केला आहे अजून .
"दादू , तू कसा रे असाच आहेस , निम्म्या वेळा हरवलेला स्वत मधेच . लक्ष दे न आमच्या कडे . तू मला काय घेवून ते बोल . डॉलर मधले बजेट आहे न "
"घे ग तुला काय हवे ते , मी कधी नाही म्हणालोय का . पण मला असे सांगता नाही येणार काय ते . असे कर आई बाबांनी एखादा हट्ट पुरवला नसेल तर तो माझ्या कडून वसूल कर , म्हणजे सगळेच खुश "
"डन , मग माझे ठरलच आहे "
"हे बरे आहे , तुम्हा बहिण भावांचे काय हो काकू . म्हणजे लग्न नंतर मी पण एखादा हट्ट नाही पुरवला तर चालेल नाही का , तिचा भाऊ आहेच कि , म्हणजे तेव्हा पण सगळेच खुश "
" असे नाही हा, चालायचे जावई बापू . माझ्या बहिणीची तक्रार येवून उप्गोग नाही "
एकंदरीत सगळे हसत खेळत पार पडत होते . निमिष चे आई बाबा पण आले होते . खूप बरे वाटले
त्यांना पण . ह्या सगळ्या मुलांना त्यांनी लहानाचे मोठे होताना पहिले होते आणि आकाश आणि इराचे विशेष कौतुक होते त्यांना , तसे ते निमिष ला म्हणाले सुद्धा . आमच्या माघारी , आता निमिष ची काळजी नाही , तू आणि इरा आता मित्रच नाही तर नात्यांनी पण जोडले गेले ,खर तर निमिष लाही त्याची भावंडे आहेत , पण त्यांचे नाते तुमच्या सारखे नक्कीच नाही . आमचीच मुले आहेत , म्हणजे वाईट कुणीच नाहीत , पण एकमेकासाठी इतका वेळ आणि त्याग करणे त्यांच्या स्वभावातच नाही . गरजेला धावून येतील हि , पण ते तर रक्ताच्या नात्याची ओढ म्हणून .
अजून एक दिवस तर गेला , रात्र सुरु झाली कि आकाश च्या स्वताशीच गप्पा सुरु . उद्या येतो असे आपण म्हणालो आहे खर पण , … काय होईल , जमेल का आपल्याला . कधी कधी जास्त ओळखीच्या ठिकाणीच गुदमरायला होते कारण अपेक्षांचे ओझे पण तितकाच मोठे असते न .
सकाळी आकाश ला जग, थोडी उशीरच आली . बाहेर च्या खोलीत हसण्याचे , गप्पाचे आवाज येत होते . बाबा इतक्या सकाळी कसे आले आहेत , आवाज नक्की त्यांचाच . आणि आता इथे कशाला भास होतील , आकाश बाहेर आला , निमिष आणि बाबा गप्पा मारत होते . गेल्या वर्षात कधी तरी विडीओ chat वरच पहिले असेल .
"शुभ प्रभात , साले बाबू , चहा घेणार का ?"- निमिष
"शुभ प्रभात , चहा चालेल , पण आज मीच करतो आपल्या सगळ्यान साठी . बाबा तुम्ही इतक्या लवकर कसे ?, म्हणजे आई म्हणाली होती तुम्ही याल , पण मला वाटले दुपारी याल ", आकाश ला वाटले , काय बोलतोय हे आपण , साधे तुम्ही कसे आहेत हे पण नाही विचारले , सुचत नाहीये म्हणून चहा करण्याचा बहाणा
"अरे लवकर आलो मुद्दामून , आई ला म्हणाले , आकाश ला थोडे लवकर घेवून , तसाच कार्यलय मध्ये जावून येतो , आणि मग तसेच घरी जावू . आणि खायला पाठवलाय आई नि , आज तुम्हा दोघा सोबत नाश्ता . आकाश , थोडा वेगळा दिसायला लागला आहेस , म्हणजे थोडा खराब झाला आहेस . अर्थात तुला प्रत्यक्ष बघून फार वर्षे झाली . पण बरे झाले आलास आणि घरी येतो म्हणालास हे तर उत्तम . तिथे गरज आहे तुझी . शेवटी इरा म्हणाली तेच खरे "
"काय म्हणाली इरा ?, आणि तुम्ही खूप दिवसांनी पहातंय म्हणून खराब वाटतोय , पण असे काही नाहीये , सुरवातीला जर सेट होई पर्यंत गडबड होती , आता तसे निवांत आहे . पण हे इरा काय म्हणाली ?"
"काही नाही रे , तिनी मला प्रॉमिस केले होते कि तु नक्की येशील आणि खरे केले तिने . खर तर आम्हीच तू आलास त्या दिवशीच तुला घरी आणायला हवे होते . पण तू येशील कि नाहीस असे वाटले . मग इरा नि च सुचवले इथे राहायचे "
"अरे , मी काही नाही येणार घरी बाबा . उलट मला वाटले , कि इतके लोक घरात आणि त्यात मी इतक्या वर्षांनी आलो तर सगळ्यान अवघडल्या सारखे वाटेल . उलट बराच झाले कि , मला तुम्हाला , आई ला , इरा ला , निमिष ला निवांत भेटता आले ."
"मला माहितीये बेटा , सगळे एकदा पूर्ववत नाही शकणार . आपल्याला वेळ द्यायला हवा . काही गोष्टी सहवासाने सुद्धा बदलतात . मी वर्ष पूर्वीच खर तर , माझे मत व्यक्त करायला हवे होते . पण गोष्टी अश्या घडल्या कि मी काही ठाम भूमिका घ्यायच्या मनस्थित नव्हतो . तू आणि अनू एकमेकांना अनुरूप होता असे मला वाटत होते आणि इरा चे म्हणशील तर तिला आपल्या घरात तेच सगळे हक्क आणि अधिकार होते जे तुला पण होते . इराच्या बाबतीत मी पण जर हळवा आहे , आणि जे घडत होते त्यातले तिला काहीच कळू नये म्हणून माझी धडपड सुरु होती . आणि म्हणूनच मला तुझा निर्णय पटला होता , पण मी ठाम पणे तुझ्या पाठी शी उभा नाही राहू शकलो . निर्णयाची जबाबदारी टाळता यावी म्हणून अनेक महत्वाच्या क्षणी मौन होतो , आयुष्य भर , हेच चुकले माझे . अनु काही खलनायिका नव्हती , पण अशी महत्वाकांक्षा असलेली मनसे , कधी कधी टोकाला जातात आणि केवळ स्वतचा विचार करतात . आणि याचा मला अनुभव आहेच कि . जे झाले ते योग्य झाले , चुकून जरी इराला जास्त काही कळले असते , तर ती पोर पार खचून गेली असती . तिच्या मूळेच सारे घडले असे तिला वाटले असते . आणि खर सांगू , काही काही गोष्टी अश्या असतात कि ज्यांचे ओझे आपण आयुष्यभर बाळगतो . ती वेळ माझ्या मुलांवर येवो . असू दे , मी काय बोलत बसलो हे "
"असे काही नाही रे बाबा , उलट मला बर वाटले कि तू इतका मोकळा बोललास माझ्या सोबत . कदाचित इतका वेळ गेल्या मुले आपण सगळेच आपल्या आपल्या पद्धतीने विचार करत होतो , जे घडले त्याचा . काही गोष्टी घडतातच , बदलत नक्की नाही येत . पण जे होते ते चांगल्या साठीच . कदाचित मी दूर होतो म्हणून तुम्ही तिघे थोडे जास्त जवळ आलात , तुम्ही मुलीची आणि मुली तुमची जबाबदारी निभावली. अजून थोडा वेळ गेला न कि सगळे छान होईल पहिल्या प्रमाणे किंवा त्या पेक्षा हि छान . कदाचित आपण सगळेच एकमेकांना गृहीत धरत जातो आणि गुंता वाढत जातो . "
"खरे आहे , आणि माझे पण जरा काही गोष्टीत दुर्लक्ष झाले खरे . पण तू मला त्याची जाणीव करून दिलीस . नाही तर , मी स्वताला आयुष्यात कधीच माफ करू शकलो नसतो , तुझ्या आजीला , आणि काकाला मी शब्द दिला होता कि त्यांच्या माघारी मी हे घर दुभंगू देणार नाही . पण आकाश , मला असे वाटतय कि तू आता परत यायचा विचार कारावास आणि स्वताच्या पुढच्या आयुष्याचा पण . इरा नि तिचे एक पाऊल पुढे टाकल आहे . म्हणजे तिची जबाब दरी संपली असे वगैरे नाही . पण तरीही …किती वाजता निघू यात आपण "
"आलोच , १०-१५ मिनिट लगेच . बाहेरची काम करून परत येवू , मला थोडे समान आवरावे लागेल , मग जावू , दुपारी आपल्या घरी. निमिष तू येतोस का आता आमच्या सोबत "
"नको रे , आज आई बाबा येतात न , त्यांना आणायला जातोय मी . आम्ही इथे २-३ दिवस राहू , आणि मग नंतर कार्यक्रम आमच्या जुन्या घरीच आहेत . कदाचित , मी फक्त झोपायलाच येयीन आणि कुणी आले तर येयिल. इराकडे पण एक किल्ली आहेच इथली , जर कधी लागले तर वापरा तुम्ही पण "
आकाश आणि बाबा बाहेर पडले . आज आकाशाल खूप छान वाटत होते , आई -बाबा दोघे पण भेटले . मनाची घालमेल थोडी कमी झालीये आता . दुपारी आकाश , त्याच्या घरी आला . वास्तू शी पण आपले एक नाते असते , असख्न्या आठवणी असतात . आकाशाला आठवत होते कि ४ एक वर्षाचा असेल ,तो आई बाबा त्याला सोडून एक वर्षे , काका राहत होता तिकडे जाणार होते , वैद्यकीय सेवा दुर्गम भागात पोचावी म्हणून . आजोबांची ती एक अट होती . आजी सांगायची कि , आई बाबा ची जर टाळाटाळ होतीये असे लक्षात आले आणि आजोबांनी सांगितले कि , मी आधी म्हणत होतो तेव्हा गेला नाही आणि आता , मुलगा लहान आहे , मग त्याची शाळा असेल हे आयुष्य बहर सुरूच राहील . दवाखाना आणि आकाश ला आम्ही सांभाळू वर्ष दीड वर्षे . तुम्ही जावून या. तशी आकाशाला आजी आजोबांची सवय होतीच आणि अधून मधून ते इकडे येणार किंवा आजी आजोबा तिकडे जाणार आकाश ला घेवून असे ठरले . काका पण खूप लाड करायचा आपले , आपण तिकडे जायचो तेव्हा . आकाश ला आठवले कि साधार १ वर्षे आणि ३ एक महिने झाले आणि आई बाबा आले . आणि त्यांच्या सोबत एक छोटी , गोड बाहुली सुद्धा आली . माझी इरा , मला किती आनंद झाला होता न तेव्हा . घरात पण खूप दिवसांनी सगळे खुश होते . कारण त्या आधी , आजी आजोबा मधेच खूप शांत शांत असायचे . नंतर मोठा झाल्या वर कळले कि अवि काका हे जग सोडून गेला त्याचे हे दु:ख होते . किती लवकर जातो काळ , आणि आता काही दिवसात इराचे लग्न आहे .
आकाश घरात आला , घर सगळे तसाच होते , त्याची रूम पण . इरा ५ वर्ष पूर्वी दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट झाली ती तिथेच राहिली , जणू तिने आपल्या साठी केलेला हा पहिला त्याग किंवा आपल्याला दिलेली भेट .
"आई दादू आला ग "- इराच्या आवाजात कमालीचा आनंद ओसंडून वाहत होता . तिने आल्या बरोबर त्याचा आणि सामानाचा ताबा घेतला . घर एकंदरीत नॉर्मल वातावरण होते . आकाश येणार याची कल्पना असल्यामुळे असेल कदाचित . खूप दिवसांनी त्याला शांत झोप लागली , कसलीच स्वप्ने किंवा भास न होता . शेवटी आपले घर ते आपले घर , असे वाटलाच त्याला
लग्न घरातले दिवस भरभर जात होते , आकाश आल्यामुळे नूरच पालटला होता . सगळी सूत्रे त्याच्या कडे होती आणि आई बाबा थोडे निश्चिंत झाले . इराच्या एक हट्टामुळे हे घर परत एकत्र आले होते . इरा तिच्या मैत्रिणी सोबत बाहेर गेली होती , बाबा दवाखान्यात . बाकी सगळे पाहुणे इकडे तिकडे फिरायला गेले होते कारण आज तसा कोणताच कार्यक्रम नव्हता . आई आणि आकाश दोघेच होते
"आकाश , तुला बरे वाटतय न रे इथे , म्हणजे राहायला ।"
"हो ग , आपल्या घर सारखे सुख नाही बघ जगात , माझे तर सगळे आयुष्याच या घरात गेलाय . मला छान वाटतय "
"एक विचारू "
"मी परत येण्या बद्दल , काय ठरवलंय असाच न "
"हो "
" आता काहीच ठरवले नाहीये , येयीन हि कदाचित . पण जे काम हातात घेतली ते पूर्ण करून किंवा त्याची पुढची सोय लावून यायला हवे न . आणि इकडे परत येवून …. तसा काही प्रोब्लेम नाहीये . माझे काही जुने सहकारी होते , तुला आठवतील बघ , सानिका , सुमित , कुमार वगैरे , त्यांनी स्वतचा युनिट सुरु केलाय . मला पण बोलवत आहेत , रिसर्च च काम आहे , माझ्या आवडीचे "
"मग तू काय ठरवले आहेस "
"अजून काहीच नाही , पण विचार करेन इतकाच सांगतो "
"आकाश , जे झाले ते विसरून जा . सगळी कटुता , समज गैर समज मागे टाकले तरच आपण पुढे जावू शकतो "
"विसरेन कि नाही सांगता येत नाही , पण कटुता नक्कीच नाहीये ग आता . पण तुम्ही इराला काही नाही सांगितले आहे न , मागचे . "
"नाही बाळा , तिला हे कधीच कळणार नाही , आमच्या कडून तरी . खर तर तिला माहितीये , अगदी निमिष आणि त्याचा आई बाबा ना पण . "
"पण इरा ला नाही सांगायचे कुणीच "
लग्नाला फक्त ३ च दिवस राहिले होते आता , आणि आकशा अजून एखादा आठवडा च होता इथे . मनावरचे ओझे खूप कमी झाले होते , सगळ्यांच्याच . जे काही घडते ते नियातीमुळेच .
भविष्य काळात काय होते हे आपल्याला काळात नाही आणि भूतकाळ आपण डावलू शकत नाही हेच खरे , आणि वर्तमानात काळात , भविष्याची हुरहूर आणि भूतकाळाची सावली असतेच कि सोबत
अनु आली आपल्या आयुष्यात , पण बराच काही शिकवून गेली . तिच्या मुळे खूप गोष्टींचा उलगडा झाला मला, माझ्याच मनात असलेल्या प्रश्नाचा . व्यसनी महाभारत लिहिले आहे असे कि आपल्या सगळ्यान मध्ये त्याच्या प्रत्येक पात्रातले काही तरी गुण दोष आढळतोच . सगळेच कधी तरी अर्जुन असतात , कृष्ण मिळाला आपला , तर पेच सुटतो , मला तेव्हा मिळाला माझा कृष्ण आणि आता …. जर नाही मिळाला तर …… असे आकाश ला वाटले . कदाचित आई , बाबा , तो सगळेच आपापला कृष्ण शोधत होते आणि इरा …. ती कदाचित या सगळ्यात नव्हतीच मुळी …।
भाग आठवा
आकाश , आणि त्याचे मन त्याच्या नावा इतकाच मोठे होते . म्हणूनच त्याला सगळ्या गोष्टींचा त्रास जास्त होत होता . आपल्या घरी राहायला आल्या पासून , त्याला एकी कडे बरे पण वाटत होते आणि दुसरी कडे भूतकाळ सतत डोळ्या समोरून जात होता . किती छोटे छोटे प्रसंग , आणि त्याचे किती वेगवेगळे अर्थ प्रत्येकाच्या दृष्टीने . त्याला उगचाच तो दिवस आठवला . इरा आणि आजी , कंटाळा आला म्हणून आठवडा भर , आजीच्या बहिणीकडे , म्हणेज आमच्या मावशी आज्जी कडे कडे गेल्या होत्या . तिला हि त्यांची सोबत हवीच होती . आकाश साधारण १४-१५ वर्षाचा असेल तेव्हाची गोष्ट . आई बाबा आणि तो असे तिघेच घरात होते . आई बाबा काही तरी बोलत होते , आकाश त्याच्या रूम मध्ये अभ्यास करत बसला होता ,, एकदम त्याला
इराचे नाव ऐकू आले आणि बाबा चा आवाज थोडा मोठा झाला , ते आई शी इतक्या मोठ्या आवाजात का बोलत आहेत असे त्याला वाटले , आई बाबांचे बोलणे असे ऐकू नये हे माहित असताना पण तो ऐकत होता
"हे शक्य नाहीये , म्हणजे अधून मधून सुट्टीला जाने इथ पर्यंत ठीक आहे . आणि ती आपल्या मुलांना कधी पण भेटू शकते , पण इरा साठी म्हणत असशील तर शक्यच नाही . तू स्वताच जें ठरवले होतास ते कसे विसरू शकतेस आणि आई , आणि आकाश ला तर अजिबात आवडणार पण नाही "- बाबा
"पण अरे मी कायमचे थोडी न म्हणतीये , १-२ वर्षाचा तर प्रश्न आहे . विनिताला पण गरज आहे बदलाची . आणि जवळच तर जायचे आहे "- आई
"नाही , नको . हा निर्णय माझ्या वर लादू नकोस प्लीज . विनीता काही गैर समज करून घेणारा नाही , मी बोलेन तिच्याशी , हवे तर आई पण बोलेल " -बाबा
"पण …."-आई
"मला वाटते , आपण इथच थाबु यात या विषय वर "- बाबा
आकशा ला चैन पडलाच नाही , विनीता मावशी , आई , इरा काय चाललाय नक्की . मी विचारतोच . त्यांना नाही आवडले तरी चालेल
"आई , बाबा , रागावू नका पण नक्की काय चाललाय . मला काहीसे कानावर पडत होते . इरा चा विषय होता म्हणून मी विचारतोय . "
"आकाश तू यात पडू नको , तसे हि तुझ्या बाबांनी हा विषय थांबवला आहे "
"आई , पण मला कळलाच पाहिजे , कारण मला आवडणार नाही असे बाबा म्हणाले ., म्हणजे जर हा विषय पुढे गेला असता तर माझ्या पर्यंत येणार होता , मला सांगा काय ते ,"
" तुझ्या बाबा न च विचार "
"ठीक आहे आकाश , मी सांगतो तुला . तस हि कधी न कधी सगळे बोलायला हवच होते , फक्त इतक्या लवकर नको असे मला वाट होते "
"असे काय आहे नक्की बाबा "
"ऐक , आकाश . तुला तर माहितीये कि विनीता चा किती जीव आहे तुमच्या वर ते ."
"हो , विनीता मावशी , सख्खी नसली तरी त्या पेक्षा जवळची आहे आपल्याला . आई इतकाच तिचे प्रेम आहे आमच्या वर. पण त्याचे काय आता "
"मावशी एक वर्ष भर पुण्याच्या बाहेर जायचे म्हणतीये , जवळच . म्हणजे सातारा इथे . तुला तर माहितीये तिचे सासर आहे ते आणि समीर काका तिकडे पण एक कारखाना सुरु करायचा म्हणतोय . तर ती म्हणत होती कि एक वर्ष भर आम्ही तिकडेच राहणार आहोत , ती पण तिथेच क्लिनिक सुरु करेल , एखाद्या वर्ष नंतर परत येतील . त्या दोघान पण बदलाची गरज आहे . पण ती तुम्हा दोघांना खूप मिस करेल असे म्हणत होती "
"त्यात काय मग , सातारा जवळच तर आहे , आम्ही सुट्टी दिवशी जाऊ कि भेटायला तिला . "
"अरे तेच तर आकाश , जवळ आहे म्हणूनच मी तुझ्या बाबाला म्हणत होते कि "- आई
"मी सांगतोय न त्याला , मला बोलू देत मग. विनीता म्हणाली कि तुअम्चय दोघा पैकी कुणी तरी एक जावू शकेल का तिच्या सोबत , शाळा वगैरे बघेल ती तिकडे "
"काय ? असे म्हणाली मावशी . पण खरच ती का जातीये तिकडे , समीर काका येवून जावून करू शकतोच कि . म्हणजे कळतंय मला कि तिला आम्ही सोबत असावासे वाटतय , पण कसे शक्य आहे ते आणि आई तू काय आई इरा ला पाठवणार होतीस का , कसे शक्य आहे , किती लहान आहे ती आणि मला नाही चालणार , मी बोलतो मावशी सोबत आणि इतकाच असेल न तर मी जातो "
"अरे आकाश , तुझी महत्वाची शाळेची वर्षे आहेत , इरा तशी लहान आहे अजून , एखादे वर्षे , अगदी नाही करमले तर २ महिन्यात परत येयील कि ती "
"नाही आई , शक्यच नाही .असे कसे तू म्हणू शकतेस . इरा ला सवय तरी आहे का ग , आपल्याला सोडून रहायची आणि आपल्याला तरी करमेल का ? मुळीच नाही , मी सांगून ठेवतोय आणि जायचे असेलच तर मीच जाईन . आणी मावशी सहज म्हणाली असेल तर तू इतके सिरीयासालि का घेतले आहेस . मावशी कधीच असे म्हणणार नाही . ती सहज बोलली असेल आणि तू मनावर घेतलेस . हा विचार काढून तक डोक्यातून आणि मावशी पण नाही जाणार मी आताच बोलतो तिच्या शी …"
"आकाश ,तू काही बोलणार नाहीयेस विनीता सोबत , फोन ठेव खाली . आणि माझ्या शी पण असे का बोलतो आहेस "
"काय चुकले माझे आई , तू मावशीला समजवायचे सोडून , मला आणि बाबाला समजावत आहेस "
"खरे म्हणतोय ग तो , मी बोलेन आकाश , विनीता सोबत . ती सहजच म्हणाली असेल "
"म्हणजे तुम्हा दोघांना असे वाटतंय कि मीच तयार झालाय इरा ला पाठवायला आणि तुम्हाला च काय ते विनीता बद्दल खात्री आणि इरा काय फक्त तुमची मुलगी आणि ह्याच बहिण आणि माझी कुणीच नाहीये का ?"
"आई , असे आम्ही म्हणलाय तरी का , तू उगाच विषय भलती कडे नेवू नकोस "
"आकाश , तू खूप बोलतोयेस . ठीक आहे हा विषय इथेच संपला . मी सांगेन विनीता ला काय असेल ते "- आई
"आई , तू एकटी का ? आपण सगळे बोलू न तिच्या शी . कदाचित ती सातार्याला जाण्याचा निर्णय बदलेल सुद्धा . पण इरा इथेच राहील आणि अगदी वाटले तर मी जैन मावशी सोबत "
"आकाश , तू कुठे हि जाणार नाहीयेस "- आई
"आई , इरा गेलेली चालेल आणि मी का नको "
"अरे कारण ९-१० वि महत्वाची वर्षे आहेत , म्हणून "- आई
"आकाश , इरा नाही जाणार बेटा , मी आतच विनीत शी बोलतो "- बाबा
बाबा आई चे काही न ऐकता मावशी सोबत फोन वर बोलले , पण त्यांच्या रूम मध्ये जावून . ते आले आणि न राहवूनच मी विचारले
"काय म्हणाली मावशी ?"
"काही नाही रे आकाश , ती म्हणाली मी सहजच विचारले . बोलता बोलता विषय निघाला म्हणून . आणि तसा हि त्यांचे पण अजून नक्की नाही , आणि ती म्हणाली कि मला माहितीये कि हे असे अवघड आहे इरा ला किंवा तुला चल म्हणणे . त्ये पेक्षा सुट्टीला तिकडे किंवा आम्ही पुण्यात राहिलो तर अधून मधून मुले येत राहू देत . नेहमी येतात तशी । मला वाटते विनीता चे पण अजून काही जायचे नक्की नाही आहे आणि माझे तिचे बोलणे झालाय आता. "
आकाश इतके ऐकून निघाला आणि तेवढ्यात आई अगदी हळू आवाजात जे पुटपुटली ते त्याला ऐकू गेले
"मी इराचे इतके करून पण तू मला आरोपीच्या पिंजऱ्या मध्ये उभे केलेस "
"असे काही नाहीये अग , मला महितोये कि इरा चे तू मुली सारखाच :- बाबा
"सारखाच म्हणजे मुलगीच आहे ती माझी "- ऐं
आकशा मागे वळला , आणि इतकाच म्हणाला मी ऐकले , आत मला सगळे पूर्ण सांगा . बाबा सांगायला तयार नव्हता , पण आई मात्र म्हणाली उगाच नंतर गैर समज नको , तो मोठा आहे आता. आकाश ऐकत होता पण त्याला खूप टेन्शन आले होते कि हे लोक काय सांगणार आहेत
आई सांगत होती आणि तो कानात प्राण आणून ऐकत होता
"आकाश , तुला इरा पहिल्यांदा या घरात आली ते आठवते "
"हो आई "
"मग ऐक , ती या घराची मुलगी आहे , पण तुझी सख्खी बहिण नाही ."
"म्हणजे ?"
"सांगते आकाश . त्या आधी एक दीड वर्षे आम्ही बाहेर होते . आणि अवि काका पण बाहेरच होता . आणि तो परत यायची शक्यता कमीच होता . अगदी निष्णात डॉक्टर होता तो . पण आम्ही इथली जबाबदारी घायला समर्थ आहे हे कळले तसा तो या सगळ्या पाशातून मुक्त झाला आणि जिथे गरज आहे त्याच ठिकाणी सेवा करायची असे त्याने ठरवले . त्याला खर तर संसार , मुले या पाशात अडकायचे नव्हते . तुझा जन्म झाला न तेव्हाच मला म्हणाला , कि हा माझा पण मुलगाच आहे कि , माझे बाप म्हणून जे काही प्रेम द्यायचे असेल ते याला देईन . "
"आई , ते सगळे खरय , म्हणजे मला तसे माहित नाही , पण अवि काका मला आठवतोय . मी खूप लहान होतो तरी सुद्धा . पण हे सगळे तू आता का ?"
"ऐक आकाश . तुला आठवत एकदा तू जुने फोटो पाहून म्हणाला होतास कि इराचे डोळे आणि अवि काकाचे डोळे सारखे वाटतात , म्हणजे त्यातले भाव सारखे वाटतात . वाटणारच न कारण … "
"कारण, म्हणजे तुला असे म्हणायचे आहे कि इरा अवि काकाची , आय मीन ती अवि काकाची मुलगी "
"पण आई कसे शक्य आहे , तू आताच तर म्हणलीस कि काका ला हे सगळे नको होते , मग इरा … आणि मला कसे नाही माहित आणि आज्जी ला , आणि आजोबाना ?"
"सांगते सगळे सांगते . आजी , आजोबाना माहित आहेच . तू लहान म्हणून तुला सांगितले नाही आणि तशी गरज पण वाटली नाही "
"हो आकाश , आम्हाला तुला सांगायची गरज वाटली नाही कारण इरा आपलीच आहे . आणि तुमचे इतके प्रेम बघून तर आम्हाला खूप आनंद वाटतो "- बाबा
"पण मग इअरचि आई ? तिला इरा नको होती "
" नाही नाही , तसे काहीच नाही दुर्दैवाने अवि काका आणि इराची आई दोघे पण या जगात राहिले नाहीत . इराच्या जन्म नंतर काही महिन्यातच ती गेली आणि अवि काकाला इरा ला साम्भायाला मदत म्हणून आम्ही त्याचे कडेच गेलो आणि इराचे लळा लागला आम्हाला . पण तरी अवि काका परत यायला तयार नव्हता आणि इरा ला पाठवायला सुद्धा . म्हणून थोडे दिवस आम्हीच राहलो आणि नंतर थोडे दिवस आजी आजोबा येणार असे ठरले होते "
"पण आई मला काही आठवत नाहीये कि , काका मला म्हणाला कि काकू आणलीये तुला किंवा बहिण आहे तुला "
"नाही राजा , तू लहान होतास आणि दुर्दैवाने तुझी काकू या घरात येवूच नाही शकली . कारण त्यांनी तिकडच लग्न केले आणि ते पण आजी चा आग्रह म्हणून . तुझी काकू सुधा काका सारखीच होती , तिला पण आपली रुग्ण सेवा दुर्गम भागात करायची होती , म्हणूनच ते दोघे कदाचित एकमेकांच्या प्रेमात पडले . आजी च्या लक्षात आले एकदा , ती तिकडे असताना , आजी म्हणाली लग्न करा मग , तुमचे ध्येय एकाच आहे तर संसार त्याच्या आड येणार नाही . आधी काका ला पटले नाही . आणि शेवटी लग्नाला एक मान्यता आहे , ती फक्त प्रेमाला नाही . तरी हि काका लगेच तयार झाला नाही . पण काय माहित , एकदा फोन केला आणि म्हणाला आजी आजोबाना कि लग्न करेन , पण इकडेच , अगदी सध्या पद्धतीने . काय झाले काय माहित , पण त्याने ठरवले . नंतर आम्हाला म्हणाला कि त्याला जेव्हा जाणवले कि संसार आपल्या कामाच्या आड नाही येणार तेव्हा ठरवले. आजी आजोबा गेले तिकडे , काकाचे लग्न झाले. काका काकू इअक्दे येणार आणि मग एक छोटी पार्टी करायचे असे ठरले खरे . एक दोन महिने असेच गेले . आपल्या काही जवळच्या नातेवाईक मंडळीना आजोबांनी पत्राने कळवले लग्न झाले म्हणून . पण काकू चा हे घर बघायचा योग आला नाही , तिला लगेचच दिवस गेले आणि प्रवास करणे शक्य नव्हते . खर तर तिने सगळाच अचानक घडले रे . पण काका म्हणाला इतक्यात कुणाला सांगू नका , कारण तिची परिस्थिती नाजूक आहे . म्हणून मग मी आणि बाबा तिकडेच गेलो , तशी पण आजोबांची अट पूर्ण करायची होती . इराच्या जन्म नंतर जेमतेम २ महिने जगली ती . तू इकडे त्यामुळे आजी आजोबा दोघे एकदम येवू शकत नव्हते . एकेकटे येवून भेटून गेले . "
"काकू गेली , पण मग काका ?"
"आम्ही तिथेच होतो आकाश आणि काका एके दिवशी जवळच्या गावातून येत असताना , त्याच्या कार चा भीषण अपघात झाला ."- आईचा गळा दाटून आला . आणि साहजिकच होते काका फक्त तिचा दीर नव्हता तर तिचा मित्र हितचिंतक आणि godfather होता .
" फार काही आशा नव्हती . तरी आमचे प्रयत्न सुरु होते . शुद्धीत आला , तेव्हा वाटले कि सुटलो , हा परत आला . "- बाबा
"हो रे आकाश , आम्ही दोघे पण तसे फार काही मोठे नव्हतो , वयाने . एक आई विना छोटे बाळ आणि तुझा अवि काका असा मरणाच्या दारात . पण फार धीराचा तो . कदाचित आम्हाला शेवटचे भेटायचे याच इच्छा शक्तीने तो शुद्धीवर आला , काही तासच . मला आणि तुझ्या बाबाला बोलावून घेतले आणि म्हणाल संसारात पडलो हे ठीक होते , पण या पोरी साठी वाईट वाटते , आई पण गेली आणि आता मी . पण तुम्ही आहात , माझी हि आठवण तुम्ही जपा . मला माहितीये कि तुम्ही आई वडिलांचे प्रेम द्यायाल . आकाश मला काही सुचत नव्हते रे . तुअल काय वाटले काय माहित , मला म्हणाला तू आई चे प्रेम देशील ग , पण आकाश हिला बहिणीचे प्रेम देईल का ग ? चुलत म्हणाले न कि उगाच महाभारत आठवते ग आणि कधी कधी वाटते तुम्ही किती पण केले तरी आई बापा विना पोर म्हणून तिला केवळ सह्नुभित मिळेल का ग लोक कडून . तसे नको ग व्हायला . मला काय वाटले माहित नाही आकाश पण मी अवि दादाला म्हणाले कि माझीच मुलगी असेल हि . पण तुला चालेल का कि तुझी नाही तर माझी मुलगी म्हणून जिला जग ओळखेल , तुझे अस्तित्व हिरावून कसे घेवू आम्ही . तुझा काका मला म्हणाला कि शक्य असेल तर आम्ही अवीची म्हणून नाही तर आमची म्हणूच इरा ला इकडे आणावे , त्याचे नाही तर आमचे नाव लावून . नाही म्हण्याचे प्रश्नच नव्हता . म्हणजे आम्ही जरी तिला अविदादा चे नाव लावले असते तरी तेवढच प्रेम दिले असते . पण अवि दादाची इच्छा आम्ही पूर्ण केली "
"आई , बाबा … हे इराला ?"
"तिला कसे माहित असेल , जर आम्ही तुला सुद्धा नाही सांगितले . पण आकाश हे तुला आता माहितीये तर "
"खरे सांगू आई , धक्का बसलाय . पण मला इरा बद्दल जे वाटतंय ते तसाच आहे . कारण मला ती माझी बहिण आहे हे च सत्य माहितीये आणि मला तेच स्वीकारायचे . पण आई एक विचारू ?"
"विचार कि "
"मी विसरू शकेन कि इरा सख्खी नाहीये , पण तू कधी हे विसरू शकशील ?"
"आकाश , तू काय बोलतो आहेस हे , मी इराचे तितकाच केलेय जितके तुझे , किंवा त्या पेक्षा जास्त काळजी आहे मला तिची "
"हो आई , काळजी आहे माझ्या पेक्षा जास्त . पण मला असे वाटते कि काळजी जास्त आहे इराची जबाबदारी म्हणून . अवि काकाच्या ओझ्या खाली , पण प्रेमाचे काय? "
"आकाश , मला हे अजिबात आवडले नाहीये तुझे असे बोलणे . इरा बद्दल मला काहीच वाटत नाही असे का वाटतय तुला . खरे सांगू तुझ्या नंतर इरा आली आणि आम्ही भेद जोवू नये म्हणून तुझ्या नंतर इराचा विचार केला आणि नंतर कधी तुझ्या साठी भावंडाचा विचार सुद्धा नाही केला आणि तूं … मला दुखावले आहेस तू आकाश "
"आई असे नाहीये , बाबा तू पण ऐक . मी असे नाही म्हणत आहे कि तुम्ही सावत्र पणा करताय पण कधी कधी असे जाणवतंय . म्हणजे आई मला हक्काने ओरडते तशी इरा ला नाही. म्हणजे ती इरेराचे काही कमी करत नाही , पण त्या करण्यात कधी कधी असे वाटत कि आई टेन्शन मध्ये आहे . जणू चांगली आई होण्याचे बर्डन आहे तिच्या वर . आई च्या काही काही वागण्याचा संदर्भ आता लागतोय मला . ती त्या जबबदारी खाली आदर्श आई होते हि , पण तरी "आई" नाही वाटत . "
"आकाश , इरा तुला असे म्हणाली ?"- बाबा
"नाही बाबा . उलट तिला असे च वाटतय कि ती आईची आणि तुझी जास्त लाडकी आहे . बाबा आई सारखे तुला पण टेन्शन आहे का ?"
"माहित नाही आकाश , मी इतका विचार नाहीच करत , पण एक आहे कि तिला पहिले कि कधी कधी जीव गलबलतो , अवीची आठवण येते , आणि असे वाटते कि चुकून या भरात इरा ला सत्य समजणार तर नाही न "
"आई , बाबा , आपण हे इराला कधीच नाही सांगायचे . तसे हि अवि काका तिला आठवत पण नाहीये . तू खूप खुश आहे या आयुष्यात आणि तिला या घरात सगळे तेच मिळेल जे तिला मिळायला हवे "
"आकाश , तू पण हे विसरून जा आणि खरच मी इराला मुलगीच मानते , विश्वास ठेव " आई
आई बाबा आणि आकाश काही वेळ नुसते बसून होते . आकाश म्हणाला बाहेर जावून येतो , तो बाहेर पडला पण खूप अस्वस्थ वाटत होते त्याला , इरा अवि काकाची मुलगी . त्याला आणखीनच भरून आले , अवि काका त्याला आठवत होता आणि इराची आता खूप आठवण येत होती . कधी एकदा इरा भेतातीय असे त्याला झाले होते . पण त्याला एक वाक्य खटकले होते आईची "मुलगी मानते ", मानते म्हणजे ? मानायचे म्हणजे ती मुलगीच आहे न तिची . आई चे वागणे वाईट नाहीये , पण तरी पण चुकून कधी आपल्या बद्दल जे वाटते ते इरा बद्दल नंतर वाटेल का ? अर्थात आई नि इरा साठी खूप केलाय आणि करतीये ती आणि तिने सुद्धा अजून एका मुलाचा मोह टाळला आहेच कि . काही काळात नाहीये , उलट सुलट विचार . तो निमिष कडे गेला , पण निमिष हि भेटला नाही . त्याला काय वाटले काय माहित तो सरळ विनीता मावशी कडे गेला .
"अरे आकाश , या वेळी इथे ?"
"मावशी थोडा वेळ बसतो तुझ्या कडे ?"
"का रे बरे नाही वाटत आहे का ?
"नाही ग "
"मला माहितीये आकाश , तुझ्या आई चा आता फोन आला होता . तिला तुझी काळजी वाटतीय "
"मावशी , तुला सगळे माहितीये "
"हो , मला आधी पासूनच माहितीये . अवि दादा तर मला पण जवळचा होते आणि माझ्या साठी इरा आणि तू दोघे हि सख्खी भावंडेच आहात "
"मावशी , तू शिफ्ट होणार आहेस का ग खरच . नको न ग जावू "
"ठरले नाही रे राजा , पण नाही जाणणार हा काळजी नको करू . मी आहे "
"मावशी , आई इरा ला तुझ्या सोबत पाठवणार होती न "
"अरे असे काही नाही , आणि मी सहज म्हणाले रे "
"पण , आई नि इराचे नाव का घेतले . का तुम्हा दोघींना पण ती आई विना पोर म्हणून कणव वाटतीय , प्रेम नाही "
"आकाश , असे काही नाहीये राजा . माझ्या तर मनात असे काही नाही "
"आणि आईच्या? "
"राजा , एक सांगू तिच्या पण मनात तसे काही नाही . तिचे इरा वर खूप प्रेम आहे , पण इरा अवीची मुलगी आहे हि ती नाही विसरू शकत आणि म्हणून जास्त जबादारीचे ओझे वाटते तिला कि कुणी असे म्हणून म्हणजे तुझे बाबा , आजी आजोबा यांनी कि ती कमी पडली किंवा असे काही . पण तुला सत्य स्वीकारणे सोपे आहे , तुला एकेच बहिण आहे , लहान पानापासून तुझे मन तिच्या वर बहिणी प्रमाणे प्रेम करताय . पण आपले मुल नसताना ते आपले म्हणून स्वीकारणे अवघड आहे . मी असे नाही म्हणत कि तुझ्या मनात ज्या शंका आहेत त्या चुकीच्या आहेत . तुझी आई माझी मैत्रीण आहे म्हणून मी सांगते कि ती इरावर प्रेम करेल , माया करेल आणि तिला तिचा हक्क पण देईल , पण त्याच वेळा हे पण सांगते कि कधी कधी ती हे नाही विसरू शकत कि तू तिचा मुलगा आहेस आणि इरा अविची मुलगी . हे सगळ खूप अवघड आहे बाळा , नात्यांचा हा गुंता , मनाचा गोंधळ . "
"मावशी , काका म्हनला म्हणून आई नि त्याचे नाव नाही लावला का ग इराला ?"
"हो आकाश , तुझा काका खूप हुशार आणि दूरदर्शी होता , जरी तुझे आई बाबा इराला प्रेम देतील हे माहित असले तरी , इरा ला पण ते काका काकू आहेत हे कळेल तर ती त्यांच्याशी कशी वागेल असे हि वाटले त्याला . तुम्हा मुल पण कदाचित मोठे झाल्यावर कसे वागाल , एकमेकांशी कसे नाते संबध ठेवाल असे वाटले त्याला . ज्या कारणाने मुळात भांडणे होतील तेच अवि दादांनी टाळले. तू लहान आहेस अजून , पुढे दुनिया दारी मध्ये काय काय अनुभव येतात अरे . सख्खे काय आणि चुलत काय "
"मावशी , मला कळातच नही ग , म्हणजे मला भीती वाटतीये कि मी कधी चुकून इरा शी , तिला कळेल असे वागणार नाही न , मला स्वताची आणि तिची खूप काळजी वाटतीये "
"आकाश , मी एक सांगू . विचार नको करू . फक्त एक कर , इराचा भाऊ आणि मित्र आहेस न , मग तसाच राहा . जस्ट बी हर ब्रदर , लव हर ."
"मावशी , किती सोपे केलेस ग तू हे :)"
आकाश नि ठरवले कि मी इराचा भाऊ , मित्र आणि …आणि मी आज पासून तिचं साठी अवि काका सुधा होईन . इरा आणि आजी परत आल्या , इरली काही कळले नाही आणि कळणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेतली . एक दिवस मात्र , आकाश आजी जवळ खूप रडला , आजी ला त्याने सांगितले कि तो आयुष्यात इरा ला कधीच अंतर देणार नाही , तिचे सगळे त्याच मायेने करेन जे त्याने भाऊ म्हणून करायला हवे आणि तितकच लाड करेन जे अवि काकांनी केले असते . आजी त्याला इतकाच म्हणाली कि आकाश तू हे तर करच , पण तुझ्या आई ला समजून घे ती मनानी मोठी आहे पण शेवटी माणूस आहे , कधी कधी आपल्या मुलाचा मोह पडला तर , तिला समजून घे आणि जाणीव करून दे तिला लगेच समजेल . तिचे पण इरा वर खूप प्रेम आहे
आकाश वर्तमानात आला , आणि त्याला क्षणभर असे वाटले कि मधली सगळी वर्षे गळून पडली आहेत . खरी गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे , निमिष च्या घरी पण . कधी तरी नंतर चुकून समजलाच तर गैरसमज नकोत म्हणून हि काळजी घेतली होती आई बाबा नि , पण हे चांगलाच झाले . हाच विचार करून आजीने अनु आणि तिच्या घरी सांगितले , पण तेव्हा मात्र आमचे अंदाज चुकले . अर्थात बराच झाले म्हणा , लग्ना आधीच काय होते ते स्पष्ट झाले होते
फोन च्या रिंग नि आकाश ची विचार शृंखला तुटली
"हेलो , मी निमिष बोलतोय "
"हा बोल रे , काय विशेष ? कुणासाठी फोन केला आहेस नक्की "
"अरे , काही नाही सहजच . खर तर तुझ्या साठीच . तू लग्न झाल्यावर २-३ दिवसात खरच परत जाणारेस ?"
"बातमी पोचली का तुझ्या पर्यंत , हो जाणारे म्हणजे सध्या तरी जायला हवे , बघू मग काय ठरतंय ते "
"मला वाटतंय मित्रा कि आता परत ये, खरच . आम्हाला सगळ्यांना तू इथे हवा आहेस अरे कमीत कमी मी इरा ची काळजी घेतो कि नाही वॉच ठेवायला तरी ये "
" नक्की , विचार करेन. झाली का तयारी सगळी "
"सुरु आहे रे हळू हळू . तू बारा आहेस न "
"हो "
"बर मग ठेवतो "
"चालेल "
निमिष नि जसे समजून घेतले तसे अनु का नाही समजून घेवू शकली , एकाच सत्यावर वर माणसे किती वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होतात , विचार करतात . अनुला कळले मात्र कि इरा चुलत बहिण आहे , तिचा दृष्टी कोनच बदलला . जे काही आहे ते आपलाच आहे , तसाही तिला हॉस्पिटल मध्ये कुणी तिच्या पेक्षा वरचढ नकोच होते , अधिकाराने आणि कर्तृत्वाने सुद्धा आणि जेव्हा तिच्या लक्षात आले कि , इरा ला आम्ही इतक्या केले तेव्हा तर तिने आई ला हेच पटवून दिले कि जे तुम्ही केले ते फारच काही तरी दिव्य आहे आणि जणू इरा वर उपकारच केले आहेत .
त्याला त्याचे आणि अनुचे शेवटचे बोलणे आठवले
"आकाश , तुझे मला पटत नाहीये , तू खरच परदेशी जाणार आहेस "
"हो , १ वर्षभर तर जावे लागेल "
"पण , मग मी काय करू इथे ?"
"तू , हॉस्पिटल सांभाळ न , नाही तर चाल माझ्या सोबत , एक वर्ष पण नाही , ६ महिन्याचा प्रश्न आहे "
"मला नाही जमणार , दोन्ही इथे तुला सोडून राहणे किंवा तुझ्या सोबत येणे "
"का ग ? तुला भीती वाटतीय का ?"
"कसली भीती ?"
"हेच कि तुझे इथले महत्व कमी होईल "
"म्हणजे ?"
"अनु मशुअ सगळे लक्षात येतेय . इरा माझी सख्खी बहिण तर आहेच पण एक सांगतो हे सगळे तीचेच आहे . तुला काय माहित ग आमच्या घराबद्दल "
"मी असे काही कधीच म्ह्नाले नाहीये "
"मी ऐकले आहे , तुझे आणि आईचे बोलणे आणि मगच बोलतोय . तू का आई ला हे पटवून देतीयेस कि इरा आज न उद्या या घरातुन लग्न होवून जाणार आहे , आणि हि हक्काची भाषा नव्हती आमच्या मनात . तुअल बरोबर कळले कि आई ला तू पटवू शकतेस "
"हे बघ आकाश , मी काय इरा ला घराबाहेर काढा असे नाही म्हणाले , पण शेवटी जे काय मिळवले आहे ते तुझ्या आई बाबांनी च न . आणि इरा बद्दल सगळी कर्त्य्व्ये करत आहेत कि ते . जर मला तुला तुझे मिलावसे वाटले तर काय चुकीचे आहे , आणि समज तू डॉक्टर झाला असतास तर . आणि तसे हि इरा म्हणत्ये न कि ती हॉस्पिटल मध्ये काम करेल नाही तर बाहेर सुद्धा जाईल एखादे वेळेस . तू उगाच गैर समाज करून घेतला आहेस . आणि तसे पण इरा अजून शिकतीये . ती आई वडील नसून सुद्धा तिला कुटुंब मिळाले आहे . तू उलट तुझ्या आईचे आभार मानायला हवे आहेस "
"अनु , जास्त बोलातीयेस . तुला काय माहित ग , अवि काका बद्दल आणि आमच्या घराबद्दल . हे जे तुला सासू ग्रेट वाटतीय न , ती आज डॉक्टर आहे कारण अवि काका होता , तो होता म्हणून तिचे माझ्या बाबाशी लग्न झाले आणि माझ्या आजी आजोबा नि उभे केलेला हा डोलारा अवि काकांनी नवा रुपाला आणला त्याच्या सुरवातीच्या काळात . आई बाबा जो पर्यंत सक्षम होत नाहीत तो पर्यंत सगळे सेट करून ठेवले त्याने इथे आणि मग कसलाही मोह न ठेवता तो निघून गेला . त्याने इरा ला पण आई कडे त्याच विश्वासाने दिले, स्वताचे नाव मागे ठेवण्याचा मोह पण ठेवला नाही ग त्याने . त्याला हेच नको होते , कि इरा कडे कुणी असे पाहावे . त्याला माझ्या आई बद्दल खात्री होती , पण आम्ही मुले मोठी झाल्यावर कशी वागू या विचाराने त्याने हा मोह टाळला . आणि ऐक माझ्या आई ने जे केले ते फक्त कर्त्यव्य म्हणून नाही . आणि इरा पण अवि काकाची मुलगी आहे हि तिने नकळत दाखवून दिले , माझ्या प्रेम खातर तिने तू म्हणशील ते ऐकले , कसलाच मोह न ठेवता . रूम शिफ्ट केली , तुला जे जे आवडेल ते देवून टाकले . तिने तुला आपले मानले आणि तू ?"
"आकाश , मला आरोपी करू नकोस , मी बाहेरची आहे म्हणून आरोपि. मग हेच प्रश्न तुझ्या आई ला विचार कि जे मला विचारात आहेस . त्यांना का पटत होते मग माझे आणि इराचे काय , तिला जेव्हा कळेल तेव्हा ती मागेल्च कि
हक्क , बघू तेव्हा पण ती तुझ्या वर इतकाच प्रेम करते का आणि सोडून देईल का तिचा हक्क तुझ्या साठी "
"अनु , तू असा इतका कडवट विचार करत असह्सील असे मला वाटत नव्हते . म्हणजे आपण सुखात राहावे , यशस्वी असे प्रत्येकाला वाटते , आणि तसे होईल इतके आहे आपल्या कडे , पैसा , बुद्धी आणि संधी सुद्धा . आणि स्पष्टच सांगतो , माझ्या आई ला जेव्हा आरोपीच्या पिंजर्यात उभे करायचे हे माहितीये मला , तू सांगायची गरज नाहीये . हो एखादे वेळी तिला तुझे पटले पण असेल , पण इरा २ महीन्याची असल्या पासून सगळे केलेय तिने इराचे आणि इरा साठी स्वताच्या अजून एका मुलाचा मोह टाळला आहे तिने , कमीत कमी तो एक मोठा त्याग आहे तिच्या नावावर , ज्या साठी मी तिला हजार वेळा माफ करेन , कळले . तू हे सगळे डोक्या तून काढून टाक . आपण एक वर्षभर बाहेर जावून येवू किमान सहा महिने , सगळे ठीक होईल मग "
"आकाश , एक मिनिट . एक तर माझे काही चुकले आहे असे मला नाही वाटत . अगदी वेळ आली तर इरा ला तिची वाटणी मिळेलच कि , तू का घाबरतोस . आणि तिला कळेल न तेव्हा तीच मागेल बघ "
"अनु , आता शेवटचे ऐक , जे काही आहे ते तिच्या बाबाचे म्हणजे अवि काकाचे च आहे , उलट तो काही न घेत गेला , त्यांनीच माझ्या आई बाबाला , विशेषत: आई ला दिलाय सगळे जे त्याचे आणि नंतर इराचे आहे . माझाच काही नाहीये त्यात , कळले . आणि एक इरा ला हे कुणी हि सांगणार नाहीये कधीच , आमच ठरले आहे तसे , सगळ्यांचे "
"तुमचे ठरलाय न , मी माहिये त्यात . अनु मला असे वाटते कि लगेच असे नाही , पण कधी तरी इरा ला सत्य कळायलाच हवे . तिला पण कळू दे कि ते , तिला असे न सांगणे हा तिच्या वर आणि तिच्या आई वडिलांवर अन्याय आहे "
"अनु , तू न्याय आणि अन्यायाची भाषा नको करूस . हे तू तिला सांगणार नाहीयेस . कधीच . आणि जर तू हे करणार असशील , आणि तुझ्या डोक्यातून हे सारे जाणार नसेल तर …।"
"तर काय , आकाश , आणि मी तुला सांगतीय कि माझे काय इरा शी वैर नाहीये , पण सत्य कडे पाठ जागल तुम्ही लोक , आणि एक तू कुठे हि जाणार नाहीयेस , आपण इथेच राहतोय , तुझे परदेशी जाणार तू डोक्यातून काढून तक "
"इरा माझी बहिण आहे आणि हेच सत्य आहे , त्य्झासाठी नसले तरी , मी राहीन ते च सत्य स्वीकारून आयुष्य भर , आणि ते पण आनंदात . आणि आपण जातोय कमीत कमी ६ महिने तरी आणि मला वाचन दे कि तू इरा ला कधीच काही सांगणार नाहीस "
"वचन वगैरे काय , कोणत्या जमान्यात जगता रे तुम्ही लोक , उद्या काय प्रसंग येतील काय माहित . कमीत कमी तिचे लग्न होईल तेव्हा तिच्या होणाऱ्या साथीदाराला तरी सांगणार न तुम्ही , मला सांगितले तसे , हे सत्य . मग तेव्हा तर तिला कळेलच कि , मग या वचनाचा काय उपयोग . आणि लक्षात ठेव तिला जर कुणाकडून कळले किंवा तेव्हा कळले न तर तिला वाटेल तू तिचा विश्वास घात केलाय , आणि ती बघ तुझा राग राग करेल "
"अनु , तू काहीही उगाच माझ्या मनात भरवू नकोस, हे बघ तुला माझे म्हणणे मान्य आहे कि नाही तेवढे संग ते सांग :
"नाही मान्य आहे , दोन्ही म्हणणे , इरा ला आज न उद्या सत्य सांगावे लागेलच आणि वेळ आली तर मीच सांगेन आणि दुसरे म्हणजे मला परदेशी नाही यायचे आहे , तू मी तुला जावू देईन "
"ठीक आहे तर , मग हेच जर तुझे ठरले असेल तर , आपले झालेले बरे "
"आकाश , हे काय बोलतोयस तू , पंधरा वीस दिअव्स वर लग्न आहे आपले आणि तू ,… "
"माझ्या समोर तू दुसरा काही पर्याय ठेवला नाहीयेस "
"मी ठेवला नाहीये ?, आकाश तूच जागा हो , ज्या इरा साठी तू मला नाही म्हणतोयेस न , तीच एक दिवस तुझ्या कडे पाठ फिरवेल कि नाही बघ , खरे कळल्यावर . अरे सख्खी भावंडे जिथे आपापल्या संसारात अडकल्यावर , एकमेकांना नकळत पाठ फिरवतात तिथे बाकीच्यांचं काय ?"
" अनु , भविष्यात नशिबाने काय वाढून ठेवले आहे मला नाही माहित , पण आज काय करायचे तेच फक्त माझ्या हातात आहे . आणि आता मला नाही वाटत कि आपण एकत्र राहू शकू , माया आणि तुझ्या विचारातच फरक आहे . कदाचित तू तुझ्या जागी बरोबर असशील हि , पण मी नाही अश्या विचारण सोबत राहू शकत . "
"आकाश अ, तू आहेस मला , मी तुला आणि मुख्य म्हणजे इअर ला कधीच माफ नाही करणार . तुम्ही काय स्वताला जागा वेगळे समजता का रे ? तुमचे ते प्रेम आणि आम्ही काय ? मी पण प्रेम केलेच तुझ्या वर पण , तुला कळलच नाही "
"अनु , आम्ही जगावेगळे नसू हि पण कदाचित , पण आमच्यात हे ऋणानुबंध नियतीनी जोडले आहेत , मला जेव्हा काही माहित नव्हते न तेव्हा पासूनच मी आणि इरा इतके जवळ आहोत , आमचे नाते आमच्या पुरते आहे आणि ते कुणी समजावून घेतले नाही तरी चालेल , पण कमीत कमी त्याचा आदर करावा इतकीच माझी अपेक्षा होती . आणि प्रेमाचे म्हणशील तर तू केले असशील माझ्या वर प्रेम , मी नाकारत नाही . मी स्वीकारले पण होते . पण तू जर माझ्या इरा बद्दलच्या भवनाचा आदर केला असतास तर कदाचित मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार . जावू दे , आपण हे जुळवू नाही शकत आता , मला माफ कर , आपण इथेच थांबू . आणि एक कारण विचारले तर हेच माझ्या परदेशी जाण्याचे सांगू , जर माझ्यावर प्रेम केले असशील तर इतक ऐक माझे . प्लीज "
"ठीक आहे आकाश , तू तुझ्या घरी आणि माझ्या घरी पण तूच सांग . पण एक सांगू आयुष्य असे एका नाट्य साठी कधीच थांबू शकत नाही . माझे पण नाही आणि तुझे पण आणि इराचे पण . एकटे जगणे अवघड आहे , तू एकटा पडशील आज न उद्या "
"अनु , प्लीज . "
अनु निघून गेली नि आकशा एकटाच मागे राहिला , आपण हे असे करायचे ठरवून आले नव्हतो . अनु ला केवळ होता . दोघानीच काही दिवस परदेशी राहणे , तिला आवडेल असे वाटले होते आणि त्यामुळे सगळे व्यवस्थित होईल असे वाटले होते , पण काही तरी भलतेच झाले . आता हे सगळ्यांना सांगयचे म्हणजे आणि इरा ला काय सांगू , तिला तर धक्काच बसेल . आई बाबा तरी समजावून घेतील का
आकाश घरी आला तर , घरी आधीच बातमी लागली होती , अनुच फोन येवून गेला होता .
"आकाश , आम्हाला तुझ्या सोबत बोलायचे आहे . इरा बेटा तू थोडा वेळ विनीता कडे जा "
"आई , पण मला एकदा दादू शी बोलू दे न ग "
"बरे ठीक आहे , तू बोल त्याचाशी अन जा मग . "
"म थाबते न ग आई , प्लीज "
"इरा , तू थाब्लीस तर हरकत नाही , पण तू अजून लहान आहेस बेटा "
"ठीक आहे आई , पण दादू काही चुकीचे करणार नाही ग , त्याचे ऐकून तरी घे "
"इरा , आम्ही शांत पणे बोलू "
"दादू , तू खरेच परदेशी जातोयेस का रे ? जाने गरजेचे आहे का ? नंतर जा न ? लग्न करून काही दिवसांनी . नाही तर काही वर्षांनी जा . अनु खूप गोड मुलगी आहे रे , ती आणि तू मस्त आहात आणि आई ला पण ती किती आवडते न आणि मला पण "
"इरा , राजा तू काळजी नको करू . बघू काय होते ते . आणि माझ्या वर विश्वास ठेव ग तू , जे काही होईल त्यात आपले सगळ्यांचे भले आहे "- आकाश
"माझा विश्वास आहे रे तुझ्या वर , तू चुकीचे काहीच करणार नाहीस . मी जाते , पण मी परत येयीन तेव्हा सगळे आनंदी झालेले असू दे . मला फोन करा "
"इरा, निघ तू , मी फोने करते तुला "- आई
इरा गेली आणि आकाश अजूनच एकटाच पडला
"आकाश , हा काय वेडेपणा आहे "- आई
"वेडेपणा काय आहे त्यात अ, हे बघ मी काय असे ठरवून गेलेओ नव्हतो . पण तिचे बोलणच असे काही होते कि माझ्या समोर दुसरा पर्याय नव्हता "
"आकाश , अरे फक्त काही दिवसांवर लग्न आहे आणि आता तू म्हणतोयेस कि , त्या लोकांचा तरी विचार कर :- बाबा
"बाबा , एक विचारू तुला , अनु वर विश्वास आहे आणि माझ्यावर नाही"
"असे नाहीये आकाश , पण तुमचे वायाच असे काही , माणूस टोकाचा विचार करतो एकदम . तू काय किंवा अनु काय . आम्ही मोठ्या माणसांनी मध्ये पडायला हवे न . इतके महत्वाचे निर्णय तुम्ही आपापले घेवून कसे चालेल "
"आई , एक वेळ मी परदेशी नाही जाणार , पण अनु नि इरा ला काही सांगायचे नाही असा शब्द तर दिलाच नाही पण उलट तिला सांगणे गरजेचे आहे हे मला पटवून देत होती , ती कधी तरी इरा ला सांगेल या दडपण खाली खाली मला आयुष्य भर जगायचे नाहीये . अनु वाईट नाहीये , पण महत्व कांक्षी तर नक्कीच आहे , तिला जे हवे आहे ते मिळवण्या साठी ती गोष्टीचा उपयोग जर आयुष्य भर करत राहील , तर आमचे नाते फुलेल का ? त्यातून केवळ आनंद मिळेल का आई ? तूच सांग ?"
"अरे असे काही नाहीये, अरे या वयात असे वाटते , आपल्याला सगळे यश , पैसा , प्रसिद्धी , मन सगळे मिळावे म्हणून . हळू हळू आपण मोठे होते आणि बदल होतात "
"मान्य आहे आहे कि माणूस वय वाढेल तसा ,बदलतो पण तरी त्याचे मुल स्वभाव नाही बदलत आणि मुख्य म्हणेज मी तिला म्हणताच नाहीये कि माझ्या इतके प्रेम तिने इरा वर करावे . फक्त माझ्या भावनांचा आदर करावा . मला असे वाटले होते कि आम्ही थोडा काळ जर बाजूल अराहू , तर आमचे नाते रुजेल आणि तिच्या मनातले हे सगळे जर बाजूला पडेल . पण तिला काही मान्यच नाहीये . बर इथेच राहायचे म्हंटले , तर तिच्या आजच्या बोलण्यावरून इरा ला कधी कधी तिच्या वागण्यातून काही तरी जाणवेल याची मला भीती वाटतीये . अनु ची तेवढी क्षमता नाहीये ऐं . खर तर तूच तिच्या विचारणा खात पाणी घातलास . तुझी पण चूक आहे . तू का नाही तिला ठणकावून सांगितले . ती बोलली आणि तुला पटले . मला वाटतय कि विनीता मावशी सोबत तुझे या वरूनच वाढद झाले आणि तिने हॉस्पिटल मध्ये लक्ष काढून घेतले . आता मला लक्षात येतेय सारे . हे असे इराला रूम शिफ्ट करायला लावणे, इर्रीन्ग्स घेणे ,हॉस्पिटल मध्ये आपले महत्व वाढवण्याचे प्रयत्न आणि आई तू हे सगळे ऐकलस . मी इथे नव्हतो , तू का इराला सांगितले नाही कि रूम बदलायची नाही आणि अनु ला पण तेव्हाच समाज दिली असतीस तर बरे झाले असते . तू माहित असून दुर्लक्ष केलेस अनु बाहेरची आहे , पण तू , तू तर आमची आहेस न , मग "
"आकाश , तू आई शी असे बोलू शकत नाहीस "- बाबा
"खरेय , आईशी च का , तुम्ही पण तर होता कि इथेच . तुम्ही तर कधीच कशात लक्ष घालत नाही . म्हणजे प्रश्नच नको , समजा जर आई चुकत असेल , तर तुम्ही तिला का नाही सांगितले . इराच्या जबाबदारीचे ओझे जितके आई वर आहे , तितके तुम्ही कधीच घेतले नाहीत . जबादारी नको , म्हणून निर्णय नको , आपण आणि आपले हॉस्पिटल बस . निर्णय सगळे आजी आणि आई कडे "
"आकाश , बस . खूप बोलला आहेस . आम्ही ऐकून घेतोय म्हणून . तू काय आम्हाला प्रश्न विचारणार का रे आता ? आई वडील आहोत आम्ही तुझे "
"आणि विसरू नको आई , इराचे पण आहात "
"ते आम्ही नाही विसरलोय आकाश , मी हि नाही आणि तुझे बाबा पण नाही . तूच पूर्व ग्रहणे बघ्तोयेस आमच्या कडे . इराचे लय कमी केलेय किंवा करतोय रे आम्ही का तू एकट्यानेच मक्ता घेतला आहेस तिचा . अनु घरात नवीन येणार होती म्हणून चार गोष्टी तिच्या मनासारख्या केल्या तर काय बिघडले आणि इरा सख्खी बहिण असती तर जशी वागली असती तशीच वागली म्हणून मी काही नाही बोलले . "
"पण , अनु तशी वागत नव्हती न , तिने लगेच वागणे बदलले , ते नाही दिसले तुला "
"हो दिसले , पण मला इतके काही वाटले नाही त्यात . आणि तसाही मी आणि तुझे बाबा समर्थ आहोत इराची काळजी घायला . तुला आणि अनु ला यात पडायचे कारण नाही. आम्ही अवि दादांना वाचन दिले होते , आमचे माही बघून घेवू . आणि एक आता आपण अनु कडे जातोय आणि सगळे सुरळीत करू . माफी मागा , दोघे एकमेकांची आणि मोठ्या मनानी एकत्र या परत . "
"आई , ते शक्य नाही . ती किती कडवट विचार करते, ते काळात नाहीये का तुला . आणि मला नकोय हि अशी मुलगी आयुष्यात . ती इराला नक्की सांगेल एखादे दिवशी नाही तर मला तलवारीच्या टोकावर धरेल आयुष्य भर . भांडणे च होतील यातून , मनस्ताप होईल तिला पण आणि मला पण , कशाला हा अट्टाहास ."
"आकाश , अरे कोणतीही मुलगी तुझ्या आयुष्यात आली तरी हे असे होणारच , तू असा किती काळ एकटाच राहणार आणि आज न उद्या इरा ला पण साथीदार मिळेलच कि तिचा , मग ?"
"तेव्हाचे तेव्हा बघू , मला समजून घेणारी अशी एखादी मुलगी असेल कि , तिह्याशी लग्न करेन मी , पण आत अनु शी नाही . आता लगेच मला हा विचारच नकोय . प्लीज "
"आणि इराला काय सांगशील आकाश ?"- बाबा
"सांगेन जे सगळ्यांना सांगितलाय तेच , परदेशी जाण्य वरून मतभेद झाले म्हणून आणि अनुचे म्हणाला तर ती खूप प्रक्टिकल आहे , she will move on easily . "
"इतके सोपे नाहीये आकाश , खेळ नाहीये हा , मनात आला मांडला आणि मनात आले मोडला . आम्ही इतके दिवस तुम्हाला मोकळीक दिली हेच चुकले , लगेच लग्न झाले असते तर बरे झाले असते . हि नसती भानगड "
"आई , इतके सगळे सांगतोय मी तुला अनु बद्दल आणि तरी पण ,… तू तरी मला समजावून घेशील असे वाटले होते आणि लग्न होनी आधीच झाले हे बरे झाले उलट . कधी कधी अशी नाती तुटतात हेच चांगले आहे . मी शेवटचे सांगतोय मी हे लग्न मोडलाय , मला काही नाही बोलायचे यावर "
"आकाश ,आताताई पण करू नको , शांतपणे विचार कर . आम्ही जातोय अनु कडे , आणि लग्न होईल त्याच तारखेला कळले . माझा शब्द अखेरचा आहे . आणि इरा आमची जबादारी आहे , ते ओझे तू उचलू नकोस "
"आई , मग माझे पण ऐक , मी हे लग्न करणार नाही हा माझा पण शब्द आहे , आणि आता खरच आता तुम्हीच इराची जबाबदारी पार पाडा . मी तसाही पुढच्या महिन्यात परदेशी जाणार होतो , ते नक्की आहे. "
"आकाश , तू तसा लहान आहेस अजून . पूर्ण आयुष्य आहे तुझ्या समोर आणि हा काय वेडेपणा आहे . किती समजवायचे रे तुला . आज अवि दादा असता तर , आणि इरा त्याचीच मुलगी असती तर हे असे काय सगळे घडलच नसते . त्या पोरीच्या नशिबात काय आहे कुणास ठावूक , आई गेली , वडील गेले आणि आता तिच्यामुळे तू लग्न मोडतोयेस , त्या पोरीला जर चुकून कळले तर काय वाटेल तिला , याचा तरी विचार कर . "
"आई एक तर , इराला मध्ये घेवून दोष तिच्या माथी मारू नकओ , आणि तिला हे कधीच कळणार. तिच्या शी तुम्ही नका बोलू मी सांगेन काय असेल ते आणि अवि काका जगाला असते तर बरे झाले असते असे वाटायला लागलाय मला आता . त्याला जर कळले असते न कि तुम्हाला इतके ओझे वाटतय , तर जगाला असता बिचारा , आपल्या पोरी साठी "
"आकाश , इतके वाईट आहोत का रे आम्ही , काय असे कमी केलाय रे आम्ही तिचे आणि तू काय असे करणार आहेस वेगळे . तुला नाहीच कळणार , आई बाप होणे किती अवघड आहे ते पण "
"ते पण काय , एका अनाथ मुलीचे हेच न . ऐक मग ती अनाथ कधीच नव्हती , हे जे सगळे आहे न तिचेच आहे हक्काचे , आपण सगळ्यांनी फक्त सांभाळले इतकाच , आणि आता तुम्हीच तिची काळजी घ्या कारण मी वर्ष भर तरी नाहीये इथे . "
इरा संध्याकाळी उशीरच आली , घरात सगळे सामसूम होती . ती आकाशाच्या रूम मध्ये गेली
"दादू , तुझे हे नक्की आहे , तू लग्न नाही करत आहेस "
"हो नक्की आहे आणि ऐक इरा पुढच्या महिन्यात मी जातोय एक वर्ष साठी "
"आणि मी ? एकटी राहू इथे "
"एकटी का बाळा , आई आहे बाबा आहेत , मावशी आहे ,निमिष आहे . हा आत आजी नाहीये , पण हे सगळे आहेत कि . आणि आपण तर टच मध्ये राहूच कि . आणि सुट्टीत तू तिकडे ये आणि मी तरी . वर्षभर जाईल बघ पटकन "
"पण तू लागा का मोडलास , मला तुझे कारण नाही पटले , नक्की काय झालाय ?"
"तेच कारण आहे इरा , माझ्या वर विश्वास ठेव . हा विषय थांबवू आपण इथेच . आणि मी जर वेळ निम्सिः कडे जावून येतो हा "
इरा ला खरे तर पटतच नव्हते , आई बाबा पण तेच सांगत आहेत . आई ला आकाश चे वागणे पटले नव्हते , आणि परदेशी जाने तर अजिबातच . वाईट ह्याचे वाटत होते कि त्याने जणू आरोपात्रच दाखल केले होते तिच्यावर आणि बाबावर सुद्धा . हि अशीच कटुता मनात राहिली आणि आकाश परदेशी गेला . एक वर्षे झाले तरी परत यायची चिन्हे नव्हती , इरा डॉक्टर झाली , हॉस्पिटलचे काम बघू लागली , पुढचे शिक्षण पण सुरु झाले , त्याला जाणवत होते कि आई बाबा आणि ती आता जास्त जवळ आले आहेत , त्याचा पासून दुरावालेले तीनही जीव एकमेकांना आधार देत जगात आहेत ,, आणि म्हणून आकाश नि तिअक्दे राहणे वाढवले . पण या मध्ये त्याचे आणि आई बाबा मधले वाढतच राहिले . तो कडवट पण अजून तसाच होता . चू होती पण कुणाची , आणि माफ मागायची तर कुणी . या सगळ्या काळात हे कुटुंब जोडून ठेवले ते इरा नि . आई बाबा नि विचारले नाही तरी आकाश चे सागेल तपशील ती त्यांना सांगायची , त्यांचे सगळे आकाशाला सांगायची . निमिष नि मात्र आकाशाला वाचन दिल्या प्रमाणे , इराला आणि आई बाबान हि लागेल ती मदत केली होती . हसत खेळत ठेवण्यात त्याचा खूप मोठा हात होता . जी इरा त्याला छोटीशी बाहुली वाटत होती , त्याच बाहुलीच्या प्रेमात तो पडला होता , अगदी सहज , नकळत आणि त्याला हा खरा भातुकलीचा डाव तिच्या सोबत मांडायचा होता , पण आकशा नि अनुचे असे झाल्या पासून त्याला जाणवत होते कि इरा हे सगळे टाळतिये. तिला मी आवडत असलो तरी , तिला ते मान्य होत नाहीये . आकाश सेटल होवू दे , मग मी विचार करेन असे तिने नकळत त्याला सांगितले होते . आत फक्त आकाशच होता जो तिला समजावू शकत होता . आणि आकाश नीच तिला लग्नाला तयार केले आणि इथे आला तिच्या हट्टा साठी .
बघता बघता इराचे लग्न पार पडले , ते पण अगदी विनाविघ्न . इरा नि अगदी हुशारीने आकशा कडून एक वचन घेतले कि तू पुढच्या ६ महिन्यात परत येयील . आणि त्याला ते द्यावाच लागले . आकाशाचा जायचा दिवस येवून ठेपला . पण तो परत येणार असल्यामूळे सारेच खुश होते . इरा आणि निमिष दोघे त्याला सोडायला जाणार होते . आकाश परत येवून त्याच्या जुन्या सहकार्यांना जोइन करणार होता .
आकाश , इरा आणि निमिष तिघे विमान तळावर होते , आपापल्या विचारात
निमिष खुश होता , त्याचा मित्र परत येत होता आणि त्याचे प्रेम त्याला मिळाले होते . आकाश पण आनंदात होता , त्याच्या लाडक्या इराला तिचा जोडीदार मिळाला होता आणि तो पण निमिष , म्हणजे काळजीच मिटली , आणि मुख्य म्हणजे इरा तितकीच जवळ राहणार होती त्याच्या आता . निमिशनी तिच्या प्रेमात पडावे याच्या इतके छान काहीच नवते . आणि इरा , ती खुश होती कारण निमिष सोबत लग्न झाले म्हणून , या हि पेक्षा आकाश परत येणार म्हणून आणि त्या हि पेक्षा आई बाबा आणि आकाश एकतर आले म्हणून .
"निमिष , मी येतोय लक्ष ठेवायला तुझ्या वर . इरा कुठाय रे ?"
"अरे ती फोन वर बोलतीये "
"मित्र खरे सांगू , खूप हलके वाटतय रे मला . आपल्या माणसात आल्यावर खूप बरे वाटतंय . ६ महिन्याच्या आतच मी येयीन इथे . इरा मुळे मी आणि आई बाबा एकत्र आलोय . आणि छान काय आहे माहितीये , आम्हा दोघांना समजून घेणारा तू आहेस तिच्या आयुष्यात "
"काळजी करू नको आकाश,इराला मी कधीच काही नाही सांगणार नाही "
"काय रे माझ्या बद्दल काय बोलताय तुम्ही "
"काही नाही , तू चिडलीस कि काय करायचे ते सांगतोय ग तुझ्या निमिषाला "
"असू दे . निघ तूं आता , वेळ झाली बघ . आणि बोलूच आपण , आणि ये परत लवकर मी खूप वाट बघतोये आणि मी रडायच्या आत पळ "
"इरा … काळजी घे , मी येतोच आहे "
निरोप छोट्या काळासाठी असेल तरी तो घेणे जड जाताच नाही का
"इरा , तू रडतीयेस. अग तो येयील परत "- निमिष
"नाही रडत नाहीये मी . एक सांगू तुला , फक्त तुझ्या आणि माझ्यात च. आज मला खूप बरे वाटतय , आकाश परत येतोय , आई बाबा आणि तो आता परत एकत्र येतील . आणि सगळे छान होईल . आज तो मनावरचे एक ओझे कमी करून गेला आहे आणि मी पण एक ओझे कमी केलाय . माझ्यामुळेच ५ वर्ष पूर्वी सगळे घडले . आई बाबा दुरावले त्याला आणि अनु पण गेली त्याच्या आयुष्य मधून "
"इरा , असे काही नाहीये , तुझा काय संबध "
"माझ्या काय संबध ते मलाही माहितीये आणि तुला हि न निमिष "
"म्हणजे "
"मला सगळे कळले आहे , माझ्या बद्दल कि मी , म्हणजे माझे बाबा म्हणजे आकाश चे अवि काका आणि आकशा माझा … खर तर तो माझा सगळे काही आहे . भाऊ , मित्र , आणि बराच काही . "
"इरा पण तुला हे सगळे कसे कळले आणि कधी आणि माहित असून हि तू कुणालाच का नाही ?"
" आकाश गेला खरा , पण १ वर्षे झाले आणि अनु अचानक भेटली , तिचे लग्नाचे परत बघत होते . मला राहवले नाही , मी तिला विचारले काय झाले ते . ती म्हणाली तुझ्या भावालाच विचार . मी खूप हट्टाला पेटले , जेव्हा मी तिला म्हणाले कि तुझ्या मुळे आकाश आम्हाला दुरावला तेव्हा तुला मला खरे सांगावेच लागेल तेव्हा मात्र ती म्हणाली कि माझ्या मुळे … सगळे … माझा विश्वास बसे न , मग विनीता मावशीला विश्वासात घेतले आणि तिच्या पाशी बोलले मी कारण मला आई बाबा , हो आई बाबच आहेत ते माझे , दिला तरी । त्यांना मला दुखवायचे नव्हते अजून आणि आकाशाला तर नाहीच नाही . मग मावशीला म्हंटले कि मला कळले आहे हे त्यांना सांगू नको . त्यांनी जे जीवापाड जपले . केवळ माझ्या साठी ते जपल्याचे समाधान आणि सुख मला हिरावून नाही घायचे आहे कधीच . काही गोष्टींच्या न कळलेल्या चांगलाय नाही का !. आणि खर सांगू , अरे ज्यांनी मला जन्म दिला ते मला आठवत हि नाहीयेत , मला आईचा स्पर्श आठवतो तो या आईचाच , बाबांचा आधार वाटला तर याचा बाबांचा आणि कुटुंब आकाश शिवाय कसे पूर्ण होईल माझे . हेच माझे कुटुंब आहे . ते आयुष्यभर धापडत राहिले , मला सत्य कळू नये म्हणून , कारण त्यातच हित होते माझे आणि त्यांचे पण आणि मला आता हि कसरत आयुष्यभर करायची आहे :) , प्रत्येक जण आयुष्यात आपले असे काही घेवून येतो आणि आपल्या माणसासाठी जर कहे ओझे उचलावे लागले तर ते उचलण्याचा एक आनंद असतोच कि , आणि आत माझी turn आहे न . आणि मला यात मदत कर , जर कधी मी कमजोर पडले चुकले तर , तू माझा कान पकडून मला आठवण करून दे . मी खूप नशीबवान आहे कि इतके प्रेम करणारी माणसे माझ्या अवती भोवती आहेत . आणि खरे सांगू आईचे प्रेम आहे रे माझ्यावर ,नेहमीच होते . आकशाला हि कळेल तिची बाजू एक दिवस. ती जर कधी चुकली असेल तर आम्ही तिला समजावून घ्याला हवे, कारण आमच्या फार चुका पोटात घातल्या आहेत तिने . "
"इरा , मी आहेच ग , पण तुझे कौतुक वाटते मला . आणि तुला हे माहित असूनही …. "
"जे होते ते चांगल्या साठीच . तुला एक गम्मत सांगू ."
"काय ग ?"
हे माझे रहस्य माहित असलेली अजून एक व्यक्ती आहे, जी आकाश सोबत परत येणार आहे आणि हे आकशाला पण माहिती नाहीये. तुला काय वाटले तू एकटाच आहेस का समजूतदार या जगात जोडीदार म्हणून "
"म्हणजे ?"
"म्हणेज काय ? आयुष्य सोपे आहे . त्रिकोणापेक्षा चौकोन चांगला नाही का ?"
इरा मनमोकळे पाने हसली , आणि निमिष पण. काही दिवसापूर्वी ती आकाशाला घेवून पुण्याच्या प्रवासाला निघाली होती आणि आता याच जागी तिनी आकाश, निमिष, आई बाबा, विनीता मावशी आणि जे त्यांच्या नात्याला समजून घेतील अश्या सार्यांना घेवून एक नवीन प्रवास सूर करत होती. एक गोष्ट त्यांची पण संपली पण थांबली नाही :)
समाप्त
Story By
Sheetal Jayant Joshi
प्रतिक्रिया
19 Aug 2015 - 11:59 am | अत्रुप्त आत्मा
19 Aug 2015 - 12:13 pm | द-बाहुबली
लेखन अजुन थोडे मोठे हवे होते, भयानक कल्पक आणि रंजक.
21 Aug 2015 - 11:53 am | शीतल जोशी
धन्यवाद , मी नवीन सदस्य असल्याने , लघु कादंबरी हि क्रमश: अशी भागाने प्रसिद्ध करावे हे माझ्या ध्यानात आले नाही . तसेंच . मजकूर दोन वेळा पेस्ट झाला आणि कसा सुधारावे हे हि ध्यानात आले नाही .
19 Aug 2015 - 12:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
लेखामधला भ्रमणध्वनीक्रमांक काढुन टाकत आहे.
21 Aug 2015 - 11:55 am | शीतल जोशी
धन्यवाद . प्रथमच या वेब वर प्रकाशित करत असल्याने काही गोष्टी लक्षात आल्या नाही , मजकूर हि दोन वेळा लिहिला गेला .
19 Aug 2015 - 1:16 pm | सस्नेह
थोडं दमानं घ्या हो, लहान लहान भाग करून टाका ना !
न वाचताच दम लागला !
21 Aug 2015 - 11:57 am | शीतल जोशी
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद . आपण भाग करून येथे प्रकाशित करावेत हे माझ्या लक्षात आले नाही . मी ब्लोग लिहिताना माझी लघु कादंबरी , क्रमश : प्रकाशित केली होती , पण इथे ते करायला हवे होते , आणि चुकून एकाच मजकूर दोन वेळा पेस्ट झाला , तो कसा काढावा या बद्दल आपण जुने सदस्य म्हणून काही मार्गदर्शन करू शकाल का ताई ?
21 Aug 2015 - 12:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
हा धागा अप्रकाशित करुन तीन ते चार भागांमधे रुपांतरीत करता येउ शकेल. त्यासाठी संपादक मंडळाशी संपर्क साधा.
21 Aug 2015 - 12:54 pm | शीतल जोशी
धन्यवाद , मी संपादकांशी संपर्क साधेन :)
19 Aug 2015 - 1:55 pm | आनन्दा
डब्बल धमाका?
19 Aug 2015 - 2:00 pm | अभ्या..
सिक्वलसहित स्पर्धेतल्या सगळ्या कथांचे शब्द टोटल एकाच ठिकाणी. :)
21 Aug 2015 - 12:00 pm | शीतल जोशी
क्रमश : टाकायला हवे होते हेलक्षा आले नाही , आणि हि तशी लघु कथा नाही , हा प्रकार दीर्घ कथा किंवा लघु कादंबरी या प्रकारात येतो . आपली सूचना स्वागतार्ह आहे . पण जर हि कथा भागात विभागून प्रकाशित केली , तर अभिप्राय नक्की द्या , वाचून :)
19 Aug 2015 - 2:14 pm | एस
छान आहे कादंबरी. फक्त कुठला भाग कुठे सुरू झाला आणि कुठे संपला ते कळालं नाही. कळाल्यावर उरलेली वाचून काढेन. ;-)
21 Aug 2015 - 12:03 pm | शीतल जोशी
हो तसा झालाय खर !!!! एकाच मजकूर दोन वेळा पेस्ट झाला आहे एका खाली एक , आणि मी नवीन असल्याने मला हे एडीट कसे करावे हेच कळत नाहीये . आपण काही मदत करू शकाल का ? भाग क्रमश : टाकायला हवे होते हेही ध्यानात आले नाही . पण आपण दाखल घेतली त्या बद्दल धन्यवाद :)
19 Aug 2015 - 3:59 pm | प्रचेतस
पुस्तकंच प्रकाशित केलं जणू.
21 Aug 2015 - 12:04 pm | शीतल जोशी
:) , पुस्तकाचा दर्जा मिळाला हे काय कमी आहे , किती जननी वाचला हा भाग निराला :)
19 Aug 2015 - 11:14 pm | एक एकटा एकटाच
वाचनखुण साठवली आहे.
निवांत वाचुन प्रतिसाद देईन.......नक्की
20 Aug 2015 - 9:39 pm | एक एकटा एकटाच
कथा आवडली...
नात्यांची भावनिक गुंतागुंत छान दाखवलीय.
फ़क्त एकाच धाग्यात ही कथा दोनदा पोस्ट झाली असल्यामुळे कथेची लांबी वाढलीय.
संपादक मंडळाला सांगुन ती अतिरिक्त कथा उडवून टाका.
बाक़ी कथा उत्तम
आणि
पुढिल लिखाणास शुभेच्छा
21 Aug 2015 - 10:57 am | शीतल जोशी
धन्यवाद !!!. चुकून दोन वेळा पोस्त झाली आहे .
21 Aug 2015 - 12:10 pm | शीतल जोशी
मनापासून धन्यवाद . हो आपण सांगितल्यावर मला लक्षात आले कि चुकण दोन वेळा पोस्ट झाली आहे . पुढच्या वेळी हि काळजी मी घेईन . खरच धन्यवाद :)
20 Aug 2015 - 12:02 am | धनावडे
संपली एकदाची
(Scroll down करुन)
21 Aug 2015 - 12:16 pm | शीतल जोशी
धन्यवाद !!! माझिंच चूक झाली आहे कि एकदम दीर्घकथा संपूर्ण टाकली , आणि प्रथमच या वेब वर मी प्रकाशित करत आहे , म्हणून चुकून दोन वेळा पेस्ट झाली आणि लांबी अजूनच दिसली , तितकी नसताना हि . आता हे लक्षात आले तरी एडीट कसे करायचे हे आपण अनुभवी म्हणून सांगू शकाल का ? आणि मी या पुढे माझी कथा छोट्या भागात विभागून प्रकाशित करेन , तेव्हा आपण केवळ स्क्रोल डाऊन न करता वाचला हीच विनंती :)
20 Aug 2015 - 12:02 am | धनावडे
संपली एकदाची
(Scroll down करुन)
20 Aug 2015 - 12:02 am | धनावडे
संपली एकदाची
(Scroll down करुन)
20 Aug 2015 - 12:15 am | पिलीयन रायडर
कौतुक वाटतं मला जे लोक इतकं टाईप करु शकतात त्यांच!!
ताई.. २-४ भागात टाकली तरी वाचु आम्ही कथा / कादंबरी (जे असेल ते..)
अशानी कुणीच वाचणार नाही..
21 Aug 2015 - 12:18 pm | शीतल जोशी
हो नक्कीच , आपली सूचना खरी आहे , हे माझ्या लक्षात लक्षात आले नाही . मी ब्लोग वर प्रकाशित ८ भाग मध्ये केली होता तेव्हा प्रतिसाद छान होता , इथे तेच तंत्र वापरावे हे लक्षात नाही आले . पण आपली सूचना अगदी खरी आहे
20 Aug 2015 - 12:18 am | प्यारे१
मला दोन पानाची समरी दया कुणीतरी करून....
21 Aug 2015 - 12:21 pm | शीतल जोशी
. खर तर आपण क्रमश : प्रकाशित करावे हे लक्षात नाही आले , जर चुकलाच . त्यातूनही मजकूर दोन वेळा पेस्ट झाला म्हणून अनिच मोठा झाला , तितका मोठा नसताना हि . आणि समरीचे म्हणाल तर काही वेळा सुरवात आणि शेवट यापेक्षा मधल्या पर्वासाची गम्मत खरी असते :) सारांश लेखन हा माझा प्रांत नाही , पण काल्पन विस्तार आहे :)
21 Aug 2015 - 12:29 pm | प्यारे१
तुमचा निरोप वरच मिळाला.
मिपा वर एकाला सांगितलं तरी सगळ्यांना निरोप पोचतो.
पूर्वी कसं उद्या घरी सत्यनारायण आहे असं एकाला सांगितलं की सगळ्यांना कळायचं तसं!
बाकी तुम्ही नवीन असल्याचं नक्कीच समजतंय. स्वागत आहे.
21 Aug 2015 - 3:12 pm | नीलमोहर
"उद्या घरी सत्यनारायण आहे असं एकाला सांगितलं की सगळ्यांना कळायचं"
फारच बाई विनोदी तुम्ही प्यारेजी :)
21 Aug 2015 - 4:53 pm | कोमल
फारच, 'बाई विनोदी' तुम्ही प्यारेजी
:)) :)) :))
काय प्यारेभौ??? काय चाललयं काय नक्की?? ;)
21 Aug 2015 - 5:50 pm | नीलमोहर
प्यारेजींना विनोदी म्हटलंय,
ते 'बाई' असंच उगाच..
(जरा म्हणून गंमत झेपत नाही लोकांना..)
21 Aug 2015 - 6:00 pm | प्यारे१
आमचा ज़रा डोळा लागला तोवर एवढा गोंधळ घातला गेला का?
भौ, बाई, काका,काकू, काके काय म्हणायचं ते म्हणा!
की फर्क पैंदा!
-टेस्टेड सर्टिफाईड ओके
21 Aug 2015 - 12:29 pm | प्यारे१
तुमचा निरोप वरच मिळाला.
मिपा वर एकाला सांगितलं तरी सगळ्यांना निरोप पोचतो.
पूर्वी कसं उद्या घरी सत्यनारायण आहे असं एकाला सांगितलं की सगळ्यांना कळायचं तसं!
बाकी तुम्ही नवीन असल्याचं नक्कीच समजतंय. स्वागत आहे.
21 Aug 2015 - 2:33 pm | एस
अहो त्या प्रत्येक प्रतिसादाला प्रतिक्रिया देत असल्या तरी एकेकच प्रतिक्रिया देताहेत. तुम्ही एकाच प्रतिसादाला दोन दोन प्रतिसाद आणि तेपण जुळे प्रतिसाद देताहात.
21 Aug 2015 - 2:53 pm | प्यारे१
ते मोबाइल नेटवर्क मुळे होतंय. त्याबद्दल दिलगीर आहोत. प्रतिसाद एकच आहे जुळा वगैरे नाही. दोनदा पेस्टलाय.
बाकी तुम्हाला काम लावतो थोडं. उड़वा एक प्रतिसाद. पावर हाय ना तुम्हाला?
बाकी जुने सदस्य असंय ते. शुद्धलेखन जमतं तुम्हाला.
21 Aug 2015 - 4:25 pm | एस
आमाला पावर न्हाय! आमी सामान्य सदश्य हाओत. सं पन न्हाय का सासं पन न्हाय. हुनार बी नाय.
बाकी ते मुद्दाम लिहिलंय. ह. घे.
20 Aug 2015 - 10:04 pm | यशोधरा
चांगली आहे गोष्ट. फक्त जरा व्यवस्थित फॉर्मॅट करा.
21 Aug 2015 - 12:24 pm | शीतल जोशी
मनापासून धन्यवाद !!! हो जर व्यवस्थित फोर्मातिंग करायला आहवे आहे . मी नक्की लक्षात ठेवेन :)
21 Aug 2015 - 11:16 am | डॉ सुहास म्हात्रे
बापरे, दम लागला म्हणून वाचायचे थांबवले ! भाग करून टाकली असती तर बरे झाले असते. शिवाय श्य्द्ध्लेखनाकडे थोडे लक्ष दिल्यास वाचकांना लागणारे बरेच धक्के कमी होतील.
21 Aug 2015 - 12:28 pm | शीतल जोशी
अगदी खरे आहे तुमचे म्हणणे . मी जेव्हा ब्लोग वर प्रकाशित केली तेव्हा ८ भागामध्ये केली होती , इथेही हेच करावयास हवे होते . लक्षात नाही आले , प्रथमच अनुभव आहे न आणि शुद्ध लेखनाच्या चुका राहून गेल्या आहेत , मराठी टायपिंग करताना , हे हि खरच आहे . आणि त्यातून हि चुकून एकाच कथा दोन वेळा पेस्ट केली आणि आता ते कसे एडीट करावे हेच माहित नाही आहे
कुणी मदत केली तारे बरे होईल . पुढील लेखन करतेवेळी मी या सूचना नक्की लक्षात घेईन . प्रतिसाद बद्दल खरच धन्यवाद
21 Aug 2015 - 11:19 am | मिनेश
चांगली आहे अब्जशब्दकथा. :)
21 Aug 2015 - 12:31 pm | शीतल जोशी
मनापासून धन्यवाद !!! खर तर थोडी मोठी झाली आहे कथा हे सत्य आहे , पण लघु कथा लिहिणे अवघड आहे .बघू जमतं का हळू हळू ते :)
21 Aug 2015 - 11:47 am | चिनार
पुस्तकच छापल की हो तै इथे !!
21 Aug 2015 - 12:34 pm | शीतल जोशी
:) , हो झालाय जरा तसाच , आधीच गोष्ट मोठी त्यात क्रमश: टाकावी हेही लक्षात नाही आले आणि भरीस भर म्हणून एकच धाग्यात एका खाली एक अशी दोन वेळा एकाच गोष्ट पोस्ट हि झाली . :)
21 Aug 2015 - 6:24 pm | पद्मावति
कथा जरा मोठी वाटत असल्यामुळे आधी वाचायला टाळाटाळ केली. पण एकदा वाचायला सुरूवात केल्यानंतर मात्र कथेत खरोखर रंगून गेल्यासारखे झाले. कथा विषय साधा असला तरी तो तुम्ही खूप छान फुलवलाय. मुख्य म्हणजे आकाश आणि इरा या बहीण भावांचं bonding खूप छान पद्धतीने तुम्ही वाचकांसमोर ठेवले आहे. सगळीच पात्रे अतिशय समजूतदार आणि mature दाखविली आहेत. कथेत फिल्मी पणा आणण्याचा भरपुर स्कोप असून तुम्ही तो मोह टाळला याचे कौतुक वाटले. बाकी वर बर्याच प्रतिसादात लिहील्याप्रमाणे हीच कथा क्रमश: टाकली असती तर इतक्या छान कथेला अधिक न्याय मिळाला असता असे वाटते.
21 Aug 2015 - 6:55 pm | भाकरी
तुम्ही जवळ जवळ प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देताय - आणि त्यात आवर्जून दोनदा मजकूर टाकलाय हे सांगताय! लोकं थोडेतरी प्रतिसाद वाचतात, त्याना उमगलंय ते आता. हा वेळ वर कोणी म्हंटल्याप्रमाणे संपादक मंडळींच्या मागे लागून, हे लिखाण अप्रकाशीत करून, तीन-चार (निदान तीन-चार तरी :-) ) भागात, आठवड्याने टाकायच्या कामात घालवा.
अवांतरः तुम्ही पहिल्या जो"शि" !
23 Aug 2015 - 12:10 am | निशिकान्त
दोन दिवसात वाचून पूर्ण केली.
23 Aug 2015 - 12:37 pm | शीतल जोशी
thank u :)
23 Aug 2015 - 10:16 am | मदनबाण
स्कोर्ल करुन बोट दुखायला लागले... ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nancy Ajram - Ah We Noss / نانسى عجرم - آه ونص
23 Aug 2015 - 10:40 am | जव्हेरगंज
स्टॅमिना संपला ...:-O
26 Aug 2015 - 9:55 am | जेपी
जमल तेवढ वाचल बाकी वाखु साठवतो.
अवांतर- मकले आठवुन गेले.त्यांच्या कथा वाचताना सारखा मोबाईल गंडायचा त्यामुळे कधि वाचताच आल्या नाहित.