एक न पाहिलेली सुखदा ..........!
त्या दिवशी फेसबुक वर एक पोस्ट पाहिली, एका 6 महिन्याच्या मुलीचा फोटो , इतकी सुंदर ,गुटगुटीत आणि खूप बोलके डोळे. मला एकदम माझी पुतणी लहान असताना अगदी अशीच दिसायची . पण खालची पोस्ट पूर्ण वाचल्यानंतर मन भरून आलं , अलिबाग मधील वात्सल्य नावाच्या अनाथाश्रामातली मुलगी होती खाली तिथला नंबर दिला होता . मी फोन केला आणि चौकशी केली पत्ता घेतला आणि जायचं ठरवलं . एक गोष्ट समजली ,तिचं नाव सुखदा . सुखदा काही डोक्यातून जात नव्हती .
शनिवारी सकाळीच तिथे पोहोचलो . बाहेरचा बोर्ड वाचून आत शिरलो , तिथल्या madam नि आत घेतले . मी चौकशी चालू केली . तर त्यांच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी असलेली सगळी मुलं कुठे ना कुठे सापडलेली आहेत . कुणी रस्त्यावर,कुणी स्टॉप वर कुणी कचरा पेटी जवळ .…. कुणी कापडात गुंडाळलेला ,कुणी असाच ठेवलेला . मी तसाच ऐकत बसलो होतो खुर्चीला घट्ट पकडून . बाजूलाच लहान मुलांचे फोटो लावले होते … कसतरीच वाटलं सगळं ऐकून आपलं स्वतःच मुल असं सोडून द्यायचं? इतकी मानसिक तयारी कशी करत असेल कोणी ? मी विचारलं सुखदा आहे का? मी भेटू शकतो?
madam :- नाही तिला दत्तक घेण्यात आलं २ आठवडे आधीच .
फारच वाईट वाटलं ऐकून कि तिला भेटण जमलं नाही
मी विचारलं :- मला मुलांना भेटता येईल का ?
madam :- हो ,वरती पहिल्या माळ्यावर आहेत इथून जा
मी वर गेलो आणि समोरच एक बाळ पाळण्यात गाढ झोपलेल दिसलं ,एकदम निष्पाप ,निरागस खूप वाईट वाटलं पाहून . व पुं नी लिहिलेलं आठवलं ."कुणाचा मुलगा होण टाळता येत नसेल पण कुणाचा तरी बाप होण टाळता येत "
कुणाची कशी मजबुरी असेल माहित नाही पण यांच्या नशिबी जन्मतःच परकेपण .कुणाच्यातरी चुकांची भरपाई यांच्या नशिबी लिहून ठेवली आहे .
अजून एक बाळ कोपऱ्यात झोपून होतं आणि झोपेतच हसत होतं . आणि अजून शेजारी २ मुली आशेने पाहत होत्या मी एकीला उचलून घेतलं . ती तरीपण पाहत होती माझ्याकडे एकटक कुणास ठावूक काय पहात होती . तिने हळूच हात फिरवला माझ्या चेहऱ्यावरून . मला खूप भरून आलं . मी थोडा वेळ खेळत राहिलो तिच्याशी . मी तिचं नाव विचारलं सेविकेला . तिचं नाव होतं 'स्वरा' . आपल्या पोटचा गोळा असा निर्दय पणे सोडून देण कस जमत असेल . तिथून कसाबसा निघालो .
madam कडे आलो . madam दत्तक घेण्याची process समजावून सांगत होत्या दत्तक घेण्यासाठी २ वर्षांचा वेटिंग लागतो अस त्या म्हणाल्या . त्या नंतर जर मुल आवडलं तर प्रोसेस पुढे जाते . वरती पाहिलेला एक ५-६ वर्षांचा मुलगा मला आठवला ,दिसायला साधा , बारीक अंगकाठी . मी त्या मुलाबद्दल विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या त्याला अजून कोणी दत्तक नाही घेतलं . माझा सहज प्रश्न का? madam म्हणाल्या दत्तक जाणारं मुल पालकांना आवडायला हवं', पर्यंत ते पसंद पडत नाही तो पर्यंत काही नाही करता येत … म्हणजे जर जन्माला यायचं असेल तर सुंदर रुपडं घेऊन जन्माला यावं . या जगात दिसणं खूप महत्वाचं आहे , आपण आणि आपली प्रत्येक गोष्ट सुंदर असावी हा अट्टाहास , आपण सुंदर , आपले कपडे चांगले , आपली गाडी चांगली इतकच काय घरातली देवाची मूर्ती पण सुंदर आणि रेखीव लागते आपल्याला …
तसाच उद्विग्न होऊन तिथून निघालो . गाडी सुरु केली समोरचं सगळं धुसर दिसत होतं म्हणून वायपर चालू केले . वायपर फिरत होते पण तरीही समोरचं सगळं तसच धुसर दिसत होतं
जाता जाता एक न पाहिलेली सुखदा एक वेगळाच अनुभव देऊन गेली
प्रतिक्रिया
अनुभवकथन आहे की नाही माहीत नाही, पण लेखन आवडलं
भारतामधे नाही. पुण्यामधल्या
नाही हो.. माझ्या माहिती
अतिशय वेगळा विषय मांडलात.
खूप भावलं
मनाला भिडणारं लेखन.
मी देखील तो फोटो बघितलाय.
कटु सत्य !
आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं
अशीही एक सुखदा
लेख आवडला. आत काहीतरी तुटल्या
श्रीवत्समधे मुलांना खरोखर
दोन वर्ष वेटिंग आहेच मुंबई
सुन्न
निशब्ध
लेख वाचुन खरेच कसेतरी झाले.
छान लेखन. आवडलं.
छान लेख.
कितीही कटू असला तरी थोडासा व्यावहारिक विचार.
स्वतःची पिल्ले
वाचुन एकदाम सुन्न झालो !!!!!!
वाचून
अस्वस्थ करणारं लेखन . माझ्या
बर्याच वेळेस अल्पवयीन मुली(१६
इथल्या प्रतिक्रियांसाठीही आणि
लेखन हळवं करून गेलं.
मस्त अनुभव
लेख आवडला
लेख सुंदर.