शिकविताना सरांनी डोळ्याच्या कोपर्यातून पाहिलं तेव्हा पुन्हा एकदा नितीन शेजारी बसलेल्या विजयच्या कानात कुजबुजताना दिसला. दोघेही हसत होते.
सर भडकले. शिकवणं थांबवून ते संतापून दोघांच्या बाकाजवळ गेले.
"विजय, हसायला काय झालं?"
"मी हसत नव्हतो सर. मी वहीत लिहित होतो."
"नाही म्हणतोस, खोटं बोलतोस, चुका नाकबूल करतोस. अरे, आम्ही शाळेत असताना आमची चूक नसताना सुद्धा सर रागावले तरी आम्ही सॉरी म्हणायचो, चुकलं म्हणायचो, परत करणार नाही असं म्हणायचो. सांग का हसलास?"
"सर, नितीन हसत होता, म्हणून मी हसलो."
"का हसत होतास नितीन?" सर गरजले.
"सॉरी सर" झटकन नितीन बोलला आणि पुढच्याच क्षणी सगळ्या वर्गात हास्यकल्लोळ झाला. सर संतापून पाहतच राहिले.
प्रतिक्रिया
4 Aug 2015 - 8:28 pm | श्रीगुरुजी
ही शतशब्दकथा "शतशब्दकथा स्पर्धेसाठी" आहे.
शीर्षकामध्ये चुकुन "शतशब्दकथा स्पर्धा" लिहिण्याऐवजी "शतशब्दकथा" एवढेच लिहिले गेले. संपादक मंडळाला शीर्षक दुरूस्त करता येईल का?
4 Aug 2015 - 10:14 pm | श्रीगुरुजी
ही सत्यकथा आहे.
हे शाळेतले मास्तर नसून पुण्यातील एका नामवंत महाविद्यालयात प्राध्यापक होते. हे प्राध्यापक मराठीतील एक गाजलेले, नामवंत, पुरस्कार विजेते साहित्यिक सुद्धा आहेत.
4 Aug 2015 - 9:02 pm | जेपी
+0 .
अवांतर-पटल नाही.मास्तराच्या शालेय जिवनात सॉरी वैगेरे दुर .फटके मिळाले असतील.
अतिअवांतर-आता माई शशक लिहीतील अशी अपेक्षा.
4 Aug 2015 - 9:12 pm | अत्रुप्त आत्मा
जेप्याशी शमत! :-\
4 Aug 2015 - 10:15 pm | श्रीगुरुजी
ही सत्यकथा आहे.
हे शाळेतले मास्तर नसून पुण्यातील एका नामवंत महाविद्यालयात प्राध्यापक होते. हे प्राध्यापक मराठीतील एक गाजलेले, नामवंत, पुरस्कार विजेते साहित्यिक सुद्धा आहेत.
4 Aug 2015 - 9:12 pm | जडभरत
+१
प्रत्येकाचा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोण आपापल्या फ्रेम ऑफ रेफरन्सनुसार असतो. आपल्याला महत्वाची न वाटणारी गोष्ट त्या त्या व्यक्तिसाठी भलतीच रोचक असू शकते.
4 Aug 2015 - 10:17 pm | प्यारे१
+०
मला झेपली नाही. चूक नसताना सॉरी म्हण असं सांगणाऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थी सॉरी म्हणाला असं आहे का काही?
4 Aug 2015 - 10:23 pm | श्रीगुरुजी
हे प्राध्यापक जुन्या पठडीतले होते. शिस्त, संस्कार, घोकंपट्टी, गुरूंविषयी आदर इ. वर त्यांचा गाढा विश्वास. गुरूंना आदर दाखवावा या संस्कारामुळे, विद्यार्थ्याची चूक नसली तर गुरूने दाटल्यावर गुरूशी वाद न करता विद्यार्थ्याने माफी मागावी अशी त्यांची अपेक्षा. त्यामुळे पहिल्या विद्यार्थ्याला दटावल्यावर ज्याने चूक केली तो दुसरा विद्यार्थी वाद न घालता लगेच "सॉरी" म्हणून मोकळा होतो आणि प्राध्यापकांना पुढे बोलायला तोंडच रहात नाही.
ही स्पर्धा संपल्यावर या ख्यातनाम प्राध्यापक-साहित्यिकांचे नाव सांगेन.
4 Aug 2015 - 10:43 pm | प्यारे१
ओह्ह ओके!
मंडळ शतशब्द वापरून आभारी आहे. (ह घ्या!)
5 Aug 2015 - 1:43 pm | श्रीगुरुजी
या प्रसंगाचा विनोदी सिक्वेल पुढच्या लेक्चरला घडला. जर कथा पुढच्या फेरीत गेली तर तो लिहीन.
4 Aug 2015 - 10:46 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
छुपा विनोद आवडला !
5 Aug 2015 - 1:37 pm | ब़जरबट्टू
हेच म्हणतो .. +1
6 Aug 2015 - 2:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
वर्गातली पोरे भलतीच हुशार होती, हे अजून एक निरिक्षण !
5 Aug 2015 - 12:25 pm | मृत्युन्जय
+१
5 Aug 2015 - 1:02 pm | gogglya
+१
6 Aug 2015 - 2:31 am | अनन्त अवधुत
असेच माझ्या बाबत पण घडले होते.
प्रात्यक्षिक पुस्तकावर सरांची सही हवी होती. आणि त्यादिवशी त्यांचे काय बिनसले होते कुणास ठावूक. प्रत्येक जण १०-१५ मिनिट तरी ऐकून घेत होता. काही जणांना सही मिळाली काही जणांना परत पाठवले.
मला मित्राने पूर्वसूचना देऊन ठेवली होती कि काळजीपूर्वक राहा. बहुधा परत पाठवतील.
मी सरांसमोर प्रात्यक्षिक पुस्तक घेऊन गेलो....
सर : या. आलात?
मी : हो सर.
सर: तुला पण सही हवी का?
मी: हो सर.
सर:हे प्रात्यक्षिक स्वत: केलेत कि दुसऱ्याचे आहेत ?
मी: हो सर. (काहीही म्हणाले तरी हो सर म्हणायचे असेच ठरवले होते :) )
सर: दोन वर्ष हो ला हो करण्यापलीकडे काहीच केले नाहीस तू.
.
.
.
.
मी: हो सर.
सर:....
सरांनी त्या प्रात्यक्षिक पुस्तकावर सही केली आणि मी बाहेर.
6 Aug 2015 - 10:40 am | जडभरत
मस्तच रे
6 Aug 2015 - 1:10 pm | श्रीगुरुजी
मस्त किस्सा! शिकत असताना शिक्षकांना, प्राध्यापकांना आगाउपणे उत्तर देऊन विजय मिळाल्याचा आनंद व्हायचा. पण आता मागे वळून पाहताना आपण त्यांचा अनादर करून किती मूर्खपणा करीत होतो याची जाणीव झाली.
6 Aug 2015 - 2:32 am | अनन्त अवधुत
हा राहिलाच होता.
6 Aug 2015 - 9:35 am | नाखु
परंपरा की ????
6 Aug 2015 - 10:25 am | चिनार
अरे केह्ना क्या चाहते हो ?
6 Aug 2015 - 2:00 pm | तुमचा अभिषेक
मला कॉलेजमधील एक किस्सा आठवला.
मी दगडमातीचा ईंजिनीअर,
तर एका लेक्चरला सर शिकवून झाल्यावर एकेकाला क्रमाने ठराविक गटात येणार्या दगडांची नावे विचारत होती. माझ्यावेळी जो गट चालू होता त्यात येणार्या ७-८ दगडांपैकी मला एकच नाव माहीत होते, ते घेऊया आणि सुटूया म्हटले.
पण शेजारच्या मुलाला काय अवदसा आठवली देव जाणे. त्याने नेमक्या माझ्या मनात असलेल्या दगडाचेच नाव घेतले. लगोलग मला ऊठावे लागले, आणि माझ्या तोंडातलाच शब्द त्याने हिरावून घेतल्याने मी फक्त एवढेच बोलू शकलो, "सेम सर.."
आणि दुसर्याच क्षणी सारा वर्ग हाहाहीहीहूहू..
एक असली जोक घडला पण तो मला समजायला काही क्षण जावे लागले.
गंमत म्हणजे एवढे बोलून मी उत्तर दिल्याच्या थाटात खाली बसलो आणि सरही गोंधळून मनातल्या मनात कपाळावर हात मारत पुढच्या मुलाकडे वळले :)
6 Aug 2015 - 2:28 pm | खटपट्या
+१
6 Aug 2015 - 2:48 pm | निमिष सोनार
मस्त
6 Aug 2015 - 4:09 pm | मुक्त विहारि
+१
7 Aug 2015 - 8:43 pm | लॉर्ड फॉकलन्ड
+१
7 Aug 2015 - 9:21 pm | बहिरुपी
+१
7 Aug 2015 - 9:53 pm | उगा काहितरीच
+१ पुभाप्र + शुभेच्छा
7 Aug 2015 - 11:51 pm | पैसा
+१
हुषार पोरे!
8 Aug 2015 - 9:43 am | नूतन सावंत
+१.
13 Aug 2015 - 2:04 pm | श्रीगुरुजी
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार! शतशब्दकथा लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न होता. या घटनेचा सिक्वेल आहे, परंतु सिक्वेल लिहिण्याची संधी मिळेल असे वाटत नाही.
13 Aug 2015 - 3:34 pm | अन्या दातार
+१
14 Aug 2015 - 6:17 pm | पद्मावति
+१
15 Aug 2015 - 10:35 pm | जयनीत
+1