✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बाया (मयगुढकथा)

प
पगला गजोधर यांनी
Tue, 08/04/2015 - 16:00  ·  लेख
लेख
* संपूर्णपणे काल्पनिक ** कमकुवत मनाच्या लोकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. *** आमची प्रेर्ना रविवारच्या दुपारी मस्त मटण चापून, वाँकिंगडेड मँरेथॉन पाहता पाहता साधारणपणे मला अर्ध्याएक तासाने सोफ्यावरच अमळसा डोळा लागला तोच, कोणितरी मला धरल्यासारखे जाणवू लागले. मला माझे डोळे बंद असताना पण सर्व दिसत होते. पण तरीही अंगात उठण्याची ताकद नव्हती, हालचाल करू शकत नव्हतो ...ओरडावस वाटलं पण तोंडातुन शब्दच फुटत नव्हते. कोणितरी माझा गळा आवळल्या सारखे वाटत होते. जी भिती, जी काळीज गोठवणारी थंडगार भिती मी एवढी वर्षे मनाच्या जुनाट सांदीकोपर्‍यात गाडून टाकली होती, ती प्रचंड वेगाने सळसळत वर आली आहे. सर्वांगाला कंप सुटतोय,हातपाय लुळावलेत आणि घशाला कोरड पडली आहे असे वाटून शेवटी मी भीमरूपी पुटपूटण्याचा प्रयत्न केला, त्याचवेळी मला जाणवत होतं की माझ्या डोक्याजवळ कोणितरी उभे आहे. हिंमत करून, मोठ्या मुश्किलीनं मी वर पाहण्याचा प्रयत्न केला, तर सगळंच ब्लर दिसत होतं, मला एक पुसटशी पांढरी आकृती दिसली हातभर अंतरावरून तिचे ते हिरवे डोळे रोखून ती माझ्याकडेच पहात होती. एकाएकी तिची गालफाडं ताणली गेली, घशातली घरघर वाढली आणि तिचे डोळे लकाकू लागले. गालावर उमटण्यास असमर्थ असणारं हसू तिच्या डोळ्यांतून ओसंडत होतं, पण त्याला हसू तरी म्हणता आलं असतं का ? तो आनंद होता. तिच्या डोळ्यातल्या त्या आनंदात क्रौर्य आणि खुनशीपणा होता; आणि त्या पलीकडलंही काहीतरी होतं. त्या आनंदात एक आधाशीपणा होता. तो चेहरा मी कधीही विसरलो नसतो. माझ्या शरीरावरचा केस नं केस ताठ झाला. तिच अतिपरिचीत भीतीची थंड जाणीव पूर्ण त्वेषाने शरीरभर पसरली. पाय लटपटू लागले. आकृती इथवर कशी पोहोचली मला कळलंही नव्हतं. आणि मग आकृतीच्या घशातली ती घरघर मला ऐकू येऊ लागली. जातं दळावी तशी. घरघर..घरघर…स्पष्ट काही कानावर पडत नव्हतं माझ्या, पण त्या भेसूर स्वराला आसमंताने साथ द्यायला सुरुवात केली होती. त्यांच्या किरट्या, कर्कश आवाजाने सभोवताल भारला गेला. एके प्रकारचा शब्दभ्रम होता. तो स्वर भूल पाडत होता. आजुबाजुच्या निर्जीवाला, अचैतन्याला अवाहन करीत होता. माजघरात काहीतरी जिवंत होऊ लागलं. आजवर मृत असणारं, किंवा कधीच जिवंत नसणारं असं काहीतरी त्या सूरात सूर मिसळून बोलू लागलं. "कितीवेळचा पडणार आहेस तू सोफ्यावर ? तरी म्हणत होते 'एकच' घे म्हणून…उठ रे … आपल्याला जायचं नं मॉलमधे ? ५ मिनिटात हा फेसपँक काढते, चहा टाकलाय, उठ आणि घे आवरून आता ? श्शी बाई किती ते वेंधळं असावं माणसाने ?? " माझी धर्मपत्नी माझ्या नावांन शंख करत म्हणाली…… स्साला या बाया म्हणजे नं ….
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
kathaa
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
6385 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

:) शिर्षक वाचुनच

होबासराव
Tue, 08/04/2015 - 16:04 नवीन
शिर्षक वाचुनच पहिलि प्रतिक्रिया __/\__ :)
  • Log in or register to post comments

मेलो..

चिगो
Tue, 08/04/2015 - 16:23 नवीन
अरे देवा.. =)) =))
आपल्याला जायचं नं मॉलमधे ? ५ मिनिटात हा फेसपँक काढते, चहा टाकलाय, उठ आणि घे आवरून आता ? शशी बाई किती ते वेंधळं असावं माणसाने ?? " माझी धर्मपत्नी माझ्या नावांन शंख करत म्हणाली…… स्साला या बाया म्हणजे नं ….
गतप्राण.. गचकलो हसून हसून..
  • Log in or register to post comments

मस्त रे पगल्या भाऊ!!!

जडभरत
Tue, 08/04/2015 - 16:36 नवीन
मस्त रे पगल्या भाऊ!!! उत्कृष्ट विडंबन. आयला दिल जीत लिया तूने!!! शशी बाई किती ते वेंधळं असावं माणसाने ?? इथं फक्त श्शी बाई असं पाहिजे होतं.
  • Log in or register to post comments

क्रमशः

मुक्त विहारि
Tue, 08/04/2015 - 16:51 नवीन
राहिलेच की...
  • Log in or register to post comments

आयला...

ब़जरबट्टू
Tue, 08/04/2015 - 16:57 नवीन
कचरा केला राव पार.. बेक्कार फुटलो बघा... +10 घ्या... ( १०० शब्द = +१, १००० शब्द = +१० ) :)
  • Log in or register to post comments

हि हि हि . पण त्या मुळ

तुडतुडी
Tue, 08/04/2015 - 17:01 नवीन
हि हि हि . पण त्या मुळ प्रेरणेच विडंबन म्हणता येईल का हो ?
  • Log in or register to post comments

वाचा अन घाबरा !

पगला गजोधर
Tue, 08/04/2015 - 17:05 नवीन
तुम्हाला (वाचकांना) आवडतं नं घाबरायला, घ्या, पोट भरून घाबरा…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

+१

टवाळ कार्टा
Tue, 08/04/2015 - 17:10 नवीन
+१
  • Log in or register to post comments

हाहाहा, मस्त जमलीये कथा

मृत्युन्जय
Tue, 08/04/2015 - 18:01 नवीन
हाहाहा, मस्त जमलीये कथा
  • Log in or register to post comments

अय्यो !

मितान
Tue, 08/04/2015 - 18:04 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments

हा हा

पाटील हो
Wed, 08/05/2015 - 09:18 नवीन
हा हा
  • Log in or register to post comments

… स्साला या बाया म्हणजे नं ….

संजय पाटिल
Wed, 08/05/2015 - 12:47 नवीन
… स्साला या बाया म्हणजे नं …. च्या ऐवजी ....स्साला या बायका म्हणजे नं ... असावं का?
  • Log in or register to post comments

शीर्षकाशी जुळेल असं होणार नाही मग ते वाक्य

पगला गजोधर
Wed, 08/05/2015 - 13:00 नवीन
स्साला या बायका म्हणजे नं ... असावं का?
शीर्षकाशी जुळेल असं होणार नाही मग ते वाक्य म्हनुन … स्साला या बाया म्हणजे नं …. हे टन्कले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

=)) =)) =))

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 08/06/2015 - 15:06 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments

घरी वाचाला दिल्तं का?

माम्लेदारचा पन्खा
Fri, 08/07/2015 - 14:42 नवीन
सुबेच्चा....
  • Log in or register to post comments

तुम्हाला काय जातंय बोलायला …

पगला गजोधर
Fri, 08/07/2015 - 15:16 नवीन
तुमचं जर मी ऐकलं तर, बिल्डींगच्या जिन्या खाली पथारी टाकून झोपावं लागेल मग मला …
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

खिक्क्!

प्यारे१
Fri, 08/07/2015 - 15:38 नवीन
खिक्क्!
  • Log in or register to post comments

वा वा खतरा लिहलय!

रातराणी
Sat, 08/08/2015 - 10:33 नवीन
वा वा खतरा लिहलय!
  • Log in or register to post comments

हाहाहा

Pain6
Tue, 08/11/2015 - 10:53 नवीन
हाहाहा
  • Log in or register to post comments

घाबरलो ना राव....छान कथा.

तीरूपुत्र
Tue, 08/11/2015 - 11:29 नवीन
घाबरलो ना राव....छान कथा.
  • Log in or register to post comments

मस्त...

उगा काहितरीच
Tue, 08/11/2015 - 12:48 नवीन
मस्त...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा