मौरिशस ला जातोय..तरी काही माहिती हवी आहे

स न वि वि's picture
स न वि वि in जनातलं, मनातलं
2 Jul 2015 - 1:39 pm

ह्या ऑक्टोबर मध्ये मित्र-मैत्रिणी सोबत मौरिशस ला जातोय. ३ जोडपी आणि एक २.५ वर्षाचे मुल सोबत आहे. आमचा हा पहिलाच परदेशी दौरा आहे. तरी काही माहिती हवी आहे आणि ती मिळेल ह्याची खात्री आहे. आम्ही Coin de mire attitude - Mauritius मध्ये राहणार अहोत. आमच्या ६ दिवसाच्या ट्रीप मध्ये पहिले ३ दिवस sightseeing आहेत आणि बाकी चे ३ दिवस मोकळे जे आम्ही आमच्या सोयीनुसार घालवायचे. ह्या ट्रीप संधर्भात काही प्रश्न आहेत, जसे:

१. साधारण जेवण कितपत खर्चाचे असते? आपली currency, MUR च्या दृष्टीने बरीच कमी आहे जसे. आपले INR १० = MUR ५. ५५. तसे हॉटेल चा हाफ बोर्ड चा (BF + Dinner ) प्लान घेतला आहे. पण दुपारच्या जेवणाची सोय बाहेरच करावी लागणार .
२. भारतातून चलन बदलून न्यावे ? कि तिथेच बदलावे? कोणत्या चलनात बदलावे? INR to USD, कि INR to MUR ? साधारण किती INR जवळ ठेवावे?
३. बर्याच फोरम्स मधेय वाचतेय कि "मौरिशस ला पिण्याच्या पाण्याचे आबाळ आहेत. म्हणजे हॉटेलात जसे आपल्या इथे सर्रास आणि मुबलक पाणी असते तसे तिथे मिळत नहि."
४. मौरिशस मध्ये करण्यासारख्या बर्याच famous water activities आहेत, पण त्याच्या साधारण किमती सांगू शकाल का कुणी? आणि कोणत्या activities worth doing आहेत.?
५. ह्या activities चे साधारण काही packages असतात का? आणि ते कुठून बुक करू शकतो? हॉटेल द्वारे बुक करण्यासारखे असतात का?
६. मौरिशस मध्ये खरेदी करण्या जोगे असे काही आहे का?
७. साधारण परदेशी दौर्याला काय काय सोबत घ्यावे ?

मी इथे विचारलेल्या प्रश्ना व्यतिरिक्त अजून काही अवांतर माहिती मिळाल्यास उत्तम.

प्रवासअनुभवसल्लामाहिती

प्रतिक्रिया

दमामि's picture

2 Jul 2015 - 2:22 pm | दमामि

एकदा tripadvisor ला भेट द्या!

ते केलय... अजुन महिति हवि आहे.

कपिलमुनी's picture

2 Jul 2015 - 3:38 pm | कपिलमुनी

मिपा हुच्चभ्रू होत चालल्याची लक्षणे :)

सुमेरिअन's picture

2 Jul 2015 - 3:49 pm | सुमेरिअन

१. सर्वप्रथम MUR - INR currency conversion rate मधे तुमचा घोळ झालेला दिसतोय तो दुरुस्त करतो. १ MUR = २ INR (१० INR नव्हे) .

२. दुपारच्या जेवणाची किंमत तिथे हॉटेल to हॉटेल खुप vary होते असं बघण्यात आलं. आम्ही tamassa resort मधे थांबलो होतो. तिथे lunch १००० MUR ला होतं. Tour कंपनीने आम्हाला क्वाड बाईकिंग साठी एका ठिकाणी नेल होतं. तिथल्या साध्या मर्यादित भारतीय थाळीचा भाव ५०० MUR होता. तो खूप जास्त वाटला. शॉपिंग मॉल मधे एका भारतीय हॉटेलात १२० MUR मस्त थाळी मिळाली होती. आमचा तिथला driver आम्हाला सांगत होता कि तिथे local ठिकाणी जेवण स्वस्त मिळत. पण tourist spots ला रेट खूपच जास्त असतात.

३. सहा दिवसांसाठी दोघांच्या खर्चासाठी साधारणतः १५००० - २०००० MUR तुम्हाला लागतील असा पकडून चला. त्या हिशोबाने तुम्ही चलन सोबत नेऊ शकता. मी ICICI visa डेबिट कार्ड वापरून तिकडच्या ATM मधून लागेल तसे पैसे काढायचो. मला ते स्वस्त पडलं. याबद्दल तुम्ही तुमच्या बँक मधे चौकशी करू शकता.

४. आम्ही airport मधून रेसोर्त ला जात असतांना वाटेत एका दुकानातून १.५ लिटर च्या १० पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या घेतल्या होत्या. त्या परत येईपर्यंत पुरल्या. पण त्याची चिंता करायचा कारण नाही. तुम्ही दुसर्या दिवशी पण लागेल तर पाणी विकत घेऊ शकता. तिथले tour guide फार co -operative
आहेत. काही रेसोर्ट्समध्ये प्यायचा पाणी available असतं. Airport वर उतरल्यावर टुर गाईड कडून एखादा सीम कार्ड पण घेऊ शकता.

५. अत्युच्च दर्जाचे Glass bottom boat ride, snorkeling, wind surfing(including coaching), boat surfing, कयाकिंग आमच्या रेसोर्टमध्ये complimentary उपलब्ध होते. Resort ला private beach असेल तर तिथे मोस्टली सगळीकडेच असतात. या व्यतिरिक्त स्कूबा diving तुम्ही नक्कीच करू शकता. मोरिशिअस च्या चारही बाजूला खूप जास्त कोरल्स असल्यामुळे आणि पारदर्शक पाणी असल्यामुळे तिथे पाण्याखालील सृष्टी बघायची मज काहीच औरच आहे.
बाकी तुमच्या tour मध्ये १ दिवस water sports साठी असेलच. underwater walk , parasailing वगैरे. ठीक असतं. प्रचंड गर्दी असते.

६. TOM TOM tours हि तिथली मुख्य tour कंपनी आहे. आपल्याकडच्या बोटावर मोजण्या इतक्या travel कंपन्या सोडल्या तर इतर सगळ्या कंपन्यांचं tie up TOMTOM सोबतच आहे. तुम्ही तिकडे गेल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या पाच्कागे विषयी माहित गाईड कडून मिळेलच. त्याबद्दल बिनधास्त रहा.

७. DODO हा फक्त मोरिशिअस मध्ये आढळणारा आणि काही शे वर्षांपूर्वी नामशेष झालेला, न उडणारा पक्षी. त्याची छोटीशी प्रतिकृती आठवण म्हणून आणू शकता. अजून विकत घेण्यासारखं विशेष असा काही नाही.

९. Universal socket converter सोबत नेल्यास फायदा होईल.

१०. तुमच्या ३ leisure days मधे तुम्हाला एक दिवस cruise मधे जाता येईल. स्वस्त आहे ते comparatively . Seven color इर्थ, forest activities वगैरे आहेत. त्याची माहिती पुस्तिका पण तुम्हाला पहिल्या दिवशी तुमच्या गाईड कडून मिळेल. ती बघून तुम्ही planning करू शकता.

कुटुंबासोबत फिरायला जाण्यासाठी मोरिशिअस एक अतिशय सुंदर जागा आहे. आणि तुम्ही निवडलेला वेळ पण अगदी योग्य आहे.
मोरिशिअस मधली ७५% जनता हिंदू आहे. हिंदी गाणे सर्रास ऐकले जातात. हिंदी भाषा पण त्यांना बऱ्यापैकी कळते. भरपूर मंदिर आहेत. सगळीकडे भारतीय पद्धतीच जेवण मिळतं. आणि ४-५ पिढ्यान्खाली त्यांचं मूळ भारतातलं असल्याने भारताविषय त्यांना आत्मीयता पण आहे.
तिथली Hospitality पण एकदम मस्त. Tourism हा या देशाचा मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत असल्याने tourist ना सगळीकडे atmost priority मिळते.
अजून काही आठवलं कि पुन्हा टंकवतो. :)

स न वि वि's picture

3 Jul 2015 - 12:36 pm | स न वि वि

सुपर्ब माहिती दिल्या बद्दल धन्यवाद . आम्ही ज्या हॉटेल मध्ये आहोत (http://coindemire-hotel-mauritius.com/) तिथे तुम्ही सांगितल्या प्रमाणे Glass bottom boat ride, snorkeling (equipment) , boat surfing, कयाकिंग आमच्या रेसोर्टमध्ये complimentary उपलब्ध आहे. पण आता मला एक अशी गोष्ट कळली आहे ती अशी कि जर आपलि airline air Mauritius च्या व्यतिरिक्त असेल तर seat In Coach basis सुविधा इतर passengers न लागू होत नाही. थोडक्यात म्हणजे विमानतळापासून ते हॉटेल पर्यंत पोहोचायाची जी सोय असते तरे मिळत नाही . हे खरे आहे का?

कारण आम्ही Air Seychelles ची flt बुक केली आहे, ते flt direct नसून २ तासाचा layover आहे आणि Air Mauritius हि direct flt आहे. मला हि एक गोष्ट माहिती करून घ्यायची आहे

सुमेरिअन's picture

3 Jul 2015 - 4:55 pm | सुमेरिअन

असं काही असणं शक्य वाटत नाही. तरीही एकदा travel कंपनी कडून खात्री करून घ्या.

प्यारे१'s picture

3 Jul 2015 - 6:44 pm | प्यारे१

@ सुमेरियन,
लेखात लिहिलेलं 10 INR=5.55 MUR म्हणजेच जवळपास 0.5MUR म्हणजे 1 INR आणि 1 MUR म्हणजे 2 INR झाले की!
बाकी माहिती उत्तम.

सुमेरिअन's picture

6 Jul 2015 - 12:46 pm | सुमेरिअन

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. माझी वाचण्यात चुकी झाली होती.

कपिलमुनी's picture

6 Jul 2015 - 1:23 pm | कपिलमुनी

चूक झाली होती.