माझी रेखाटने- कृष्ण

सैरंध्री's picture
सैरंध्री in जनातलं, मनातलं
23 Aug 2008 - 1:02 pm

नमस्कार मंडळी,
आधीच्या रेखाटनांचा प्रतिसाद बघून अजून काही रेखाटने टाकण्याचा हुरूप आला आहे.
आधीच्या रेखाटनांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद

आज गोकुळाष्टमी. सर्वाना गोकुळाष्टमी आणि दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा !

बाळकृष्ण
Bal krishna

केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा
Krishna

राधा ही बावरी , हरीची राधा ही बावरी
Radha Krishna

मिनिएचर शैली - राधा कृष्ण
Radha Krishna - miniature

कलासंस्कृतीसद्भावनाशुभेच्छाविरंगुळा

प्रतिक्रिया

मिंटी's picture

23 Aug 2008 - 1:06 pm | मिंटी

सुरेख.........
अप्रतीम आहेत रेखाटने......................... :)

मिलिन्द खटावकर's picture

24 Aug 2008 - 10:51 pm | मिलिन्द खटावकर

:H सुरेख आहेत !!

देवदत्त's picture

23 Aug 2008 - 1:06 pm | देवदत्त

छान आहेत रेखाटने. :)

फक्त एक जाणवले. चेहर्‍याच्या मानाने ओठ लहान वाटतात. (बहुधा माझेही प्रमाण चुकले असू शकते :) )

टारझन's picture

23 Aug 2008 - 3:11 pm | टारझन

कधी कधी ... एवढी चांगली चित्रणे ... आमच्या कंन्याराशीला ट्रीगर करतात

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

बेसनलाडू's picture

23 Aug 2008 - 1:19 pm | बेसनलाडू

गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर अतिशय छान भेट दिलीत. सगळीच रेखाटने छान आहेत.
(आस्वादक)बेसनलाडू

मनीषा's picture

23 Aug 2008 - 1:25 pm | मनीषा

सगळीच चित्रे सुंदर ...

II राजे II's picture

23 Aug 2008 - 1:31 pm | II राजे II (not verified)

लहान बाळाची तुमची रेखाटने पाहून मला शंका होती की फोटोशॉप अथवा ईतर प्रणालीचा वापर करुन ती चित्रे तुम्ही तयार केली आहेत, पण कृष्ण रेखाटने पाहील्यावर माझ्या मनातील सर्व शंका दुर झाल्या.... खरोखर तुमच्या हाती सरस्वतीचाच वास आहे त्यामुळे तुम्ही ईतकी सुंदर रेखाटने करु शकता...

खरोखर अप्रतिम रेखाटने आहेत !

***
महाजालावर अनेक दगाबाज पाहील्यामुळे त्यामुळे मनात शंका होती त्या बद्दल क्षमस्व !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

पद्मश्री चित्रे's picture

23 Aug 2008 - 1:31 pm | पद्मश्री चित्रे

>>मिनिएचर शैली - राधा कृष्ण
खुप आवडले...
कालिन्दीच्या तीरी, घुमवी बासरी
सावळ्याच्या संगे राधा बावरी...

मदनबाण's picture

23 Aug 2008 - 1:34 pm | मदनबाण

व्वा फारच सुंदर ..

(ॐ नमो भगवते वासुदेवाय)
मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

विसोबा खेचर's picture

23 Aug 2008 - 1:54 pm | विसोबा खेचर

दुसरं चित्र आवडलं नाही. बाकी सर्व चित्रे क्लास!

असो, गोविदाच्या शुभेच्छा! :)

तात्या.

सहज's picture

23 Aug 2008 - 2:16 pm | सहज

चित्रकला अप्रतिम!!

अवांतर - आता अजुन नैसर्गिक चित्रे येउ देत म्हणजे पहिल्या चित्रातील लहान कृष्णाचा चेहरा व वासराचे तोंड एकाच मापाचे??
हरीण, शेळी, मेंढी छोटा आकार असतो पण गाय, घोडा चेहरा/तोंड मोठे असते आकाराने.

चित्रकला अप्रतिम!!

चिन्या१९८५'s picture

23 Aug 2008 - 2:26 pm | चिन्या१९८५

अतिशय सुंदर चित्र्!!!!!धन्यवाद

बघा- http://gandharvablog.blogspot.com/

सुर's picture

23 Aug 2008 - 2:46 pm | सुर

खुप सुंदर चित्र आहेत..

खरच खुप छान...

अप्रतिम....

Sweet Sonu
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *

शितल's picture

23 Aug 2008 - 5:24 pm | शितल

अगदी सुंदर रेखाटने.
:)
सर्वच आवडली.

भाग्यश्री's picture

23 Aug 2008 - 9:19 pm | भाग्यश्री

खरं सांगू का एखाद्या व्यक्तीने हाताने काढलीएत ही चित्रं हे तद्दन खोटं वाटावं इतकी सुंदर आली आहेत!!
अप्रतिम!! मी आजपर्यंत इतकी सुंदर चित्रं नाही पाहीली... येऊदेत अजुन!

प्रियाली's picture

23 Aug 2008 - 9:49 pm | प्रियाली

तुमची चित्रे पाहून तुमची चित्रकला केवळ छंदापुरती मर्यादीत नसावी असे वाटते.

पिवळा डांबिस's picture

23 Aug 2008 - 9:56 pm | पिवळा डांबिस

चित्रे सुरेख आहेत!
खूप खूप आवडली...

तुमची चित्रे पाहून तुमची चित्रकला केवळ छंदापुरती मर्यादीत नसावी असे वाटते.

सहमत. कमीतकमी तुम्ही चित्रकलेचे फॉर्मल शिक्षण तरी घेतले असावे. व्हेरी गुड!!
अजून येऊ द्यात!

४= उडणारे पक्षी, इतकेच येणारा,
पिवळा डांबिस

ऋषिकेश's picture

23 Aug 2008 - 10:07 pm | ऋषिकेश

चित्रेकलेच्या अंगाने उत्तम...अतिशय सुंदर चित्रे.
पण नेहेमीची छापिल पोस्टर-चित्रे पाहत आहोत असे वाटले.. चित्रकाराने मुक्तहृदयाने विचारांना मुर्त रूप दिले आहे असे वाटले नाहि...म्हणजे कृष्ण कसा असला पाहिजे याची ही चित्रे वाटली.. तुम्हाला कृष्ण कसा वाटतो ते सांगणारे चित्र कोणते?

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

स्वाती दिनेश's picture

23 Aug 2008 - 10:14 pm | स्वाती दिनेश

गोकुळाष्टमीची सुंदर भेट..
मनमोहनाची सगळीच चित्रे मनमोहक!
स्वाती

लिखाळ's picture

23 Aug 2008 - 11:46 pm | लिखाळ

सुंदर चित्रे ! अभिनंदन.
कृष्ण-राधा (राधा ही बावरी , हरीची राधा ही बावरी)हे चित्र सर्वात जास्त आवडले. सहज यांनी मांडलेला वासराच्या आकाराचा मुद्दा पटला.
--लिखाळ.

ऍडीजोशी's picture

24 Aug 2008 - 10:12 pm | ऍडीजोशी (not verified)

अहो तुमचे चित्र एका साईट वर फुकट वाटण्यात येतंय

हा पत्ता - http://www.commentsguru.com/graphics/hindu/

आपला,

ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

ऍडीजोशी's picture

24 Aug 2008 - 10:15 pm | ऍडीजोशी (not verified)

ह्या चित्रात तर रंग भरून कुणीतरी ते स्वतःच्या नावाने खपवलंय.

ऍडीजोशी's picture

24 Aug 2008 - 10:23 pm | ऍडीजोशी (not verified)

हे असले चौर्यकर्म करणार्‍यांचा मी जाहीर धिक्कार करतो.

(स्वतःचे लेख स्वतःच लिहीणारा) ऍडी जोशी

टारझन's picture

25 Aug 2008 - 11:21 am | टारझन

क्षमस्व

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

भाग्यश्री's picture

25 Aug 2008 - 4:18 am | भाग्यश्री

ह्म्म.. चित्र त्या दुसर्‍या माणसाने ढापले असेल तर वाईटच..पण अदर वे राऊंड पण असू शकते.. म्हणजे, त्या चित्रावरून सैरंध्रींनी चित्र काढले असेल. (मला, ऍडी जोशीने दिलेलं चित्र जास्त सफाईदार वाटले म्हणून हे डोक्यात आले..) ज्यात चुकीचे काहीच नाही.. कारण मीही बर्‍याचदा चित्र पाहूनच काढते. तसे असेल तर मात्र तसा उल्लेख करावा..

प्राजु's picture

25 Aug 2008 - 5:43 am | प्राजु

असेच वाटते...
पण चित्रे अप्रतिम..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सैरंध्री's picture

25 Aug 2008 - 5:46 am | सैरंध्री

जोशीसाहेब,
मी एक पोर्ट्रेट आर्टिस्ट आहे. पोर्ट्रेट आर्टिस्ट व्यक्तीचा फोटो समोर ठेवून किंवा त्या व्यक्तीला समोर बसवून त्याचे हुबेहुब चित्र काढतो.
मी आतापर्यंत अनेक रेखाटने काढली आहेत. ती सर्व मूळ चित्र समोर ठेवून काढली आहेत. त्यावेळी मी जालावरील मला आवडलेल्या काही चित्रांचे प्रिंटआऊट
काढून मग तो कागद समोर ठेवून ते चित्र रेखाटले आहे. (आणि इथे लावताना माझ्या रेखाटनाचा फोटो काढून लावला आहे.)
सिनेमातील नटनट्यांचे किंवा इतर प्रसिध्द व्यक्तींचे अनेक लोक रेखाटने काढतात. त्यावेळी ते त्यांचा एखाद्या मासिकातील किंवा इतरत्र प्रसिध्द झालेला
फोटो वापरतात. त्यात कसलेही चौर्यकर्म नसते.
तुम्ही मूळ चित्रे शोधून इथे लावली आहेतच ...तर एक काम करा. मूळ चित्र आणि मी रेखाटलेली चित्रे यात तुलना करा. दोन्ही मध्ये साम्य निश्चित आहे
कारण रेखाटने हुबेहुब काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण काहीतरी फरक ही असेलच की.
मी मागे माझ्या भाचीचे तिच्या फोटोवरून काढलेले चित्र इथे लावत आहे. त्यावरून पोर्ट्रेट आर्टिस्ट नेमेके काय करतो ते तुम्हाला समजेल.
मूळ फोटो
DSC02674
मी काढलेले रेखाटन
portrait
सरळ सरळ आरोप आणि धिक्कार करण्याआधी एकवार माझे म्हणणे काय आहे हे मांडण्याची संधी द्यावी असेही तुम्हाला वाटले नाही ?
इतरांची चित्रे मला स्वतःच्या नावावर खपवायचीच असती तर मी असे चित्र शोधले असते की जे (मूळ चित्र) सहजासहजी कोणाला सापडणार नाही.
एक चोर एवढी तर काळजी निश्चितच घेतो.
एनीवेज मला असल्या सवंग प्रसिध्दीची गरज तर नाहीचे आणि स्वतःला इथे सिध्द करण्याची गरज ही वाटत नाही. त्यामुळे या विषयावर हा माझा शेवटचा
प्रतिसाद राहील.
सैरंध्री

Painting is poetry that is seen rather than felt,
and poetry is painting that is felt rather than seen. -- Leonardo da Vinci

ऍडीजोशी's picture

25 Aug 2008 - 10:56 am | ऍडीजोशी (not verified)

अहो मी तुमचा धिक्कार कुठे केलाय? मला वाटलं की तुमची चित्र ढापली आहेत म्हणून मी ती चित्र इथे टाकली. रेफरंस घेऊन चित्र काढणे ह्यात कहिही वाईट नाहिये. गैरसमज नसावेत. नाहितर मी सरळ सैरंध्री ताईंचा धिक्कार असो असंच नसतं का लिहीलं?

आनंदयात्री's picture

25 Aug 2008 - 11:08 am | आनंदयात्री

>>हे असले चौर्यकर्म करणार्‍यांचा मी जाहीर धिक्कार करतो.

मग ऍडी या वाक्यातही तु सैरंध्रीचा नाही तर ते चित्र प्रसिद्ध करणार्‍याचा धिक्कार करतोय असे व्यक्तिशः वाटले नाही. तुझ्या जागी मी असलो असतो तर अश्या बेजबाबदार विधानाची माफी मागितली असती.

सैरंध्री चित्रे खुपच सुरेख आहेत, मिपावर अजुनही चित्रे येउ द्यावित ही विनंती.

ऍडीजोशी's picture

25 Aug 2008 - 12:00 pm | ऍडीजोशी (not verified)

माझ्या विधानांमधून माझं म्हणणं नीट लक्षात न आल्याने अर्थाचा अनर्थ झाला. माझ्या स्पष्ट न लिहीण्यामुळे सैरंध्री च्या भावना दुखावल्या गेल्या. त्या बद्दल मी त्यांची माफी मागत आहे.

आनंदयात्री's picture

25 Aug 2008 - 12:03 pm | आनंदयात्री

धन्यवाद ऍडी.

सैरंध्री's picture

25 Aug 2008 - 5:50 am | सैरंध्री

सर्व आस्वादकांचे मनःपूर्वक आभार.
सैरंध्री

Painting is poetry that is seen rather than felt,
and poetry is painting that is felt rather than seen. -- Leonardo da Vinci

अनिल हटेला's picture

25 Aug 2008 - 11:36 am | अनिल हटेला

सैरंध्री देवी!!

अर्थाचा अनर्थ झालाये ..............

प्लीज मनावर नका हो घेउत ...........

एडी भौ ला वेगळ म्हणायच होत ,

अर्थ वेगळा निघतोये........

असो .........

चित्रे सगळी च बढीया श्रेणीतली आहेत ....

अजुनही बघायला आवडतील......................

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

ईश्वरी's picture

25 Aug 2008 - 12:52 pm | ईश्वरी

सैरंध्री , सर्व चित्रे सुरेख.
भाचीचेही हुबेहुब आले आहे.
मीही काहीवेळेस छापील चित्रावरून पेन्सिल ने चित्रे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ती चित्रे एवढी खास काही जमली
नाहीत. चेहर्‍यावरचे भाव ,हातांची बोटे,डोळे तुझ्याइतके सुबक मला कधीच काढता आले नाहीत. चित्रातील बारकावे
काढण्याचे कसब ही छान आहे.
मला वाटते चित्रे बघून काढणे हे पण अजिबात सोपे नाही. तिही एक कलाच आहे आणि मला त्या कलेचा आदर
आहे. तुझी चित्रे खरोखर आवडली. अजूनही टाक तुझी चित्रे. आवडतील बघायला.
ईश्वरी