लहान बाळाची तुमची रेखाटने पाहून मला शंका होती की फोटोशॉप अथवा ईतर प्रणालीचा वापर करुन ती चित्रे तुम्ही तयार केली आहेत, पण कृष्ण रेखाटने पाहील्यावर माझ्या मनातील सर्व शंका दुर झाल्या.... खरोखर तुमच्या हाती सरस्वतीचाच वास आहे त्यामुळे तुम्ही ईतकी सुंदर रेखाटने करु शकता...
खरोखर अप्रतिम रेखाटने आहेत !
***
महाजालावर अनेक दगाबाज पाहील्यामुळे त्यामुळे मनात शंका होती त्या बद्दल क्षमस्व !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
चित्रकला अप्रतिम!!
अवांतर - आता अजुन नैसर्गिक चित्रे येउ देत म्हणजे पहिल्या चित्रातील लहान कृष्णाचा चेहरा व वासराचे तोंड एकाच मापाचे??
हरीण, शेळी, मेंढी छोटा आकार असतो पण गाय, घोडा चेहरा/तोंड मोठे असते आकाराने.
चित्रकला अप्रतिम!!
खरं सांगू का एखाद्या व्यक्तीने हाताने काढलीएत ही चित्रं हे तद्दन खोटं वाटावं इतकी सुंदर आली आहेत!!
अप्रतिम!! मी आजपर्यंत इतकी सुंदर चित्रं नाही पाहीली... येऊदेत अजुन!
चित्रे सुरेख आहेत!
खूप खूप आवडली...
तुमची चित्रे पाहून तुमची चित्रकला केवळ छंदापुरती मर्यादीत नसावी असे वाटते.
सहमत. कमीतकमी तुम्ही चित्रकलेचे फॉर्मल शिक्षण तरी घेतले असावे. व्हेरी गुड!!
अजून येऊ द्यात!
४= उडणारे पक्षी, इतकेच येणारा,
पिवळा डांबिस
चित्रेकलेच्या अंगाने उत्तम...अतिशय सुंदर चित्रे.
पण नेहेमीची छापिल पोस्टर-चित्रे पाहत आहोत असे वाटले.. चित्रकाराने मुक्तहृदयाने विचारांना मुर्त रूप दिले आहे असे वाटले नाहि...म्हणजे कृष्ण कसा असला पाहिजे याची ही चित्रे वाटली.. तुम्हाला कृष्ण कसा वाटतो ते सांगणारे चित्र कोणते?
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
सुंदर चित्रे ! अभिनंदन.
कृष्ण-राधा (राधा ही बावरी , हरीची राधा ही बावरी)हे चित्र सर्वात जास्त आवडले. सहज यांनी मांडलेला वासराच्या आकाराचा मुद्दा पटला.
--लिखाळ.
अहो तुमचे चित्र एका साईट वर फुकट वाटण्यात येतंय
हा पत्ता - http://www.commentsguru.com/graphics/hindu/
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
ह्म्म.. चित्र त्या दुसर्या माणसाने ढापले असेल तर वाईटच..पण अदर वे राऊंड पण असू शकते.. म्हणजे, त्या चित्रावरून सैरंध्रींनी चित्र काढले असेल. (मला, ऍडी जोशीने दिलेलं चित्र जास्त सफाईदार वाटले म्हणून हे डोक्यात आले..) ज्यात चुकीचे काहीच नाही.. कारण मीही बर्याचदा चित्र पाहूनच काढते. तसे असेल तर मात्र तसा उल्लेख करावा..
जोशीसाहेब,
मी एक पोर्ट्रेट आर्टिस्ट आहे. पोर्ट्रेट आर्टिस्ट व्यक्तीचा फोटो समोर ठेवून किंवा त्या व्यक्तीला समोर बसवून त्याचे हुबेहुब चित्र काढतो.
मी आतापर्यंत अनेक रेखाटने काढली आहेत. ती सर्व मूळ चित्र समोर ठेवून काढली आहेत. त्यावेळी मी जालावरील मला आवडलेल्या काही चित्रांचे प्रिंटआऊट
काढून मग तो कागद समोर ठेवून ते चित्र रेखाटले आहे. (आणि इथे लावताना माझ्या रेखाटनाचा फोटो काढून लावला आहे.)
सिनेमातील नटनट्यांचे किंवा इतर प्रसिध्द व्यक्तींचे अनेक लोक रेखाटने काढतात. त्यावेळी ते त्यांचा एखाद्या मासिकातील किंवा इतरत्र प्रसिध्द झालेला
फोटो वापरतात. त्यात कसलेही चौर्यकर्म नसते.
तुम्ही मूळ चित्रे शोधून इथे लावली आहेतच ...तर एक काम करा. मूळ चित्र आणि मी रेखाटलेली चित्रे यात तुलना करा. दोन्ही मध्ये साम्य निश्चित आहे
कारण रेखाटने हुबेहुब काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण काहीतरी फरक ही असेलच की.
मी मागे माझ्या भाचीचे तिच्या फोटोवरून काढलेले चित्र इथे लावत आहे. त्यावरून पोर्ट्रेट आर्टिस्ट नेमेके काय करतो ते तुम्हाला समजेल.
मूळ फोटो
मी काढलेले रेखाटन
सरळ सरळ आरोप आणि धिक्कार करण्याआधी एकवार माझे म्हणणे काय आहे हे मांडण्याची संधी द्यावी असेही तुम्हाला वाटले नाही ?
इतरांची चित्रे मला स्वतःच्या नावावर खपवायचीच असती तर मी असे चित्र शोधले असते की जे (मूळ चित्र) सहजासहजी कोणाला सापडणार नाही.
एक चोर एवढी तर काळजी निश्चितच घेतो.
एनीवेज मला असल्या सवंग प्रसिध्दीची गरज तर नाहीचे आणि स्वतःला इथे सिध्द करण्याची गरज ही वाटत नाही. त्यामुळे या विषयावर हा माझा शेवटचा
प्रतिसाद राहील.
सैरंध्रीPainting is poetry that is seen rather than felt,
and poetry is painting that is felt rather than seen. -- Leonardo da Vinci
अहो मी तुमचा धिक्कार कुठे केलाय? मला वाटलं की तुमची चित्र ढापली आहेत म्हणून मी ती चित्र इथे टाकली. रेफरंस घेऊन चित्र काढणे ह्यात कहिही वाईट नाहिये. गैरसमज नसावेत. नाहितर मी सरळ सैरंध्री ताईंचा धिक्कार असो असंच नसतं का लिहीलं?
>>हे असले चौर्यकर्म करणार्यांचा मी जाहीर धिक्कार करतो.
मग ऍडी या वाक्यातही तु सैरंध्रीचा नाही तर ते चित्र प्रसिद्ध करणार्याचा धिक्कार करतोय असे व्यक्तिशः वाटले नाही. तुझ्या जागी मी असलो असतो तर अश्या बेजबाबदार विधानाची माफी मागितली असती.
सैरंध्री चित्रे खुपच सुरेख आहेत, मिपावर अजुनही चित्रे येउ द्यावित ही विनंती.
माझ्या विधानांमधून माझं म्हणणं नीट लक्षात न आल्याने अर्थाचा अनर्थ झाला. माझ्या स्पष्ट न लिहीण्यामुळे सैरंध्री च्या भावना दुखावल्या गेल्या. त्या बद्दल मी त्यांची माफी मागत आहे.
सर्व आस्वादकांचे मनःपूर्वक आभार.
सैरंध्रीPainting is poetry that is seen rather than felt,
and poetry is painting that is felt rather than seen. -- Leonardo da Vinci
सैरंध्री देवी!!
अर्थाचा अनर्थ झालाये ..............
प्लीज मनावर नका हो घेउत ...........
एडी भौ ला वेगळ म्हणायच होत ,
अर्थ वेगळा निघतोये........
असो .........
चित्रे सगळी च बढीया श्रेणीतली आहेत ....
अजुनही बघायला आवडतील......................
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
सैरंध्री , सर्व चित्रे सुरेख.
भाचीचेही हुबेहुब आले आहे.
मीही काहीवेळेस छापील चित्रावरून पेन्सिल ने चित्रे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ती चित्रे एवढी खास काही जमली
नाहीत. चेहर्यावरचे भाव ,हातांची बोटे,डोळे तुझ्याइतके सुबक मला कधीच काढता आले नाहीत. चित्रातील बारकावे
काढण्याचे कसब ही छान आहे.
मला वाटते चित्रे बघून काढणे हे पण अजिबात सोपे नाही. तिही एक कलाच आहे आणि मला त्या कलेचा आदर
आहे. तुझी चित्रे खरोखर आवडली. अजूनही टाक तुझी चित्रे. आवडतील बघायला.
ईश्वरी
प्रतिक्रिया
सुरेख......... अ
सुरेख
छान आहेत
कन्यारास
अतिशय सुरेख!
सुरेख
लहान
आवडले..
अप्रतीम
दुसरं
उत्तम कलाकुसर
अतिशय
खुप सुंदर
मस्तच.
खरं सांगू
फारच सुंदर
सुंदर!
चित्रेकले
वावा..
वा !!
.
आयला
.
क्षमस्व
ह्म्म..
मलाहि..
जोशीसाहेब,
गैरसमज नकोत
मग
खरंय
धन्यवाद
सर्व
सैरंध्री
सर्व चित्रे सुरेख.